क्रमश : भाग ७७
सुनील नेहमी सारखा ऑफिसला जायला तयार होत होता .. आज जरा वैतागलाच होता .. तेजूने त्याला सकाळी वेळेत उठवले नाही उलट तीच झोपून राहिली होती .. त्यामुळे त्याची खूप घाई चालली होती ..
सुनील " तेजू यार .. दे ना लवकर डबा .. किती उशीर "
तेजू " अरे थांब ना .. नाही होत आहे मला पटपट .. आज मला थकल्या सारखं होतंय .. डोकं पण दुखतंय .."
सुनील एकदम खुश झाला . कदाचित गुड न्यूज येण्याची चाहूल लागली होती
सुनील एकदम नरमला " असे होय .. मग तू आराम कर .. पण एक छोटे काम करशील प्लिज .. "
तेजू " नाही .. यार .. प्लिज मला काही काम सांगू नकोस .. मला जाम कसेतरी होतंय ?"
सुनील अजून खुश झाला ...
सुनीलने तिला प्रेग्नसी किट दिले .. चेक कर म्हणून सांगितले
तेजू " काय सुनील ? कशाला ? तुला माहितेय ना आपल्याला नाही होणार बाळ ? कशाला उगाच ?" ती वैतागत्तच बोलली
सुनील " एकदा माझ्या साठी कर प्लिज .. "
तेजू " मी चेक करेन पण ते टेस्ट निगेटिव्ह येते आणि मला खूप दुःख होते .. मी रिझल्ट नाही पाहणार "
सुनील "ठीक आहे , मी रिझल्ट चेक करेन तू फक्त टेस्ट कर आणि बाहेर ये ओके डार्लिंग " त्याचा स्वरच एकदम बदलला होता.
शेवटी बिचारी चेक करायला वॉशरूम मध्ये गेली .. आणि आतूनच ओरडली..
सुनील " तेजू .. काय होतंय .. दार उघड ना .. " खूप टेन्शन मध्ये आला होता तो
ती बाहेर आली ती रडतच आली ..
सुनील " इट्स ओके डार्लिग .. नाही तर नाही .. रडतेस कशाला ? मला असे उगाच वाटले .. सॉरी मी उगाच त्रास दिला तुला ...तो एकदम नाराज होऊन बोलत होता .. आणि ती खूपच रडत होती .. हमसून हमसून .. इतके कि तिला बोलायलाच होत नव्हते .
तिने किट सुनीलच्या हातात दिले .. सुनीलने बघितले तर तो वेड्या सारखा ओरडायला लागला .. इतका कि आई कशी बशी धावत त्यांच्या रूम मध्ये आली ..
आई " काय रे सुनील ? काय करतोय काय ? केवढ्यांदा ओरडलास ?"
सुनीलने आईला गर्रकन फिरवले " आई, तेजू इज प्रेग्नन्ट "
आईच्या डोळ्यांतून पण आनंदाश्रू आले ..त्यांनी तेजुला घट्ट मिठी मारली " पोरी .. खूप धीराची निघालीस ग ? देवाने तुझ्या पदरात मुलं टाकले म्हणायचे "
तिघांनी एक मेकांना एकच मिठी मारली आणि मनसोक्त रडून,ओरडून आनंद व्यक्त केला ..
थोडे सावरल्यावर सुनीलने डॉक्टर ची अपॉइंटमेंट घेतली आणि पुढील तयारीला लागला ..
तेजूचे पाय आज जमिनीवरच नव्हते .. किती तरसली होती ती त्या प्रेग्नसी किट वर दोन रेषा पाहण्यासाठी .. जेव्हा जेव्हा तिने त्या पाहिल्या तेव्हा तेव्हा रिझल्ट निगेटिव्हच असायच्या आणि ह्या वेळी जेव्हा ती अजिबातच अपेक्षा करत नव्हती तर टेस्ट पॉझिटिव्ह आली होती .. सुनील च्या आनंदाला पण आज सीमा नव्हती .. असे होईल यावेळी त्याला खात्री होती पण विश्वास नव्हता .. तिला लिटरली उचलूनच त्याने दवाखान्यात आणले होते ..
डॉक्टर मॅडम नि लगेचच टेस्ट केल्या .. सोनोग्राफी केली आणि प्रेगन्सी कनफर्म केली .. लिटरली मॅडम च्या पण डोळ्यांत त्या दोघांशी बोलताना पाणी आले .. तेजू अल्मोस्ट डिप्रेशन मध्ये गेली होती .. प्रयत्न करूनही त्यान्ना यश येत नव्हते .. आणि ह्या वेळी चक्क नॅचरल कन्सिव्ह झाले होते . फक्त इनिशिअल गोळ्या मॅडम ने दिल्या होत्या . IVF वगैरे केले नव्हते .. अजूबा म्हणा चमत्कार म्हणा पण काहीही असो कोणतीही गोष्ट वेळ आल्या शिवाय होत नाही .. आणि होयची असली कि आपोआप होते .. तोपर्यंत आपण प्रयन्त सोडायचे नाहीत आणि आपले पेशन्स पण सोडायचे नाहीत
आज अशा कितीतरी मुली आहेत कि लग्न झाल्या झाल्या प्रेगन्सी राहिली म्हणून अबोर्ट करतात किंवा करायचा विचार करतात.. जेव्हा काहीही न करता कोणती गोष्ट मिळते ना तेव्हा त्याची किंमत राहत नाही असेच आहे .. तेजू सारख्या असंख्य स्त्रिया आज मातृत्वासाठी झगडत आहेत .. आई होणे ह्याचा इतका आनंद दुसरा नाही .. आपल्या गर्भात होत असलेल्या एका जीवाची हालचाल , आपल्या बाळाला दूध पाजायच समाधान दुसऱ्या कशात नाही .. ते फक्त एक स्त्रीच समजू शकते .. आणि हे सुख स्त्रीला तिचे स्त्रीत्व मिळवून देत असते .. जणू आपल्या जन्माचे सार्थकच झाले असे तिला भासते ..
तर मंडळी तेजस्विनी सुनीलची हि मातृत्वाला आसुसलेली स्त्री आणि तिच्या वेदना सांगणारी कथा आहे .. सुनील तिचा पती आणि त्याची आई या दोघांना मी कथेमध्ये खूपच चांगले दाखवले आहे .. सपोर्टिव्ह दाखवले आहे प्रत्यक्षांत नवरा आणि सासू हि दोन माणसे अशी असतीलच यांची खात्री नाही .. पण असा प्रॉब्लेम असलेल्या स्त्रीच्या जीवनाला सुद्धा सुंदर बनवता येऊ शकते आणि ते फक्त तिच्या फॅमिलीवर अवलंबून आहे हेच मला या कथेतून सांगायचे आहे..
एक स्त्री जर आई नाही होऊ शकली तर तिच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाहीये ..
एका पॉईंट ला तेजूने हे एक्सेप्ट केले होते कि आपल्याला आता बाळ होणार नाहीये .. सुरुवातीला ती या एका गोष्टीमुळे डिप्रेशन मध्ये गेली होती पण सुनीलने त्याच्या प्रेमाने हळू हळू तिला समजून घेत तिला या दुःखातून बाहेर काढले .. त्यासाठी तो डॉक्टरान्कडून तिच्याशी खोटेही बोलला कि प्रॉब्लेम सुनील मध्ये आहे तिच्या मध्ये नाहीये .. कारण ती त्याचे दुसरे लग्न लावून देण्या पर्यंत गेली होती .. या सगळ्यांतून ती बाहेर तर आलीच पण डिप्रेशन मधूनही बाहेर आली इतकी की सौभाग्यवती भव सारख्या सौन्दर्य स्पर्धेत तिने पहिल्या नंबरचे बक्षीस मिळवले .. याचाच अर्थ तिचा गेलेला कॉन्फिडन्स तिला परत मिळाला होता ..
जगात अनेक मुलं अनाथ आहे .. एका मुलाला दत्तक घेण्यापेक्षा त्या सगळ्यांसाठी आपण काही करू, आपल्याला जमेल तेवढे दान करू त्यांच्या बरोबर चांगला वेळ घालवू असे तिने ठरवले देखील होते .. आणि ती अशा निर्णयापर्यंत येण्यासाठी सुनीलचा आणि तिच्या सासूचा खूप मोठा हात आहे .. नाहीतर जनरली अशा स्त्रीला हिणवून हिणवून जीव नकोस केला जातो ..
सुनीलने सगळ्या हॉस्पिटलमध्ये आधीच पेढे वाटले .. ती प्रेग्नंट आहे हिच त्याच्या साठी गुड न्यूज होती.
लगेचच थोड्या दिवसांत त्यांनी दोघांनी ५ लाखाची त्यांची FD मोडली आणि पनवेल जवळच्या अनाथ आश्रमाला भेट दिली .. सासूबाईंच्या हस्ते त्या अनाथ आश्रमाला ५ लाख रुपये दान केले ..
तिथल्या अनाथ मुलांना खाऊ आणि खेळणी नेली .. सगळ्या मुलां बरोबर छान दिवसभर टाइम स्पेंड केला .. आजीने पण मुलांना छान स्टोरीज सांगितल्या .. तेजुचे नुसते सारखे डोळे भरून येत होते .. आणि सुनील तिच्या मनातले भाव बरोबर टिपून घेत होता ..
हि बातमी तेजूच्या माहेरी सांगिल्यावर तेजूची आई लगेचच आली ..
तेजूच्या आईने तेजूच्या आधी तिच्या सासू बाईंना मिठी मारली .. मग तेजू ला
तेजूची आई "अभिनंदन ... आता तुम्ही आणि मी आजी होणार "
सुनील ची आई "अभिनंदन तुम्हांला पण "
तेजू "आई , मी आता आई होणार आहे "हे सांगताना तेजूचे ओठ थरथरले .. आणि आवाज कापरा झाला होता ..
तेजूची आई "हो ग , माझी बाय .. आई होणार तू .. किती ग ती देवाने परीक्षा घेतली माझ्या सोनू ची "
सुनीलचे पण डोळे भरून यायचे .. हा प्रवास इतका कठीण होता .. आहे ती बायको पण हातातून निसटून जाईल कि काय अशी वेळ आली होती ..
तेजूची आई "जावई बापू , आता मी नाही हो जाणार इथून .. बाळाचे बारसे झाल्यावरच मी जाईन .. आता तेजूची काळजी घ्यायला इथेच थांबेल "
सुनील "आई थांबा च .. आता तुमची खरी गरज आहे .. दोन्ही आज्या पाहिजेत आमच्या पिल्लू ला "
तसे सगळे आनंदात हसले .. आणि तेजूने आनंदात तिच्या पोटावर हात ठेवला आणि बोलली "पिल्लू "
एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मातृत्व आणि तो मिळवण्यासाठीचा मानसिक संघर्ष संपला होता ..
लगेचच सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून तेजूची चोर ओटी भरली .. घर पाहुण्यांनी भरले होते आणि आज सुनील ने बऱ्याच दिवसांनी त्याची गिटार काढली आणि गाणे म्हणायला सुरुवात केली

आई तू बाबा मी
होणार गं
कुणी येणार गं
आजी तू आबा मी
होणार गं
कुणी येणार गं
नवखी चाहूल
इवलं पाऊल
रुजलेला अंकुर आता
फुलणार गं
कुणी येणार गं
मायेचा सोहळा
झुलवू झोपाळा
फुलांच्या माळांनी घर हे कसे
खुलणार गं
कुणी येणार गं
चिऊची ताई नि काऊ चा दादा
चांदोमामा अन काळोख बुवा
पणजीचा मान
होऊन बेभान
बाळाचे खुप लाड मी
करणार गं
कुणी येणार गं
चाउ आणि माऊ चे खेळ आपण खेळू
पितळीचे पाणी तुला
बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ
इवलुशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू
छोट्याश्या कपातला चाहा आम्ही पिऊ
भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या
फुले आणि उंच उडणाऱ्या पऱ्या
उमलून आले
आईचे तेज
मायेची सेज साजिरी
सजणार गं
कुणी येणार गं
(गाणे नक्की ऐका आणि एकदा बघा .. सुनील आणि तेजू आणि बरोबरच घरातल्यांचा आनंद डोळ्यांसमोर येईल)
चला तर मग तेजु आणि सुनील चे मनापासून अभिनंदन करू आणि त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा देऊन त्यांची दोघांची भावनिक स्त्रीत्वाची कथा इथेच संपवू.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा