स्त्रीत्व भाग ५८

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ५८
क्रमश : भाग ५७
अभय ने त्या फ्लॅटवर एका कुरिअरबॉय बॉयला पाठवले .. आणि माहिती काढून आणली त्या घरात एक अफसाना नावाची मुलगी भेटली .. आणि लिझा इथे रहात नाही .. हे घर त्यांचेच आहे किती तरी वर्ष अशी जुजबी माहिती मिळाली ..
अभय " प्रसाद, याचा अर्थ त्या अब्दुलने लीझला त्याच्या फ्लॅट वर बोलावले .. आणि तुला पण तिथेच बोलावून घेतले .. दारावर नेम प्लेट नाहीये त्यामुळे नक्की कोणाचे घर आहे हे बाहेरून कळत नाही .. "
प्रसाद " मला तर वाटतं .. आता मी लिझाला गाठतो आणि विचारतो ? नक्क्की ती असे का करतेय ?"
अभय " थांब , उद्या संध्याकाळी त्रिवेणी भेटणार आहे आपल्याला .. लिझा आणि ती दोघी थोड्या ओळखीच्या झाल्यात .. थोडी फ़ार तरी माहिती मिळेलच "
प्रसाद " ठीक आहे .. नाहीतर एक काम करू? आपण डँनी ला भेटून येऊ "
इकडे रागिणीने अब्दुल ला जे जे लोक ५००००/- पेक्षा मोठी अमाऊंट दर महिन्याला पाठवतात त्या सगळ्या अकॉउंट होल्डर्सची माहिती मिळवली .. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स मिळवले आणि रोहनला दिले.. रोहन त्यांना एकेकाला कॉल करून विचारून घेत होता कि ते कसे आणि कुठे फसले .. त्यातल्या काही जणांनी रोहनला भेटून ते कसे या प्रकरणात फसले ते सांगितले .. प्रसादाची केस स्ट्रॉंग होत होती .. एक दोन जण पुढे येऊन वेळ आली तर साक्ष द्यायला पण तयार होते ..
पण हि गोष्ट रागिणीने मुद्दामुन प्रसादला सांगितली नव्हती .. वेळ आल्यावर सांगू .म्हणून ठेवली होती ..
अभय आणि प्रसाद दोघे गोव्याला आले .. डॅनी वर लक्ष ठेवले ... तो हि एकटाच फ्लॅट वर राहत होता .. हे कळल्यावर त्यांनी डॅनीच्या घरची बेल वाजवली
डॅनी " तू ? तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची ?"
प्रसाद "आपण बहुदा एवढे एकमेकांना ओळखत नाही ? तुम्ही मला कसे लगेच ओळखलंत ?"
डॅनी " तुला कसे विसरेन मी ?"
प्रसाद " म्हणजे ?
डॅनी " काय पाहिजे ? इकडे का आलास ? डिवोर्स पेपर मी लिझाला पाठवलेत .. तू आणि ती मोकळे आहात .. तुम्हांला काय वाटले ते करायला ?"
प्रसाद " म्हणजे ?"
डॅनीने प्रसाद आणि लिझाचे फोटो त्याच्या समोर फेकले .. " लाज नाही वाटत का रे ? असले धंधे करायला ?"
प्रसाद " एक मिनिट .. तुम्ही लिझाला डिवोर्स पेपर्स पाठवलेत का ?"
डॅनी " मग काय ? शी इज प्रेग्नंट .. "
प्रसाद " मिस्टर डॅनी, हे फोटो फेक आहेत .. मी पण फ़सलोय यात .. पण माझे नशीब चांगले कि माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे .. आणि या लढाईत ती माझ्या बरोबर आहे .. तुमच्या सारखे तिने मला असे सोडून नाही दिले "
डॅनी " शट अप !! मी काय करायचं हे तू मला सांगू नकोस ? तू फसवतोय तुझ्या बायकोला .. लाज नाही वाटत ?"
अभय " सर, आम्ही नीट बोलतोय ना .. तर नीट बोलायचं .. प्रसाद बोलतोय ते खरं आहे .. "
मग प्रसादने त्या दिवशी काय काय झाले ते सगळे डॅनीला सांगितले .. आणि मग त्याला किती दिवसांनी हे पार्सल आले ते सांगितले "
डॅनी " मग तू काही केलेच नाही ना मग पैसे का भरतोस ? लपवायलाच ना ?"
प्रसाद " हो लपवतोय , पण माझ्या आई वडीलां पासून लपवतोय , बायको पासून नाही "
अभय " लिझा या प्रकरणात कशी फसली हे सांगितले नाही का तिने तुम्हांला ?"
डॅनी" नाही .. आय मिन मी हे फोटो बघितल्यावर हाकलून लावले तिला कारण आल्रेडी आम्ही लॉन्ग डिस्टन्स रिलेशन मध्ये होतो "
प्रसाद " ती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे .. तुम्ही तिला मदत केली पाहिजे असे मला वाटते ..प्रेग्नंट आहे ..कोणीहि मदतीला नाहीये .. शिवाय हॉस्टेलला राहते.
डॅनी" बाळ तुझं आहे ना ते .. मग आता का मागे पडतोय ?का झाली मज्ज करून ?
प्रसादने रागाने डॅनी ची कॉलर पकडली " माईंड युअर लँग्वेज .. स्वतःच्या बायको बद्दल बोलताना तुला लाज वाटत नाही का रे ? "
डॅनी "असले धंधे करताना तुम्हांला दोघांना लाज वाटत नाही का ?"
प्रसाद " कानफाड फोडीन .. एवढं सगळे सांगितल्यावर पण तोच विचार करतोस? "
डॅनी " मी पोलिसांना कॉल करेन ? मी HR ला सांगून तुला कामावरून काढून टाकेन ? "
प्रसाद " ठीक आहे .. बाळ माझे .. मी सांभाळीं न बाळाला .. एक चान्स तुला दिला होता मी .. उद्या DNA टेस्ट घेऊन आलास ना तरी बाळ देणार नाही .. एवढा तर देवाने मला सशक्त बनवलंय कि बाळाला मी सांभाळू शकतो "
अभय " डॅनी साहेब , एक छोटासा विचार करा .. या दोघांचे लफडं असतं तर प्रसाद पैसे कशाला भरेल ? आणि असे फोटो काढून तुमच्यकडे कशाला पाठवेल ? तुम्हांला फोटो पाठवून त्या दोघांना काय मिळेल ?"
डॅनी " डिवोर्स .. अजून दुसरं काय ?"
प्रसाद " सर मी पुन्हा एकदा सांगतो माझा आणि लिझाचा काहीही संबंध नाहीये "
डॅनी " मग तू तिच्या बाळाचा बाप आहे असे का सांगतेय ती ?"
प्रसाद " ते तिलाच माहित ? आत इथून गेलो कि तिलाच विचारणार आहे .. या सगळ्या प्लॅन मध्ये मी ही आता पर्यन्त तिलाच दोषी मानत आलोय .. मला असे वाटले कि पैशासाठी या थरावर लिझा गेली म्हणून ? पण आता असे वाटतंय कि काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे "
डॅनी " तिला काय पैशांची कमी आहे .. चांगले पॅकेज आहे ?"
अभय " सर , मग तुम्हीच सांगा .. हे बाळ जर प्रसाद आणि तिचे असते तर ते अबोर्ट करता आले नसते का तिला ? तुमच्या पर्यंत कशाला बातमी पोहचू देईल "
डॅनी " गप्पच बसला "
प्रसाद " मला या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायचंय .. एका प्रेग्नंट स्त्रीला मी त्रास नाही देऊ शकत .. म्हणून तुमच्या पर्यंत आलोय .. तुम्ही आम्हांला मदत करा नाहीतर लिझाला पोलिसांत द्यावे लागेल मला .. सगळे पुरावे तिच्या विरुद्ध आहेत .. मी केस टाकतोय तिच्यावर "
डॅनी " कर काय पण ? मला तिच्याशी काही घेणं देणं नाहीये "
प्रसाद " पोटातल्या बाळाशी पण नाही ना ? म्हणतात ना दैव देतं पण कर्म नेत .. तसलीच गत आहे तुमची ?"
अभय " चल , प्रसाद निघूया आपण .. जिथे हा माणूस स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेतोय ह्याला आपण काय समजावणार ? मरू दे आपल्याला काय करायचंय ? सडू दे त्या लिझाला जेल मध्ये ? होईल तिथेच नरकात डिलिव्हरी ? आणि वाढेल याचे बाळ त्या जेल मध्ये . ती पण त्याच लायकीची आहे ."
तसा डॅनी जरा नरमला .
डॅनी " मी एकदा बोलेन तिच्याशी ? मी भांडलो तिच्याशी म्हणून कदाचित तिने रागातच मला ते तुझे बाळ आहे असे सांगितले असेल "
प्रसाद मनात " साला , ह्यांच्या भानगडीत मला खेचतोय "
प्रसाद " हे सगळे झाले तरी ती मला का असे सांगेल कि ह्या बाळाचा बाप मी आहे ? हेच मला कळत नाहीये ?"
डॅनी " आय डोन्ट नो .. मला दोन एक दिवसांतून तीच कॉल करते आणि सांगते कि ती आणि तू रिलेशन मध्ये आहेत "
प्रसाद " व्हॉट ! नॉन्सेन्स ? मी तिच्याशी एकदाच बोललोय फक्त कि ती मला बाळाच्या भानगडीत का घेतेय ते विचारायला ? कारण आमच्यात काय झालंय हे फक्त ती आणि मी दोघांनाच माहित आहे "
डॅनी " ठीक आहे मी येतो तिकडे.. आपण बोलू तिच्याशी ?"
प्रसाद " ठीक आहे "
अभय " आपण माझ्या फ्लॅटवर भेटू .. आणि त्याला ऍड्रेस देऊन ते दोघे घरी परत निघाले "
---------------------------------------
त्रिवेणीने माहिती काढली कि ती कोणत्या हॉस्टेल ला राहते ? तिची तोंड ओळख झाली होती .. नक्की कितवा महिना चालू आहे ते वगैरे माहिती मिळाली .. दोघींनी एकमेकींचे नंबर्स एक्सचेंज केले .. त्रिवेणीने तिच्या नवऱ्या विषयी अनेकदा विचारले तर ती ने तो विषय टाळला .. तशी ती फारच कमी बोलायची त्यामुळे तिच्याकडून माहिती काढून घेणे हे महत्प्रयास होते .
रागिणी आणि रोहन जर कोर्टात केस लागली तर त्याला पुरावे आणि साक्षिदार तयार करत होते .. काहीही केल्या प्रसाद त्याच्यातून सुखरूप बाहेर पडायला पाहिजे होता .. त्यासाठी तिचा जीवाचा आटापिटा चालू होता .. प्रसाद दोन दिवस ऑफिसच्या कामाला गोव्याला गेलाय असे सांगून गेला होता .. म्हणून घरातले कामं झाल्यावर तिच्या झाडांची मशागत करत बसली .. होती तर अचानक तिला मळमळ होऊ लागली आणि मग तिच्या लक्षांत आले कि यावेळी आपली पाळी अजून आलेली नाहीये .. मनात एक आनंदाची लहरच आली .. आई शप्पथ ! इट लुक्स आय एम प्रेग्नन्ट .. म्हणून असली खुश झाली ..
आईंना कळलं तर आई कसल्या खुश होतील .. पण तिथेच थांबली .. केसचा निकाल लागला कि सगळ्यांना एकदमच खुश खबर देऊ म्हणून गप्पच बसली ..
तेवढ्यात प्रसाद गोव्या वरून आला .. त्याचे मिशन फत्ते झाले होते .. डॅनी लिझाशी बोलायला आणि भेटायला तयार झाला होता .. त्यामुळे अर्धा प्रॉब्लेम सॉल्व झाला होता .. त्याला जरी नाही सांगितले तरी डॅनीला ती नक्कीच सांगेल शेवटी तिचा नवरा होता तो.
प्रसाद आला आणि डायरेक्ट रागिणीला उचलूनच घेऊन गोल फिरवली त्याने
रागिणी "अरे काय करतोय ? चक्कर येईल ना मला "
प्रसाद " लिझाचा नवरा सापडला .. म्हणजे मी आणि अभयने शोधला , त्याला भेटलो , आणि आता तो आपल्या बाजूने आहे .. तो लिझाशी बोलणार आहे एकदा "
रागिणी " आणि तोच मुख्य दोषी असला तर ? दोघे नवरा बायको मिळून लोकांना फसवत असले तर ?"
प्रसाद " तू ना .. डिटेक्टिव्ह बायको आहेस ? आणि हसला
प्रसाद " तिचा नवरा आमच्याच कंपनीत आहे .. तो गोवा ब्रांचचा हेड आहे .. कधी भेटलो नव्हतो पण नाव ऐकून होतो त्याचे .. आज भेटून पण आलो "
रागिणी " अरे वाह !! गुड न्यूज पे गुड न्यूज "असे ती पटकन बोलली आणि पटकन जीभ चावली तिने
प्रसाद " अजून काय आहे गुड न्यूज "
रागिणी " ते .. ते म्हणजे केस सुटेल आपली म्हणजे तिचा नवरा सापडणे एक आणि तो आपल्या बाजूने असणे हि दोन अश्या दोन न्यूज दिल्यास तू नाही का ?"

🎭 Series Post

View all