स्त्रीत्व भाग ३७

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ३७
क्रमश : भाग ३६

डॅड " ओके बेटा .. तुला पाहिजे तर मी भेटतो तिच्या पेरेंट्सला .. उद्याच जाऊ पाहिजे तर .. आय जस्ट वॉन्ट यु टू बी हैप्पी इन युअर लाईफ "
आदिराज " स्पृहा इज माय हैप्पीनेस "
डॅड " ओके .. ये आता बाहेर .. आपण डिनर करू .. मला अजून बऱ्याच गप्पा करायच्यात तुझ्याशी .. उद्याचे प्लांनिंग सांगायचंय "
आदिराज " ओके "
तोंडावर पाण्याचे हबके मारून आदी बाहेर आला .. डोळे लाल झाले होते ..
डॅडनी तो बाहेर आल्यावर त्याला एक मिठीच मारली " सॉरी माय सन .. तुझ्या डोळ्यांत तिच्यासाठी अश्रू आले .. म्हणजे तू किती डीप इन लव्ह आहेस मी समजू शकतो "
आदी पण लहान मुला सारखा डॅडच्या मिठीत रडला " डॅड .. सागर , नाहीतर कोणी अगदी कोणी पण कॉल करू दे .. यु शुड बिलिव्ह इन मी .. मी जेवढा तुमचा आहे तेवढाच मी मॉमचा पण आहे हे विसरू नका .. स्पृहाला मॉमला भेटवण्यासाठी मी तिला घरी बोलावलं होते .. तीला न बघता तुम्ही असे बोललात .. मला खूप हर्ट झाले मला .."
डॅड " सॉरी बोललो ना आता .. आता आज एक सांगतो आपल्या घरची सून कोण बनेल तर स्पृहाच बनेल .. इट्स डॅडस प्रॉमिस "
तेव्हा कुठे आदी साहेबांच्या चेहऱ्यावर हसू आले
डॅड " अगेन यु आर ब्लाशिंग "
आदी " आय एम हंग्री चला जेवूया " दोघेही हसत हसत गप्पा मारत जेवले.
------------------------------------------
रागिणी "चहा टाकते .. ये बाहेर ५ मिनिटात "
प्रसाद " ऐक ना .. आपल्या दोघांचा चहा घेऊन इकडेच येशील का ? आपल्या गॅलरीत बसून घेऊ .. मी तोपर्यंत फ्रेश होतो "
रागिणी " ठीक आहे " म्हणतच ती बाहेर निघून गेली .. दहा मिनिटांनी सासू सासर्यांना चहा बिस्कीट खायला देऊन ती त्या दोघांचा चहा , बिस्किट्स आणि फ्रिज मधून गार पाण्याची बॉटल घेऊन त्यांच्या बेडरूम मध्ये आली ..
प्रसाद आल्रेडी गॅलरीत असलेल्या खुर्ची मध्ये बसला होता .. तिच्या येण्याची चाहूल लागताच त्याने हातातून ट्रे घेतला आणि समोरच असलेल्या टी पॉय वर ठेवला .. आणि तिला कळायच्या आतच त्याने तिला मिठीत घेतले ..
रागिणी एकदम ऑकवर्ड झाली .. अंग चोरूनच उभी होती
रागिणी " हे असे बाहेर .. गॅलरीत .. कोणी बघेल ना "
प्रसाद " घर माझे .. बायको माझी ? मग काय प्रॉब्लेम आहे ?" आणि हसला पण त्याने तिला सोडले
रागिणी ने त्याला चहा दिला
प्रसाद " गॅलरी खूप छान सजवली आहेस तू .. मस्त रंगीबेरंगी फुलांनी सजली आहे .. इतकी फुलझाडे कधी आणलीस आणि लावलीस .. मला कळलं पण नाही .. इनफॅक्ट मी आज बऱ्याच दिवसांनी गॅलरीत आलोय "
रागिणी " तू घरी नसायचास .. आणि बँकेतून आल्यावर तर मी एकटीच घरी असायचे .. सुरुवातीला तुझे जेवण बनवून ठेवायचे पण ते अन्न वाया जाऊ लागले मग मॅगी ,पास्ता असे खाऊन माझे पोट भरून घ्यायचे .. पण तू का माझ्याशी असे वागतोय या विचाराने जीव हैराण होयचा .. मग या गँलरीत येऊन बसायचे .असलेली सगळी झाडे सुकली होती .. मग रोज एक नवीन रोपटे आणायची आणि लावायला सुरुवात केली .. हळू हळू भकास गॅलरी एकदम सुंदर झाली ..तो लॅम्प आहे ना तो .. सोलार वर चालतो .. खूप शोधून आणलाय मी .. आता संध्याकाळी काळोख पडला ना कि मस्त उजेड पडतो .. ते .. ते छोटे आर्टिफिशियल कारंजे बघितलेस .. किती छान वाटते ना त्याच्या कडे बघितले कि .. अखंड वाहणारे पाणी .. त्याचा येणारा बारीक खळखळ आवाज खऱ्या झऱ्याखाली बसल्या सारखं वाटते ..
प्रसाद ती काय बोलतेय ते तिला निरखून पहात ऐकत होता ..
रागिणी उत्साहाने " प्रसाद .. हे झाड बघितलेस .. हे ना .. मी खूप शोधून आणलंय .. तू त्याला हात लाव ना .. प्रसाद तिथून उठला आणि अलगद त्याने त्या झाडाला स्पर्श केला तसे त्या झाडाने स्वतःला मिटून घेतले.
प्रसाद " अरे वाह !! इट मॅजिक .. एकदम मिटून गेले हे तर "
रागिणी " खरंच मॅजिकल आहे ना .. त्याला टच मी नॉट असे म्हणतात .. आणि मराठीत लाजाळू "
प्रसाद " ओके .. भारी आहे "
रागिणी " हे बघितलेस .. लिली चे आहे .. सुंदर पवित्र फुल आहे .. तू त्याच स्मेल घे ना "
प्रसादने खाली वाकून त्याला हात न लावता त्याचा स्मेल घेतला " खरंच ग खूप छान स्मेल येतोय "
रागिणी "चल झाला का चहा घेऊन .. दे कप ठेवून येते "
रागिणी कप घेत होती तर त्याने तिचा हात पकडला .. आणि तिला त्याच्या मांडीवर बसवून घेतले
रागिणी " प्लिज प्रसाद .. नको ना .. मला नको वाटतंय .. आय नीड सम टाईम "
प्रसाद " माहितेय मला .. आणि मी काहीही करत नाहीये .. बस ना इथे फक्त शांत .. तू अशी दूर दूर गेलीस तर आपल्यातला दुरावा कसा संपेल? .. मला काही घाई नाहीये पण आपण निदान फ्रेंड्स किंवा फ्रेंड्स पेक्षा थोडे जास्त .. किंवा पार्टनर्स बनूया ना .. का तुला पण त्या झाडा सारखेच स्पर्श केलेला चालत नाही .. "
रागिणी उठायला जात होती तर त्याने त्या आराम खुर्चीत तो मागे सरकला तशी ती त्याच्या अंगावर पडली " काय करतोय प्रसाद ? "

प्रसादने तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवून घेतले .. आणि तिला दोन्ही हातांनी कव्हर केले " थोडासा विश्वास ठेवून बघ ना माझ्यावर .. मी नाही पुढे जाणार तुझ्या इच्छे शिवाय पण अशी थोडावेळ पडून राहा .. कदाचित माझ्या हृदयात होत असलेली हलचल जी कि तुझ्यासाठी आहे हे तुला जाणवेल . आज तू बोल मला फक्त ऐकायचंय .. तुझ्या मनात असलेला राग , द्वेष , दुःख सगळे बोलून टाक .. तुला बरं वाटेल "
त्याच्या बोलण्याचा रागिणीवर इतका असर पडत होता कि एकदम निपचित पडली होती त्याच्या छातीवर पडून राहिली .. दोन एक मिनिटे काहीच कोणच बोललं नाही .. पण तो तिच्या केसांतून हलका हलका मसाज करत होता .. त्याने तिला तिथून हटावं असे वाटलं नाही .. एखादं वेडं कोकरू आपल्या आईच्या कुशीत झोपावं तशी ती त्याच्या मिठीत होती .. मायेच्या , विश्वासाच्या .. पाच एक मिनिटे झाली असतील तर त्याला त्याचे शर्ट ओले झाले असे जाणवले .. डोळ्यांतून अश्रू बाहेर येत होते तिच्या ..
प्रसाद " सॉरी .. आय कॅन फील इट .. इट्स बिकॉज ऑफ मी "
रागिणी " मला भीती वाटतेय ?"
प्रसाद " कसली ?"
रागिणी " असे वाटतेय .. मी चुकतेय .. तुझ्यावर विश्वास ठेवून .. असे वाटतंय कि आजचा दिवस सम्पला कि हे नाटक संपून जाईल आणि पुन्हा तू पूर्वी होतास तसाच वागशील माझ्याशी .. मी इथुन निघून जावे म्हणून मला त्रास देशील "
प्रसाद " नाही असे नाही होणार आहे आता .. कारण आता तू मला पाहिजेस .. माझे प्रेम आहे तुझ्यावर .. मी सांगितले ना तुला ?"
रागिणी " हो पण .. तू .. तुझा काही अंदाज येत नाही मला .. माझ्या भावनांशी तू आल्रेडी खूप खेळला आहेस .. आता माझ्यात सहनशक्ती नाही राहिली " रागिणीच्या डोळ्यांतून अविरत पाणी येत होते
प्रसाद " प्लिज डोन्ट टेक स्ट्रेस .. म्हणून तर तुला मी म्हटले कि मी तुला किस करू का ? किस केल्याने स्ट्रेस लेव्हल कमी होते असे मी वाचलंय "
रागिणी " तू फक्त तुझ्या भावनांचा विचार करतोस ... तुला समोरच्याच्या फिलिग्स कळतच नाहीत "
प्रसाद " मग काय आहेत तुझ्या फीलिंग्स .. मला मारावेसे वाटतंय का तुला ? "
रागिणी ने त्याच्याकडे रागाने पाहिले
प्रसाद " मग काय ?"
रागिणी काहीच बोलली नाही
प्रसाद " तुला असे वाटतंय का ?मी जे काही सांगितले हे सगळे खोटं आहे .. आणि मी तुला फसवतोय .. मी ऑफिस मध्ये एक आणि घरी एक अशी चापलुसी करतोय "
पुन्हा तिने रागाने बघितले त्याच्याकडे
प्रसाद " मग काय आहे तुझ्या मनात ?"
रागिणी " मला माहित नाही "
प्रसाद " मग मी काय केल्यावर तुला माझ्यावर विश्वास बसेल ते सांग .. तुला पाहिजे तर लीझाला भेटवतो "
रागिणी " शांत बसशील का थोडावेळ ? मला काहीच सुचत नाहीये आत्ता "
प्रसाद " ठीक आहे " म्हणतच त्याने पुन्हा त्याची मिठी घट्ट केली आणि तिच्या केसांत माथ्यावर किस केले "
आता रागिणी त्याच्या त्या कुशीत सेट झाली होती .. तिथून उठूच नये असे वाटत होते तिला .. संध्याकाळचा मंद वारा .. सोलर लाईट मधून हलकासा पडलेला प्रकाश .. ,आजू बाजूला रंगीबेरंगी फुल डोलत होती आणि त्यांचा सुगंध पसरला होता .. डोळे मिटून दोघे फक्त एकमेकांना अनुभवत होती .. कदाचित स्पंदने एकमेकांशी बोलत होती .. वर चांदण्यांनी भरलेलं आभाळ आणि त्यात पूर्ण चंद्र त्याच्या समोर होता.
मेरा चाँद मुझे आया है नज़र
ए रात ज़रा थम थम के गुजर
छाया है नशा मेरी आँखो पर
ए रात ज़रा थम थम के गुजर
मेरा चाँद मुझे आया है नज़र

मेरे दिल में है अरमा कई कई
मेरी चाहत है अभी नयी नयी
रह जाये न प्यासा प्यार मेरा
मेरी बाहों में भर दे यार मेरा
इतना सा करम तू कर मुझ पर
ए रात ज़रा थम थम के गुजर
मेरा चाँद मुझे आया है नज़र

अभी लबों को लबों ने छुआ नहीं
अरमा कोई पूरा हुआ नहीं
अभी आस का गुलशन खिलना है
अभी दो जिस्मों को मिलना है
देखूगा अभी मैं वो मंजर
ए रात ज़रा थम थम के गुजर
मेरा चाँद मुझे आया है नज़र
आया है नज़र
https://www.youtube.com/watch?v=DeSa4z6rV9c&ab_channel=SaregamaMusic
(गाणे नक्की ऐका .. प्रसादच्या मनातल्या आत्ताच्या सगळ्या भावना आहेत )

🎭 Series Post

View all