स्त्रीत्व भाग ७४

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ७४
क्रमश : भाग ७3

पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली .. त्यांचे सगळे सामान चेक केले .. त्यात अनेक फोटो सापडले .. लॅपटॉप मध्ये फोटोंचा भडीमार होता .. हे असे सगळे फोटो समोर आल्यावर सब इन्स्पेक्टर शिवानीने अब्दुलच्या कानाखालीच वाजवली ..
शिवानी " बोल , कसे करत होतात .. हे दोघे कोण आहेत ? अजून कोण कोण आहेत तुमच्या रॅकेट मध्ये ? बोल .. नाहीतर जीवच घेईन तुझा ?"
अब्दुल " मी तरी काय करू ? माझे शिक्षण चांगले असूनही मला चांगला जॉब मिळाला नाही ?"
शिवानी " म्हणून हे असले काम केलेस ? तुला पण बहीण आहे ना ?हि अफसाना बहीण आहे ना ? तिला मदतीला घेऊन असली काम करतोस ? आणि हा शाहिद कोण आहे ?"
अब्दुल " शाहिद अफसाना का होने वाला पती है .. इन दोनोंको छोड दो .. जो भी किया है मैने किया है .. इंनका कोई दोष नहीं ।"
शिवानी “ क्या करना है ये तू मत बता मुझे ? त्याची कॉलर पकडून डोळ्यांत आग होती इंस्पेटर शिवानीच्या
तेवढयात एक जण दुसरा पोलीस म्हणाला
दुसरा पोलीस " मॅडम , ह्याच्या सामानामध्ये काही पैसे नाहीयेत .. सोन्याचे दागिने सोडले तर ?"
शिवानी " अब्दुल " बोल ,कैसे करता था ये .. कहा है सब लोगोंके पैसे ? बँक डिटेल्स दे दे तेरे .. दुसरोंको बॅकमेल करके , लडकियोंके गंधे फोटो खिंचके , कभी हनी ट्रॅप , कभी ब्लँकमेल , कितने गुनाह किये है तुने .. बोल नहीं तो तेरे बहेन को इतना मारुंगी कि सिर्फ रोने और चीख कि आवाज सुनई देगी |” फ़ाडकन एक वाजवली शिवानीने अफसानाच्या.. हे बघून अब्दुल घाबरून पोपटासारखा बोलू लागला
अब्दुल " शाहिद मेरा दोस्त है .. उसका फोटो स्टुडिओ अँड लॅब है .. मैं फोटो को एडिट करने उसकी मदत करता था .. और उसीसे येह आयडिया आया | पैसे कमानेका सबसे आसान तारिका था.. सिर्फ लोगोंसे प्यार से बात करो .. खूब सारा रिस्पेक्ट दे दो । लोग अपनी खुद कि इन्फॉर्मेशन दे देते है । फिर अपनी इज्जत बचाने के लिये जितने मांगु उतने पैसे दे देते है |"
शिवानीने स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतले
अब्दुल कडून १० लाख रुपये जप्त केले त्यातून प्रसाद लिझा आणि अशा अनेक लोकां कडून घेतलेल्यांना समान पैसे वाटून टाकले .. सगळा डेटा काढून घेतला .. हार्डस कॉपीज काढून घेतल्या.
कोर्टात सगळे पुरावे दाखवण्यात आले .. अब्दुल ,शाहिद आणि अफसाना यांना शिक्षा झाली .. स्वतः लिझा कोर्टात उभी राहिली आणि तिच्या बरोबर काय काय झाले हे तिने भर कोर्टात सांगितले .. प्रसादचे नाव मात्र बाहेर येऊ दिले नाही .. कोर्टाने कायद्याने जी होईल ती शिक्षा तिघांना दिली
रागिणी " अफसाना .. एक लडकी होने के बाद भी तुमने यह सब किया ? खुद तो बुरखे में अपना पुरा शरीर ढक देती हो .. लेकिन ऐसी कितने लडकीयोंके कपडे तुने उतारे .. जरा भी शरम नहीं आयी ना ?"
अफसाना " रागिणी , जुर्म तो मुझसे हुआ है .. उसकी सजा मिल भी गयी .. लेकिन एक बात बोल दु .. मै थी उनके साथ उसी वजह से किसी भी लडकी कि इज्जत खराब नहीं होने दि ।" आणि ती रडू लागली.
अफसाना "कौन सुनेगा मेरी बात .. एक भाई है .. दुसरा होने वाला पती है .. दोनो मिले हुए थे .. कैसे जाती पोलीस में .. किसके खिलाफ़ कम्प्लेंट कर दु .. मैं सिर्फ दुवा माँग रही थी कि यहं सब जल्द से जल्द रुक जाये .... खुदा गवाह है.. मैने किसीभी लडकी कि इज्जत पर आंच आने नहीं दी| "
रागिणीच्या डोळ्यांत पाणी आले .. एक गुन्हेगार स्त्री एका स्त्री ची गुन्ह्या करताना सुद्धा तिची किती काळजी घेते याचे उदाहरण होते .. दुसरीची इज्जत पण इज्जत आहे आणि ती खराब होउ नये म्हणून अफसानाला जे करता आले ते तिने केले .. मला वाटतं हा हि एक स्त्रीत्वाचा भाग आहे .. स्त्री कमजोर असली , लाचार असली तरी आपल्या इज्जतीवर आणि दुसऱ्याच्या इज्जतीवर आंच येऊन देत नाही..
रागिणी गप्पच बसली .. एक मिनिट तिला अफसाना साठी वाईटही वाटले ..
प्रसाद आणि रागिणीने सुटकेचा श्वास टाकला .. आता सगळे चांगले होत होते .. संकट टळले होते .गुन्हेगार तुरुंगा आड होता .. गेलेले पैसे सगळे जरी नाही मिळाले तरीही थोडेफार मिळाले होते .. एका प्रॉब्लेम मध्ये जो प्रसाद अडकला होता त्यातून निष्कलंक बाहेर पडला होता .. आणि आता तो कमालीचा खुश होता .. आता आईची तब्बेत बरी होती , रागिणी प्रेग्नन्ट होती आणि तो ज्या प्रॉब्लेम मध्ये फसला होता त्यातून तो बाहेर आला होता .. आता फक्त प्रेम करायचे होते त्याला रागिणीवर ..
प्रसादच्या विमझिकल वागण्यामुळे रागिणीला खूप सहन करावे लागले होते .. सुरुवातीला तर बिचारी एकटीच होती .. ना तो तिच्याशी बोलायचा ना तिच्याशी नीट वागायचा .. एक नवी नवरी मोठया आशेने प्रसाद कडे बघून संसाराची स्वप्न उराशी बाळगून आली होती आणि हा असल्या प्रॉब्लेम मध्ये अडकल्यामुळे तिला सोडून देण्याच्या विचारात होता .. पण रागिणीने न थकता , न हरता तिची हि लढाई जिंकली होती ..
कारण नसताना आपल्याच नवऱ्याकडून मिळालेली तुसडी वागणूक तिला आतून पोखरून काढत होती .. सर्व नात्यांवरचा तिचा विश्वास उडून जायला लागला होता .. पण प्रसाद ने आई बाबांच्या तब्बेतीच्या भीती पोटी का होईना तिच्याशी त्याने सगळे डिस्कस केले आणि तो कोणत्या महा संकटात आहे हे त्याने तिला सांगितले .. आपला नवरा जेव्हा एका मोठ्या महा संकटात उभा आहे त्याला आपल्या आधाराची गरज आहे हे जेव्हा तिला कळले तेव्हा आपला इगो , आपले दुःख सगळे बाजूला सारून ती त्याच्या बरोबर खंबीर मनाने उभी राहिली .. आणि त्याचाच परिणाम प्रसादला तिची किंमत कळली .. ती हवी हवीशी वाटली आणि मग एकदा का नवर्याला बायको मना पासून हवी हवीशी वाटली कि कोणतेही संकटाला सामोरे जाण्याची ताकद बळावते .. यातून बाहेर आले पाहिजे ह्याची जाणीव झाली. मग दोघांची की टीम तयार झाली.. दोघे मिळून घडलेल्या घटनांचा पाठ पुरावा करू लागले ..
प्रसाद ला अभय सारखा मित्र लाभला हे त्याचे चांगले नशीब .. आपल्या मित्राला त्याच संकटा तुन बाहेर काढण्यासाठी कसलाही मागे पुढे विचार न करता अभय आपल्या होणाऱ्या पत्नी बरोबर मदतीला धावून आला .. मैत्रीच्या नात्याचे मोल त्याला माहित होते ..
तसेच रागिणीचा मित्र रोहन तो हि कायद्याचा तज्ञ असल्यामुळे त्याचे वेळो वेळी मार्गदर्शन झाले .. कायद्याची , पुराव्याची , पोलिसांची नक्की कधी आणि कशी मदत घेता येईल हे कळल्यामुळे प्लॅन ऑफ ऍक्शन तयार करणे आणि त्यावर अंमल बजावणी करणे सोपे झाले .
त्रिवेणीने अभयचे नाते जे स्विकारले ते त्याच्या मित्रासंहित स्विकारले .. वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोघे प्रसाद बरोबर उभे राहिले .. त्रिवेणी मध्ये असलेल्या डॅशिंग पणाचा रागिणीला मदतच झाली .. लीझा नक्की क्रिमिनल आहे कि नाही हे माहित नसताना तिने लिझा बरोबर मैत्री केली आणि ती निभावली सुद्धा आणि हि सगळी स्त्रीत्वाची रूपच आहेत .. प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखें आहे .. स्त्रीत्वाचा महिमा अगाध आहे ..
प्रसादची आई एक पुढारलेली स्त्री दाखवण्याचा प्रयत्न केला .. जेव्हा आपला मुलगा सुनेला छान वागवत नाहीये हे कळल्यावर त्या मुलीला दोष न देत राहता हिचे दुसरे लग्न लावून देण्याची तयारी दाखवली .. आपली खरी जवाबदारी काय आहे हे ए का स्त्री ला माहित असते .. आणि ती जवाबदारी जर वेळेवर तिने पाळली तर त्याचा रिझल्ट नेहमी चांगलाच येतो ..
---------------------------------------------------
लीझाच्या कथेत दोन गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या आहेत .. स्त्री ला शस्त्र बनवून बऱ्याच लढाया आज पर्यंत इतिहासात झाल्या आहेत .. स्त्रीच्या मदतीने अनेक गुन्हेही होत असतात .. स्त्री ला कधीही कमजोर न समजता सर्वांनी हे लक्षांत घेतले पाहिजे कि स्त्री हि आदी शक्तीचे रूप आहे .
एक वेळ अशी आली होती कि लीझाने डॅनी ज्याच्यावर ती खूप प्रेम करत आहे त्याला ती सोडून द्यायची तयारी तिने दाखवली .. स्त्रीच्या अब्रूचे वाभाडे काढून तिचे मानसिक रित्या हनन करायचे कारण स्वतःची अभ्रू टांगणीला लागली कि तिची सगळी ताकद संपून जाते .. सीतेचे अपहरण द्रौपदीचे चीर हरण हे सगळे फार आधी पासून आहे .. आणि हे थांबले पाहिजे .. पण इकडे लिझा जर शिकार झाली आहे तर त्यातून बाहेर काढायलाही एक स्त्रीच कारणीभूत आहे कारण प्रसादच्या मागे जी उभी राहिली ती त्याची पत्नी रागिणी एक स्त्रीच आहे, स्त्री आदी शक्तीचे असे रूप आहे जी महिशासूरमर्दिनी आहे , जी दुर्गा आहे , जी अशी मोहिनी आहे जी भस्मासुराचा वध करते..
शेवटी विजय हा सत्याचाच होतो .. लिझा आणि प्रसाद यातून निष्कलन्क सुटले
डॅनी " लिझा, मी माझी ट्रान्सफर करून घेतलीय “
लिझा " थँक यु डॅनी .. आय लव्ह यु "
डॅनी " लव्ह यु टू डिअर " आणि तिला हाताला धरून त्याने कार मध्ये बसवले .. आणि इथून पुढे ते आनंदी जीवन जगू लागले.
एका स्त्रीची महिमा किती आहे हे शब्दात सांगूच शकत नाही .. माफ करणे ह्याला सुद्धा एक शक्ती लागते .. सीता मातेने प्रभू रामाच्या साक्षीनेअग्नी परीक्षा दिली ..
सीतेला जशी तिची चूक नसताना अग्नी परीक्षा द्यावी लागली तशीच लिझा ची चूक नसताना तिलाहि अग्नी दिव्यातून , मानसिक त्रासातून जावे लागले .. नवऱ्याची जेव्हा सर्वात जास्त गरज होती तेव्हाच नवऱ्याने साथ ना देऊन तिला एकटे पाडले होते .. या सगळ्यांत आपल्या बाळासाठी आपण पुरेसे आहोत आणि आहे त्या परिस्थितीशी जसे जमेल तशी चार हात करायची मनाची तयारी करतानाचा लिझाच्या प्रवासाचा शेवट छान झाला . नवऱ्याने माफी मागून तिला स्वीकारले .. तिनेही मोठ्या मनाने त्याला माफ केले आणि पुन्हा नवीन सुरुवात करून छान संसार सुरु केला .. तर अशी हि लिझाची एका मोठ्या ब्लॅकमेलिंगच्या क्राईम मध्ये अडकलेल्या आणि त्यातून बाहेर येण्यासाठी प्रसादला हनीट्रॅप मध्ये फसवलेल्या लिझाची या संकटातून मुक्तीच्या लढाईची कथा संपूर्ण झाली
------------------------------------
कोर्टातून केस सुटल्यावर बाहेर आल्यावर सगळे एकमेकांसमोर उभे राहून बाय करत होते .. लीझा आणि तिचा नवरा डॅनी कार मध्ये बसून निघून गेले . रोहन त्याच्या कार मध्ये बसून प्रसाद रागिणीला बाय करून निघून गेला
अभय त्रिवेणी आणि रागिणी प्रसाद आनंदात एकमेकांना मिठी मारत उभे होते .. फायनली केस जिंकली याचा आनंद ओसंडून वाहत होता
अभय " त्रिवेणी , आपण कधी करूया लग्न ? “नुसता साखरपुडाच झाला होता..
त्रिवेणी " लवकरात लवकर माझ्या घरी ये .. आणि मला घेऊन ये तुझ्या घरी .. आय वॉन्ट इट ऍज अर्ली एज पॉसिबल "
अभय एकदम खुश होत " ओके डार्लिंग "
प्रसाद " फायनली अभय ,तुला तुझी रिअल डार्लिंग मिळाली " तसे सगळे जोर जोरात हसू लागले
रागिणी सारख्या अनाथा सारख्या वाढलेल्या मुलीच्या वाट्याला छान संसार करायची स्वप्न उराशी असताना कारण नसताना पतीचा जाच सहन करावा लागला .. नंतर तिचा नवरा म्हणजेच प्रसाद असे का वागतोय हे कळल्यावर तिने तिच्या चांगल्या वागणुकी मुळे,प्रेमा मुळे त्याच्या मनात आपले स्थान निर्माण केले आणि त्याच्या कठीण काळात .. त्याच्या बरोबर एखाद्या पिलर सारखी शेवट पर्यंत उभी राहिली .. हनी ट्रॅप सारख्या ट्रॅप मधून त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी जीवाचे रान तर केलेच तिने पण जीवाची पर्वा नाही केली आणि जसे सावित्रीने यमाचे प्राण परत आणले तशी आपल्या नवऱ्याला त्या प्रॉब्लेम मधून निष्कलंक बाहेर काढले .. तर प्रसंगी रणरागिणी बनून आलेल्या संकटांचा मोठ्या ताकदीने सामना करणाऱ्या रागिणीची आणि तिचा जोडीदार प्रसादची तसेच त्याचा मित्र अभय आणि त्याची होणारी बायको त्रिवेणी यांची कथा संपूर्ण झाली.

🎭 Series Post

View all