स्त्रीत्व भाग ४४

Story Of A Women's Facing Tough Situations


स्त्रीत्व भाग ४४

क्रमश : भाग ४३

सागर " माय डार्लिंग ..आपल्याला काहीच घाई नाहीये .. तुला पाहिजे तेवढा वेळ तू घे " दोन्ही हाताने त्याने तिचे गाल ओढले.
निहारिका " सागर .. तुला असे वाटते का कि मी तुझ्या माझ्यावर असलेल्या प्रेमाचा गैरफायदा घेतेय ?"
सागर " सांगू का ? गैरफायदा प्रेमाचा नाही .. तू माझ्या शांतपणाचा घेतेस .. माझी ना अशी ईच्छा आहे कि जी काय लाईफ आहे ना ती शांत स्टेबल असली पाहिजे .. उगाचच त्यात अप्स अँड डाऊन नको वाटतात .. मग ह्या सगळ्या गोष्टी हळू हळू सोडवाव्या लागतात .. उगाच दुसऱ्याला नावं ठेवण्यात काहीच अर्थ नसतो .. आत या गोष्टीत ना आई बाबा चुकीचे आहेत .. ना तुझे आई बाबा चुकीचे आहेत .. ना मी चुकीचा आहे .. ना तू चुकीची आहे तरीही सर्वजण एकमतावर येतोय का ?नाही .. कारण प्रतेय्काची अशी एक बाजू आहे ती समजून घ्यावी लागते .. तुला दिल्लीला न पाठवायाला आम्ही काय तुझे दुश्मन आहोत .. तुझ्या चांगल्या भविष्याच्या वाईटावर आहोत का ? तर तसे नाहीये .. सर्वांना आपल्या जिगरच्या तुकड्याला लांब पाठवायला भीती वाटतेय .. आणि ती भीती रास्त आहे .. आज जमाना इतका खराब आहे .. कोण कसा वागेल आपण काहीच सांगू शकत नाही .. त्यामुळे वेळ आली तर आपण लग्न करून जाऊ . म्हणजे समाज , आई वडील कोणालाच ऑब्जेक्शन नसेल .. राहिला प्रश्न मंगळसुत्रचा तू काढून ठेव तिकडे गेल्यावर .. नको सांगुस कोणाला माझे लग्न झालेय .. आणि मी तिथे येणारच तुझ्या मागावर .. तर तू इकडे नसताना मी इकडे राहूच शकत नाही " आणि हसायला लागला
निहारिका " ठीक आहे " आणि ती पण गोड हसली .. तेवढ्यात आतून निशिता बाहेर आली ..
निशिता " सागर भाऊ .. तुमच्यात ब्रेक अप झाला तरीपण बोलतात का ? अरे माझ्या शाळेत माझ्या मैत्रिणीचा तिच्या फ्रेंड बरोबर ब्रेक अप झाला ना तर ते दोघे आता बोलत पण नाहीत .. चक्क बघत पण नाहीत एकमेकांकडे "
निहारीका" हो .. का ? अभ्यास झाला आजचा ? नको त्या गोष्टीत लक्ष कशाला घालता मॅडम तुम्ही ?"
निशिता " ए गप ए मी सागर भाऊजींशी बोलतेय "
सागर " निशिता .. तुझ्या बहिणीला ब्रेक अप म्हणजे काय कळतच नाही .. ब्रेकअप म्हटल्यावर मला भेटायला घरी आली ती "
निहारिका " शट अप सागर .. "
निशिता " ए .. मी आईला नावं सांगेन हा तुझे .. तू त्याला काही बोलू नकोस .. "
सागर " बर चला मंडळी .. मी जातो .. तुमचं चालू द्या " आणि गाडीला किक मारून निहारिकाला डोळ्यांनीच बाय करून गेला.
--------------------------------------------------------------
प्रसाद आणि रागिणी मस्त एन्जॉय करत कुणीकडे तरी जात होते ..प्रसाद आज भयंकर खुश होता .. आणि एकदम हँडसम दिसत होता .. डोळ्यांवर गॉगल लावून ह्रितिक रोशन वाले लुक्स देत होता .. आणि रागिणी त्याची नजर चुकवून त्याला पाहत होती .. रागिणी मनात विचार करत होती कि हा जो प्रॉब्लेम झालाय तो नसता तर आज ते दोघे किती खुश असते .. मला माझी हैप्पी फॅमिली मिळाली असती .. प्रसाद आता छान वागतोय तर किती क्युट दिसतोय .. ते काही नाही लवकरात लवकर या प्रोब्लेम मधून बाहेर आले पाहिजे ..
प्रसाद " रागिणी , तुझ्या कॉलेज लाईफ बद्दल सांग ना काहीतरी ?"
रागिणी " अम्म्म .. मी ना ****** कॉलेजला होते.. कॉलेजच्या हॉस्टेल ला रहायचे .. मी स्न्हेहा , लीना आणि कुसुम या तिघी माझ्या रूम मेट्स होत्या .. आणि आता त्या माझ्या फॅमिली आहेत .. तुला माहितेय प्रसाद दिवाळीला सुद्धा आम्हांला घरी जावेसे वाटायचे नाही .. मला तर काकांकडे राहायला जावे लागायचे .. काकूला फारसे माझे तिथे असणे आवडले नाही कधीच .. स्न्हेहा इज लकी .. तिला सुट्ट्या लागल्या तिचे डॅड किंवा तिचा दादा तिला लगेच घ्यायला यायचा .. कुसुमची आई सावत्र आई होती त्यामुळे तिलाही काही एवढी घराची ओढ नसायची पण तरी तिचे डॅड तिला घ्य्यायला यायचे मग ती पण जायची .. राहिली लीना आणि मी आम्ही दोघीना सुट्ट्या सुद्धा हॉस्टेल ला काढायचो .. मग काका लक्ष्मी पूजनाला मला बोलवून घ्यायचा.. कारण काका जो बिझनेस चालवतो तो माझ्या बाबांचा आहे ..
लीना आणि मी सॉलिड मज्जा करायचो .. तुला सांगते लीना ना जाम टेरर होती अरे .. एकदा आम्ही ......
रागिणीच्या डोळ्यांत तिच्या हॉस्टेलचे किस्से सांगतांना एक वेगळीच चमक आली होती .. तिचे बोलके डोळे मागे पुढे होत होते आणि प्रसाद तिच्या डोळ्यांत हरवला होता ..
रागिणी " प्रसाद तुला सांगते एक मुलगा माझ्या मागे लागला होता .. लीना ने बॉईज हॉस्टेलला जाऊन हॉकी स्टिकने त्याला फोडला होता " आणि खळखळून हसू लागली
बराच वेळ गप्पा मारल्यावर ते दोघे कॉफी घ्यायला थांबले .. तेव्हा पण ती कॉलेजचे सांगत होती
पुनः गाडीत बसल्यावर
प्रसाद " अजून १ तास आहे तुला पाहिजे तर तू झोपलीस तरी चालेल "
रागिणीने एक दोनदा जांभई दिल्यावर त्याने तिला सांगितले .. आणि रागिणी खरंच डोळे मिटून पडली
मिटल्यावर तर तिचे डोळे अजूनच सुंदर दिसत होते .. भरगच्च पापण्या .. सुंदर दिसत होत्या
एक तासांनी त्यांना जिथे पोहचायचे होते तिथे ते पोहचले
प्रसादने तिला हात लावून उठवले " रागिणी .. उठतेस का ? आपण आलोय "
तशी रागिणीने पटकन डोळे उघडले " सॉरी मला खूपच झोप लागली बहुदा "
प्रसाद " उतर खाली .. पोचलोय आपण "
रागिणीने पर्स हातात घेतली .. आणि खाली उतरली .. इकडून प्रसाद खाली उतरला .. समोर जे काही होते ते दिसल्यावर रागिणी सुन्नच झाली .. एकदम एकटक त्याकडे बघत बसली .. शांतपणे पण डोळयांतून अश्रू ओघळत होते
प्रसाद " चल .. जायचं ?"
रागिणी " तुला ह्या प्लेस बद्दल कुणी सांगितले ?
प्रसाद " सांगतो .. आगोदर आतमध्ये तर चल "
समोर एक जुने पुराणे घर होते .. बरेच वर्ष वापरले नसल्याने जुनाट दिसत होते पण घराची रचना इतकी सुंदर होती .. पुढे छोटेसे अंगण .. एका बाजूला लहान मुलीची सायकल .. पार गंजून गेली होती .. फक्त तिची सीट पिंक असावी अशी वाटत होती .. रागिणीचे आई बाबा असताना ते लोक या घरात राहायचे .. अंगणात पुढे झोपळा लावलेला .. तोही लाकडी .. एका झोपाळ्यावर ५ जण तरी आरामात बसतील एवढा मोठा .. रागिणीच्या डोळ्यांसमोर आले कि कितीतरी वेळा बाबा यावर झोपायचे आणि त्याच्या पोटावर ती झोपायची आणि आई तिला जेवण भरवायची .. ती गंजलेली सायकल बघून तर खुद्कन हसली .. कीति पडली असेल ती तिच्यावरून ते आठवले ..
प्रसादने धावत जाऊन घराचे लॉक उघडले .. ती पण धावतच घरात गेली .. तिच्या नजरेला सगळीकडे पटापट फिरायचे होते .. पण शरीर मात्र हळू हळू चालत होत .. लहानपणीच्या असंख्य आठवणीचा कप्पा उघडला गेला होता .. प्रसादच्या हाताला धरून तीने लहान मुला सारखे ते घर त्याला दाखवले
रागिणी " प्रसाद " हे बघ .. हि आई बाबांची रूम .. हि माझी रूम .. इथे ना एक टेलेफोन होता .. ग्रीन कलरचा .. त्यात बोट टाकून मग लावायचा तसला वाला .. बाबांनी माझ्या साठी टि व्ही पण घेतला होता .. आईसाठी रेडिओ .. आई ना रोज जेवण करताना गाणी ऐकायची .. तिच्या रुम मध्ये एका खोक्यात सगळी खेळणी दिसली .. तिने कपाटावर चिकटवलेली चित्र होती .. काही काही तिने तिच्या हाताने काढली होती .. "
रागिणी " प्रसाद .. हे घर जुना आहे पण धूळ कशी नाहीये इथे .. ? आणि तुला कोणी सांगितले हि जागा .. इनफॅक्ट चावी कशी आली तुझ्याकडे ?"
प्रसाद " आपल्या लग्नाच्या दिवशी तुझ्या काकांनी मला ह्या घराचा पत्ता आणि चावी दिली .. मला म्हणाले हे घर हि एकच रागिणीच्या आयुष्यातली गोष्ट जी मी माझ्याकडे आहे.. ती मी तुझ्याकडे देतो .. मी म्हटले तुम्ही तिलाच द्या तर ते म्हणाले .. घर आहे तिचे लहानपणीचे .. तू घेऊन जा तिला कधीतरी .. मी काही नेऊ शकलो नाही .. मग मागच्या आठवड्यात मी ऑफिसच्या कामाला बाहेर गेलेलो बघ .. तेव्हा मी इकडे आलो होतोआणि शेजारच्या माणसाकडून माणसं लावून घर साफ करून घेतले .. पण सगळ्या वस्तू साफ करून नीट ठेवून दे असे सांगितले होते .. "
प्रसाद बोले पर्यंत रागिणी धावतच पुढे आली पटकन त्याच्या मिठीत गेली " थँक यु .. मला इथे आणल्या बद्दल .. आई बाबां गेल्यानंतर मी आज येतेय इकडे .. तुला आई बाबांचा फोटो दाखवते चल .. ती रडत होती , आनंदीत होती कि दुःखात होती .. काहीच कळत नव्हते .. मन भरून आले होते तिचे .. मोठया मोठ्या डोळ्यात मोठे मोठे अश्रू जणू रांगेत उभेच राहिले होते ..
तिने त्याला आई बाबांचा आणि तिचा लहान पाणिचा फोटो दाखवला .. तिघेच किती खुश असतील त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहूनच कळत होते.. छोटुसे दोन पोनी बांधलेली आणि फ्रॉक घातलेली रागिणी किती क्युट दिसत होती .. बाबांनी उचलून घेतले होते तिला एका हातात आणि एक हात आईच्या खांद्यावर होता रागिणीने आई बाबांच्या फोटोला ओठ लावले
रागिणी " आई ... बाबा .. कसे आहात तुम्ही ? आई तुम्ही दोघेच याचं मला सोडून का गेलात ? आई मला किती आठवण यायची .. किती लहान होते मी "

रागिणी काय काय बोलत होती .. तिच्यातल मोठेपण कुठेतरी गायबच झाले होते .. आज ती तिच्या आईची लहान परी होती .. निरागस होती .. आईला मिस करत होती बाबांना मिस करत होती ..
प्रसाद " रागिणी .. रडू नको ना प्लिज .. "
रागिणी " सॉरी .. आज ना कंट्रोलच होत नाहीये .. अरे असे मोकळे पणाने रडले पण नाही कधी .. लहानपणी असे वाटायचं मी रडले तर काकू ओरडेल .. आणि काकू ओरडेल या भीतीने कधी रडलेच नाही .. मग ना मी हॉस्टेल वर राहायला गेले ना तशी रडणंच संपले होते .. म्हणतात ना आगीतून फोफाट्यात तसे झाले होते तरी पण मला फोफाटा बरा वाटायचा .. . "
प्रसादने त्याच्या खिशातून रुमाल काढला .. आणि तिचे डोळे पुसले .. तिला त्याच्या मिठीत घेतलं .. तिच्या केसातून .. डोक्यावरून मायेने हात फिरवत होता .. " रिलॅक्स .. अशी रडलीस तर आई बाबांना आवडेल का ? मग.. तू एवढी स्ट्रॉंग आहेस आणि आता त्यांच्या समोर रडतेस ? "

🎭 Series Post

View all