स्त्रीत्व भाग ६७

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ६७
क्रमश : भाग ६६
आदी “चल उठ खाऊन घे .. आज मी तुझ्यासाठी खिचडी बनवलीय पहिल्यांदा " बोलता बोलता तिला बेडला टेकवूंन बसवले .. पाठीला उशी लावली
आदीने एक चमचा भात चमच्यात घेतला आणि फुंकर मारून तिच्या तोंडा समोर धरला ..
तर स्पृहाला इतके भरून आले .. दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून हमसून हमसून रडू लागली ती
आदी " काय झाले ? नको वाटतंय का ? आय नो जरा भातात पाणी जास्त आहे .. पण पेशन्टला असाच भात द्यायचा असतो "
स्पृहा अजूनही हमसून रडत होती
शेवटी आदीने डिश पुन्हा झाकून ठेवली .. आणि तिचे हात बाजूला करू लागला .. " नको ना रडूस , आता झालेत ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व .. तुझ्या घरातून परमिशन मिळालीय .. इटस टाईम टू सेलेब्रेट "
स्पृहा रडतच " आदी .. "
आदीने त्याच्या पॉकेट मधून कोरा करकरीत रुमाल काढला आणि तिचे डोळे पुसू लागला .. रडून नाक लाल झाले होते ..तो चेहरा पुसत असताना स्पृहा एकदम त्याला बिलगली .. दोन्ही हाताने त्याला घट्ट पकडले
स्पृहा रडतच " आदी .. किती प्रेम करशील .. ऑर्डर सोडलीस कि काय वाटेल ते तुला तू मिळवू शकतोस .. पण माझ्यासाठी तू आज भात बनवलास .. तू करतोस इतकं प्रेम नाही करत मी .. मघाशी बाबा चिडलेत म्हटल्यावर लगेच आपला प्रवास संपवायला निघाले हिते मी .. सॉरी .. माझ्यात हिम्मत नाहीये रे तुझ्या इतकी "
आदीला तिने घट्ट पकडले होते .. त्याला इतके छान वाटतं होते .. आज पहिल्यांदा ती त्याच्या जवळ मनापासून आली होती .. कशाचाही विचार न करता .. इतके कि खाली आपले आई बाबा आहेत कधीही कोणीही वर येऊ शकते .. दार उघडे आहे .. आज कशाचीही तिला तमा नव्हती ..
आदीने तिला त्याच्या हाताने कव्हर केले .. तिच्या केसांत .. कपाळावर तो किस करत होता .. " तुझ्या बरोबर इथून पुढची माझी अख्खी लाईफ मला व्यतीत करायची आहे .. तू लवकर माझी बनून ये माझ्या आयुष्यात .. मला आता नाही राहवत तुझ्या पासून लांब .. "
स्पृहा " मला पण आता नाही राहायचंय लांब .. मला तुला तुझे पेंडिंग गिफ्ट द्यायचंय .. पण हिम्मत नाहीये माझ्यात .. मला माहितेय तू माझ्या होकारासाठी थांबलाय .. सॉरी .. मी काय करू .. कसे करू "
आदिला हसायलाच येऊ लागले
आदी " यु मिन .. यु वॉन्ट टू किस मी ?" तो मुद्दामून तिला छेडत होता
स्पृहा एकदम ओशाळली .. आणि त्याच्या भोवतीचे हात एकदम सैल पडू लागले
आदी " यार , नको ना लगेच लांब जाऊस .. किती छान वाटतंय .. अशीच जवळ राहशील ना माझ्या कायम .. माझ्या हृदयातील स्पंदने तुला ऐकायला आली पाहिजेत इतकी जवळ पाहीजेस तू मला नेहमी. "
स्पृहा रडतच " आदी , मला कंटाळणार नाहीस ना तू कधी .. मला जास्त फॅशन माहित नाही ? मला जास्त हॉटेलिंग माहित नाही ? मला टेबल मॅनर्स पण माहित नाही ?.. स्टाईल माहित नाही .. तुझी माझी बरोबरी होईल ना .. तुझ्या हाय सोसायटीत माझा निभाव लागेल ना .. "
आदी " यार , स्पृहा किती रडतेस .. आणि तू मझ्या घरी आली आहेस ना .. तुला कधी ऑकवर्ड वाटले का ? नाही ना ? काही नवीन गोष्टी असतील पण होईल ना तुला पण सवय त्याची .. मी आहे ना तुझ्या बरोबर तू कशाला काळजी करतेस ?"
स्पृहा " सगळेच तुला शिकवायला लागेल मला .. मग कंटाळशील तू ?"
आदी " असा कसा कंटाळेन .. आणि खरं सांगू .. तू आहेस ना तशीच मला आवडतेस .. "
आदी " बरं .. चल जेवून घे .. खाली डॅड आलेत .. तुला भेटायला येतील .. तू छान दिसली पाहिजेस ना .. आज काय तें होऊनच जाऊ दे .. आता तुझ्या बाबांना कळेल कि मी कोण आहे ते .. अजून काय चिडा चीड होतेय काय माहित ?"
स्पृहा " आदी .. सॉरी .. माझ्यामुळे खूप प्रॉब्लेम्स वाढले ना "
आदी " ए गप ग .. पकवू नकोस .. जेवून घे पटकन . आणि मग साडी नेसून खाली ये .. मग मी आणि डॅड तुला प्रश्न विचारू .. आय एम सो एक्ससायटेड "
स्पृहा " तू मला काय प्रश्न विचारशील ?
आदी " उम्म्म ..... तुला हनिमूनला कुणीकडे जायला आवडेल? तुला किती मुलं पाहिजेत असले काहीतरी साधे साधे प्रश्न विचारेन ?" आणि हसू लागला
स्पृहा " आदी .. हे असले प्रश्न मला तू आई बाबा आजी आणि डॅड समोर विचारणार आहेस ?"
आदी हसतच " मग विचारतो .... किस कधी देणार आहेस ? हा चालेल प्रश्न ?"
स्पृहा " जा बाबा .. तू काय पण बोलतोस ?"
आदी " ए यार .. पण सिरिअसली .. आय वॉन्ट टू किस यु .. राईट नाऊ .. प्लिज मे आय ?"
स्पृहाने लगेच त्याला सोडले .. " आता .. आज .. आय मिन .. “एकदम प्रेशराइज्ड झाली होती ती
आदी " अग ए .. त्यात एवढं काय घाबरते ... इट्स नॉट द्याट हार्ड ... आय थिंक " बोलतच त्याने तिच्या हाताच्या बोटांवर किस केले .. आणि तिने लगेचच हात मागे घेतला ..
आदी " यार .. किती हात पटकन खेचून घेतलास . जरा होल्ड कर ना पोझिशन "
स्पृहा " आदी कोणीतरी येईल वर ?"
आदी " ठीक आहे मग दार लावतो "
स्पृहा " अरे .. खाली आई बाबा आहेत ना ? असा काय ?"
आदी " आता मी जर घर जावई झालो तर ते असतीलच ना खाली .. मग काय ?"
स्पृहा खिडकीच्या पांढऱ्या ट्रान्सपरंट पडद्यामागे गेली .. त्याने तिला पडद्यासकटच पकडली .. दोन्ही हाताने तिचा चेहरा हातात घेतला .. पांढऱ्या झिरमिरीत पडद्या मागे तिचा चेहरा निहाळत होता.. तिचे ओठ त्या पडद्यामागून स्पष्ठ दिसत होते .. आणि त्या पडद्यावरच त्याने तिच्या ओठांवर किस केले .. ती स्तब्ध एकदम स्तब्ध झाली होती .. त्याच्या ओठांचा स्पर्श पडद्याच्या कापडा मधून पण तिला जाणवला होता ... दोन एक मिनिटाने तो थांबला तर पडद्यामागे तिचा चेहरा त्याला दिसला .. डोळे बंद केले होते तिने .. त्यानं पडदा बाजूला केला .. आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावर हात ठेवून .. किस करू लागला .. जेव्हा त्याचा डायरेक्ट स्पर्श जाणवला तेव्हा तिने एक सेकंद डोळे उघडले तर त्याने डोळे मिटले होते ..
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
समय का ये पल थम सा गया है
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो...

कितने गहरे हलके, शाम के रंग हैं छलके
परबत से यूँ उतरे बादल, जैसे आँचल ढलके
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो...

सुलगी सुलगी साँसे, बहकी बहकी धड़कन
महके महके शाम के साए, पिघले पिघले तन मन
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो...

फायनली .. सर्व पाश सुटले होते .. अंतर कापत दोघे एकमेकांच्या जवळ आले होते .. आज आत्ता या क्षणी स्वर्गीय आनंदात होते
तो क्षण गेल्यानंतर स्पृहाने लाजून त्याच्या छातीवर कपाळ टेकवलं .. खूप लाजत होती .. त्याच्याकडे बघायलाही त्याला होत नव्हते .. आणि तो थोडासा शांत झाला
आदी " स्पृहा .. "
स्पृहा " हमम "
आदी " रोज .. असा किस मिळाला ना तर कधीच कंटाळणार नाही मी "
तशी स्पृहा अजूनच लाजली आणि त्याच्या मिठीत सामावली ..
तेवढयात खालून आरोळी आलीच
आदी " बघ , मला तुला भरवायचे होते ना . चल पटकन दोन घास तरी खा ना माझ्या हातून "
आदीने पुन्हा हॉट पॉट मधून गरम राईस काढला .. आणि तिला चमच्याने भरवू लागला .. आणि ती तो आळणी असलेला राईस अतिशय चवीने , आवडीने खात होती ..
आदी "आवडला ?"
स्पृहा "जगातली सगळ्यांत भारी डिश आहे हि .. एकदम टेस्टी आहे .. आय जस्ट लव्ह इट "
आदी एकदम खुश झाला .. आणि आनंदाने तिला भरवू लागला .. तिला आनंदात खाताना बघून त्याला आंतरिक समाधान मिळत होते "
खाली बोलावले होते म्हणून पटपट ती खात होती .. आणि हा पटपट भरवत होता ..
आदी " ओके .. जातो आता खाली मी .. ठीक आहे .. तू आराम कर .. ह्या गोळ्या खा .. मग खाली ये .. "
स्पृहा " ओके "
आदी खाली जायला निघाला तर स्पृहा " आदी एक मिनिट .. इकडे ये ना "
आदी तिच्या जवळ खाली वाकला
स्पृहा त्याच्या कानाजवळ " आदी , आय लव्ह यु "
तिने त्याच्या गालावर पटकन किशी दिली एकदम अनपेक्षित होते त्याला ..
आदी " यार स्पृहा .. थँक यु .. तुला माहित नाहीये हे माझ्यासाठी किती मॅटर करतंय " म्हणतच तिच्या कपाळावर किस करून खाली गेला.
--------------------------------
आदी खाली गेला तर आदींचे डॅड एकदम साध्या पॅन्ट शर्ट मध्ये आले होते .. एकदम मिडल क्लास असल्या सारखे वाटत होते ते.
श्रीधर आदीला पाहून " सर , हा बघा राज, जो माझा जावई होणार आहे .. आपल्या कंपनीत माझ्या अंडर इंटर्न म्ह्णून काम करतोय .. तुमच्या मुलाचे स्थळ तुम्ही घेऊन आलात माझ्या सारख्या गरीब माणसाकडे .. तुमचे मोठेपण आहे .. पण माझी मुलगी ह्या मुला बरोबर जास्त सुखी राहील .. तो सांभाळून घेईन तिला .. याची खात्री पटलीय मला .. तुमचा मुलगा फॉरेन रिटर्न आहे .. हायली एडुकेटेड असेल .. माझी मुलगी एकदम साधी आहे .. तिला तुमच्या मुला बरोबर जुळवून नाही घेता येणार .. सर प्लिज मला माफ करा .. "

🎭 Series Post

View all