स्त्रीत्व भाग ४०

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ४०
क्रमश : ३९
सागर थोडा त्याच्या रूम मध्ये बसला आणि मग सरळ त्यांच्या ऑफिसला गेला ..
सागरचे बाबा एकदम आश्यर्य चकित झाले कि आज सागर ह्या वेळेला इकडे कुठे आलाय
सागर " बाबा मला थोडे बोलायचंय .. आता बोलू शकतो का ?"
बाबा " ये ना आत .. केबिन मध्ये बसून बोलू .. तो आलाय हे कळल्यावर ते हातातले काम टाकून बाहेर रिसेप्शन वर आले होते ..
सागर " बाबा आई कुणीकडे आहे ?"
बाबा " आहे ना .. ती तिच्या केबिन मध्ये आहे "
सागर " आई ला पण बोलवून घ्या .. मला बोलायचंय दोघांशी "
बाबा " घरी जायचं का ? "
सागर " नाही .. फक्त पाच मिनिटं पाहिजेत तुमच्या दोघांची "
बाबांनी केबिन मधून आईला फोन करून बोलावून घेतल
आई " सागर .. अरे तू आज कॉलेजला नाही गेलास का ?"
सागर " आई , तू निहारिकाच्या घरी कॉल केलेलास का ? "
आई " हो .. केलेला .. २ महिन्यांनी परीक्षा झाली कि मग लग्नाची तारीख काढू "
सागर " मला लग्न नाही करायचंय "
दोघेही अश्यर्यचकित झाले
दोघेही " म्हणजे ?"
सागर " म्हणजे माझे आणि निहारिकाचे ब्रेक अप झालंय ?मला लग्नच नाही करायचंय इनफॅक्ट "
आई " सागर .. काय झालंय नक्की ?"
सागर " काहीच नाही आई .. तू फक्त एक काम कर .. निहारिकाच्या आईला फोन करून सांग कि सागरला निहारिकाशी लग्न करायचं नाहीये "
बाबा " अरे पण तुझे प्रेम आहे ना तिच्यावर ?"
सागर " कदाचित तेच निभवण्याचा प्रयत्न करतोय " आणि ताडताड निघून गेला बाहेर
------------------------------------------
रागिणी किचन मध्ये रात्रीचे जेवण बनवत होती .. बाबा तिला छोटी मोठी मदत करत होते .. मध्ये हसत होते दोघे .. आई बेड वर बसून आराम करत होती.. तेवढयात प्रसाद आईच्या रूम मध्ये गेला .. बाजूला असलेल्या चेअरवर बसला
आई " कसा आहे पप्या " आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आईने
प्रसाद " आई ..नको ना पप्प्या म्हणू .. रागिणीने ऐकले तर हसेल मला ती .. "
आई " हो रे .. चुकून आले माझ्या तोंडून "
प्रसाद " आई .. तब्बेत कशी आहे आता .. ? तो बोलत होता कि बाबा पण त्याच्यात सामील झाले ..
प्रसाद " बाबा .. या ना मला बोलायचंय दोघांशी "
बाबा बाजूच्या चेअर वर बसले
बाबा " बरं झाल आलास .. मी आणि आई उद्या सकाळी मामाकडे जातोय .. सकाळी आम्हांला ओला बुक करून दे "
आई " तो आणि रागिणी पण येतील कि आपल्या बरोबर? "
बाबा " कशाला ? त्यापेक्षा उद्या रागिणीला घेऊन कुणीकडे तरी फिरायला जाईल ना तो "
आई " ठीक आहे .. हे पण चांगले आहे "
तेवढ्यात रागिणी आईला जेवणा आधीची गोळी घ्या असे सांगायला येत होती .. तर रूमच्या बाहेर तिचे पाय थांबले .. एक क्षण असे वाटले तिला कि त्यांच्या प्रायव्हेट गप्पा चालू असतील .. मी कशाला आत जाऊ ...आणि मागे फिरतच होती तर तिच्या कानावर शब्द पडले
प्रसाद " आई .. आता तुम्ही दोघे इथेच रहा कायमसाठी ?"
बाबा " अरे कशाला ? तुमच्या दोघांचा नवीन संसार आहे .. थोडे एन्जॉय करा .. आम्ही काही अजून खाष्ट म्हातारे नाही झालोय "
प्रसाद " बाबा .. माझ्यासाठी नाही .. रागिणी साठी थांबाल प्लिज "
आई " म्हणजे ?"
प्रसाद " म्हणजे आई .. लहानपणा पासून ती एकटी आहे .. तिच्या आई वडिलांचा सहवास तिला कमी लाभलाय .. आता ती तुमच्यात तिचे आई बाबा शोधते ..मी ऑबझर्व केलंय .. ती खुश असते तुम्ही दोघे असलात कि .. आणि शिवाय मी हा असा कधी कधी तिरसट सारखा वागतो .. तिला त्रास देतो .. निदान तुम्ही दोघे असला तर तिला समजून घ्याल "
रागिणीने हे शब्द ऐकले आणि तिच्या डोळ्यांतुन पाणीच आले .. एवढी चांगली माणसे आणि मला रूम मध्ये जाताना असे एक क्षण वाटले कि मी यांच्यात कशी जाऊ .. त्यांच्या हृदयात मी आहे .. मी या फॅमिलीचा एक भाग आहे याची जाणीव झाली ..
आई " ठीक आहे .. पण मग जेवणाला बाई लावूया का ? रागिणी वर कामाचा लोड येतो .. मला अजून फारसे काही किचन मध्ये करायला लगेच जमणार नाही .. "
प्रसाद " त्याची काही काळजी करू नकोस आई .. मी आहे ना .. मी मदत करेन तिला "
बाबा " अहो .. तोंड बघा मदत करणार्याच .. "
तसे तिघेही हसले ..
बाबा " बरं .. पण आम्ही उद्या मामाकडे जातोय .. तुम्हीं तुमचा प्लॅन करा "
प्रसाद " ठीक आहे .. विचारतो तिला .. तिला जर माझ्या बरोबर जावेसे वाटले तर नक्की नेईन "
आई " प्रसाद .. असे का म्हणतोस रे ? मागचे सगळे सोडून द्या .. आणि नव्याने संसार सुरु करा बघू .. हे असे किती दिवस तुम्ही राहणार ?"
प्रसाद " होतोय हळूहळू सेट .. काही गोष्टी अशा आहेत कि ... "
तेवढ्यात रागिणी आत आली " चला जेवायला बसुया का ? मला खूप भूक लागलीय .. आई तुम्ही हि गोळी घ्या जेवणाच्या आधीची " बोलतच तिने एक गोळी काढून त्यांच्या हातावर ठेवली आणि पाण्याचा ग्लास ठेवला
मुद्दामून तिने ते चालू असलेलं डिस्कशन थांबवले होते .. भावनेच्या भरात प्रसाद काही जास्तीचे सांगून टाकू नये म्हणून
बाबा " चला मी ताट पाणी घेतो .. " आणि बाहेर निघून गेले
आई " रागिणी .. एक मिनिट जरा बसतेस का इथे ?"
रागिणी त्या चेअरवर बसली
आई " रागिणी .. एक आई म्हणून तुला सांगते .. माझा मुलगा वाईट नाहीये .. तू त्याला माफ करशील का ? तुझ्याशी लग्न करायचं म्हणून किती आनंदात होता तो हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय .. जे झाले ते विसरून संसार सुरू करा आता .. मी मरायच्या आधी मला नातवंडांचे तोंड पहायचं आहे "
रागिणीला कसे आणि काय बोलू ते काहीच कळे ना .. समोरच प्रसाद बसला होता .. तिला हे ऐकून इतकि लाज वाटली कि ..पटकन उठली आणि धावतच ती त्यांच्या रूम मध्ये गेली .. काहीच न बोलता
प्रसादला काही कळलेच नाही तिला बहुदा हे आईचे बोलणे आवडले नसणार असेच वाटले " आई काय ग !! नातवंडांचे वगैरे कशाला बोललीस .. हल्लीच्या पोरींना नाही आवडत असे "
आई "वेडा रे वेडा माझा मुलगा .. अरे लाजून पळाली ती .. "
प्रसाद " छे . मला नाही वाटतं असे "
आई " ठीक आहे .. मग जेवताना बघ ती तुझ्याकडे बघणार पण नाही आणि तू काही बोलायला गेलास तरी बोलणार नाही "
प्रसाद " ह्याला लाजणे म्हणतात का ? ह्याला चिडणे म्हणतात किंवा आमच्या भाषेत फाट्यावर मारणे म्हणतात " आई " कसे होणार रे तुमच्या दोघांचे .. जा .. जेव जा .. आणि मला थोडे कमी वाढायला सांग "
प्रसाद " आणि एक पुन्हा असे मरणाचं वगैरे बोलू नकोस .. " म्हणतच तिला मिठी मारून बाहेर निघून गेला
--------------------------------------
आदी दिवसभर विक्रमने त्याला जे काम सांगितले ते काम करत होता .. खरतर त्यांच्या कंपनीत जो सॉफवेअर होता त्याचा आदी मास्टर होता .. विक्रमने काम दिले कि आदी २० मिनिटातच ते काम पाठवून मोकळा होयचा .. आणि काम एकदम परफेक्ट असायचं .. आणि त्यामुळे विक्रमची चिडचिड होत होती .. हा फ्रेशर आहे तरी सुद्धा एवढे काम कसे काय याला जमतंय .. हे काम मला शिकायला २ वर्ष गेली ..
विक्रम उठला आणि आदींच्या समोर जाऊन उभा राहिला
विक्रम " मिस्टर राज .. व्हेरी गुड .. आता मला मला सांगशील का ? कि कुठून कॉपी पेस्ट करतोय तू ?"
आदी " व्हॉट ?"
विक्रम " म्हणजे एवढे कठीण काम तू २० मिनिटात सोडवलेस ना तर नक्कीच तू कुठून तरी कॉपी करतोय .. मला तुझा मोबाईल चेक करावा लागेल "
आदी " एक्सयूज मी .. हाऊ डेअर यु .. डोन्ट यु डेअर आय विल फिनिश यु "
विक्रम " ए हॅलो .. तू एक इंटर्न आहेस हे विसरू नकोस .. आणि तुझ्या सिनिअरशी असे बोलतोस का रे ? मी तुझ्या परफॉर्मन्स सगळे रेकॉर्ड ठेवणार आहे .. आणि मी जे रेकॉर्ड लिहीन ना त्यावरच तुझा इथला जॉब फिक्स होईल "
आदी "व्हॉट यु वॉन्ट फ्रॉम मी ?"
विक्रम "आय वॉन्ट टू चेक युअर मोबाईल "
आदी " नो द्याट्स नॉट पॉसिबल "
विक्रम " मग सांग हे कुठे बघून केलंस .. हे काम २० मिनिटे होणार नाहीच आहे .. .. कमीत कमी २ दिवसाचं काम आहे "
आदी " हाऊ अनस्किलड यु आर ? यु मस्ट अपग्रेड युअर हॅन्ड्स ऑन सॉफ्टवेअर "
विक्रम चिडला .. आय विल पूट ऑल धिस मॅटर टू श्रीधर सर .. नाऊ हि विल कम अँड चेक युअर मोबाईल "
आदी जरा घाबरला .. कारण त्यात स्पृहाचे आणि त्याचे फोटो होते ..
आदी " विक्रम सर .. प्लिज डोन्ट डू धिस टू मी .. बिलिव्ह मी मी कॉपी नाही केलीय "
मनातून नुसता चरफडत होता तो .. साल्या या साध्या एम्पलयीला सर म्हणायला लागतंय त्याचे पाय धरावे लागतायत "
आदी " सॉरी .. प्लिज इफ यु वॉन्ट यु कॅन सीट नेक्स्ट टू मी .. व्हाईल वर्किंग .. "
विक्रम " ठीक आहे .. मी अजून एक टास्क तुला देतो .. तू तो माझ्या शेजारी बसून कर.. तरच माझा विश्वास बसेल तुझ्यावर "
आदी " डन .. आय एम रेडी "
विक्रमने त्याला अजून कठीण काम दिले .. आणि त्याच्या शेजारी बसला ..

🎭 Series Post

View all