क्रमश : भाग ७८
आदिराजचे लग्न ठरले होते तरीही त्याने स्वतःला कामात झोकून दिले हिते .. त्यांच्या सगळ्या कंपनीजला विझिट करत होता .. कामाचा लोड सध्यातरी खूप होता ..पण स्पृहाने सुनीताला सांगून त्याचे चांगले सेट अपलावून दिले होते .. नाश्ता केल्या शिवाय पाठवायचे नाही .. शिवाय टिफिन ती स्वतः करून बाबां बरोबर पाठवायची .. त्याचा पण आणि त्यांचा पण . इतका तो कामात बिझी झाला होता कि गेल्या चार दिवसांत तो स्पृहाला भेटला पण नव्हता .. रात्री एवढा थकून जायचा कि तिच्याशी बोलायला त्याला त्राण नसायचे ..
स्पृहाच्या घरी लग्नाची तयारी जोरदार चालू होती .. लग्नाचे शॉपिंग,सा ड्या, शालू , घेऊन झाले होते .. रुखवत , भांडी कुंडी घेऊन झाले होते .. एकेक पै पाहुणे घरात उद्या पासून येणार होते .. मग पापड बनवायचे असे प्लॅनिंग होते .. स्पृहाच्या पार्लर च्या अपॉईंटमेंट , हेअर स्टाईल्स ची प्रॅक्टिस वगैरे अशी वेगळूच गडबड चालू होती .. आजी एकेक कामाची आठवण संगीताला करून देत होत्या आणि संगीता ती काम उरकत होती ..
श्रीधरने त्याचा पी एफ ठेवला होता तो काढला होता .. कशातच कमतरता राहणार नाही याची खबरदारी घेत होते .. छान हॉल बुक कला , जेवणाच्या ऑर्डर्स झाल्या , मेनू फिक्स झाला , देण्या घेण्याचे कपडे खरेदी झाले .. जावयाची चेन अंगठी आणि ब्रेसलेट झाले , स्पृहाचे दागिने अर्धे होतेच , छोटे मोठे काय होते ते खरेदी चालू होती .. आदिराजच्या मामा मामी , आत्या काका , डॅड यांना द्यायला भारीतले कपडे घेतले .. जावयाचे कपडे घेतले ..
दोन दिवस आधी घराला लायटिंग लावायची ऑर्डर दिली होती .. एकंदरीत सगळे आनंदी वातावरण होते एकुलत्या एक मुलीचे लग्न म्हणजे आयुष्यभराचे महत्वाचे काम होते ते त्यांच्यासाठी ..
आज आदी दिवसभर मिटिंग मध्ये होता .. आणि स्पृहाने त्याला दुपारी तीन वेळा कॉल केला पण ह्याला कॉल उचलायला जमलेच नाही .. नेहमीच कोणीतरी बरोबर असायचे आणि कामामुळे त्यांना जा असे म्हणता पण येईना .. स्पृहा तशी चिडखोर नव्हतीच .. पण आता या खास क्षणी तो तिला हवा होता .. हि हेअर स्टाईल कशी वाटेल .. ? अशी मेहंदीची डिझाईन कशी वाटेल ?असे छोटे छोटे प्रश्न तिला पडायचे आणि आदींचे ओपिनियन घ्यावे असे तिला वाटायचे पण नेमका तोच नव्हता तिच्या बरोबर..
डॅड त्यांच्या घरी बिझी झाले .. आमंत्रण , घरातली तयारी सगळी त्यांच्यावरच पडली होती .. दोन दिवसांनी लगेच रिस्पेशन होते .. आणि त्यांचा व्याप मोठा होता .. खूप मोठं मोठे बिझनेसमन , नेते , अभिनेते येणार होते रिसेप्शनला त्यामुळे त्या इवेंट मॅनेजर कडून सगळी तयारी करून घेत होते .. आणि त्यामुळे आदी वर कामाचा लोड पडला होता ..
इकडे स्पृहाला वाटले कि हा कामात असताना त्याला मी डिस्टरब करतेय तर कदाचित आता तो चिडला असेल .. आणि तिला अस्वथपणा आला होता . आणि तिने कसलाही विचार न करता त्याला मेसेज पाठवला " सॉरी .. तुला कामात डिस्टरब केले .. इतके अर्जंट नाहीये "
त्याला उगाचच वाटले हा मेसेज तिने रागात टाकला.. कि काय?
संध्याकाळी कामं उरकून हा घरी निघाला पण आपोआप त्याने स्पृहाच्या घराची वाट पकडली .. तिच्या घरी आला तर ती नेमकी पार्लरला गेली होती ..
आदी " काकू , मी स्पृहला भेटूनच जाईन .. मी तिच्या रूम मध्ये वाट बघत बसतो "
संगीता " आदी , तिला यायला एक तास आहे .. आत्ताच गेलीय ती "
आदी " ठीक आहे .. मी थांबतो .. माझे काम लॅपटॉप वर करत बसतो ..
संगीता " ठीक आहे तू फ्रेश हो .. मी चहा करते "
आदी " नको चहा .. आज मी जेवूनच जाईल " आणि गोड हसला .
संगीता " हो .. नक्कीच .. जेवूनच जा .. पण आधी चहा घे म्हणजे फ्रेश वाटेल .. किती दमला आहेस तू "
आदी स्पृहाच्या रूम मध्ये लॅपटॉप ओपन करून बसला खरा .. पण पाचच मिनिटात त्याला बेड वर झोप लागून गेली
संगीता चहा आणे पर्यंत गाढ झोपला तो .. संगीताने फॅन फास्ट केला आणि लाईट्स ऑफ केले ..
एक तासाने स्पृहा आली तर बाहेर आदी ची गाडी दिसली ..
लगेचच त्याला भेटायला तिच्या रूम मध्ये गेली तर साहेब गाढ झोपले ले आणि मोबाईल व्हायब्रेट होत होता ..
स्पृहाने मोबाईल बघितला तर डॅड चा कॉल होता म्हणून तिने पीक केला आणि सांगितले कि तो झोपलाय .. मग डॅड म्हणाले " ठीक आहे .. त्याला आराम करू दे .. काम करून थकलाय तो "
स्पृहा खाली जाऊन संगीताला जेवणात मदत करू लागली .. श्रीधर पण पत्रिका वाटायला गेले होते..
रात्री आदीला जाग आली तर रात्रीचे ११ वाजले होते .. तो उठला आणि फ्रेश होऊन खाली आला
आदी " सॉरी .. मला झोप लागली .. स्पृहा कुठेय ?"
स्पृहा बाहेर आली " चला बाबा , जेवून घ्या "
आदी साठी सगळेच जेवायचे थांबले होते ..
आदी " अरे .. तूम्ही लोक कशाला थांबले इतका वेळा जेवून घ्यायचं होते ना "
आजी " जावई बापू .. आता तुमच्या आधी आम्ही कसे जेवायचं ?"
आदी " आजी , अहो असे काही नसते "
बोल बोलता सगळे जेवायला बसले .. भरपेट जेवला तो ..
श्रीधर " मी आणि संगीता आईसक्रिम घेऊन येतो .. "
आजी " मी जाते बाबा आता झोपायला .. मला खूप झोप आलीय "
आदिला आणि स्पृहाला एकत्र बोलायला वेळ मिळावा म्हणून हे सगळे चालू होते .. स्पृहाने पटकन भांडी घासली आणि हात पुसतच बाहेर आली
आदी " तू चिडलीय का माझ्यावर ?"
स्पृहा " नाही .. चिडेन कशाला ?"
आदी " सॉरी जरा खूपच कामात होतो "
स्पृहा " हो मी समजू शकते "
आदी " नक्की ना तू चिडली नाहीस ?.. तू कॉल केला होतास ना काही बोलायचे होते का ?"
स्पृहा " हा ते पार्लर वाली ने दोन तीन हेअर स्टाईल करून दाखवल्या होत्या .. मी फोटो काढून ठवलेत .. तुला कोणतीही आवडते ते सांग म्हणजे ती फायनल करू ? ? शिवाय मेहंदीच्या डिझाईन पण फायनल करायच्यात "
आदीने तिचे हात हातात घेतला .. आणि त्यावर ओठ ठेवले
आदी " सॉरी , तू कॉल केलास आणि मी उचलला नाही .. तुला राग नाही ना आला "
स्पृहा " नाही रे अजिबात नाही .. तू कामात असशील .. उलट मला वाटले कि मीच तुला सारखा फोन करून त्रास तर नाही ना देत "
आदी " तुझा त्रास होईल का मला ?" त्याने भुवया उंच करून प्रश्न केला
स्पृहा " त्रास म्हणजे डिस्टरब रे "
बोलतच आदी तिच्या मांडीवर डोके ठेवून पडला
आदी " स्पृहा , उद्या पासून गेस्ट येतील .. आत्या काका आणि तिची मुलगी रिया येतेयऑस्ट्रेलिया वरून.. मामा मामी आणि त्याचा मुलगा विजय येतोय गावातून.. मला असे झालेय कधी एकदा तू आमच्या घरात येतेय "
स्पृहा त्याच्या केसांत हात फिरवत " हमम .. आता लवकरच मी कायमची तुमच्या घरात येणार आहे .. " जरा नाराजीतचं बोलली
आदी " तू नाराज आहेस ?"
स्पृहा " नाराज नाही .. पण खूप धड धड होतेय .. या रूमला आता कायमचे सोडायला लागेल , हे घर सोडावे लागेल , आई बाबा ... आजी " पुढे बोलूच शकली नाही .. डोळ्यांतून पाणी आले तिच्या " सगळ्यांना कायमचं सोडायला लागेल .. आदी .. माझे काही चुकलं तर .. माझे काही वागणे तुला , डॅड आवडले नाही तर .. "
आदी " अग स्पृहा , मी येऊ का तुमच्याकडे मग घर जावई बनून .. मला चालेल .. रोज रोज असे सासू बाईंच्या हातचे जेवण जेवायला मिळेल .. "
स्पृहा " आदी , तुला मजाक सुचतोय .. एक मुलीच्या आयुष्यात किती मोठा बदल असतो .. असे आपले घर सोडून जायचं आणि दुसऱ्याच्या घरात राहायचं .. तुला समजणार नाही ते ? एक प्रकारचे आपल्या घरात आम्ही मुली नंतर पाहुण्या होत जातो..
आदी " हमम .. आय कॅन अंडरस्टॅंड "
स्पृहा " आदी , आपण महिन्यातून एकदा इकडे रहायला येत जाऊ .. आई बाबांना माझ्या शिवाय कोणी नाहीये .. ते काय करतील मी गेल्यावर "
आदी " आपण त्यांना सेकंड हनिमून ला पाठवू " आणि हसला
स्पृहा " काय रे आदी .. चिडवू नको ना "
आदी " अग , तू ना इतकी क्युट दिसतेय ना अशी रडताना .." म्हणतच तीच गाल ओढले त्याने
स्पृहा " बरं तुला घरी नाही जायचंय का ? डॅड चा फोन आला होता "
आदी " नको ना कटवू .. जरा असे छान वाटतंय असा निवांतपणा पुन्हा कधी भेटेल.. "
तो बोलत होता पण स्पृहाच्या मनातली घालमेल त्याला जाणवत होती .. लग्नाआधी प्रत्येक मुलीला जी भीती वाटते तीच भीती ती तिच्या डोळ्यांत होती.
त्याने अलगद तिचा हात त्याच्या हातात घेतला .. विश्वासाने
आदी " बरं , ऐक मी काय सांगतो .. अजून काही आई बाबा म्हातारे झालेले नाहीयेत .. अजूनही ते जग फिरायला जाऊ शकतात .. त्यांचे लाईफ एन्जॉय करू शकतात .. आजीला आपण आपल्या कडे घेऊन जाऊ आणि आई बाबांना खरंच जरा मोकळे सोडू .. मग बाबा रिटायर्ड झाले ना कि आपल्याला जे बाळ होईल ना ते सांभाळायला आजी आजोबा पाहिजेतच ना . मग .. जास्त निगेटिव्ह विचार करू नकोस .. आता फक्त छान छान स्वप्न बघू आणि ती पूर्ण करू .. " "
स्पृहा एकदम लाजली " काहीपण असत तुझे ? इथे मला कसले कसले टेन्शन आलाय आणि तू ?"
आदी "कसले टेन्शन आलंय ?"
स्पृहा " तू एवढा श्रीमंत , हुशार .. लोक म्हणायचे कि मी तुला नादी लावलं म्हणून .. तेही पैशांसाठी .. मोठ्या घरासाठी?"
आदी " हा रे... नादी तर लावलंय तू ? पण पैशासाठी नाही ग .. काही पण विचार करते ? आणि कोण म्हंटले कि तू गरीब आहेस ? तू किती करोडपती आहेस माहीतच नाहीये तुला ?"
स्पृहा " हा म्हणे मी करोडपती "
आदी " हे करोडोचे डोळे , हे करोडोचे नाक , हे करोडोचे ओठ , करोडोचे गाल .. सगळे रडल्यामुळे लाल होतात .. आणि माझी अशी सुंदर बायको टोमॅटो सारखी लाल दिसते मग ..किती करोडचे नुकसान होतेय ? काय सांगू तुला ?"
स्पृहा " आदी , काय पण असत तुझे ?
आदी " काहीपण नाही .. मी खरं बोलतोय ग .. राणी .. आणि घराचं म्हणशील तर तुझी नि माझी भांडण झाल्यावर तू मला घरातून हाकलून दिल्यावर मी कुणीकडे जाणार बिचारा .. मग इथेच तर येईन ना मी झोपायला " आणि हसला
स्पृहा " काही हि काय ? मी कशाला असे करेन ?"
आदी " करतात बायका .. नवऱ्या कडून चुका झाल्या कि बेडरूम मधून बाहेर काढतात "
स्पृहा इतकी लाजत होती .. आणि हा मुद्दामून तिला हसवायला अजूनच बोलत होता ..
आदी " आता बघ कशी छान दिसतेस .. तुला एक सांगू .. आदिराज द बिसनेस मॅन ची बायको अशी रडली तर कसे चालेल .. ? किती मोठे नुकसान आहे माझे माहितेय तुला ?"
शेवटी शेवटी तिला हसवलीच त्याने ... तेही खळखळून .. आणि मग घरी गेला ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा