स्त्रीत्व भाग ५७

Story Of Women's Facing Tough Situation

स्त्रीत्व भाग ५७
क्रमश " भाग ५६
आठ दिवस झाले कोणीही शरयू वर हक्क दाखवायला आले नाही .. मग पोलिसांनी तिची जवाबदारी मोहिनी वर सोपवली .. मोहिनीला आणि आजीला खूप आनंद झाला .. तिने स्टेशनवर तिच्या दुकानात जेवढी लोक येतील तेवढ्या लोकांना पेढे वाटले ..आनंदाने सगळ्यांना सांगत सुटली .. \" शरयूची कस्टडी मिळाली म्हणून .. शिवाय तिच्या टीम मध्ये काम करणाऱ्या सगळ्या बायकांना मस्त मिसळ पावची पार्टी दिली ..
मोहिनी शरयूला सकाळी थोडा वेळ दुकानात घेऊन येऊ लागली .. कारण आई म्हणून तिला तिचा लळा लागावा म्हणून .. कारण आता थोडेच दिवसात ती शाळेत जाईल .. मग तिने हि माझी आई म्हणून इंटरव्यूहला सांगितले पाहिजे ..
तर तिच्या दुकानात गेले ५ दिवस एक बुरखा घातलेली बाई यायची .. पण ती त्या धर्माची आहे असे वाटायचं नाही .. यायची शरयूला बघायची , रडायची आणि घेतला तर न्यूज पेपर घ्यायची आणि जायची .. शरयू खाली खेळत वगैरे असली तर ती दिसे पर्यन्त ती दुकानाच्या आजू बाजूला रेंगाळत बसायची .. मोहिनीच्या चाणाक्ष नजरेने हे हेरले होते ..
मोहिनी " तू काय पोरीची आई आहेस का ?"
ती बाई नाही नाहीच म्हणत होती आणि पळून गेली .. मग दोन दिवस आलीच नाही .. पुन्हा दोन दिवसांनी ती आली .. शरयूला बघितले आणि निघाली तर
मोहिनी " थांब ग.. बाई, तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे ते सांग .. नाहीतर मी पोलिसांना सांगेल .. इथे सगळीकडे CCTV आहेत .. तू त्यात नक्की आली असणार "
तशी ती बाई आतमध्ये रडतेय असे मोहिनीला जाणवले
मोहिनी " रडू नको ग बाई , मी काही करत नाही तुला .. फक्त मला खरं काय ते सांग ?"
ती बाई मोहिनीच्या पाया पडली " तुम्ही माझ्या लेकीला चांगले वागवताय .. तुमचे कसे आभार मानू .. तीला सांभाळण्या इतकी ताकद देवी आंबा बाईने माझ्यात दिली नाही .. देव तुमचे भले करो .. "
मोहिनी "मला वाटलेच कि तू आई असणार तिची ?"
ती बाई " पोरीचा जीव वाचवला मी तिला इथे सोडून .. तुमचं इथे दुकान आहे आणि तुम्ही किती मायाळू आहेत हे मी पाहिलं होत .. म्हणून इथे तुमच्या दारात पोरीला सोडून गेले .. तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा न करता माझ्या लेकीचा जीव वाचवला त्या दिवशी हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलय "
मोहिनी " तुमच्यामुळे मला आई पण आलं .. तुमची लेक मला आई हाक मारते तेव्हा जन्माचं सार्थक झाल्या सारखं वाटत "
ती बाई " मी जाते .. आता .. "
मोहिनी " थांब.. तुला पाहिजे तेव्हा तू तिला बघायला , येऊ शकतेस .. पण तुझे तोंड नको दाखवू तिला .. आता कुठं पोर आमच्यात रमायला लागलीय "
ती बाई " हो .. मी कधीतरी येत जाईन तिला भेटायला .. " बोलतच ती बाई रेल्वे स्टेशन च्या गर्दीत नाहीशी झाली.
--------------------------------------------------
थोड्याच वेळात इकडून संगीता नवीन साडी नेसून आली तर स्पृहा तिच्या रूम मधून साडी नेसून खाली आली ..
श्रीधर " अरे वाह !!! दोघी छान दिसताय "
संगीता " स्पृहा , आज तुला कशी काय साडी नेसावी वाटली ? खूप छान दिसतेय बाळा "
आजी " स्पृहा ,अगदी संगीताचं दिसतेय ग .. संगीताला बघायला गेले होते ना तेव्हा ती अशीच दिसत होती "
संगीता " हो ग .. " तिचे डोळे आनंदाने भरून आले "
आदी मात्र सुखद धक्क्यात होता .. साडी तिने त्याच्यासाठीच नेसली आहे हे त्याला काही वेगळे सांगायाला नको होते ..
मग श्रीधर आणि सांगिताला स्पृहाने ओवाळलं ..
राज " सर,मी फोटो काढतो .. तूमचा मोबाईल द्या "
श्रीधरने त्याचा मोबाईल आदी कडे दिला .. आणि तो फोटो काढू लागला .. सारखा त्याचा पासवर्ड टाकायला लागत होता म्हणून मग श्रीधरने च सांगितले तुझ्या मोबाईल मध्ये काढलेस तरी चालेल
मग काय आदी साहेबांना बायकोचे मनसोक्त फोटो काढायला मिळाले .. स्पृहाच्या सगळ्या छटा त्याने त्याच्या मोबाईल मध्ये कैद केल्या ..
मग आजीला मध्ये बसवून हे दोघे मागे उभे राहिले आणि स्पृहा आजीच्या पायाशी बसली .. आदीने एक असा फोटो काढला तर श्रीधर
श्रीधर " राज एक सेल्फी घे .. म्हणजे तू पण येशील “
आदीने एक सेल्फी घेतला आणि झाला परफेक्ट फॅमिली फोटो तयार ..
मग केक कटिंग .. आणि एकमेकांना सर्वांना केक भरवला .. आदिला स्पृहाने बाउल मध्ये दिला
आदी " थँक यु .. मला पण भरवला असता तर चाललं असते " असे हळूच बोलला
स्पृहाने पटकन त्यातलाच एक पीस त्याला भरवला आणि आत मध्ये धूम ठोकली .
त्याच्यासाठी तिने साडी नेसली .. त्याला हाताने केक भरवला बासच .. दिल खुश हो गया त्याचा .. नंतर सगळे एकत्र बसून जेवले .. गप्पा गोष्टी चालूच होत्या .. आदी लिटरली हातची बोटं चाटून जेवण जेवत होता .. हसवून सोडले होते त्याने सगळ्यांना .. अशा गंमती जमती चालू होत्या .. स्पृहाच्या हातच्या पोळ्या , केक आणि गुलाब जामून भरपेट खाल्ले त्याने ..
जेवण झाल्यावर
आदी " सर .. मी निघतो आता "
श्रीधर " ठीक आहे .. खूप मज्जा आली आज .. तू आल्याने चार चांद लागले .. थँक यु "
संगीता " राज .. खरंच .. तू चांगला मुलगा आहेस .. तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होऊ दे .. एका आई कडून दिलेल्या शुभेच्छा आहेत .. आणि मला तुझ्या पहिल्या पगारातून तू साडी आणलीस .. खूप छान वाटलं .. तुला कधीही माझ्या हातचं जेवावस वाटलं तर कधीही ये "
आदी " थँक यु काकू .. मी येईन कधीतरी .. चला मग निघतो .. बाय सर्वांना "
आदिने एक नजर स्पृहा कडे बघितले .. ती पण त्याच्या कडेच बघत होती ..
स्पृहा " बाय .. थँक यु आल्या बद्दल " आता पहिले वाक्य ती त्याच्याकडे बघून बोलली होती
श्रीधर " स्पृहा , उद्या तू आणि राज बाहेर जाणार आहेत .. तर राज तू किती वाजता येशील तिला घ्यायला ?"
स्पृहा " मी ? म्हणजे ..? का ? म्हणजे सगळे ? कि एकटीच ?" जरा बोबडी ववळली होती तिची
श्रीधर " ते मी प्लॅन केलंय ? तू कधीच अशी ट्रिप ला वगैरे गेली नाहीयेस ना ? राज बरोबर तू सेफ आहेस ? तो नीट घेऊन जाईल आणि आणेल .. आणि डोन्ट वरी त्याची आल्रेडी गर्ल्फ्रेन्ड आहे .. फक्त मी सांगतले म्हणून तो नेतोय "
स्पृहा " नको ना बाबा , असे कसे वाटेल ते ? उगाच कशाला त्यांना त्रास ? नको ना बाबा "
श्रीधर " अग , स्पृहा असे काही नाहीये .. मीच त्याला सांगितलंय कि तुला एकदा जग दाखवूंन आण.. तुला नेहमी मी आणि संगीताने धाकात ठेवलं .. खरतर कोणावर विश्वास ठेवावा असा माणूसच भेटला नव्हता .. पण राज तुला व्यवस्थित नेईल आणि आणेल "
स्पृहा एकदम रडवेलीच झाली होती .. आपले बाबा आज असे का बोलत आहेत हेच तिला कळे ना ? असे कसे मला ते तिऱ्हाईत मुला बरोबर पाठवू शकतात .
म्हणजे तो तिच्यासाठी अपरिचित नसला तरी एक वडील म्हणून बाबांनी असा निर्णय कसा घेतला हेच तिला कळेना ..
स्पृहा " राज , प्लिज तुम्ही राग मानू नका .. पण मला हे नाही जमणार .. मी नाही येऊ शकणार तुमच्या बरोबर "
आदिराज मनातून जरासा नाराज झाला .. एवढ्या चालून आलेल्या सुवर्ण संधीला स्पृहाने नाकारू नये .. तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही .. सगळ्यात शेवटी ती माझा विचार विचार करते .. आता काय झाले होते तिला यायला माझ्या बरोबर? असे काहीसे विचार त्याच्या मनात येऊ लागले ..
आदिराज "सर , सॉरी आय एम नॉट फ्री टुमॉरो " असे बोलून घरातून बाहेर पडला
श्रीधर " राज , सॉरी तू म्हणालास ते मला आता पटतंय .. तिला सवय झालीय मन मारून जगायची.. तिला आऊट ऑफ द वे जाऊन काही करायचंच नाहीये "
स्पृहा " बाबा , तुम्ही हे काय बोलताय ? मला नाही आवडत आहे .. मी हे असे करेन असे वाटलेच कसे तुम्हांला ?" आणि ती रागातच तिच्या रूम मध्ये निघून गेली ..
तिला माहित होते .. दिसत होते कि आदिराज नाराज झालाय ... एकतर त्याच्यासाठी काही खास असे ती करू शकली नव्हती ..
आदिराज पण मनातून थोडा नाराज होऊन च त्याच्या घरी आला .. त्याच्या रूम च्य गॅलरीत एकटाच बसला होता .. तर त्याचे डॅड आले त बोलायला
डॅड "आदी , आज हाल्फ डे घेतला होतास ? कुणीकडे गेलास होतास ?"
आदिराज " स्पृहाच्या घरी "
डॅड " अरे वाह !! मग काय म्हणतेय आमची सून बाई "
आदिराज " आय डोन्ट नो .. डॅड .. सगळ्यात शेवटी तिच्या लिस्ट मध्ये आहे मी .. मला जशी तिची आठवण येते तशी तिला येते कि नाही .. मला माहित नाही ? मला जशी बेचैनी येते .. असे वाटत कि तिला घट्ट मिठीत घ्यावं .. तिला तसे होत नाही .. कधी कधी वाटत माझे प्रेम एकतर्फी आहे कि काय ?"
तेवढयात त्याला स्पृहाच्या मोबाईल वरून कॉल आला .. त्याने तिच्या मोबाईल वरून कॉल येतोय हे पाहिले तरी त्याने लगेच उचलला नाही .. उलट फोन बेड वर टाकून दिला .. कितीतरी वेळ वाजत होता पण तो मुद्दामून अव्हॉइड करत होता
डॅड " इतके कॉल तिने केले म्हणजे काहीतरी वाटतंय म्हणूनच केले ना .. काही वेळेला आपल्या मना सारखे नाही झाले किंवा समोरचा वागला नाही कि त्याचं आपल्यावर प्रेमचं नाही असे वाटू लागतं .. मी जेव्हा तुझ्या एवढा होतो ना तेव्हा असाच तुझ्या आईवर फुगून बसायचो .. नंतर जेव्हा राग शांत होयचा ना तेव्हा समजायचं कि तिने केलेला विचार बरोबर आहे .. एकदा ती काय म्हणतेय ते ऐकून घ्यावेस असे वाटतंय मला .. बाकी तू आता समंजस आहेस .. आणि एक सांगू का .. मुली असे मुलांसारखे एक्सप्रेस करू शकत नाहीत .. आणि जर करत असतील तर त्या स्वतंत्र विचाराच्या असतात .. पण तू प्रेम करताना सेल्फ डिपेंडंट , डॅशिंग , मुलीशी प्रेम नाही केलंय .. हे लक्षात ठेव .. आणि एक रिलेशन मध्ये दोघांना निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे .. तिने जर ठामपणे काही तुला सांगितले असेल तर तिने नक्कीच तुझा विचार पहिल्यांदा करूनच तो घेतला असेल ..”
आदी " डॅड , चूक माझीच असते तुमच्या दृष्टीने नेहमी .. मला माहितेय .. मला सांगा ? प्रेम करण चूक आहे का ? त्यात घाबरायचं काय कारण ? का लपवायचं ? का नाही एक्सप्रेस होयचं ? का एकमेकांना स्पर्श पण नाही करायचा .. का ? हेच मला कळत नाहीये?"
डॅड हसायलाच लागले " काय आहे ना आदी ..तुझे ना असे झालंय .. शिकलास तिकडे फॉरेन मध्ये आणि राहतोय इकडे इंडिया मध्ये .. तिकडे आणि इकडे जमीन आस्मानचा फरक आहे "
आदी " फरक फक्त स्पृहाच्या डोक्यात आहे ? बाकी सगळे खूप फॉरवर्ड आहेत .. "
डॅड " असेलही .. मग काय विचार आहे तुझा ? सोडून देतोस का तिला ?"
आदी " डॅड .. तुम्ही पण ना .. प्लिज लिव्ह मी अलोन "जरा वैतागलाच तो .. तिला सोडून देणार असे कुठे तो म्हणाला .. आणि त्यांनी असा अर्थ काढला त्याचा राग आला त्याला.
डॅड " एक काम कर ? तिच्या वडिलांचा नंबर दे .. मी एकदा बोलून घेतो त्यांच्याशी .."
आदी " नको डॅड , नाही चालणार तिला तसे ?तिची एक्साम आलीय जवळ .. उगाच अभ्यासावर परिणाम होईल "
डॅड हसले आणि त्याचे गाल जे टम्म फुगले होते ते त्यांनी हातांनी ओढले " यु आर क्युट बॉय " आणि निघून गेले ..
इकडे आदी रुसलाय

इकडे आदी रुसलाय हे तिला कळले होते .. आता त्याला कसे मनवायचं ह्यावर ती विचार करत होती ..
हे तिला कळले होते .. आता त्याला कसे मनवायचं ह्यावर ती विचार करत होती ..

🎭 Series Post

View all