Login

स्त्रीत्व भाग ७५

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ७५
क्रमश : भाग ७४
-----------------------
निहारिका आणि सागर यांची वेगळीच गडबड चालू होती .. त्यांच्या फायनल एक्साम झाल्या होत्या ..निहारिका त्याच्या पासून दूर जाणार म्हणून तिला आणि त्याला दोघांनाही मनातून खूप अस्वथता आली होती .. कंठाशी आलेले अश्रू दाबून धरत होते दोघेही .. निहारिकाचे बॅग्स पॅकिंग चे काम जोरात चालू होते .. बॅग्स भरून झाल्या होत्या आणि थोडा पाच मिनिटांचा ब्रेक घेतला होता त्यांनी ..
सागर तिथेच तिच्या बेड वर जरा आडवा पडला .. दमला होता तो ..
निहारिका तेवढ्यात मस्त कोकम सरबत घेऊन आली
निहारिका " सागर , हे घे .. जरा बरं वाटेल ?"
सागर उठला आणि वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन आला आणि सरबताचा ग्लास हात घेऊन बसला
निहारिका " सागर , तू कसा आहेस ? .. तुझ्या डोळ्यांत खूप भावना दिसतायत मला "
सागर " मी ठीक आहे ? तू कशी आहेस बोल ?"
निहारिकाने ग्लास खाली ठेवला आणि पळतच जाऊन त्याच्या मांडीवर बसली आणि त्याच्या खांद्यावर जाऊन डोकं ठेवलं तिने .. आय एम गोइंग टू मिस यु सागर बॅडली "
सागरने तिच्या केसांतून मायेने हात फिरवला " मी पण .. तू तिकडे अभ्यासात नवीन फ्रेंड्स मध्ये रमशील तरी .. पाचवीत असल्या पासून मला तुझ्या अवती भोवती फिंरण्या शिवाय कोणतं काम च नाहीये ग .. मी वेडा नाही झालो म्हणजे झाले ?
निहारिका " ए असे नको ना बोलूस .. "
सागर " हमम .. निहारिका .. मी तुला दोन महिन्यांनी भेटायला येत जाईन .. मग मला त्या दिवशी किस पाहिजे त्या दिवशी सारखा .. "
निहारिका " ए .. हळू बोल ना .. आई ऐकेल ना ?"
सागर " निहारिका .. तू जातेय पण श्वास अडकल्या सारखा वाटतंय ग "
निहारिका " सागर .. मला पण तसेच होतंय "
तेवढयात निशिता पटकन रूम मध्ये आली .. तशी निहारिका पटकन उभी राहिली
निशिता " थांब आईला सांगते .. आई .. "
निहारिका " गप ना निशिता .. "
निशिता " मग जाताना मला तुझा तो पांढरा टॉप देऊन जा .. मग नाही सांगणार ?"
निहारिकाने गप पणे कपाटातून तो टॉप काढला आणि तिला दिला " हमम घ्या .. आईचा लाडोबा "
निशिता " आणि तू कोण ? तू सागरचा लाडोबा .. किती लाड करतो तो तुझे ?"
सागर " ए .. निशिता .. गप ग .. आता जास्त त्रास नको देऊ तिला .. ती आधीच इमोशनल झालीय "
तशी ती तोंड वेडावून गेली
दुसऱ्या दिवशी सागर आणि तिचे बाबा तिला दिल्लीच्या युनिव्हर्सिटी हॉस्टेलला सोडायला गेले .. तिची सगळी नीट तयारी करून दिली .. रूम लावून दिली .. मेस लावून दिली .. दोघांनी खूप सारी कॅश दिली ..
निहारिका " बाबा .. थँक यु .. माझे हे स्वप्न पूर्ण करायला तुम्ही इतका सपोर्ट केलात .. इथून पुढे मी तुमचे सगळे ऐकेन .. इट्स लाईक माय ड्रीम कम ट्रू "
बाबा " काळजी घे .. नीट मन लावून अभ्यास कर "
निहारिका " हो बाबा .. "
बाबा " जेवायला वेळेत जात जा "
निहारिका " हो बाबा , तुम्ही पण काळजी घ्या .. निशिता आईची काळजी घ्या .. मी रोज रात्री कॉल करेन "
सागर तिच्या बॅग्स तिच्या रूम मध्ये नीट लावत होता .. हे दोघे एक साईडला बोलत होते
बाबा " सागर खूप चांगला मुलगा आहे .. आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो . त्यालाही न विसरता फोन कर "
निहारिकाच्या डोळ्यांत पाणी आले .. तिने बाबांना घट्ट मिठी मारली " बाबा .. मी जरी नसले तरी तो आपल्या घरातला मेम्बर आहे .. माझ्या अबसेन्स चा मध्ये त्याला अंतर नका देऊ .. "
बाबा " वेडी आहे का ? माझा जावई नंतर आधी मानस पुत्र आहे तो ..खूप आधार वाटतो त्याचा .. "
निहारिका " बाबा , मी मिस करेन तुम्हां सगळ्यांना .. पण आज तुम्हांला सांगते .. आतापर्यंत मुलींना नेहमी लग्न कि नोकरी .. संसार कि करिअर असा प्रश्न पडतो .. या दोन्ही पैकी एक च काहीतरी सिलेक्ट करावे लागले याचाच अर्थ काहीतरी सॅक्रिफाईज करावे लागते पण तुम्ही आणि सागरने सपोर्ट केल्यामुळे आज मी इथे येऊ शकले .. कोणतेही सॅक्रिफाईज न करता .. आणि ह्या दिलेल्या संधीचे मी नक्की सोने करेन .. तुम्हांला दोघांना माझा गर्व वाटेल असेच वागेन "
बाबा " मला विश्वास आहे पोरी .. तू जे बोललीस ते नक्की करशील "
तिने बाबांना खाली वाकून नमस्कार केला .. आणि बाबा तिला मन भरून आशीर्वाद देऊन बाहेर निघून गेले
निहारिका “सागर मी लावेन बाकीचे.. तू थांब ना .. बास आता किती करशील ?"
सागर " हे झालंच आहे .. आता फक्त स्टडी टेबल सेट करून घे .. विंडोजला पडदे पण लावून झालेत .. प्यायच्या पाण्याचे पण सेट झालेय "
निहारिका ने त्याच्या चेहऱ्याला हातात पकडले " सागर , मी करेन ते सगळे .. "
सागर च्या डोळ्यांत पाणी होते .. आणि काहीच ना बोलता तिला घट्ट मिठीत घेतले त्याने .. रडत होता बिचारा .. तिला एकटीला सोडवत नव्हतं त्याला .
निहारिका पण रडतच होती अल्मोस्ट " सॉरी .. मी खूप त्रास देतेय ना तुला .. "
सागर " नको ना यार असे बोलूस .. मला माहितेय तुझे ह्यात भलं आहे .. हि चांगली संधी आहे .. मी कसा राहू तुझ्या शिवाय .. मला माहित नाही तुझ्या शिवाय जगणे "
निहारिका " सॉरी सागर , ह्या सगळ्यांत तुझ्या भावनांचा मी विचार केला नाही .. "
सागर " यार निहारिका .. असे नाही मला म्हणायचंय "
निहारिका " सागर , माझा सगळे जीवन मी तुला समर्पण केलंय .. मी इकडून आले कि तू म्हणशील ती पूर्व दिशा ]सागर " गप ग.. मी कधी बॉसिंग करतो का तुझ्यावर ?
निहारिका " कर ना .. लग्न झाल्यावर तू मला बॉसिंग कर .. "
सागर " नाही यार असे नाही .. आपले नाते जसे आहे तसेच छान आहे .. आपण दोघे मेड फॉर इच अदर आहोत .. ओके सो नो वरिज .. मस्त अभ्यास कर .. तिकडची काही काळजी करू नकोस .. अगदी रोज नाही गेलो तरी मी जात जाईन "
निहारिका " मी रोज तुला कॉल करेन "
सागर " तुला जमेल तेव्हा कर .. असा काही नियम नको लावून घेऊस .. ठीक आहे "
म्हणतच त्याने तिच्या कपाळावर किस केले .. पण निहारिका कसली त्याला तसाच जाऊन देतेय .. तिनेच त्याला कळायच्या आधी त्याच्या ओठांवर किस केलं .. " लव्ह यु "
सागर " लव्ह यु टू .. "
दोघे कपाळावर कपाळ लावून एकमेकांकडे बघत होते ..
बाबांनी सागरला आवाज दिला तसं तिला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली आणि दोघे वेगळे झाले ..
तर मंडळी हि आहे सागर आणि निहारिकाची म्हणजेच सागरिका ची कहाणी .. शिक्षणाची ओढ असलेल्या मुलींना नेहमी नात्यांची किंमत मोजावी लागते .. समाजात , किंवा घरातले लोक जर तिने तिच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आणि सागर सारखे आलेले स्थळ नाकारले किंवा असे लग्न पोस्टपोन केले तर तिलाच नावे ठेवली जातात .. अगदी घरातल्या स्त्रिया सुद्धा तिला या निर्णयात साथ देत नाहीत .. कारण लग्न हा टप्पा तिच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा मानला जातो आणि मग लग्न झाले कि कसले शिक्षण .. मग ते मागेच राहिले जाते .. निहारिका थोडी बॉसी नेचर ची आहे .. जे आपल्याला हवाय ते ती मिळवतेच आणि तिने ते मिळवलेच ..पण इथे तिने कोणताही हट्ट नाही केला .. इथे तिने सक्षम पणे तिची बाजू मांडली .. तिच्या होणाऱ्या नवऱ्याने त्यात कोणतेही कमीपणा ना घेता किंवा आपला मेल इगो मध्ये न आणता तिला पुढे जाण्यासाठी तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला .. वडिलांनी पण तिला मिळालेली स्कॉलरशिप पाहता , तिचं म्हणणं शांतपणे ऐकून मग तिला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः पोहचवायला सुद्धा आले ..
असे म्हणतात तू एक पाऊल पुढे टाक नशीब आपोआप तुला साथ देईल .. तसेच कोणतहि नातं न गमावता निहारिका आपले शिक्षणाचे उद्दिष्ट मिळवू शकली ..
सावित्री बाईंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी शेणाचे गोळे अंगावर सहन केले ... तर अशा या सावित्रीच्या लेकी आता मोठं मोठ्या शिक्षणासाठी पुढाकार घेत आहेत .. नवी नवीन क्षेत्रात आपले नाव आणि ठसा उमटवत आहेत .. काहीतरी बनण्याची तीव्र इच्छा असली तर ती त्यातून मार्ग मिळवतेच .. तर अशा सर्व सावित्रीच्या लेकींना त्यांच्या जिद्दीला एक मानाचा मुजरा !!
आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेली स्कॉलरशिप असून सुद्धा पुढील शिक्षणाला जाता येईल कि नाही अशी शंका असताना ..शिक्षणाची ओढ असलेल्या स्त्रीची हि कथा कि एका बाजूला सगळी हवी हवी वाटणारी नाती आणि एका बाजूला हवे हवेसे वाटणारे शिक्षण या दोघांमध्ये एकालाच सिलेक्ट करायचे किंवा ह्या दोन्ही गोष्टी एक स्त्री , मुलगी डिझर्व करते आणि ते मिळवण्यासाठीच्या तिच्या प्रेमळ प्रवासाची हि कथा सफळ संपूर्ण. तिच्या स्त्रीत्वाचा कस इथेहि कसा लागला याची हि कथा संपूर्ण झाली.

🎭 Series Post

View all