स्त्रीत्व भाग ७७

Story Of women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ७७

स्त्रीत्व भाग ७६

स्पृहा " राज .. मला पण भूक लागलीय .. मी आले तर चालेल का तुमच्या बरोबर कॅन्टीन ला "
विक्रमला नुसता राग येत होता .. विक्रम ने पटकन ती बसली होती ती चेअर त्याच्या जवळ ओढली
विक्रम " काही गरज नाहीये त्याच्या बरोबर जायची " जरा जोरातच बोलला .. त्याने असे अचानक केले तशी स्पृहा घाबरली .. आणि पटकन त्या चेअर वरून उठली ..
स्पृहा रडवेली झाली " बाबा कुणीकडे आहेत .. मी बाबांजवळ जाते "
आदीचा पारा १०० च्या वर गेला .. मनात त्या विक्रम चा खून करून झाला होता
विक्रम " अग, तो नवीन मुलगा लागलाय कामाला .. म्हणून बोललो मी .. तुला भूख लागली असेल तर मी नेतो ना तुला कॅन्टीन ला "
स्पृहा " विक्रम सर,प्लिज नकोय मला काही खायला ..” आणि ती बाबांना कॉल करू लागली
विक्रम " अग,घाबरू नकोस .. मी आहे ना .. मी नेतो तुला कॅन्टीन ला .. चल .. " आणि तो तिच्या हाताला धरणार होता तर आदीने पटकन त्याच्या हातात स्वतःचा हात दिला ..
आदी "सर , तिघे जाऊ .. चला "
स्पृहा "नको .. मी जाते बाबांकडे .. मला काही नकोय खायला .. तुम्ही दोघे जाऊन या .. "
आदीने तिला मेसेज केला " चल ना .. प्लिज .. मला ह्याचीच जिरवायचीय .. त्याला तू आवडते .. तुझ्याशी लग्न करायचेय त्याला ?"
स्पृहा ने मेसेज केला " काय आदी .. मग कशाला मला बोलावलेस ? मी उगाच आले .. मी घरी जाते ना प्लिज .. मला खूप अन कफर्टेबल होतंय .. ह्या माणसा बरोबर "
आदी "अरे .. मी आहे ना .. तू काय टेन्शन घेतेस ?"
स्पृहा "आदी .. प्लिज नको ना तो किती ओरडला माझ्यावर .. मला भीती वाटते आता .. त्याने कसे ओढलं मगाशी .. एकदम विचित्र आहे .. आणि शेवटी तू त्याला वाजवशील हे नकोय मला "
आदी हसला" एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर ? त्याला वाजवायची तर आहेच मला .. पण जरा वेगळ्या पद्धतीने .. "
स्पृहा " मला नाही जमत असे वागायला .. त्याने अल्मोस्ट आत्ता माझा हात पकडला असता "
विक्रम " राज राहू दे . तिला तुझ्या बरोबर कम्फर्टेबल होणार नाही .. आम्ही दोघे जातो .. "
स्पृहा " नाही असे काही नाही .. राज चल आपण जाऊ तिघे .. बाबा तुझ्या बद्दल खूप छान सांगत असतात "
तेवढयात श्रीधर आले कोणाला तरी घेऊन
स्पृहा एक मिनिट इकडे ये .. तशी स्पृहा बाबांकडे गेली
स्पृहा " हा बाबा "
श्रीधर " हे मिस्टर आगरकर .. हे आणि मी आमच्या दोघांची जॉइनिंग एकदम झाली होती .. माझे फार जुने मित्र आहेत "
स्पृहाने लगेच खाली वाकून त्यांना नमस्कार केला .. आदी लगेच धावत तिकडे गेला .. आणि त्याने पण वाकून नमस्कार केला
श्रीधर "आगरकर, हा राज .. माझा होणारा जावई आहे .. लवकरच स्पृहाचे आणि याचे लग्न होणार आहे "
आगरकर "अरे वाह !! खूप सुंदर जोडी आहे .. हा राज तर आत्ताच लागलाय ना कंपनीत आपल्या ?"
श्रीधर बिचारे " हो . आपल्या कंपनीत तो आहे का आपण त्याच्या कंपनीत ? मला कधी कधी कळत नाही”
आगरकर " म्हणजे ?"
श्रीधर " म्हणजे .. इतके चांगले काम करतो कि जणू हि कंपनी त्याचीच आहे "
नेमका विक्रमला तेव्हा फोन आला तेव्हढ्यात आणि हा सगळा सिन त्याला कळला पण नाही .. आणि आदी तेवढयात स्पृहाला घेऊन फुर्रर झाला ..
श्रीधर मोठ्या साहेबांच्यात गेले .. आदी स्पृहाला घेऊन डॅडच्या प्रायव्हेट रेस्ट रूम मध्ये घेऊन गेला ..
विक्रम ह्या दोघांना शोधत बसला .. आधी कॅन्टीन , मग गार्डन , मग डेस्क , सगळीकडे त्याने शोधले पण आदी आणि स्पृहा त्याला दिसेना ..
इकडे आदी आणि स्पृहा धावतच प्रायव्हेट रेस्ट रूम मध्ये आले .. आणि त्याला कसे फसवलं म्हणून जोर जोरात हसत होते .. अजूनही तिचा हात त्याच्या हातात घट्ट होता .. तिला तर धावत आल्यामुळे धाप लागली होती .. आणि आता तो इतका जवळ होता म्हणून धडधड वाढली होती .. तो तिच्याकडे बघतच असा होता
आदीने तिचा चेहरा हातात घेतला "आज खूप सुंदर दिसतेय तू .. " बोलतच तिच्या जवळ जात होता
स्पृहा "आदी आपण ऑफिस मध्ये आहोत " cctv असतील ?" ती बोले पर्यंत आदी साहेबांनी तिला किस करायला सुरुवात केली .. आणि ह्यावेळी तो किस जणू तिला सांगायला होता कि यु आर ओन्ली माईन ..नो बडी कॅन टच यु "
दोघांना आलेली बेचैनी जणू त्या किसने त्या दोघांना शांत करत होती ..
स्पृहा "आदी .. बास ना .. कुठे आहोत आपण ? कोणीतरी बघेल ना .. बाबा डॅड सगळे ऑफिस मध्ये आहेत .. "
आदी "स्पृहा, किती टेन्शन घेतेस ? हे डॅड चे रेस्ट रूम आहे .. इकडे cctv नाहीयेत .. आणि इकडे कोणी येऊ पण शकत नाही .. ओन्ली डॅड येतात इकडे "
आदी " बरं चल काहीतरी खाऊन घेऊ .. मी ऑर्डर करतो .. तू काय खाशील ?"
मग तिकडेच त्याने ऑर्डर केले .. तिकडेच बराच वेळ गप्पा मारत खाल्ले त्यांनी ..
इकडे विक्रम त्यांना शोधून दमला .. शेवटी .. श्रीधरला जाऊन कानात सांगू लागला " सर ते स्पृहा कुणीकडे आहे ?"
श्रीधर एकदम चक्रावले त्याच्या या वाक्याने
विक्रम " नाही म्हणजे राज पण गायब आहे .. मला भीती आहे कि तो राज कुठे घेऊन तर गेला नसेल ना तिला .. ?"
श्रीधर " हो ती त्याचाच बरोबर आहे .. मला सांगून गेलीय "
विक्रम : काय सर ? असे कसे तुम्ही तिला त्याच्या बरोबर पाठवलीत .. शी इज नॉट सेफ विथ हिम .. तो चान्गला मुलगा नाहीये ?"
श्रीधर " विक्रम , तू हे असे का बोलतोय मला माहित नाही .. तो चांगला मुलगा आहे याची खात्री आहे मला .. “
विक्रम " सर .. काय बोलताय काय ? हि इज जस्ट अ इंटर्न "
श्रीधर " पण वन डे हि विल बी डायरेक्टर एवढा हुशार आहे .. आणि त्याही पेक्षा माणूस म्हणून चांगला आहे .. उगाचच कारण नसताना दुसऱ्याच्या बद्दल वाईट सांगत नाही "
विक्रमचा चेहरा एकदम पडला .. तेवढयात स्पृहा आणि राज दोघे आले
स्पृहा " बाबा , मी घरी जाऊ का ? मला आता जावेसे वाटतंय ?"
श्रीधर " हो ठीक आहे .. मी कॅब बोलावतो .. तू जाशील का ?"
राज " नाही , कॅब कशाला ? कंपनीची कार पाठवू कि आपण ? विक्रम सर, जरा स्पृहा मॅडम साठी निशा मॅडम ला सांगून कार अरेंज करता का ?"
स्पृहा " नको राज , मी जाईन कॅबने .. उगाच कंपनीची कार कशाला ?"
विक्रम लगेच " नाही काहीच प्रॉब्लेम नाही .. HR वाली माझी चांगली मैत्रीण आहे .. "बोलतच त्याने निशाला सांगून स्पृहा साठी कार अरेंज केली
मोठ्या दिमाखात स्पृहा कार मध्ये बसून घरी निघाली पण जाताना हाताने बाय आदिला करून गेली आणि विक्रम नुसताच हात हलवत बसला
--------------------------------------------------------------
आज आदीच्या कंपनीचे लाँचिंग होते .. सगळे मीडिया वाले आले होते .. लवकरच नवीन MD हेलिकॉप्टरने येतील म्हणून सगळा स्टाफ गेटच्या बाहेर वाट बघत उभा होता .. निशा आणि विक्रम दोघांच्यावर नवीन सरांच्या स्वागताची तयारी होती त्यामुळे विक्रम आणि निशा एकत्र मिळून काम करत होते .. खूप बिझी होते .. प्लांट वरून सगळे वर्कर्स पण आले होते .. राजीव त्यांना गाईड करत होता आणि त्यांना वेळोवेळी सूचना देत होता
डॅडची सेक्रेटरी पण खूप गडबडीत होती .. आज सरांच्या मुलगा पहिल्यांदा सगळे पाहणार होते .. कशातच काही कमी नको होते .. तो ऑस्ट्रेलिया मधून शिकून येतोय म्हणजे त्याला किती परफेक्ट लागेल सगळे .. शिवाय इकडच्या पेक्षा विचाराने ऍडव्हान्स असेल .. कोणी कोणी तो कसा दिसायला असेल यावरही बोलत होते ..
स्पृहा,सांगिता आणि आजीला स्पेशल गेस्ट म्हणून आमंत्रण होते.. श्रीधर पण सिनिअर स्टाफ म्हणून त्यांना दिलेले काम करत होते आणि करवून घेत होते .. पण मनातून एक वेगळाच सुकून होता .. हे सगळे चाललंय ते आपल्या जावया साठी ह्याचा आनंद काही वेगळाच होता त्यांना .. आपल्या मुलीच्या आयष्याचे कल्याण झाले असेच वाटत होते ...
तेवढ्याच कंपनीच्या टेरेस वर हेलिकॉप्टर अवतरले आणि त्यातून .. आदिराज क्रिम कलरचा ब्लेझर .. डोळ्यांवर गॉगल लावून खाली उतरला .. आजू बाजूला असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या .. इतकी ग्रँड एन्ट्री त्याने घेतली होती ..
डॅड पण त्याच्या मागून उतरले .. दोघे उतरल्यावर दोघांनी एकदम हाताने ब्लेझर सारखा केला आणि तोच त्यांचा फोटो मीडिया वाल्याने कॅप्चर केला .. टी व्ही वर दाखवत होते .. हूबेहूब वडिलांसारखे वागणारा .. आता इथे नवीन कंपनी लाँच करतोय आणि नवीन ऑस्ट्रेलियन टेक्नोलोंजि आणणार आहे .. आदिराजचा सगळा बायोडाटा मीडिया वाले वाचत होते .. त्याने केलेले कोर्सेस , त्याने घेतलेलं शिक्षण आणि मग त्याचा अनुभव यावरच बोलले जात होते ..
डॅड आणि आदी दोघे खाली ऑफिसला आले .. तर सगळे आश्यर्य चकित झाले हा मुलगा जो इंटर्न होता तो सरांचा मुलगा आहे .. राजीव तर हादरलाच .. त्याच्याशी कसे वागावे कोणालाच काहीच कळत नव्हते ..
स्पृहा खाली ऑडिटोरिअम मध्ये बसली होती . विक्रम च्या नजरेस अजून ना आदी पडला होता ना स्पृहा ..
डॅड बोलू लागले तसे खूप सारे फोटो क्लिक होऊ लागले .. डॅडनी त्याची ओळख करून दिली .. आणि तो उभा राहिला तसा सगळा हॉल टाळ्यांच्या गडगडाने भरून गेला ..
निशाने वाकून बघितले तर एक मिनिट चक्रावली ती .. आणि गप्पच बसली .. तेवढ्यात विक्रम आला
विक्रम " अग निशा बसलीस काय ? चल पुढे तो पुष्पगुच्छ घे .. मी हा हार घेतो .. आपल्याला पुढे स्टेज वर जायचयं दोन्ही सरांचे स्टेज वर स्वागत करायचेय "
निशा आणि विक्रम पुढे आले .. विक्रमने आधी डॅड ला हार घातला .. मग निशा ने बुके दिला .. मग पुढे आदिला हार घालायला गेला .. आदिला बघूनच घाम फुटला त्याला .. कसा बसा हार गळ्यात घातला .. मग निशा ने पुष्पगुछ दिला.
विक्रमला जोर का झटका धीरे से लगा था .. पण आदीने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही.. ऍटिट्यूड
आदी बोलायला उभा राहिला आणि सगळ्या हॉल मध्ये टाळ्या वाजू लागल्या
नवीन कंपनी कोणत्या प्रॉडक्टची असेल , कोणती टेक्नोलोंजि वापरायचीय .. त्याच्या बरोबर काम कसे करायचेय , त्याची कामाची कशी पद्धत आहे .. काय टार्गेट आहे हे सगळे तो नॉन स्टॉप बोलत होता .. कोणीतरी एकदम मोठा बिझनेसमॅनच्या मुलाने जसे बोलले पाहिजे तसाच बोलत होता .. त्याच्या व्यक्तिमत्वावर सगळे भारावून जात होते लोक .. स्पृहा तर एकदम मंत्रमुग्ध झाल्या सारखी त्याच्याकडे बघत होती. समोर असलेला मुलगा आपला लाईफ पार्टनर आहे आणि तो किती हुशार आहे , किती मोठा आहे याची कल्पना तिने केली होती पण आज प्रत्यक्ष अनुभवत होती ..
आदी " मला तुमच्यातलाच एक समजा .. आणि म्हणूनच मी तुमच्या बरोबर गेले दोन महिने काम करतोय .. तुमच्याकडूनही मला खुप कही शिकायला मिळाले ,.. काही बदल आपण नक्कीच करणार आहोत आणि ते बदल काय आहेत ते मी हळू हळू पण लवकरच सांगेन .. या शिवाय प्लांट मध्ये कॅन्टीन सुरु करणार आहे .. तेही एकदम अद्ययावत असेल .. AC असेल तिथे.. काम करून थकलेल्या हातांना , मनाला आराम मिळेल असे असेल .. हे ऐकल्यावर सगळे प्लांटचे लोक एकदम खुश झाले .. आणि खालून शिट्या वाजवू लागले .. टाळ्या वाजवू लागले.
मग डॅडने स्पृहा, संगीता आणि आजीला स्टेज वर बोलावले .. आदी कोणाचीही वाट न बघता पटकन खाली गेला आणि आजीचा हात धरून आजीला वरती स्टेज वर घेऊन आला .. आजी पण मस्त नवीन कोरी जरीच्या काठाची क्रिमीश रंगाची त्यावर बुट्टे अशी नऊवारी साडी नेसून आली होती ..
आजीच्या हस्ते लाल फित कापण्यात आली .. डॅड आणि श्रीधर दोघांनी मिळून त्याच्या कंपनीच्या नावाच्या बोर्ड ची पूजा केली आणि त्याला हार घातला .. आदिराजच्या केबिनचे उदघाटन स्पृहा आणि संगीता दोघींच्या हस्ते करण्यात आले ..
नुसत्या टाळ्या वाजत होत्या .. स्पृहा आणि आदी आज खूप खुश होते .. फायनली आदिराजचे लौंचिन्ग एकदम ग्रँड झाले होते .. आदिराज एवढा बिझी होता कि लगेच मीडिया वाले डॅड आणि त्याचा साईडला इंटरव्यूह घेऊ लागले .. आज अख्ख्या भारतात ग्रेट इंडस्टीयालीस्ट चा मुलगा आदिराज भारतात येऊन नवीन कंपनी सुरु करतोय म्हणून सर्वांना नॅशनल टीव्ही वर कळत होते..
मीडियावाले बातम्यांमध्ये सांगत होते कि तो मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे ... म्हटल्यावर डॅड ला राहवले नाही आणि त्यांनी ऑफिशिअली डिक्लेर करून टाकले
डॅड नि श्रीधर ला पण वरती बोलावून घेतले आणि स्पृहाची ओळख करून दिली ..
डॅड " आपल्या कंपनीतले सिनिअर मॅनेजर श्रीधर यांची सुकन्या हि आमची होणारी भावी सून आहे .. येत्या ५ तारखेला लग्न आहे .. आणि ७ तारखेला ग्रँड रिसेप्शन आहे तरी सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी "
स्पृहाकडे अचानक सगळे मीडियाचे फ्लॅश वळले आणि माईक घेऊन तिला प्रश्न विचारू लागले आणि मॅडम त्यासाठी अजिबात तयार नव्हती .. आदिराजने तिच्या खांद्यावर सगळ्यांसमोर हात ठेवला ..
आदिराज " नो मोअर पर्सनल questions प्लीज " म्हणत तिला सांभाळून घेतले .
हे सगळे लांबूनच विक्रम बघत होता आणि आता आपली नोकरी जाणार आहे याची कल्पना त्याला आली होती
सगळा प्रोगॅम छान पार पडला .. स्पृहाची फॅमिली सगळे डॅड च्या केबिन मध्ये बसले होते.. आदिराज त्याच्या केबिन मध्ये बसून काही डॉक्युमेंट्स साईन करत होता .. तर विक्रम आला
विक्रम " हॅलो सर "
आदी " अरे हॅलो .. विक्रम सर .. कसे आहात ?"
विक्रम " प्लिज सर, कॉल मी ओन्ली विक्रम.. आणि ते मी तुम्हांला सॉरी बोलायला आलोय .. हे माझे रेसिग्नेशन .. सॉरी जाणता अजाणता मी तुम्हांला त्रास दिलाय ..
आदी " स्पृहा बद्दल काय म्हणणं आहे तुमचं विक्रम सर "
विक्रम " सॉरी सर .. स्पृहा मॅडम .. बद्दल मी काय बोलणार ..? "
आदी मनात " स्पृहा वरून स्पृहा मॅडम वर आलास हे खूप चांगले केलेस विक्रम "
आदी " गुड .. डोन्ट इव्हन थिंक इन युअर माईंड अदरवाईज आय विल सु यु " शांतपणे बोलला आणि एकदम गोड हसला
विक्रम " नो सर .. अँड यु बोथ लूक परफेक्ट टुगेदर "
आदी " थँक यु विक्रम सर "
विक्रम " प्लिज सर , कॉल मी विक्रम "
आदी " एकाच अटीवर "
विक्रम " बोला सर "
आदी " निशाचे प्रेम आहे तुझ्यावर .. तिला प्रपोज करायचं .. आणि लगेच लग्न करायचं तिच्याशी .. तरच जॉब राहील तुमचा सर "
विक्रम " हो सर .. आजच प्रपोज करतो तिला"
आदी " गुड यू मे लिव्ह "

🎭 Series Post

View all