क्रमश :भाग बोनस पार्ट
सुनील ऑफिसला जायच्या तयारीत होता ..
तेजू "सुनील , मी ना आज आई कडे जातेय .. "
सुनील " का ? ग ? तब्बेत बरी आहे ना "
तेजू " हो रे .. एकदम ठणठणीत आहे मी .. "
सुनील " मग चल मी सोडून येतो तुला ?"
तेजू " नाही नको .. मी ओला कॅबने जाईन .. मला संध्याकाळी रिटर्न यायचंय "
सुनील " का ? म्हणजे आता जातेच आहेस आईकडे तर दोन दिवस राहून ये पाहिजे तर ?"
तेजू " अरे नको रे , सध्या मन नाही रमत माझे तिथे .. शिवाय शेजारचे सगळे लोक लगेच चोकश्या करू लागतात .. मग आईला आणि मला उत्तरे देताना नाके नऊ होतात "
सुनील " बरं .. जसे तुला वाटतंय तसे कर ... चल मग मी निघू का ?"
तेजू " हो चालेल .. "
सुनील" तुझ्या गोळ्या खायला विसरू नकोस काय ?"
तेजू " हो ..रे .. काय सारखे तेच सांगतोस .. तुला ना माझे कौतुकच नाही.. काल मी एवढी जाऊन पार्लरला आले तरी तुझ्या साधे लक्षात पण येत नाही "
सुनील जरासा हसला " म्हणून फुगा आला होता काय काल ? मला वाटले मूड स्वीन्ग्स आहेत कि काय ?"
तेजू ने नाक मुरडले " जसे काय माझे सगळे मूड मी न सांगता कळतात तुला ?"
सुनील " अरे देवा .. मग काय आता चिडून माहेरी चाललीस कि काय ?"
तेजू " नाही रे .. उगाच काय पण ? मला कंटाळा आलाय आता घरात बसून ?"
सुनील " अरे जातोय ना आता आपण ट्रिप ला .. तुझी डेट येऊन गेली कि जाऊ म्हणजे तुला पण मजा टेन्शन नाही "
तेजू " हमम .. बरं चल .. बाय .. मी काय सांगते ते ऐक .. आज माझा मोबाईल प्रवासात कदाचित बंद असेल किंवा मी उचलणार नाही .. चीड चीड करू नकोस .. नाही उचलला तर .. मी घरी पोहचले कि तुला मेसेज करेन "
सुनील " ओके .. मॅडम .. तुमची ईच्छा झाली तर या गरिबाला मेसेज करा .. " हसतच बोलला
तेजू " गरीब .. काय म्हणे गरीब "
सुनील " सहा महिने ज्याची बायको लांब राहते त्याच्या इतका गरीब कोण असेल ?" मुद्दामून काहीतरी मोठे त्याचे नुकसान झालंय असे चेहर्यावर एक्सप्रेशन आणून बोलला
तेजू " अरे ... "
सुनीलने तिला मिठीत घेतले " निदान तोंड तरी गोड करा मॅडम .. एवढा ग्लो आलाय फेशिअलचा त्या बद्दल "
तेजू " आज अजिबात नाही .. तू काल नोटीस केले असतेस ना तर नक्की विचार केला असता .. आता आज मी सांगितले मग तुझ्या लक्षांत आले "
सुनील " अरे ए .. आता मला उपोषणालाच बसायला लागणार आहे "
शेवटी तोंड गोड करूनच साहेब ऑफिसला गेले ..
आज तेजू ची स्पर्धा होती .. आणि तिला त्याला सर्प्राइज द्यायचे होते .. म्हणून तिने त्याला आईकडे जातेय असे सांगितले होते .. स्पर्धा सुरु झाली कि मग सासूबाई त्याला जरा अर्जंट काम आहे असे सांगून त्याला बोलावून घेणार होत्या तिकडेच डायरेक्ट ..
तेजू घरातले आवरून दुपारीच मेक अप करायला निघून गेली .. दुपारी ३ वाजता स्पर्धा सुरु होणार होत्या ..
ठरल्या प्रमाणे पहिल्या राऊंडला ती नऊवारी साडी नेसून सगळा महाराष्ट्रीयन साज घालणार होती .. आणि त्याची तयारी खूप होती म्हणून आधीच जाऊन बसली
आज किती तरी दिवसांनसांतर तेजू इतकी छान नटणार होती .. आणि ती खूपच एक्ससायटेड होती स्पर्धेसाठी ..
सासूबाईंनी सुनीलला दुपारी अर्जंट काम आहे म्हणून बोलावून घेतले .. त्या आल्रेडी पहिल्या दोन रो मध्ये जाऊन बसल्या होत्या आणि त्याच्यासाठी जागा ठेवली होती
सुनील बिचारा आईने सांगितले म्हणून हातातले काम टाकून लगेच तिकडे आला .. बाहेरच मोठे मोठे बॅनर होते पण आई हि स्पर्धा बघायला मला कशाला बोलवेल असा विचार करतच आत गेला आणि आई शेजारी जाऊन बसला
तितक्यात कॉन्टेस्टन्ट नंबर ७ ची एंट्री .. आणि अर्थात ती आता तिचा इंट्रो देणार होती ..
जांभळ्या रंगाची पेशवाई नऊवारी.. खांद्यावर शाल , हिरव्या बांगड्या , गळ्यात मोठं मोठे सोन्याचे हार . कानातले , मोठी चंद्रकोर .. पायात जोडवी , साखळ्या .. अंगठ्या , कंबरपट्टा, बाजूबंद .. जेवढे असतील नसतील तेवढे दागिने तिने घातले होते .. नाजूक पाऊले टाकत जशी ती पुढे आली तशी संपूर्ण हॉल मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला ..
सासूबाई एकदम हौशीने तिला बघत होत्या आणि त्यांच्या मोबाईल मध्ये तिचा फोटो काढत होता .. सुनील तोंड मोठे करून बघतच बसला .. नेहमी शॉर्ट पॅन्ट वर त्याच्या अवती भोवतीची फिरणारी त्याची बायको आज महाराष्ट्रीयन वेशभूषा आणि दागिन्यांनी मढलेली समोर बघून शॉकच झाला तो .. इतकी सुंदर दिसत होती
तेजू ने सर्वांना हात जोडून मान खाली करून नमस्कार केला
तेजू " नमस्कार !! मी तेजस्वीनी सुनील ***********.. मी प्रोफेसर आहे .. वाचनाची मला खूप आवड आहे मी इंग्लिश हा विषय शिकवते .. मला मुलांच्यात वेळ घालवायला आवडतो .. आज मी इथे आहे कारण माझ्या पाठीमागे माझ्या सासूबाई ज्या मला आई इतक्याच प्रिय आहेत आणि माझा नवरा सुनील जो नेहमी मला समजून घेतो .. माझ्या गुण दोषांसहित त्याने मला स्विकारले ..
ज्या महाराष्ट्रा मध्ये जिजाऊंनी शिवबांना घडवले , ज्या मराठी भूमीत सावित्री बाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला आणि सर्व स्त्रियांचा उद्धार केला त्याच महाराष्ट्रातील मी एक कन्या आहे .. याचा मला सार्थ अभिमान आहे .. आज मी प्रोफेसर होताना माझ्या डोक्यात असतो .. शिक्षणाचा वारसा हा पुढे वाढत गेला पाहिजे आणि त्याच शिक्षणासाठी मी माझे आयुष्य वेंचेन
जाता जाता आज मी महाराष्ट्रीयन साज केला आहे तर मी आज नाव घेणार आहे
मंगळसुत्राला असतात दोन वाट्या
एक असते सासरची एक असते माहेरची खूण
मी तेजस्विनी , सुनील रावांचे नाव घेते ****** ची मुलगी ******** ची सून "
टाळ्यांचा कडकडाट होत होता .. अशी ग्रँड एंट्री तेजस्विनीची नावा प्रमाणेच तेजस्वी झाली होती.. आता सुनील थोडा सुखद धक्क्यातून सावरला होता आणि त्यानेही ती बोलत असताना तिचा एक व्हिडीओ बनवला
तेजू मोठ्या स्टाईलमध्ये बाकीच्या स्पर्धकांबरोबर जाऊन उभी राहिली
मग दुसऱ्या राऊंडला एक कल्चरल ऍक्टिव्हिटी करायची होती .. आणि त्यावर साजेसा ड्रेस घालायचा होता
तेजू गाणे म्हणणार होती .. म्हणून तिने पैठणीचा शिवलेला वन पीस घातला होता आणि त्यात कमालीची सुंदर दिसत होती ..
तेजु ने तिच्या आवडीचे गाणे म्हंटले
आनंद ह्या जीवनाचा
सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा
ओठांतुनी ओघळावा
झिजूनि स्वतः चंदनाने
दुसर्यास मृदगंध द्यावा
हे जणाता जीवनाचा
प्रारंभ हा ओळखावा
आनंद ह्या जीवनाचा
सुगंधापरी दरवळावा
इतकी तल्लीन होऊन तिने हे गाणे म्ह्टले कि एकदम स्तब्द शांतता होती पूर्ण हॉल मध्ये .. सुनील आणि सासूबाईंच्या डोळ्यांत मात्र अश्रू होते .. तिच्या आतमध्ये असलेलं दुःख तिने किती खोलवर दाबून टाकलय आणि आता आपल्या जीवनाकडे एक नवीन विचाराने तिने प्रारंभ केलाय असे ती सांगत होती
तिसरा राउंड सगळ्यात कठीण होता .. कारण आता एकेक कमी कमी होत शेवटच्या ५ स्पर्धक राहिले होते आणि त्यात तेजू चा नंबर होता .. या राऊंड ला परीक्षक प्रश्न विचारणार आणि मग विजेती कोण आहे ते कळणार होता ..
सुनील आणि सासूबाई प्रेक्षनकांच्यात बसून तिची स्टेज वर येण्याची वाट बघत होते ..
आणि लगेचच पाच स्पर्धक स्टेज वर आले .. तेजु ने आता डिझाईनर पार्टी वेअर ड्रेस घातला होता आणि त्यात ती एखादी मिस इंडिया सारखी आधीच दिसत होती .. . दोन जणींमध्ये खूप कॉम्पिटिशन होती .. तेजू का अजून एक स्पर्धक होती ती .. या दोघींपैकी एक जण क्राऊन जिंकेल असे वाटायला लागले होते ..
प्रश्न विचारता विचारता तेजुचा नंबर आला .. तेजु आता स्पर्धेत कॉन्फिडन्ट वाटत होती .. कोणताही प्रश्न येऊ दे आय एम रेडी अशी वाटत होती . मुळात तिचे वाचन जास्त होते , अभ्यासात हुशार होती .. आता बघू तिला कोणता प्रश्न विचारतात परीक्षक
परीक्षक " सौभाग्यवती तेजू , माझा प्रश्न असा आहे .. स्त्री चे स्त्रीत्व कशात आहे ?"
तेजूला वाटले कि बाकीच्यांना जनरल नॉलेज वर जसे प्रश्न विचारले तसे मला पण असाच काहीसा प्रश्न विचारतील .. पण तेजूचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे हे तिच्या गाण्यांतून तिने दाखवून दिले म्हणून तिला असा प्रश्न परीक्षकांनी विचारला असावा.
तेजूने एक मिनिट विचार केला .. आणि तिच्या डोळ्यांत आपोआप पाणी येऊ लागले ..
परीक्षक " काय झाले ? तुम्हांला उत्तर येत नाहीये का ?"
तेजू " सॉरी मॅम , जरा भावूक झाले .. उत्तर येतंय मला .. अरेंजरने तिला टिशू आणून दिला तिने डोळे पुसले आणि पुन्हा कॉन्फिडन्टली उत्तर द्यायला तयार झाली
तेजू " थँक यु सो मच मॅडम .. खूप छान प्रश्न विचारला आहेत तुम्ही .. माझ्या दृष्टीने स्त्री चे स्त्रीत्व हे मातृत्वात आहे .. स्त्रिया पुरुषानं बरोबर खांद्याला खांदा लावून काम करू शकतात .. . पुरुष जरी कितीही ताकदवान असले तरी मातृत्वाचे वरदान हे फक्त आणि फक्त स्त्री ला च आहे .. आपल्या गर्भातून एक नवीन जीव तयार करण्याचा अविस्मरणिय अनुभव फक्त स्त्री कडे देवाने दिला आहे .. तशी तिची रचना केली आहे .. मला वाटते ह्यातच स्त्री चे स्त्रीत्व आहे. "
यावेळी भरून आलेले डोळे फक्त सुनील आणि सासूबाईंनाच कळले इतके शिताफीने ते लपवले पण उत्तराला खूप टाळ्यांनी प्रतिसाद दिला ..
थोड्याच वेळात रिझल्ट लागला आणि अर्थातच तेजुने या वर्षीचा \" सौभाग्यवती भव : \" स्पर्धेचा \"किताब जिंकला होता .. लगेचच मराठी फिल्म जगतातील फेमस ऍक्टरच्या हस्ते तिला क्राऊन घालण्यात आला .. तिथल्याच नगरसेविका यांनी तिला साड्यांची महाराणी पैठणी देऊन तिचा सत्कार केला .. आणि अनेक गिफ्ट तिला मिळाली .. रिझल्ट लागल्यावर सुनील आनंदातच स्टेज वर गेला आणि तिला घट्ट मिठी मारली " काँग्रट्स .. यु डिड इट .. आय एम प्राऊड ऑफ यु बायको . "
मग काय त्या दिवशी मॅडम सेलिब्रटीच झाल्या होत्या .. खूप सारे फोटोस काढले .. आणि मग आनंदात तिघे घरी आले ..
सुनीलने अंदाजे तिच्या ओवुलुशन डे च्या जवळच्या डेट्स चे तिकीटस बुक केले होते
सुनील " मग .. मॅडम .. हे घ्या माझ्याकडून तुम्हांला गिफ्ट ?"
तेजू ने चेक केले तर आत मध्ये तिकिट्स होती ५ दिवसांची ट्रिप उटी मैसूर , बंगलोर ची ..
तेजू " अरे वाह !! सुनील त्या उटीच्या च्या बंगल्यात हम आपके है कौन चे शूटिंग झाले होते ना तो बांगला बघायचाय मला "
सुनील " अरे डार्लिंग , आपण त्याच बंगल्यात राहणार आहोत ( हे काल्पनिक आहे .. तो बंगला असा टुरिस्ट ला रहायला देतात कि नाही मला माहित नाही )अग लकीली माझे एक क्लाएंट उटी चे आहेत त्यांच्या ओळखीने चक्क पाच दिवस आपल्याला तिथेच रहायचं आहे "
तेजूने एकदम आनंदात उडीच मारली " वॉव !! आय एम सुपर एक्ससायटेड "
सुनील " मला माहितेय मॅडम .. तुला काय आवडते आणि काय नाही हे सगळे लक्षांत आहे माझ्या .. चला मग पॅकिंग करायला सुरुवात करा .. "
तेजू " नक्कीच .. लगेचच .. "
सुनील तिच्या कानात " डोन्ट फर्गेट आपला सेकण्ड हनीमूनच आहे .. सहा महिन्यांच्या गॅप नंतर "
तेजू " यु ... सारखे सारखे तेच ऐकवत असतो .. " म्हणतच त्याच्या मागे त्याला मारायला धावत होती आणि तो पुढे पळत होता .. आणि सासूबाई किचन मध्ये कुकर लावत होत्या .. त्याही खुश होत्या .. आपले दुःख बाजूला सारून दोघेही असे हसतायत खिदळतायत बघून खूप छान वाटले त्यांना ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा