स्त्रीत्व भाग ६२

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ६२
क्रमश : भाग ६१
(कपडे घालून बाहेर आल्यावर मी त्याला चार लाख रुपये दिले .. तेव्हा त्याने माझे एकटीचे फोटो सगळे डिलीट केले .. पण मला म्हणाला .....)
पुढे...
तो " खरंतर एका कडून १० लाख मिळालें तरच समाधान मिळते .. मला अजून एक शिकार मिळवून तू द्यायचास .. म्हणजे मग तुझे हे फोटो मी डिलिट करेन "
मी कशो बशी तिकडून घरी आले .. दोन दिवस घरातून बाहेरच पडले नाही .. काय झाले .. सगळे होत्याचे नव्हते झाले होते .. खूप रडले .. डॅनीला सगळे सांगायचं नव्हतं मला .. माझ्या लेव्हल वरच सोडवायचं होते .. त्यातच मला कळले कि मी प्रेग्नन्ट आहे ..
तेवढ्यातच प्रसादचे डिपार्टमेंट बदलले आणि तो माझ्या अंडर कामाला आला.. आणि माझ्याकडे पर्याय नव्हता .. एक शिकार म्हणून प्रसाद मी त्याला दिला .. पण तरीही त्याने मला वेठीस धरले .. प्रसाद बरोबर माझा एक फोटो पाहिजे होता .. म्हणून प्रसादला घरी बोलावले .. तिकडे त्याच्याशी जवळीक करायला त्याने मला भाग पाडले ... जे काही होत होते ते .. सगळे त्याच्या इंस्ट्रक्शन वरून होत होते .. जेव्हा मी प्रसाद शी बोलत होते तेव्हा त्याने प्रसादचे फोटो काढले .. वेगववगेळ्या ऍंगलला कॅमेरे लावले होते रूम मध्ये ..
प्रसाद गेल्यावर त्याने माझे आणि त्याचे होते ते सगळे फोटो डिलीट केले माझ्या समोर .. मला वाटले आता मी सुटले या प्रकरणातून पण झाले उलटेच त्याने माझेच फोटो प्रसाद बरोबर एडिट करून प्रसादला पाठवले .. त्याची एक कॉपी त्याने डॅनीला पाठवली .. आणि एक कॉपी मला पाठवली .. आज सुद्धा पगार झाला कि घराचा हप्ता द्यावा तसा १ लाख रुपयाचा हप्ता मी त्याला देते .. आणि शिवाय प्रसाद कडून पण तो घेतो ते वेगळेच ..
प्रसादने पैसे दिले नाही गेल्या महिन्यात तर त्याने पुन्हा वेगवेगळ्या पोज मधले फोटो पुन्हा पाठवले .. आणि मला म्हणाला त्याला सांग कि तू जर पैसे नाही दिलेस तर तुझी बदनामी करेन .. तू माझ्या बाळाचा बाप आहेस हे कोर्टात सिद्ध करेन .. आणि हा खोटा DNA रिपोर्ट मला दिला तुला द्यायला "
प्रसाद मला माफ कर .. तुला यात उगाच अडकवले मी पण मीच स्वतः इतकी फ़सले.. त्याच्या जाळ्यात अडकलेय .. माझे फोटो आहेत त्याच्याकडे .. त्याला जर मी पैसे नाही दिले किंवा तू नाही दिलेस तर तो माझे फोटो कोणा बरोबर पण एडिट करू शकतो.. "
आता लिझाच्या डोळ्यांत पाणी होते आणि आता ती हमसून हमसून रडू लागली .. आता पर्यंत सगळे कुठेतरी मनात दाबलेलं होते .. आज ते बाहेर पडले होते ..
ती जे काय बोलली ते अभयने सगळे मोबाईल वर रेकॉर्ड करून घेतले होते ..."
रागिणी त्रिवेणी एकदम सुन्न झाल्या होत्या ..
लिझा " इट वॉज ट्रॅप फॉर मी .. माझे सगळे आयुष्य बरबाद झाले .. त्यात हा डॅनी फोटो पाहिल्यावर मला तिकडे बोलावून घेतले आणि माझ्याशी किती भांडला .. मला घरातून हाकलून लावलं त्याने .. म्हणे डिवोर्स देणार आहे मला .. त्याचा माझ्यावर तीळा एवढा पण विश्वास नाहीये .. सांगून सांगून थकले कि हे बाळ आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे पण नाहीच त्याला पटतच नाहीये .. आता हा मला माझ्या बाळाचा बाप म्हणून नकोय माझ्या आयुष्यात .. माझे काय होयचं चे होऊ दे म्हणे प्रयन्त लिझाच्या पोटात अचानक दुखायला लागले आणि ती ओरडायला लागली .
प्रसादने लिटरली कशाचाच विचार न करता तिला दोन्ही हातांवर उचलले आणि तिला दवाखान्यात नेऊ लागला . त्याच्या मागोमाग अभय गाडीची चावी घेऊन उतरला ..
डॅनी मात्र खजील होऊन चेअर मध्ये निपचित पडला होता .. अजूनही त्याचे हातपाय बांधले होते .
त्रिवेणी आणि रागिणी त्याला इथेच तसेच सोडून दवाखान्यात जाणार होत्या तेवढ्यात तिथे रोहन आला
रोहन " सॉरी ... मला उशीर झाला का ? " असे म्हणे पर्यंत चेअरवर बांधलेला डॅनी दिसला आणि रोहन घाबरलाच
रोहन " ए .. हे काय आहे ? ह्याला बांधलंय का ? हा च तो का ब्लॅकमेलर .. ?"
रागिणी " नाही रे हा लिझाचा नवरा आहे "
मग त्याला का असे बांधलंय .. त्याला कोणी मारलं हे सगळे रागिणीने त्याला सांगितले
रोहन " अरे यार .. हा प्रसाद पण ना .. काही पण करतो .. सोड त्याला .. आपण हात सोडू त्याचे "
त्रिवेणी " नको .. इथे आपण सगळेच लेचेपेचे आहोत . प्रसाद भाऊजींना नाहीतर अभय येऊ दे .. तेच बघतील याच काय करायचं ते "
-----------------------------
दुसऱ्या दिवशी आदी
आदी " गुड मॉर्निंग डॅड "
डॅड " गुड मॉर्निंग .. झाली झोप "
आदी " डॅड , आय वॉन्ट टू गेट मॅरीड .. as अर्ली as पॉसिबल "
डॅड " व्हॉट ? अरे आता तुझे लाँचिंग आहे ना ?"
आदी " मग काय झाले ? लाँचिंग वर काय माझे करिअर अवलंबून आहे का ? मी काम तर करणारच आहे नीट "
डॅड "काय झाले काय अचानक ?
आदी " मला हे पटतच नाहीये मुळात .. आहे ते रिलेशन हाईड करायचं ?
डॅड " यु आर टू यंग फॉर मॅरेज "
आदी " आय नो .. पण तुम्हीच म्हटले ना कि तुम्ही माझ्या वयाचे होते तेव्हा तुम्हांला मी झालो होतो मग "
डॅड " तो काळ वेगळा होता " अरे , आदी .. असा आततायी पणा करू नकोस .. तिचा विचार कर .. ती लहान आहे अजून .. ती लग्नासाठी तयार तर होऊ दे "
आदी " तुम्हांला काय माहीत लहान आहे .. तुम्ही तर तिला पाहिले पण नाही "
आदी " हाऊ डू यु नो ?"
डॅड " तुझा बाप आहे मी "
आदी " म्हणजे ?"
डॅड " आय नो स्पृहा आणि आय नो हू इज हर फादर "
आदी " डॅड , सांगा ना नीट "
डॅड " हे बघ , तू कुठे जातोस ? कोणा बरोबर टाइम स्पेंड करतोस ? सगळ्याचा माझ्याकडे रेकॉर्ड आहे ?"
आदी " डॅड .. का पाठवता बॉडीगार्ड माझ्या मागे ? "
डॅड " एकुलता एक मुलगा आहेस तू ?"
आदी " तुम्ही पाहिलीय का तिला ?"
डॅड " नाही रे .. फोटो पाहिलाय ? सुंदर आहे .. आणि तुझ्या आई सारखी जास्त आहे .. हो ना "
आदी जरासा लाजला " हमम . शी इज ब्युटीफुल .. पण डॅड मला पाहिजे ती लवकरात लवकर आपल्या घरात.
आदी " तुम्हांला कशी माहिती ती सांगा ना "
डॅड " तूला मी म्हटले होते ना मी आपल्या एका एम्प्लॉयीची मुलगी तुझ्यासाठी पसंत केलीय .. ती श्रीधरचीच मुलगी आणि कॉलेजमध्ये तू जिच्या मागे लागलास तिची माहिती काढली तर मला कळले कि ती हीच मुलगी आहे .. म्हणून मग मी तुला कधीच विरोध केला नाही "
आदी " ओह डॅड .. सही .. काय को इन्सिडन्स आहे .. म्हणजे आपली चॉईस सेम "
डॅड " येस .. पण आता आधी तुझे लाँचिंग करू मग लग्न ठीक आहे "
आदी " पण डॅड एक प्रॉब्लेम आहे .. मी श्रीधर सरांच्या अंडर काम करतोय .. त्यांना आता कळु दया कि मी तुमचा मुलगा आहे .. नाहीतर नंतर प्रॉब्लेम होईल "
डॅड " श्रीधर खूप चांगला माणूस आहे .. मला खूप मानतो "
आदी " डॅड प्लिज डोन्ट प्रेशराइज्ड हिम .. "
डॅड " हो रे .. आला मोठा सासऱ्याच्या पुळका तुला " आणि हसायला लागले"
आदी " डॅड .. असे नाहीये काही .. ते थोडे प्रेशर घेणारे आहेत म्हणून म्हटले "
डॅड " उद्याच बोलतो श्रीधर ला कि मला तुझी मुलगी सून म्हणून पाहिजे "
आदी " ठीक आहे .आणि मी तुमचा मुलगा आहे.. मी का असे काम केले .. माझी आयडेंटिटी का लपवली हे सगळे पण सांगा .. नाहीतर त्यांना वाटेल मी फसवलं त्यांना "
डॅड " ठीक आहे .. तू काळजी नको करू .. मी बघतो "
आदी " थँक यु डॅड.. माझे लाँचिंग होईल तेव्हा निदान आमच्या एंगेजमेंटची तरी अनाऊंसमेंट करा "
डॅड " अरे बाळा , त्या लोकांचं काय मत आहे हे पण बघावं लागेल .. मला बोलू तर दे त्यांच्याशी "
आदी " ठीक आहे "
--------------------------------------------
इकडे गम्मत अशी झाली कि स्पृहाच्या मोबाईलचे बिल श्रीधरच्या हाती आले .. सहज बिल चेक करताना त्यांच्या लक्षांत आले कि रात्री १२ वाजता वगैरे एकाच नंबर वर आऊट गोइंग कॉल आहेत .. श्रीधरच्या पाया खालची जमीनच सरकली .. त्यांनी तो नंबर त्यांच्या मोबाईल वरून डायल केला तर तो नंबर राजचा आहे हे त्यांना कळले कारण तो त्यांच्या मोबाईल मध्ये सेव होता ..
श्रीधर एकदम खालीच बसला .. स्पृहा अशी वागत असेल .. स्पृहा रात्री राजला का कॉल करत असेल .. हिच्या मोबाईल मध्ये नंबर सेव नाहीये पण हिच्याकडे नंबर कसा आला .. याचा अर्थ हे दोघे आधी पासूनच ओळखत असणार .. राज सांगतोय ते जर खरं असले तर त्यांनी देवळात लग्न केलंय .. कदाचित तो इन्डायरेक्टली सगळे म्हणून मला सांगत होता .. हे दोघे इतके पुढे गेलेत कि .. तो तिच्या मागावर घरी आला .. मग माझ्या कंपनीतआला .. शुद्ध फसवणूक आहे हि ..
श्रीधर विचार करत होते , आता काय करायचं .. ह्या दोघांना परमिशन देऊ का ? मुलगा तर चान्गला आहे .. पण आपली फसवणूक केलीय म्हणजे कशावरून तो स्पृहाला फसवणार नाही ..
आराम खुर्चीत श्रीधर आराम करत बसले होते पण घाम सुटला होता .. बसल्या बसल्या ..
नमस्कार !! वाचकहो / लेखकहो / ईरा मेंबर्स
तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला मराठी नूतन वर्षाभिनंदन !! मराठी नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धी , ऐश्वर्य लाभो .. तुमची सगळी स्वप्न साकार होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते ..
असेच तुमचे प्रेम माझ्या लिखाणावर राहू द्या ..
नवीन वर्षाची माझ्याकडून एक छोटीशी भेट अजून एक भाग आज पोस्ट करतेय खास तुमच्यासाठी ..
धन्यवाद
शीतल महामुनी माने
दोन्ही भाग कसे वाटले जरूर कळवा ..
उद्या रात्री जमणार नाही म्हणून .. हा भाग उद्या रात्रीचा आहे असे समजा.

🎭 Series Post

View all