स्त्रीत्व भाग ५९

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ५९
क्रमश: भाग ५८
प्रसाद " रागिणी , थँक यु .. माझ्या बरोबर तू आहेस किती लकी आहे मी .. लीझा तिच्या नवऱ्याने ते फोटो बघितले आणि घरातून हाकलून लावले त्याने .. "
रागिणी " सो सॅड "
प्रसाद " तूला कसा काय माझ्यावर विश्वास ठेवावा वाटला ग ?"
रागिणी " कसे आहे प्रसाद , एक स्त्री तिच्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते .. म्हणजे तिला त्याच्यात काही अवगुण दिसतच नाही भले तो वाईट असो "
प्रसाद " म्हणजे .. मी वाईट आहे का ?" आणि हसला
रागिणी " अरे म्हणजे .. मला नाही सांगता एक .. प्रभू रामचंद्रांनी सीता मातेला अग्नी परीक्षा द्यायला लावली .. पण सीता माता सुद्धा त्यांच्या पासून तितकीच लांब होती .. ती नाही म्हणाली कि तुम्ही पण अग्नीपरीक्षा द्या ..आता मला सांग तिचा नवरा तिच्याशी एवढा वाईट वागला , उद्या तो परत आल्यावर लीझाने त्याला स्वीकारावे असेच सगळ्यांना वाटेल... आणि ती स्विकारेल पण त्याला... पण तसे पाहिले तर .. जो माणूस आपल्या बायको वर अशा प्रकारचा संशय घेतो त्याला माफ करावे कि न करावे ? मला सांग जर माझे तुला असे कोणी फोटो पाठवले तर तू काय केलं असतेस ? "
प्रसाद " शट अप यार !! कुठचा विषय कुठे नेतेय तू "
रागिणी " सॉरी पण हे ऐकायला सुद्धा नको वाटतंय ना "
प्रसाद " म्हणूनच मी तुला विचारले कि तू माझ्यावर कसा काय विश्वास ठेवलास ?"
रागिणी " त्याचे काय आहे ना ? माणूस कसा आहे हे त्याच्या डोळ्यांतुन कळतं .. म्हणून तर म्हणतात डोळे हा माणसाचा आरसा आहे .. तुझ्या डोळ्यांत मी बायको असताना सुद्धा कधी तसले भाव दिसले नाहीत .. तर दुसऱ्या स्त्री विषयी तर तू असा नक्कीच वागू शकत नाहीस ह्याची ग्यारेंटि होती मला .. उलट मीच तुझ्या जवळ आले होते पहिल्यांदा .. तर मला ... "
प्रसादने तिच्या तोंडावर हात ठेवला " नको बोलू आता पुढे .. माहितेय मला मी कसा वागलो ते " आणि हसला
प्रसाद " तरी पण हा विषय असा आहे कि असे फोटो बघितल्यावर विश्वास डळमळू शकतो ?"
रागिणी " हा मग मी .. जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा भडकलेच होते कि .. तू जेव्हा मला नीट सांगितलेस कि हे एडिटेड आहेत तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला शिवाय ते लेटर दाखवलेस "
रागिणी " अरे हो , आपण ते लेटर त्या अब्दुल विरुद्ध पुरावा म्हणून वापरू शकतो .. थांब थांब मी रोहनला फोन करते.. थँक यु प्रसाद .. तू केवढा मोठा पुरावा समोर आणून दिलास"
प्रसाद " ऐक ना राणी .. जाऊ दे आता .. नंतर बोल त्या रोहनशी .. वाजलेत किती बघ .. १० वाजलेत .. "
रागिणी " जा तू फ्रेश हो .. मी जेवण वाढते तुला "
प्रसाद फ्रेश होयला गेला .. आणि हि किचन मध्ये गेली.
----------------------------------------------------------
आदी ला सकाळी जाग आली तेव्हा त्याने मोबाईल चेक केला .. तर कालचे स्पृहाचे मिस्ड कॉल दिसले .. आता या क्षणाला तिला लगेच कॉल करावे आणि तिच्याशी बोलावे असे वाटत होते पण ह्याला तिला कॉल करायची बंदी होती ना .. बिचारा पुन्हा तसाच नाराजीने फोन बेडवर लोळत पडला .. कालचे तिचे मोबाईल मधले फोटो बघत लोळत होता बेड वर .. तिचे फोटो छातीशी लावले आणि उठला आणि फ्रेश होऊन जिम मध्ये गेला .. डॅड सकाळीच बाहेर गेले होते .. ह्याने ह्याचा प्रोटीन शेक बनवला .. आणि घरातल्या जिम मध्ये जाऊन घाम गाळू लागला.. पण डोळ्यांसमोर स्पृहाचा कालचा साडीतला चेहरा डोळ्यांसमोर येत होता.. अगदी ती त्याच्या जिम मध्ये आहे कि काय असे त्याला भास होऊ लागला ..
घाम आला म्हंणून टी शर्ट काढून तिकडेच फेकला आणि अजून एक्ससेरसाईज करू लागला .. तेवढयात जिम चे दार उघडल्या सारखा आवाज आला . त्याने मागे न बघताच
आदी " सुनीता , आय डोन्ट नीड एनी थिंग .. यु कॅन गो ... मी जेवायला हि नाहीये .. बाहेर जाणार आहे "
समोरून " आदी .. "
त्याला स्पृहाचा आवाज ओळखला .. आणि त्याने पटकन मागे बघितले .. त्याला शर्ट लेस बघून ती पटकन बाहेर पळाली .
आदीला वाटले हा माझा भासच असावा .. ती आली होती त्याला मनवायला ..
थोडावेळा नंतर तो थोडासा शेक प्यायला .. आणि स्वामिंग पूल मध्ये गेला आणि एकटाच विचार करत पोहू लागला .. मधेच काठावर उभा रहायचा .. मधेच पोहायचा .. असे सगळे स्पृहा आतून पाहत होती पण तो तशा कपड्यावर आहे म्हणून तिला समोर जायला कसे तरी वाटे ..
मग इकडे तोपर्यंत तिने त्यांच्यासाठी मस्त उपमा बनवला .. ढोकळा बनवला .. मस्त चहा बनवला ..
ह्याचे स्वामिंग झाल्यावर तो अंघोळ करायला त्याच्या रूम मध्ये गेला .. अंघोळ करून बाथरोब वरच किचन मध्ये आला .. तर स्पृहा ढोकळ्याला फोडणी बनवत होती .. आता हा सुद्धा आपल्याला भास होतोय आता स्पृहासाठी अर्धा वेडा झालोय याची त्याला खात्री पटली.. तो बाथरोब मध्ये होता .. केसांतुन पाणी टपकत होते .. फ्रेश स्मेल येत होता .. पण ती त्याच्याकडे बघे ना ..
त्याने फ्रिज मधून पाण्याची बाटली काढली .. ग्लास मध्ये ओतून थंड पाणी प्यायला .. अजूनही ती बाजूला आहे असा भास होतोय म्हणून तिला हात लावायला गेला .. तर स्पर्श झाला ..
आदी मनातच " भास मध्ये स्पर्श जाणवतो ..म्हणून त्याने तिला त्याच्याकडे वळवली .. तशी ती थोडीशी त्याच्याकडे बघून हसली .. तो हि हसला " आर यु रिअल ? "
तिने मानेनेच होकार दिला
आदीने दोन्ही हातात चेहरा पकडला .. मुद्दामून
स्पृहा " काय करतोय ?.. जा लवकर आवरुन ये .. नाश्ता रेडी आहे "
आदी " शट अप यार !! यु कान्ट बी रिअल .. मला आज सकळ पासून तू सगळीकडे दिसतेय ?"
स्पृहा "आदी , मी आलेय "
आदी "का आलीस ? कशाला आलीस ? तुला कोणी सांगितले ईकडे यायला ? तू तुझा वेळ कशाला वाया घालवतेय ? तुझा माझ्या वर विश्वास नाहीये तर कशाला आलीस ? आणि हे काय ? किचन मध्ये कशाला काम करतेय ? एव्हरी टाईम यु शुड नॉट कुक फॉर मी ? आय ह्याव माय कुक "
त्याची नाराजी दाखवून तो लगेच मोकळा झाला .. पण स्पृहाचे डोळे मात्र पाणावले.
स्पृहाच्या डोळ्यांत भरून आलेलं आभाळ पाहिलं आणि आणि तो पटकन मागे आला ..
आदी " स्पृहा , मी खूप चिडका आहे ग .. मला ना सहनच होत नाहीये मला तू माझ्या बरोबर फिरायला यायला नकार दिलास ... तू आज नको यायला होतंस .. मला तुझ्याशी वाईट वागायचं नाहीये पण आज मी खूप नाराज आहे .. तू प्लिज चल मी तुला सोडतो .. उगाच मी काहीतरी बोलेन आणि तुला वाईट वाटेल . "
स्पृहा " म्हणूनच मी आलेय ना.. थोडे माझे ऐकून घे ना "
आदी " प्लिज स्पृहा , चल मी तुला सोडून येतो .. मी पाहिजे तर तुला सॉरी बोलतो .. पण आता तू घरी जा .. म्हणजे मी सोडायला होते "
स्पृहा " आदी , किती चिडतोय ? अरे जरा थांब ना .. ऐकून तर घे ना "
आदी " तुला मी नकोय सध्या तुझ्या आयुष्यात हे सहनच होत नाही मला "
स्पृहा " अरे आदी , असे नाहीये”
आदी "असेच आहे, तुला नकोय ना मी ठीक आहे आता जातो ऑस्ट्रलियाला आणि येतच नाही येईन डायरेक्ट २ वर्षांनी येईन तेसुद्धा जर तू बोलवलेस तर .. नाहीतर थांबेन तिकडेच .. माझ्यामुळे तुला किती त्रास सहन करवा लागतोय , माझ्यामुळे तुला खोटे बोलायला लागतंय , त्यापेक्षा मी जातोच ना इथून "
स्पृहा " सॉरी .. कदाचित तुला समजून नाही घेतल मी .. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला .. सॉरी .. " रडतच पर्स उचलून निघाली.
दारा जवळ गेली तर " मी येतोय म्हटलं ना तुला सोडायला ?"
स्पृहा " जर मी मी एकटी येऊ शकते तर एकटी मी जाऊ पण शकते "रडतच
आदीने रागातच येऊन तिला उचलून घेतले आणि बेडरूम लागला
स्पृहा " जाऊ दे ना आता .." रडतच
आदीने तिला बेड वर ठेवले .. " मी तयार होतो मग आपण जाऊ "
स्पृहा " आदी, मी एकटी जाईन "आणि पुन्हा रूमच्या बाहेर जायला निघाली
तर त्याने तिला हाताला धरून रागात तिच्या अंगावर जोरात ओरडला " एकदा सांगितलेलं कळत नाही का ?"
बिचारी एकदम दचकली .. इतक्या जोरात तो ओरडला होता ..
आदी " सॉरी .. यार .. "असे म्हणतच त्याने आरशावर जोरात हात मारला तर आरशाची काच फुटली आणि आदींच्या हातात काच घुसली आणि रक्त येऊ लागले आणि स्पृहा एकदम घाबरून गेली .. आणि थरथरयायला लागली
स्पृहा " आदी एवढा चिडलास तू ? तुला काय कळतं कि नाही ? काय वेड्या सारखा वागतोय ?"
पटकन काच ओढून काढली .. आणि किचन मधून धावत जाऊन हळद घेऊन आली आणि त्याच्या जखमेवर लावली .. आणि त्यावर रुमाल बांधला .. रक्त थांबले होते .. त्याला प्यायला लिंबू सरबत दिले ..
स्पृहा " जरा झोपतोस का तू ?"
आदी " सॉरी .. तुला रडवले ना मी .. तू का मला अव्हॉइड केलेस .. एक महिना मला तुझ्या पासून लांब ठेवलेस .. असे हा कुठला न्याय आहे ? असे कोणी वागत का ? का तुला माझ्या फीलिंग्स कळत नाही ? "
स्पृहा " सॉरी ना आदी .. तू आता प्लिज चिडू नकोस ..हे बघ रक्त प्रवाह थांबलाय आता .. "
आदी " माझे ऐकशील ना तू ?"
स्पृहा " हो .. ऐकेन मी .. काय करू सांग म्हणजे तुझा राग जाईल .. तुला पाहिजे ती शिक्षा दे .. सॉरी "
बिचारी भांबावून गेली होती ..
आदीला लिटरली तिने बेडवर झोपवले .. त्याला झोप लागल्यावर अलगद त्याचा हात उशीवर ठेवून ती उठली तर त्याने डाव्या हाताने तिला जवळ ओढली
" प्लिज डोन्ट लिव्ह मी अलोंन .. आय नीड यु "
डोळे बंद होते त्याचे पण डोळ्यांच्या कड्यातून पाणी ओघळले .. आपल्या केलेल्या त्राग्यामुळे आता त्याला गिल्ट आले होते .. स्पृहाने त्याचे डोळे अलगद हाताने पूसले .. आणि अलगद त्याच्या मिटलेल्या पापणीवर ओठ ठेवले .. " सॉरी .. नको त्रास करून घेऊस इतका .. आणि तू जा म्हणालास तरी मी कुठेही जाणार नाहीये .. आणि एक ह्या घराची आणि तुझी मी आता मालकीण आहे पुन्हा जर मला जा म्हणालास तर याद राख .. " तिच्या डोळ्यांतले अश्रू त्याच्या गालावर ओघळले तसे त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले ..
आदीने दोन्ही हाताने तिचा चेहरा हातात पकडला आणि स्वतःच्या जवळ ओढला .. " जान .. आपण प्लिज लवकर लग्न करूया का ? मला नाही होणार हे दोन वर्ष लांब वगैरे .. माझे कशातच लक्ष नाही लागत आहे "

(सॉरी सॉरी .. मुलीला सुट्ट्या लागल्यात मी गावी आलेय .. जसे जमेल तसे लिहतेय आणि पोस्ट करतेय ..)

🎭 Series Post

View all