स्त्रीत्व भाग ७ Updated

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ७
क्रमश : भाग ६
पुढच्या स्टेशन ला लगेच रागिणी उतरली आणि येता येता भाजी घेत घरी आली .. घरी आली तर घराला लॉक नव्हते .. रागिणी मनातून इतकी खुश झाली ..घराला लॉक नाहीये म्हणजे प्रसाद आधीच घरी आला आहे .. .. तिने आंनदातच बेल वाजवली .. आतून दार उघडले तर समोर सासूबाई ..
रागिणी " आई .. तुम्ही ? आय मिन तुम्ही कधी आल्यात ?"
प्रसादची आई म्हणजेच उज्वला " अग .. पर्वा संक्रात आहे ना . आणि तुमच्या दोघांचा पहिला सण आणि पहिली संक्रात आहे .. म्हंटले लागून विकएन्ड आलाय तर आलो दोघे "
रागिणी घरात आली आणि आई बाबा (सासू सासरे ) दोघांच्या पाया पडली ..
रागिणी " आई .. चहा करू का ?"
उज्वला " नाही नको .. आम्ही आताच घेतला .. तू फ्रेश हो .. मीच देते तुला चहा करून .. मग आपण दोघी बाजारात जाऊ .. तुझ्यासाठी आणि प्रसाद साठी हलव्याचे दागिने आणू "
रागिणी आणि उज्वला दोघी बाजारात जाऊन आल्या .. घरी येऊ पर्यंत साडे आठ वाजले तरी प्रसादचा तिला एकदाही कॉल आला नाही .. शिवाय तो अजून आलेला नाहीये हे आई आणि बाबांना कळले
उज्वलाने प्रसादच्या बाबांना म्हणजे शेखरला प्रसादला फोन करायला सांगितला
उज्वला " अहो .. आपण इकडे आलोय हे आधी बोलू नका त्याला "
शेखरने प्रसाद ला कॉल केला
शेखर " प्रसाद .. कसा आहेस बेटा .. कुठे आहेस ? ऑफिस काय म्हणतय ? मुख्य म्हणजे आमची सुनबाई कशी आहे ?"
प्रसाद " बाबा .. आम्ही दोघे खूप मस्त आहोत .. हे काय बाजारात शॉपिंगला आलोय ... रागिणीला साडी घ्यायची होती तर मी तिला एका दुकानात सोडली आणि मित्राचा फोन आला म्हणून खाली आलोय "
फोन स्पीकर वर होता त्यामुळे तो किती सपशेल खोटं बोलतोय हे कळूनच आले होते दोघांना .. रागिणी आतमध्ये जेवणाचे बघत होती त्यामुळे तिला माहित नव्हते ह्या दोघांनी कॉल केला ते
शेखर " अरे वाह .. ग्रेट .. मस्तच .. असेच आनंदी रहा .. "
प्रसाद " हो बाबा .. बाबा .. आई कशी आहे ? तब्बेत कशी आहे आईची "
प्रसादच्या लग्ना आधी आईला एक हार्ट अटॅक येऊन गेला होता .. सध्या त्या बऱ्या आहेत .. नवीन सुनबाई आल्यामुळे खूप आनंदी आहेत .. बहुदा आईच्या आनंदापुढे प्रसाद चे काही चालले नाही म्हणून त्याने रागिणीशी ईच्छा नसताना लग्न केले .. याची कल्पना आई आणि बाबांना दोघांना नाहीये नाहीतर रागिणीचा असा हकनाक बळी दिला नसता .
शेखर " आहे बरीं आहे.. तू तिचं ऐकून लग्न केलंस त्यामुळे सध्या खुश आहे .. शिवाय रागिणी पण खूप चांगली आहे .. म्हणून खुश आहे .. गोळ्या चालूं आहेत "
प्रसाद " ठीक आहे .. बाबा .. चक्कर टाका एखादी .. मी आणि रागिणी विकेंड ला येऊन जाऊ "
शेखर " ठीक आहे .. चल ठेवतो "
तेवढ्यात रागिणीने प्रसादला मेसेज टाकला
रागिणी " हाय .. घरी कधी येणार आहेस ?"
प्रसाद " तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग ? मला असले फालतू प्रश्न विचारायचे नाहीत ?"
रागिणी " आज घरी लवकर ये .. नाहीतर तूच प्रॉब्लेम मध्ये येशील .. बघ हा .. नाहीतर नंतर म्हणशील कि मी वॉर्न केले नाही म्हणून "
प्रसाद " वॉर्न .. तू काय समजते ग स्वतःला .. मी नाही घाबरत जा .. आणि दार नाही उघडलेस ना तर दरवाजा तोडून आत येईल .. माझे घर आहे मला पाहिजे तेव्हा येईन मी "
रागिणी " ठीक आहे .. मग भोग आपल्या कर्माचे फळ "
------------------------
सागरने निहारिकाला समजावयाचा खूप प्रयत्न केला पण निहारिका काही त्याला समजून घेण्याच्या मूड मधेच नव्हती ..
सागर " ठीक आहे .. चल .. तुला घरी सोडतो .. माझे एक काम आहे ते उरकून भेटू संध्यकाळी आरतीला "
निहारिका " ठीक आहे "
बागेतून बाहेर पडतच होते कि बाहेर पाणीपुरी भेळपुरी वाला होता .. दोघांनी नेहमी सारखा एकत्र चाट खाल्ला .. समोरच आईस्क्रिमवाला होता त्याच्याकडून दोन कॉर्नोटो घेतले आणि चालत बोलत गाडीच्या पार्किंगच्या इथे आले ..
सागरच्या गाडीला टेकून ती उभी राहिली होती .. आणि त्याच्याकडे बघत होती ... सागर जरा नाराज आहे हे लगेच कळत होते ..
निहारिका " सागर . तू चिडलाय का माझ्यावर ?"
सागर “ झालंय का खाऊन .. चल मग बस .. निघू आपण "
निहारिकाने त्याचा हात कोपरापासून पकडला आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवले \"
निहारिका " सागर .. यु नो ना .. यु आर मोस्ट इम्पॉर्टन्ट पर्सन इन माय लाईफ .. माझा बेस्ट फ्रेंड आहेस तू "
हे ऐकल्यावर तर सागरने पटकन त्याचा हात बाजूला काढून घेतला
निहारिका " काय हे .. लागलं ना मला .. इतका रागावतोस लगेच ?"
सागर " हे असे तिकडे गेल्यावर चिकटू नकोस कोणाला ? सगळेच काही सागर नसतात .. "
तशी निहारिका एकदम आनंदून " म्हणजे तू मला पाठवायला तयार आहेस ?"
सागर " मी कोण पाठवणारा आणि अडवणारा .. आय एम जस्ट अ फ्रेंड "
निहारिका " नुसता फ्रेंड नाही रे .. बेस्ट फ्रेंड "
निहारिकच्या ख़ुशी पुढे सागरने हात टेकले आणि तिला जायला मार्ग मोकळा करून दिला .. MBA झाल्यावर प्रपोज करणार होता .. लग्न करणार होता .. सगळे बारगळले .. अजूनही तिला मी बेस्ट फ्रेंड वाटतो .. कदाचित दिल्लीला गेल्यावर तिला तिचा जीवनसाथी भेटेल .. काहीही होऊ शकते असा काहीसा विचार त्याच्या मनात येऊ लागला होता तर
निहारिका " सागर .. मला तू प्रपोज कधी करणार ? मी म्हातारी झाल्यावर का ?"
सागर " म्हणजे ?"
निहारिका " म्हणजे लग्न नाही करणार का तू माझ्याशी ?"
सागर एकदम हडबडून तिच्या कडे बघू लागला
निहारिका " सागर .. मी जायच्या आधी आपली एंगेजनमेन्ट झाली पाहिजे .. आता हे कसे मॅनेज करायचं ते तू ठरव "
सागरच्या डोळ्यांतले भाव एकदम बदलले .. कसलाही विचार न करता तिथेच पार्किंग मध्ये तो निहारिकच्या पुढे ढोपरांवर बसला " विल यु मॅरी मी .. " म्हणतच त्याने खिशातुन रिंग ची डबी काढली आणि ओपन करून समोर ठेवली
निहारिका आनंदून " इतकी तयारी केली होतीस .. ?"
सागर " गेले वर्षभर रोज माझ्या खिशात घेऊन फिरतोय .. कधी प्रोपोज करू कळतच नव्हते .."
निहारिका " येस .. आय विल .. " म्हणतच त्याला हाताला धरून तिने त्याला उठवले
सागरने तिच्या बोटांत लगेच अंगठी घातली .. आणि तिच्या हातावर किस केले .. आणि चक्क निहारिका लाजली
-----------------------------------------------
दोघे मंदिरात गेले दर्शन करून तिथल्याच बाकावर बसले ..
आदिराजने त्याच्या जॅकेटच्या खिशातून ते गिफ्ट काढले आणि तिच्या पुढे धरले
आदिराज " मी .. तुला जो काही त्रास दिला त्या बद्दल "सॉरी ".. डॅडने मला तुला सॉरी बोलून हे गिफ्ट द्यायला सांगितले "
स्पृहा " नको .. मला काहीच नको .. मला सॉरी पण नको बोलूस .. आपण जाऊ या का ?"
आदिराज "अरे हो .. जाऊ या .. पण हे गिफ्ट तर घे .. बघ ना .. आवडले का ?"
स्पृहा "नकोय मला गिफ्ट .. मला सवय नाहीये अशा गिफ्ट ची .. मला घरी जायचंय "
आदिराज जरासा वैतागला " अरे यार .. तू काय बावळट आहेस का ? मी काय खातोय का तुला ? मी काय बोलतोय ? तुझे लक्षच नाहीये .. सारखे आपले मला घरी जायचंय घरी जायचंय "
तशी स्पृहा एकदम दचकली ..
आदिराज " घे ते गिफ्ट .. उघड आणि मला सांग कसे आहे ते .. दोन तास तुझ्यासाठी मी त्या दुकानात काढलेत आणि शाधून आणलाय खास तुझ्यासाठी "
स्पृहाने हातात घेतले नाईलाजाने
आदिराज " हे बघ मी काय सांगतो ते .. पुढल्या आठवड्यापासून मी कॉलेजला रेग्यूलर येणार नाहीये .. डॅडने माझ्यासाठी नवीन फॅक्टरी काढायची ठरवलेय .. त्यासाठी त्यांनी मला आमच्याच कंपनी मध्ये इंटर्नशिप करायला सांगितलीय .. तर आपली आता रोज रोज भेट होणार नाही "

🎭 Series Post

View all