स्त्रीत्व भाग ७३

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग ७३

क्रमश : भाग ७२
शरयूचे चांगल्या शाळेत ऍडमिशन तर झाले .. शिवाय NGO मधून झाल्यामुळे फीजचे पण काही टेन्शन नव्हते .. शरयू अभ्यासात तशी बरी होती .. पण मुख्य प्रॉब्लेम हा होयला लागला कि ती जिथे राहत आहे त्याचा परिणाम तिच्या भाषेवर होत होता .. आजूबाजूला झोपडपट्टीतील लोक राहत असल्यामुळे तिच्या कानावर खूप वाईट शब्द आणि शिव्या येत होत्या . आणि त्याच ती शाळेत बोलू लागली होती .. आणि हे तिच्या क्लास टीचरच्या लक्षात आले .. पॅरेण्ट ला नोटीस पाठवली .. तर मोहिनी शाळेत भेटायला गेली पण झाले उलटच पॅरेण्ट म्हणून मोहिनीला बघिल्यावरच त्या क्लास टीचर चे डोके सणकले.. त्या काहीच बोलल्या नाहीत मोहिनी जवळ आणि आता हा प्रॉब्लेम चिघळणार आहे हे मोहिनीच्या लक्षात आले ..
बिचारी मोहिनी मुलीला शाळेतून काढून टाकतील कि काय अशी भीती तिला वाटू लाग ली .. पण तिनेही आता आलेल्या परिस्थितीशी फाईट करायचे ठरवले होते .. लगेचच NGO च्या मॅडम ला तिने कॉन्टॅक्ट केला आणि जे जे झाले ते सर्व सांगितले .. लगेचच त्या मॅडमने शाळेत कॉन्टक्ट केला असता कळले कि मुलीला शाळा बदलायला सांगत आहेत ..
मोहिनी " मॅडम , तुम्ही काहीतरी करा ना ,, ह्या शाळेत शरयू शिकली तर तिचे भविष्य उज्वल आहे .. मॅडम काहीतरी करा ना प्लिज "मोहिनी लिटरली हात पाय जोडू लागली .
मॅडम " हे बघा आपण असे करू कि तिला आपण हॉस्टेल ला शिफ्ट करू .. याच स्कुलचे बोर्डिंग पण आहे .. ती तिकडेच राहील तर चांगल्या वातावरणात लहानाची मोठी होईल ?"
मोहिनी " पण , मॅडम पोर लहान आहे , एकटी कशी राहील ? शिवाय आम्ही कसे राहणार तिच्या शिवाय ? तीच तर आता एकमेव आशा आहे जीवनातील .. तिला बघून आयुष्य छान वाटायला लागलंय . घरी एक म्हातारी आजी आहे .. मरायला टेकली होती शरयूच्या येण्याने जगायला लागली परत .. आता तीचं बोर्डिंगला गेली तर .. आम्ही कोणाकडे बघायचं ?"
मॅडम " मग मी काहीच करू नाही शकत .. हे बघा , बाकीच्या मुलांचे पेरेंट्स खूप मोठी रक्कम भरतात कारण मूलाना चांगले शिक्षण , संस्कार घडावेत म्हणून आणि तिथेच जर अशा शिव्या ऐकल्या त्यांनी तर ते पेरेंट्स काय करतील ? शरयू लहान आहे .. जे ऐकेल ते च आणि तसेच बोलेल .. त्या झोपडपट्टीत तिला असेच शब्द कानावर येणार आणि ती तेच बोलणार.. तुम्हीच नुकसान करताय तुमच्या मुलीचं ?"
मोहिनी " पण मॅडम , ती लांब गेली तर आमच्यांशी कॉन्टक्ट ठेवेल ना ती .. ती विसरून जाणार नाही ना ?"
मॅडम " असे कसे होईल ?.. तीला महिन्यातून एकदा तुम्ही भेटू शकता ? घरी आणूं शकता ? मिटिंग ला भेटू शकता ? सुट्टीला घरी आणू शकता ?"
मोहीनि " आणि तब्बेत पाणी बिघडली तर पोरीची "
मॅडम जरा हसलीच " अहो बरीच मूलं मुली राहतात बोर्डिंगला .. नका एवढं टेन्शन घेऊ "

मोहिनी मनापासून नाही पण आता हि शाळा सोडायची नाही म्हणून कशी बशी तयार झाली आणि त्या मॅडमने लागेचच शाळा गाठली आणि बोर्डिंगची प्रोसिजर सुरु केली
इकडे मोहिनी जरा जड पाउलांनी घरी आली तर आजी शरयूला भरवत होती
रुक्मिणी " कार्टे जेव कि .. पटपट .. मला कामं आहेत "
शरयू " आजी , होय कि खातेय कि .. तोंडातला घास संपू दे कि ? " आणि खाता खाता ती खडूने चित्र रंगवू लागली .
मोहिनी घरी आली तशी " आई , तू आज शाळेत आली होतीस का ? मला क्लास टिचर म्हणाल्या "
मोहिनी " काय म्हणाल्या मॅडम "
शरयू " आज ना मॅडम नि मला क्लासरूम च्या बाहेर उभे केले होते .. पनिशमेंट "
मोहिनी " का ? तू काय केलंस ?"
शरयू " ते मी क्लास मध्ये बॅड वर्ड्स बोलते ना म्हणून "
मोहिनी " शरयू .. तुला बोर्डिंग काय आहे माहितेय का ?"
शरयू " हो ? ते आमच्या क्लास मधला ओजस आहे ना तो बोर्डिंगला राहतो .. का रणं त्याची आई बाबा दुसऱ्या गावी राहतात ना म्हणून .. सारखा क्लास मध्ये रडत असतो "
मोहिनी " शरयू , तसे नाहीये काय ? जी मुलं अभ्यासात हुशार असतात ना त्यांना बोर्डिंगला ठेवतात .. म्हणजे छान अभ्यास करतात आणि मग पहिला नंबर येतो त्यांचा "
शरयू " पण आई नसते ना तिकडे .. त्या मॅडम असतात त्या पण ओरडतात सारख्या असे ओजस सांगत होता मला "
रुक्मिणी " बरं जेव आधी .. काय बोलताय काय माहित ? “आजीच्या तर बिचारीची सगळेच डोक्यावरून गेले
शरयू झोपल्यावर मोहिनीने आजीला समजावून सांगितले कि नक्की काय करायचय ते .. रुक्मिणी जरा नाराजच झाली ..
रुक्मिणी " काय करायचीय शाळा ? हित सरकारी शाळा आहे तिकड घालू मग पोरीला ... आपल्या डोळ्यांसमोर तर राहील "
मोहिनी " हि शाळा खूप चांगली आहे .. आपली शरयू मोठी साहेबीण बनेल .. फ़टाफ़ट इंग्लिश बोलेल "
रुक्मिणी " अग पण.. लहान किती हाय ती ..अजून हातानं जेवत नाही ती "
मोहिनी " अग आजे , शिकवतात बोर्डिगला सगळे .. आपण जाऊ शकतो कधीही तिला भेटायला "
रुक्मिणी " पोरीला आता आपल्या दोघींचा लळा लागलाय ... असा एकदम सोडून द्यायचं का तिला ?"
मोहिनी " तिच्या चांगल्या भविष्या साठी हे करावेच लागेल .. काय आहे इथे सांग .. बाजूला तो बबन जीव जाईस्तोवर त्याच्या बायकोला मारतो , शिव्या घालतो .. हेच सगळे ती ऐकते आणि शाळेत बोलते .. अग चांगले नाही हे "
कशी बशी आजी तयार झाली पण मोहिनी आणि रुक्मिणी ला रात्रभर झोप लागली नाही .. उद्याच तिला बोर्डिंग ला पाठवायचे होते त्या झोपलेल्या नाजूक जीवाला बघतच त्या दोघी झोपल्या ..
दप्तरा बरोबरच तिची कपड्याची बॅग भरली ..
रुक्मिणी ने तिला दूध बिस्कीट भरवले ..
मोहिनी " शरयू , आज पासून तू बोर्डिंग ला रहायचं .. मी आणि आजी तुला भेटायला दर रविवारी येऊ .. ठीक आहे ?"
झाले शरयू जोर जोरात रडायला लागली .. रुक्मिणीला धरून घट्ट बसली .. " आजी नको ना .. मला नाही राहायचं बोर्डिंगला . मला आई आणि तुझ्या बरोबर राहायचंय .. मला सोडू नको ना आजी "
रुक्मिणी डोळ्याला पदर लावून बसली .. मोहिनीने तिला उचलून घेतली तशी मोहिनीच्या खांद्यावर मान टाकून रडू लागली
शरयू "आई , तुला पण मी नकोय का ? मला एका आईने स्टेशन वर सोडले आता तू मला शाळेत सोडणार का ?"
मोहिनी चे पण डोळे भरून आले .. पोरगी खूप घाबरली होती
मोहिनी " अरे देवा , असे नाहीये काय ? तू ला सोडत नाहीये ग .. तू एवढी हुशार आहेस .. मग तुझा पहिला नंबर आला पाहिजे कि नाही ? म्हणून तुला बोर्डिंगला ठेवणार .. मी आणि आजी रोज येऊ तुला भेटायला ? इथे बघ आजू बाजूला कशी घाण आहे ? उलट शाळेत तुला छान वाटेल.
शरयू " नको ना आई , नको ना मला बोर्डींगला पाठवू "
मोहिनी ने आणि आजीने मन घट्ट केले आणि तिला बोर्डीन्गला सोडून घरी आल्या .. आत जाताना खूप रडत होती ती .. एवढ्याशा डोळ्यांत खूप प्रश्न होते .. का मला माझी आई सोडते ?
मोहिनी घरी आली आणि आजीच्या कुशीत लिटरली डोकं खुपसून रडली
मोहिनी " आजी .. तिच्या भल्या साठी केलंय ग हे .. आपण जात जाऊ तिला भेटायला दर रविवारी "
आजी " हो ग बाई .. तसेच करू ? तू गप रडू नकोस ?"
मोहिनी " राहिल ना ग ती तिथे ? पोर आजारी पडायची नाही ना ?"
आजी " नाही ग .. तुला आठवतंय ना आपल्याकडे आली तेव्हा पण ती किती रडत होती .. मग झाली ना आपोआप शांत .. थाड वेळ देऊ तिला "
मोहिनी " हमम .. आणि एक आजे .. तिला शाळेत पाठवली म्हणून आता तू खचून नको जाऊस .. अजून खूप जगायचंय तुला ? शरयू ला मोठी साहेब झालेलं बघायचंय दोघींना "
आजी " हो ग हो .. आपण तिला म्हणू " यस मड्डम "
तशा दोघी रडता रडता हसल्या
मोहिनी " ती NGO वाली मॅडम आली होती तिच्याशी काय बोलत होती ग तू .. मी शरयू बरोबर होते तेव्हा ?"
रुक्मिणी एकदम चपापली
मोहिनी " बोल कि "
रुक्मिणी " ते अवयव दानाचा फॉर्म भरून दिला मी .. मरून गेले कि माझे चांगले असलेले अवयव उपयोगी येतील कुणा कुणाला?"
मोहिनी " मला वाटलंच .. खरं सांगू आहे .. साला आपला विचार कोण करत नाही .. पण आपण भारी जगाचा विचार करतोय "
रुक्मिणी " ह्या जन्मात पुण्य करू म्हणजे पुढचा जन्म तरी चांगला मिळल .. बाकी काय नाही "
मोहिनी " फार मोठं बोललीस म्हातारे !! जे काही असते ते आपल्या साठीच असते .. दुसऱ्या साठी नसते .. आता मी पण माझा अवयव दानाचा फॉर्म भरून देते "
आणि दोघी खळखळून हसल्या ..
मोहिनी , रुक्मिणी आणि शरयू या तिघी एकमेकांना भावनिक नात्याने जोडल्या गेल्या आणि एक नसलेल कुटुंब त्यांनी तयार केलं .. एकटे पणाला कंटाळलेली रुक्मिणी आज आई होती , आजी होती .. शिवाय अवयव दान करून जी ट्रेन मध्ये एक प्रकारे भीक मागायची ती दाता बनली होती.. आणि साधी सुधी दाता नाही बरं अनेकांना जीवनदान देणार होती .. अशी असते स्त्री .. काट्यांतून चालत जाऊन फुल वेचते आणि त्याचा सुगंध पसरवते ..
मोहिनी चे रूप शाप कि वरदान हे तीच तिलाच माहित ..पण असा जन्म मिळाल्यावरही भीक ना मागता मोहिनी स्वतःच्या पायावर उभी तर राहिलीच व अनेक गरजू स्त्रियांचा आधार बनली .. त्यांना पोट भरण्यासाठी मार्ग दाखवला .. ह्या असल्या जन्मा मुळे घरदार सुटलं . शिक्षण सुटलं .. आई वडील सोडून गेले .. पण तरीही ती एकटी लढत राहिली .. शरयू मध्ये तिला तिचे बालपण दिसले . आपण ज्या यातना भोगल्या त्या शरयूच्या वाट्याला येऊ नये म्हणून तिला दत्तक घेतले तिने .. तिला आईची ममता दिली .. तिच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले .. किती हे पुण्यकर्म एखाद्याने करावे . आणि शेवटी ती हि अनाथ आहे आपल्याला हि खांदा द्यायला कोणी येईल कि नाही माहित नाही म्हणून तिनेही अवयव दानाचा निर्णय घेतला .. हि आहे मोहिनी सारख्या नारी ची कहाणी .. अशा कितीतरी अनेक नारी आज जगात आहेत.. त्यांचे असंख्य प्रॉब्लेम आपण कल्पनाही करू शकत नाही .. एक स्त्री म्हणून माझ्या तर्फे एक मनाचा मुजरा मोहिनीला आणि तिच्या सारख्या अनेकांना !!
तर मंडळी मोहिनी , रुक्मिणी आणि शरयू या तिघींना त्यांचे पुढील आयुष्य सुखाने समाधानाने जगण्यास मोकळं करून त्यांच्या स्त्रीत्वाची कहाणी इथेच संपवू ..

🎭 Series Post

View all