Jan 26, 2022
नारीवादी

स्त्रीत्व भाग ४

Read Later
स्त्रीत्व भाग ४
स्त्रीत्व भाग ४
रुक्मिणी आजी डोक्यावरची टोपली खाली दारात ठेवून .. झोपडीला दार म्हणून लावलेलं फळकुट बाजूला सारू लागली तेवढयात .. तिचा ठेकेदार म्हणजे मोहिनी आली .मोहिनी म्हणजे तृतीयपंथी .. पण रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा ह्या अशा वस्तू होलसेल मधून आणायच्या आणि विकायच्या अशा चार पाच गरीब बायकांना माल पुरवायचं काम ती करायची ..
मोहिनी " आजे .. आलीस काय ?"
रुक्मिणी "ह्यो काय आताच आले "
मोहिनी " आजे .. भूख लागलीय बघ .. मी मस्त ताजी वांगी घेऊन आलेय .. मस्त भाकरी आणि वांग्याची भाजी कर .. आज जेवणार आहे मी तुझ्याकडे "
रुक्मिणी " बर "
मोहिनी " आज किती पैसे कमवलेस ?"
रुक्मिणी ने सगळे पैसे मोहिनीला दिले .. मोहिनीने पैसे मोजले .. अर्धे पैसे आजीला दिले आणि अर्धे पैसे तिच्या ब्लाउज च्या आत टाकले .. ह्या टोपलीत ५०० रुपयाचा माल आहे .. पुढल्या वेळेला नवीन माल घेऊन येईन "
रुक्मिणी " त्ये खड्याचे कानातले तसेलच नवीन दे .. पोरींना लय आवडतात तसले "
मोहिनी " उद्या पासून मी पण लेडीज डब्यात माल घेऊन फिरणार आहे .. पण मी बुकं घेऊन फिरणार आहे "
रुक्मिणी " बुकं कशाला कोण घील "
मोहिनी " घेतील ग .. हल्ली बुकं खूप वाचतात "
रुक्मिणी " चल हात धुवून घे .. भाकरी झाली .. तव्यात वांग टाकलय .. लगेच जेव "
मोहिनी ला आजी कडून चांगली वागणूक मिळायची म्हणून आजी बरोबर तीच चांगले जमायचं .. तिच्यातल्या पुरुषात असलेल्या स्त्रीत्वाला आजीने स्विकारलं होतं.
मोहिनी चा जन्म झाला तेव्हा ती मुलगा म्हणून जन्माला आली होती .. जस जशी मोठी होत गेली तशी तिला जाणीव होउ लागली आपण मुलगा नाही मुलगी आहे .. तिला स्वतःला हा मोठा धक्का होता पण ह्या नैसर्गिक धक्क्याकडे समाजाने आणि घरातल्यांनी अनैसर्गिक पणे हॅन्डल केले .. खूप त्रास , जाच सहन करावा लागला ..त्यातच घरदार , समाज , शिक्षण सगळे सुटले आणि रस्त्यावर भीक मागण्याशिवाय काही पर्यायच नाही राहिला तिच्याकडे ..

पण तिने तिचा जगण्याचा मार्ग शोधून काढलाच .. आज ती बऱ्यापैकी मोठी ठेकेदार झाली होती .. आणि बेवारश्या स्त्रियांना आर्टिफिशियल जुलरी घेऊन द्यायची आणि विकायला सांगायची .. एक प्रकारे तिच्या बरोबर अजून चार जणींना जगायला मार्ग दाखवत होती ..
आजी आणि मोहिनी ने मिटक्या मारत वांग्याची भाजी आणि भाकरी वर ताव मारला .. आणि निघून गेली
-----------------------
तेजस्वीनी ला एक रात्र हॉस्पिटल मधेच ठेवली ..तिचा ताप उतरल्यावर आय व्ही एफ ची ट्रीटमेंट केली .. म्ह्णून डॉक्टरांनी अजून एक दिवस आराम करण्यासाठी ऍडमिटच करून ठेवली .. आणि मग डिस्चार्ज दिला .. दोघे घरी आले
सुनील " तेजू .. मी काय म्हणतो .. हि नोकरी आता तू सोडून दे "
तेजस्विनी एकदम आश्यर्य चकित होऊन " का ?"
सुनील " हे बघ .. तुझी ना खूप दगदग होते .. त्यात तुला ते ट्रेन ने जावे लागते .. किती धावपळ होते तुझी .. त्यापेक्षा ..एखाद वर्ष आराम कर .. जरा तब्बेतीकडे बघ .. नुसता सापळा राहिलाय .. मला डॉक्टर खूप ओरडले .. म्हणाले जर लक्ष द्या त्यांच्याकडे "
तेजस्विनी " सुनील .. अरे आता हि इतकी मोठी ट्रीटमेंट .. किती इंजेक्शन्स आहेत . तुला तर माहितेय ना .. त्यामुळे मी बारीक झालेय .. दगदग नाहीये काही "
सुनील " हे बघ .. आ ता मी जर तुला म्हटले कि ट्रीटमेंट थांबवू .. तर ऐकशील का तू ? तर नक्कीच नाही .. मग नोकरी सोड .. काही गरज नाहीये आपल्याला .. माझ्या पगारात भागेल आपले .. घरावर कर्ज नाहीये .. माझा पगार पुरेसा आहे आपल्या तिघांना .. "
तेजस्वीनी " अरे सुनील .. आईंचा दवाखाना .. माझा दवाखाना .. उद्या आपले बाळ झाले कि त्याची जवाबदारी .. हे एवढं सगळे नाही भागणार . आणि त्यापेक्षा मला माझि नोकरी प्यारी आहे .. हे इतके शिकलेय ते घरात बसायला का ?"
सुनील आता वैतागला .. " याचा अर्थ तू माझे काहीही ऐकणार नाहीयेस .. आणि मनःस्ताप तेवढा देणार आहेस .. "
तेजस्विनी " सॉरी तुला राग येत असेल माझा ? पण तू डायरेक्ट माझ्या आयडेंटिटी वरच घाला घालतोयस .. "
सुनील " अरे यार .. तुला काही कळत नाही का मी काय म्हणतोय ते ? बाळ होण्यासाठी माणसाने रिलॅक्स राहायला पाहिजे .. जास्त स्ट्रेस घेतेस तू म्हणून प्रॉब्लेम होतोय .. मूर्ख "
सुनील ची आई " सुनील .. काय बोलतोय .. कसा बोलतोय तिच्याशी .. तिला बरं नाहीये .. काल ट्रीटमेंट घेऊन आलास ना . मग तिला आनंदात कसे ठेवायचे हे तुझ्या हातात आहे ना .. असे भांडून आनंदी राहणार आहे का ती ?"
तसा सुनील दार आपटून बाहेर निघून गेला .

काही वेळेला कोण चूक कोण बरोबर काही ठरवताच येत नाही .. सुनील तिच्या भल्याचाच विचार करतोय पण तेजस्विनी ला तिचे स्वतःचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते असे वाटतेय .. नोकरी सोडली कि मी डिपेंडंट होईन अशी भीती वाटतेय .. म्हणून ती या गोष्टीला विरोध करतेय .. स्ट्रेस घ्यायचा नाही म्हणून कधी कधी माणूस स्ट्रेस वाढवून घेतो.
-------------------------
आदिराज " डॅड यु मस्ट बी जोकिंग .. एवढा मोठा बिझनेस .. मी कसा हॅन्डल करेन .. मला त्यातले काही कळत नाही "
डॅड " व्हेरी गुड .. म्हणजे आपल्याला काय येतंय आणि काय येत नाहीये ह्याची कल्पना आहे तुला म्हणायचं "
आदिराज " येस डॅड .. सो .. आय एम लिविंग .. यु टेक केअर ऑफ युअर बिझनेस "
डॅड " शट अप .. मी काय सांगतो ते नीट ऐकायचं .. एक म्हणजे पुढल्या आठवड्यापासून तुझी इंटर्नशिप सुरु करतोय मी .. प्रत्येक डिपार्टमेंट ला २ महिने काम करायचं ..
म्हणजे तुला सर्व डिपार्टमेंटची व्यायवस्थित माहिती होईल .. आणि मग तू जेव्हा MD होशील तेव्हा काही अडचण येणार नाही .. आणि काही अडचण आलीच तर आय एम देअर माय सन "
आदिराज "डॅड .. प्लिज ना .. प्लिज डोन्ट इम्पोज मी थिंग्स लाईक धिस " आणि तो जायला निघाला .
जितक्या लवकर इकडून सटकू तेव्हढाच आपला फायदा आहे ..हे समजून तो पळ काढायचा प्रयत्न करत होता
डॅड " आदी .. हू इज स्पृहा ?"
हे ऐकल्यावर आदी जो दारा पर्यन्त गेला होता तो तिथेच थांबला .. स्पृहा हे नाव ऐकल्यावरच त्याच्या हृदयाचा ठोका चुकला होता ..
डॅड गालात हसतच " अब आया उंट पहाड के नीचे "
आदी अजूनही तिथेच थांबला होता
डॅड " सो नाऊ व्युई कॅन डिस्कस .. राईट माय सन "
आदी " ओके ... आय एम बॅक ..” म्हणत त्या प्रोजेक्ट च्या मॉडेल समोर उभा राहिला .. डॅड ने त्याला एकेक नीट सांगितले आणि तो मन लावून ऐकत होता .. जे काही त्याला कळले नाही त्या बद्दल त्याने प्रश्न पण विचारले .. आणि त्यामुळे डॅड एकदम खुश झाले .. अर्धा एक तास त्यांनी बिझनेस प्लॅन काय आहे कसा आहे हे सगळे नीट सांगितले आणि मग पुन्हा त्याला त्यांच्या केबिन मध्ये घेऊन गेले .. एक फोन करून दोघांना स्नॅक्स आणि कॉफी ऑर्डर केली .
डॅड " सो .. टेल मी अबाऊट स्पृहा "
आदिराज " नाही काहीच स्पेशल नाही .. जस्ट अ फ्रेंड "
डॅड " ओके .. ठीक आहे .. मग माझ्याकडे तुझ्यासाठी अजून एकऑफर आहे "
आदिराज " ऑफर ?"
डॅड " येस .. ऑफर .. आपल्या सॉफ्टवेअर कंपनीत एक एम्प्लॉयी आहेत .. मी असाच ऑफिस प्रिमाएसेस मध्ये फिरत असताना .. त्या एम्प्लॉयीच्या डेस्कवर एका मुलीचा फोटो मी पाहिला आणि मला तो खूप आवडला .. इतकी गोड मुलगी आहे .. तुला तर माहितेय मला एक मुलगी पाहिजे होती पण आपल्या घरात मुलगी झालीच नाही .. तर त्या गोड मुलीचा फोटो बघितल्या पासून ती मुलगी आपल्या घरात सून म्हणून यावी अशी माझी ईच्छा झाली .. पण आता या साठी ती मुलगी तुला पण पसंत पडणे गरजेचे आहे नाही का ? त्यात तुझ्या मागे लावलेल्या आपल्या बॉडीगार्ड ने सांगितले कि तू कोणत्या तरी पोरीच्या मागे मागे करत असतोस .. मग काढली तिची माहिती तर कळले कि तिची नावं स्पृहा आहे असे कळले "
आदिराज " नो .. नो .. डॅड .. शी इज जस्ट अ फ्रेंड .. इनफॅक्ट ज्युनिअर आहे ती .. मी उगाच तिला छेडत असतो "
डॅड " शेम ऑन यु .. कीप इन युअर माईंड .. नेव्हर मेक फन ऑफ गर्ल्स .. नेव्हर बुलली देम .. गिव्ह देम रिस्पेक्ट .. टेक केअर ऑफ देम .. यु शुड नॉट बिहेव्ह लाईक धिस .. तुझ्या आईला कळले तर तिला खूप वाईट वाटेल .. "
आदिराज " डॅड .. ती ना मला घाबरते .. मी समोर गेलो ना कि माझि स्टुडंट असल्या सारखी ताठ उभी राहते .. इतकी क्युट दिसते ना तेव्हा ती .. असे वाटत ... आय मिन .. बघायला खूप चांगली वाटते .. म्हणून तिला त्रास देतो .. बाकी काही नाही "
डॅड " नो .. यु शुड स्टॉप धिस इमिडिएटली .. आणि उद्या तिला छान काहीतरी गिफ्ट घेऊन जा आणि सॉरी बोल .. ओके "
आदिराज ला तिला गिफ्ट द्यायचं हे इतकं आवडले .. आणि लगेच होकार दिला
डॅड .. तुझ्या अकाउंट ला पैसे ट्रान्सफर करतो त्याचे तिला गिफ्ट दे "
आदिराज धावतच आला .. आणि डॅड ला मिठी मारली " थँक्स डॅड "
डॅड " यु आर वेलकम .. मग .. त्या मुली चा फोटो बघायला कधी येशील ?.. स्पृहा नुसती फ्रेंड आहे तर मी बघितलेली बघायला हरकत नाहीये ना ?"
आदिराज " डॅड .. नको ना .. प्लिज .. काही निर्णय माझे मला घ्यायची परवानगी द्या ना .. अरेंज मॅरेज म्हणजे जरा जास्त होईल "
डॅड " ठीक आहे .. पण "
आदिराज " पण बिण काही नाही .. आय एम गोइंग नाऊ .. "
असे बोलतच त्याने समोरचे जॅकेट चढवले ..गॉगल लावला आणि आनंदात बाहेर पडला
स्पृहाला गिफ्ट घ्यायला म्हणून आदिराज आनंदात उदड्या मारत तिकडून बाहेर पडला .. खाली पार्किंग पर्यंत येत होता तर त्याला मेसेज आला .. २ लाख रिसिव्हड फ्रॉम डॅड .. मेसेज पाहून आदीने एक फ्लयिंग केसच फेकला डॅडच्या केबीन कडे बघून आणि वरून काचेतून डॅड ने तो कॅच केला .. हसतच
आदिराज गोल्ड च्या शॉप मध्ये गेला .. स्पृहा साठी काय घ्यावे .. म्हणून बराच वेळ बघून त्याने एक रोझ गोल्ड चे नाजूक ब्रेसलेट घेतले .. छोटे छोटे गुलाबाच्या फुलासारखे बटन्स होते आणि त्यावर बारीक स्टोन्स होते .. आदिराज ने गिफ्ट पॅक करायला सांगितले .. आणि ते पॅकेट त्याच्या लेदरच्या जॅकेटच्या खिशात टाकले ..
आदिराज इतका खुश होता .. कि बाईक वर जणू नाचतच होता .. मन एकदम आनंदले होते त्याचे .. प्रेमाची धुंदी चढत चालली होती ..
पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है नया इंतज़ार।
कर लू मैं क्या अपना हाल , ऐ दिले बेक़रार, मेरे दिले बेक़रार
तू ही बता।


पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है नया इंतज़ार।
कर लू मैं क्या अपना हाल , ऐ दिले बेक़रार, मेरे दिले बेक़रार
तू ही बता।
पहला नशा, पहला खुमार।

उड़ता ही फिरूं इन् हवाओ में कहीं ,
या मैं झूल जाऊं घटाओं में कहीं
उड़ता ही फिरूं इन् हवाओ में कहीं ,
या मैं झूल जाऊं घटाओं में कहीं।
इक करदूँ आसमान और ज़मी,
कहो यारो क्या करूँ या नहीं।

पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है नया इंतज़ार।
कर लू मैं क्या अपना हाल , ऐ दिले बेक़रार, मेरे दिले बेक़रार
तू ही बता।
पहला नशा, पहला खुमार।

उसने बात की कुछ ऐसे ढंग से ,
सपने दे गया हज़ारों रंग के।
उसने बात की कुछ ऐसे ढंग से,
सपने दे गया हज़ारों रंग के।

रह जाऊं जैसे मैं हार के,
और चूमें वो मुझे झूम के।


पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है नया इंतज़ार।
कर लू मैं क्या अपना हाल , ऐ दिले बेक़रार, मेरे दिले बेक़रार
तू ही बता।

https://www.youtube.com/watch?v=YoThngCrGGc&ab_channel=ClassicSuperhitMusic
गाणे नक्की ऐका आणि पहा .. आदिराज असाच आनंदी आहे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now