स्त्रीत्व भाग ३८

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ३८
क्रमश : भाग ३७
स्पृहा घरी आली फ्रेश होऊन घरात नेहमी प्रमाणे घरात मदत करत होती .. पण स्पृहाच्या डोळ्यांसमोरून आदी हटतच नव्हता .. त्याच्या बरोबर घालवलेल क्षण बेचैन करत होते .. मधेच तिच्या रूम मध्ये जाऊन मोबाईल वर नुसता त्याच्या नंबरवर हात फिरवायची आणि तिच्या अंगावर काटा येत होता .. आईने सांगितलेलीही सगळी काम करून रात्री जेवण झाल्यावर
बाबा " बरं झाले तुझा मोबाईल मिळाला ?"
आई " हो ना .. तेवढेच पैसे वाचले ?"
आजी " तशी ती निष्काळजी नाहीस आहे मुळी .. गुणांची आहे माझी पोर "
आई " हो ना.. पण हल्ली काय करतेय काय माहित ? "
स्पृहा " आई काय ग ? आता नाही ना असे होणार सांगितले ना .. " असे म्हणून ती तिच्या रूम मध्ये निघून गेली
----------------------------------------
सागरने निहारिकाला मेसेज केला " हाय ..मला बोलायचं होते तुझ्या जवळ ? रात्री येऊ का ?"
निहारिकाने तो मेसेज वाचला " पण काहीच रिप्लाय दिला नाही ..
सागरला उगाचच असे वाटले कि ती मला अव्हॉइड करतेय आणि रागातच मोबाईल बेड वर टाकून तो झोपला
-----------------------------------------
शरयू आजी जवळ चांगली रमली होती .. आजीच्या आजू बाजूला खेळण्यांनी खेळत होती.. आजी बाई तिच्यासाठी वरण भात बनवत होती आणि मोहिनी आज दुकानात बसली होती खरी पण तिच्या डोक्यात आपल्या मुलीसाठी आपण काय काय करायचं .. तिला असं शिकवायचं .. तिला लवकरच शाळेत टाकू .. असे काय काय ठरवू लागली
-----------------------------------------------
सुनील " तेजू .. मी तुला सांगितलेलं लक्षांत आहे ना ? काहीतरी लिहायला सुरुवात कर .. हि साईट आहे बघ .. बऱ्याच जणी त्यावर लिहतात .. आपले ज्ञान हे शेअर केल्याने वाढत जाते .. तू एवढी बुक्स वाचतेस .. स्टार्ट रायटिंग "
तेजू " बघते .. पण काय लिहू .. मला थोडा वेळ हवाय "
सुनील " ठीक आहे .. काही घाई नाहीये .. रिकामी बसलीस तर मनात निगेटिव्ह विचार येतील आणि तसे येऊ नये म्हणून मी तुला बोललो बाकी काही नाही "
तेजू " मी जॉब ला च जाते ना त्या पेक्षा "
सुनीलने प्रेमाने तिचा चेहरा हातात घेतला " तुला असे घरात ठेवायचं नाहीये मला .. पण अजून तुझी तब्बेत नाजूक आहे .. थोडी ठणठणीत झालीस कि जॉब नक्की कर .. तुला आरामाची गरज आहे "
तेजू " ठीक आहे .. सुनील .. संध्याकाळी ऑफिस मधून घरी येताना .. पाणीपुरीच्या पुऱ्या आणशील का ? खावीशी वाटतेय "
सुनील " ओके .. छान पाणी बनवून ठेव .. आल्यावर दोघे ताव मारू "
तसे दोघेही हसले आणि तो ऑफिसला निघून गेला
----------------------------
डॅड " आदी .. हे तुझे आय कार्ड .. हे तुझे ऑफिसला घालायचे कपडे .. आणि हे तुझे इंटर्नशिप चे लेटर .. उद्या सकाळी ९ वाजता आपल्या ह्या ऑफिसला जायचं आणि हे लेटर दाखवायचं तु कॉलेज कॅम्पस मधून सिलेक्ट केलंय असेच सर्वांना सांगायचं .. "
आदी " पण मला कोणी ओळखलं तर ?"
डॅड " माझ्याशी अजिबात बोलायचं नाही .. मी समोर दिसलो तरी .. मी दुपारी त्या ऑफिसला येईन.. मग वेळ आली कि आपण तुझी ऑफिशियल ओळख करून देऊ .. आणि एक माझ्या बापाची कंपनी आहे या अविर्भावात तू जायचं नाहीयेस .. २०००० रुपये महिना काम केल्यावर स्टायपेंड मिळणार आहे तुला .. तर तुझे वागणे तसेच असले पाहिजे .. तुला अर्ध्या रस्त्यापर्यंत ड्राइव्हर सोडेल .. ऑफिस जवळ एक बस स्टॉप आहे .. तिकडून लोकल बसने ऑफिसला यायचं "
आदी " डॅड .. हे काय आहे सगळे ?"
डॅड " तुझी मॉम आणि मी नेहमी तुझ्या बद्दल बोलायचो तेव्हा ती म्हणायची मला कि आदिला सर्व सामान्य लाईफ कशी असते हे पण माहित पाहिजे .. आणि तू एकदा का md म्हणून लाँच झालास कि तुला हे कधीच कळणार नाही कि सर्व सामान्य माणूस काय काय करतो .. त्यामुळे हे दोन महिने मी तुझ्या मॉमची ईच्छा पूर्ण करणार आहे .. पण तू माझा मुलगा आहेस हे सांगून तुला जॉबला लावलं तर लोक तुला जातीस अटेन्शन देतील .. हे नको होयला म्हणून हे सर्व .. तर दोन महिने यु आर जस्ट "राज एम "
आदी " ओके .. "
डॅड " जा झोप आता .. सकाळी शार्प ९ वाजता यु शुड बी ऍट रिसेप्शन "
आदी " ओके "
आदी बेड वर येऊन झोपला .. पण आज ना राहून राहून सारखा हात मोबाईल मधल्या स्पृहाच्या फोटो कडे जात होता .. तिच्या रुमालाला तो थोड्या थोड्या वेळाने हुंगत होता आणि त्यावर ओठ लावत होता ..
स्पृहा बेड वर आडवी पडली होती खरी .. पण बेचैनी , अस्वथता होती .. सारखी या कुशीवरून त्या कुशीवर होत होती .. जणू आदींचा अदृश्य स्पर्श तिला जाणवत होता .. ना रहावता तिने तिच्या मोबाईल वरून आदीला फोन लावला .. कदाचित एक रिंग देऊन कट करणार होती पण तोही फोन हातात घेऊनच बसला होता .. तिचा आता या वेळेला फोन येईल अशी जरा सुद्धा त्याला आशा नव्हती .. पण दुसऱ्या सेकंदाला त्याने फोन उचलला .. इतका खुश झाला होता ..
आदी " हॅलो "
तिकडून काहीच रिस्पॉन्स नाही.
आदी " माझी आठवण येतेय का ?"
आदी " अजून झोपली नाहीस ?"
आदी " अच्छा !! बेड वर आडवे पडून झोपायचा प्रयत्न करतेय पण झोप येत नाहीये हो ना ?"
समोरून काहीच आवाज नव्हता .. ती फक्त मनात बोलत होती पण आदिला तिने न बोलता सगळे कळत होते आणि दोघे कम्म्युनिकेट करत होते "
स्पृहा " आदी .. उद्याची तयारी झाली का ?" आवाज रडवेला होता तिचा ..
रोज तिच्या मागे पुढे करणारा आदी आता उद्या पासून चक्क दोन महिने आपल्याला दिसणार पण आंही या विचाराने डोळे भरून आले होते तिचे .. अनामिक धडधड होत होती .
आदी " हो .. झाली उद्याची तयारी "
आदी " तुला भेटावेसे वाटतंय यार !! दोन महिने कसे काढायचे ? उद्या भेटूया का ?"
आदी " तुला माहितेय का डॅड मला एक नॉर्मल इंटर्न मधून जॉईन करून घेणार आहेत .. आणि मी पब्लिक ट्रान्सपोर्ट ने ऑफिसला जाणार आहे "
थोडक्यात आता तो नॉर्मल लाईफ जगणार आहे हे त्याने तिला सांगितले आणि याचा तिला अत्यंत आनंद होत होता .. खूप खुश झाली होती ती .. ह्याच दोन महिन्यात त्याला आयुष्याचे सार कळणार होते .. आणि मग तो हि रिस्पॉन्सिबल बनून खूप चांगले काम करायला तयार होईल .. शिवाय ती सध्या त्याच्या पासून लांब असेल त्यामुळे संयम काय आहे हे हि त्याला कळेल ..
असे म्हणतात
प्रेमातली खरी मजा विरहात असते .. कारण विरह आल्यावर माणसाला कळून जाते कि आपण आपल्या जीव भावाचे माणूस आपल्या बरोबर नसेल तर आपण शून्य आहोत .. कितीही स्वर्ग सुखात जरी ती व्यक्ती असली तरीही आवडीची व्यक्ती तो आनंद शेअर करायला नसला तर तो आनंद सुद्धा आनंद वाटत नाही ..
आदी " दोन वर्ष जरा जास्ती होतील .. थोडा यावर विचार कर .. म्हणजे किती कमी करता येई ते बघ .. "
स्पृहा " आदी .. आपण चुकत तर नाही ना .. मला आई बाबांना मी फसवतेय अशी सारखी भीती वाटतेय "
आदी " मी डॅड ला घेऊन येऊ का उद्या ? आजच डॅड म्हणत होते कि मी भेटतो तिच्या पॅरेंटसला .. आणि डॅड नि मला प्रॉमिस केलंय कि तूच त्यांची सून होणार "
स्पृहा पटकन "नाही नको .. मला ना आता काहीच कळत नाहीये .. मी नक्की काय करू ?"
आदी " सांगू का ? आपण जे ठरवलंय तेच बरोबर आहे .. तुझा अभ्यास , तुझे करिअर याकडे दुर्लक्ष नको होयला .. आफ्टर ऑल आय वॉन्ट यु इन माय ऑफिस बिसाईड मी "
स्पृहा "आदी .. माझी आणि तुझी बरोबर होत नाही रे "
आदी "मी ना आता तुला ओरडणार आहे .. हे असले सारखे नको ना बोलू .. छान छान बोल .. आपल्या फ्युचर बद्दल बोल .. आपले लग्न झाले कि आपण कसा संसार करू त्याची स्वप्न बघ . आपल्या मुलां .. "
स्पृहा "आदी .. बाय " तो फारच पुढचं बोलतोय म्हंटल्यावर तिने पटकन फोनच कट केला .. पण त्याने बोललेलं वाक्य अजूनही कानात घुमत होते तिच्या .. आणि संपूर्ण शरीरात आनंदाची लहर उठवत होती ..
स्पृहाने हसतच लाजत अंगावर पांघरूण घेतले आणि आदींच्या स्वप्नात रंगली
दिल दीवाना बिन सजना के माने ना - २
ये पगला है समझा ने से समझे ना - २
धक धक बोले इत उत डोले बिन रैना
ये पगला है समझा ने से समझे ना - २

दर्द-ए-जुदाई क्या होता है तुम जानो मैं जानूं
ओ हो
दर्द-ए-जुदाई क्या होता है तुम जानो मैं जानूं
प्यार बुलाये दुनिया रोके किसका कहना मानूं
तुमसे मिले बिन दिल को कुछ भी सुझे ना
ये पगला है समझा ने से समझे ना - २

बन के लहू नस नस में मुहब्बत दौड़े और पुकारे
ओ हो ओ
बन के लहू नस नस में मुहब्बत दौड़े और पुकारे
प्यार में सब कुछ हार दिया पर हिम्मत कैसे हारे
कह दो दुनिया दिल का रस्ता रोके ना
ये पगला है समझा ने से समझे ना (२)

ओ हो ओ ...
दिल दीवाना बिन सजना के माने ना
ये पगला है समझा ने से समझे ना - २
दिल ये चाहे बना के आँचल तुझ को लपेटूँ तन से
गगन में

दुनिया माँगे अपनी मुरादें मैं तो माँगूँ साजन
ओ हो हो, ओ हो
दुनिया माँगे अपनी मुरादें मैं तो माँगूँ साजन
रहे सलामत मेरा सजना और असजना का आँगन
इस के सिवा दिल रब से कुछ भी न चाहे ना
ये पगला है ...
ओ हो ओ ...
(एकदा गाणे नक्की पहा .. आपला स्वीट आदी आणि त्याची स्वीटी स्पृहा कसे त्याचे स्वप्न बघतेय)

🎭 Series Post

View all