स्त्रीत्व भाग ६६

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ६६
क्रमश : भाग ६५
स्पृहाचे माझ्यावर प्रेम आहे हे मला माहितेय .. तिला माहितेय एवढ्यावर आम्ही दोघे जगतोय .. आज मी आणि माझे डॅड तुमच्याकडे ऑफिशियली मागणी घालायला येणार होतो तर हे असे झाले ..
लग्नाचे म्हणाल तर ती ऍक्सेप्टच करत नव्हती माझे प्रेम म्हणून मी तिला देवळात नेलं आणि तिच्या भांगेत देवी समोरचे कुंकू लावले .. बास .. यापुढे काही नाही .. तिला तिच्या बाबांच्या कंपनीत जॉब करायचाय .. तिच्या बाबांच्या गाडीवर बसून ऑफिसला जायचंय .. आणि हे स्वप्न आधी पूर्ण करायचंय आणि मग लग्न .. २ वर्षांचा वेळ ती मागत होती माझ्याकडे .. पण मीच उतावळा झालो होतो ..एवढा काळ मी नाही राहू शकत तिच्याशिवाय .. म्हणून मी आज डॅडला घेऊन येणारच होतो
श्रीधर आणि संगीता सगळे ऐकत होते शांतपणे
आदी " दोन महिन्यांनी स्पृहाची परीक्षा झाल्यावर आमची ऑफिशिअली एंगेजमेंट करू .. आणि मग थोड्या दिवसांनी लग्न .. म्हणजे निदान ती मला फोन तरी करेल इतकी साधी अपेक्षा आहे माझी .. एकदा तुमच्या कडून ग्रीन सिग्नल मिळाला कि ती घाबरणार नाही मला भेटायला ... तिला तिच्या पसंतीने लाईफ पार्टनर चूज करायचा अधिकार आहे .. हे का विसरताय तुम्ही ? "
आजी " बरं .. ते कुकर बंद कर .. १० शिट्या झाल्या "
आदीने गॅस बंद केला
आदी " आणि एक सांगतो आता नाजोपर्यंत तुम्ही परमिशन देत नाही तोपर्यंत मी इथून जाणारच नाहीये .. आता तुमचा घर जावईच बनतो .. म्हणजे निदान जे काही आहे ते तुमच्या डोळ्यासमोरच घडू दे "
एका हॉट पॉट मध्ये खिचडी वाढून घेतली .. प्लेट , स्पून घेतलाआणि वरती रूम स्पृहाच्या मध्ये जायला लागला
-----------------------------------------------
आजी " संगीता , मुलगा दिसायला राजबिंडा आहे .. मुलगा श्रीधरच्या कंपनीत कामाला आहे .. त्याचे वागणूक , विचार चांगले आहेत .. आणि याही पेक्षा .. स्पृहावर जीव ओवाळून टाकतोय तो .. अजून कसा जावई पाहिजे तुम्हांला ? थोडा शांत चित्ताने विचार करा दोघेजण "आणि आजी देव घरात निघून गेल्या ..
श्रीधर " राजने मला हे सगळे सांगितले होते .. तेव्हा मी त्याला बोललो होतो .. तुझी गिर्ल्फ्रेन्ड एकदम चांगली आहे.. तिच्यावर चांगले संस्कार केलेत तिच्या आई बाबांनी .. पण हि गल्फ्रेन्ड आपलीच मुलगी आहे हे मला सहन नाही झाले .. राज तसाही मला पाहतच क्षणी आवडला होता .. स्पृहासाठी .. "
संगीता " त्याला जमत नव्हता तर कसाबसा भात केला त्याने तिच्यासाठी .. किती काळजी करतोय तिची .. मला वाटत आपण त्यांना परमिशन देऊया का ?"
श्रीधर " परमिशन पेक्षा आशीर्वाद देऊया .. आपली मुलगी सुखात असणे जास्त महत्वाचे आहे "
तेवढयात राजने आवाज दिला
" सर , स्पृहाला शुद्ध येतेय .. तुम्हांला बघून तिला आनंद होईल .. प्लिज या लवकर "
आजीने हे ऐकून देवाची घंटी वाजवली
श्रीधर आणि संगीता वर आले
स्पृहाने डोळे उघडले तर समोर आई बाबांना बघून रडू लागली
स्पृहा " आई , मी नाही फसवलंय तुम्हांला ? वेळ आली कि सांगणारच होतो आम्हीं .. ते राज बरोबर फिरले नाही आई मी.. आई राज ने मला हातही नाही लावलाय .. आई राज चांगला मुलगा आहे .. आई प्लिज त्याला काही शिक्षा नका देऊ .. जे काय बोलायचं ते मला बोला .. आई तुझ्यात त्याची आई शोधतो ग तो .. आई खूप इमोशनल आहे तो .. बाबा .. मी फक्त हे तीनच कॉल केले त्याला .. याआधी आणि नंतर कधीच कॉल नाही केला .. आत्ता मगाशी करून फक्त सांगितले .. बाबा .. राज बरोबर माझ्या पेक्षा तुम्हीं जास्त वेळ घालवला आहे .. तुम्हीच सांगा तो वाईट आहे का ?
दाराच्या मागून राज सगळे ऐकत होता .. आणि आता त्याचे डोळे पाणावले होते .. बिचारी स्पृहा त्याची बाजू मांडायचा प्रयन्त करत होती
संगीता " बस बस .. आता जेवून घे .. तुझ्या राजने तुझ्यासाठी त्याच्या हाताने खिचडी बनवलीय "
श्रीधर " सॉरी .. मी खूप ओरडलो आज तुला ? एक बाप म्हणून कदाचित कमी पडलो \"
स्पृहा " बाबा , एक मुलगी म्हणून मी नाही कमी पडलेय .. आदीने माझ्याशी देवळात लग्न केले .. तरीही आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये नाही राहिलो .. नेहमी तुम्हला काय वाटेल हाच विचार पहिला असायचा माझ्या मनात ?"
श्रीधर " सॉरी बेटा , जेव तू .. आणि आराम कर .. "
आदी आहे इथेच त्याला भेट .. पाठवतो त्याला ..
स्पृहा " आई बाबा , तुम्हांला आदी पसंत आहे ना ?"
तेव्हढ्यात आजी वर आल्या ..
आजी " स्पृहा , मला माझा नातं जावई एकदम पसंत आहे .. ते तुमच्या भाषेत हँडसम आहे .. "
तसा राज बाहेर रडता रडता हसला ..
श्रीधर " हि आई ना "
संगीता " राजला सांगून त्याच्या वडिलांना भेटायला आम्ही लवकरात लवकरच जाऊ .. ठीक आहे .. पण याचा परीक्षेवर परिणाम झाला नाही पाहिजे .. आधी काहीतरी बना मग संसार करा ,, नाहीतर मग आमच्या सारखं फक्त घर एके घरच करावे लागेल "
श्रीधर " काहीही काय बोलते सांगिता , तुला नोकरी करायची नव्हती म्हणून तू घरी राहिलीस ना "
संगीता " हो तेही आहेच .. पण मलाही वाटतं कधी कधी मी पण करायला पाहिजे होती नोकरी .. थोडा तुमचा आर्थिक भार कमी केला असता "
आदी अजूनही रूमच्या बाहेरच होता श्रीधरने त्याला हाताला धरून आत आणले
श्रीधर " मग जावई बापू .. भेटा तुमच्या बायकोला .. आम्ही खाली आहोत .. "
राज डोळे पुसत आत आला .. स्पृहा बेड वर आडवी पडूनच त्याच्याकडे बघत होती ..
श्रीधर आईला हात धरून हळू खाली गेले ..
संगीता " राज , तुझे बाबा काय करतात ?"
आदी मनात " साला , एका झमेल्यातून सुटलो नाही तर दुसरा झमेला सुरु "
तितक्यात आदींच्या मोबाईल वर कॉल आला ..
आदी मनात " आहे आहे .. देव माझा पाठीराखा आहे .. कॉल वर बोलायला म्हणून आदी रूम मधून बाहेर गेला
संगीता " स्पृहा , लागले नाही ना बाळा तुला ?"
स्पृहा " आई . किती जोरात जोरात मारलस मला .. खांद्यातून हात दुखतोय माझा .. "
संगीताने तिच्या गालावर हात फिरवला .. ह्याच गालावर मघाशी तिने जोरात मारली होती .. अजून गाल लाल होता संगीताच्या डोळ्यांतून अश्रू आले " तू .. मला पण नाही सांगितलेस ?मी किती खोदून खोदून विचारत होते तुला ?"
स्पृहा " आई काय सांगू ? मीच या सगळ्याला मनातून तयार नव्हते .. हे असे प्रेम करणे प्रेम पाप आहे असेच वाटायचे मला .. आदीने शेवटी मनवलेच मला .. आई आता तुला सांगते आज जी गोष्ट तुला माहित असली पाहिजे
संगीता " काय ग ?
स्पृहा " आदीने मला देवळात नेले आणि तिथे माझ्या केसांत देवी समोरचे कुंकू भरले .. आणि मला म्हणला " आज पासून तू फक्त माझी आहेस .. मी इतकी घाबरले .. त्याने असे कसे केले मला काहीच कळेना आणि मला मंदिरात अशीच चक्कर आली .. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी आदींच्या घरी होते .. घरी त्याची केअर टेकर पण होती माझ्या जोडीला ..
तेव्हा खरा मी आदिला ओळखले .. त्याची आई आपल्या सारखीच सर्व सामान्य होती .. नाहीयेत त्या जगात .. पण माझे राहणीमान त्याच्या आई सारखे आहे म्हणून तो माझ्याकडे ओढला गेला .. घरी त्याने मला आईचा फोटो दाखवला .. आई तो त्याच्या आईच्या फोटोशी बोलतो .. माझ्या इतका जवळ होता पण त्याने त्याचा कधीच गैरफायदा घेतला नाही किंवा घ्यायचा प्रयत्नही नाही केला .. फक्त माझे प्रेम आहे तुझ्यावर एवढेच बोलायचा ..
मला शुद्धीवर येई पर्यंत रात्रीचे १० वाजले होते .. त्यामुळे नाईलाजाने मला आदींकडे रात्र काढावी लागली .. तो त्याच्या बाबांच्या रूम मध्ये वरती झोपला मी सुनंदा बरोबर खाली त्याच्या रूम मध्ये झोपले
मी तिकडे थांबणार आहे म्हणून बघ सुनंदा च्या आजोबांनी फोन केलेला तो दुसरा कोणी नसून आदी होता .."
श्रीमंत असून त्याच्या साधे पणावर माझे मन बसत गेले .. मी त्याला होकार तर दिला पण दोन वर्षांनी एकत्र येऊ असे सांगितले .. एक वर्ष जॉब केल्यावर तू घरी येऊन मागणी घाल असे ठरवले होते .. पण त्याला ते नाही पटत .. तो म्हणतो आपले प्रेम असे लपवायचं का ? सांगायचं का नाही ? आपण काही चूक करत नाही ? थोड्या वेगळ्या विचारांचा आहे .. म्हणून त्याला लवकर लग्न करायचंय .. कारण मी त्याच्याशी असले रिलेशन ठेवायला तयार नाहीये ..
संगीता " तू त्याच्या घरी एक रात्र राहिलीस हे त्याच्या बाबांना माहितेय का ?"
स्पृहा " बहुतेक हो .. तो सगळे बोलतो त्याच्या डॅड शी .. "
संगीता " तुला मला पण सांगावेसे नाही वाटले ना हे सगळे ?"
स्पृहा " आई , अग मला वाटले कदाचित दोन वर्षांनी आजच्या ह्या बोलण्याला काहीच अर्थ नसेल .. कदाचित तो निघूनही जाईल माझ्या आयुष्यातून .. पण जेव्हा रिलेशन मध्ये दोघेही मनाने आहोत हे जाणवले लगेच घरी सांगून टाकायचे ठरवले .. आज तो डॅडला घेऊन मागणी घालायला येणारच होता .. तर बाबांना बिल सापडले आणि हे सगळे झाले ..म्हणून राहिल "
आदी रूम मध्ये यायला आणि खाली डोअरबेल वाजली
संगीता " कोण तरी आले वाटतं .. मी खाली जाते .. "
आदी " काकू , मी इथे स्पृहा जवळ थोडा वेळ थांबलो तर चालेल का तुम्हांला ? म्हणजे ती जेवे पर्यंत थांबतो .. मग जातो घरी "
संगीता " आता तू पण जेव आणि जा .. मी जेवण बनवते "
आदी एकदम खुश झाला .. " काकू , ती परवा जी केली होती ना तशी आमटी कराल प्लिज "
संगीता खाली निघून गेली .. खाली कोणीतरी पाहुणे आले होते .. श्रीधर आणि त्यांचा बोलण्याचा आवाज येत होता
आदी " स्पृहा, कशी आहेस ? किती टेन्शन घेतेस यार ? "
स्पृहा " मी ठीक आहे आता .. काय माहित ? खूप भीती वाटत होती मला .. "
त्याने तिच्या गालावरून हात फिरवला " गाल दुखतोय .. ?"
स्पृहाने मान हलवून होकार दिला .. " हात पण दुखतोय .. आईने पाठीत धपाटे घातले ना ते खांद्यातून कळ येते.. हात हलवला कि "
आदी " किती जोरात मारत होत्या काकू ?"
स्पृहा " सॉरी .. तुला आज काय काय बघायला मिळाले आमच्या घरात ?"
आदी "आमच्या ?"
स्पृहा "आय मिन आपल्या " आणि एकदम लाजली .

🎭 Series Post

View all