स्त्रीत्व भाग ३५

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ३५
क्रमश : भाग ३४

सागरने नाही नाही म्हणता रात्री जेवण झाल्यावर घरी विषय काढलाच
सागर " बाबा मला जरा बोलायचे होते .. आई ये ना तू पण बाहेर ?"
आई " हो आलेच .. दोन मिनिट "
बाबा " हा बोल काय बोलायचंय आमच्या राजकुमाराला "
सागर " राजकुमार .. काहीपण " आणि हसला
बाबा " मग एकुलता एक आहेस आमचा ? "
सागर " हा तेर आहेच "
तेवढयात हात पुसत आई बाहेर येऊन बसली
सागर " आई बाबा मला तुमच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय "
आई " बोल ना बाळा ? काही प्रॉब्लेम आहे का ?"
सागर " नाही ग .. प्रॉब्लेम नाहीये .. पण कसे सांगू तेच कळत नाहीये मला "
बाबा " काय सुनबाई बघितलिस कि काय आमच्यासाठी ?"
आई " ती तर त्याने लहानपणीच बघितलीय " आणि दोघेही हसले
सागर " बाबा .. मला आणि निहारिकाला लग्न करायचेय "
आई बाबा दोघेही एकदम " अरे वाह !! डायरेक्ट लग्न .. मग तर मस्तच आहे कि .. मला पण जरा मैत्रीण भेटेल गप्पा मारायला "
सागर " बाबा .. म्हणजे तुम्हां दोघांना निहारिका सुन म्हणून पसंत आहे ना ?"
दोघेही " नक्कीच "
आई " हे बघ , तुझ्या आनंदापुढे काहीच नाहीये आम्हांला .. आणि लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ना तर तसे तुझे पाय कुठे वळतायत हे लहानपणीच कळले होते आम्हांला .. मी तयार आहे सासूबाई बनायला .. बोल कधी जायचं मागणी घालायला "
सागर एवढे आई बाबांनी ग्रीन सिग्नल दिला तरी काही खुश होई ना
सागर " ते निहारिकाला दिल्ली युनिव्हर्सिटीला PHD ला जायचंय .. तिकडून ती आल्यावर लग्न .. आणि जायच्या आधी एंगेजमेंट करून ठेवली असती "
------------------------------------------------
रागिणीने " सॉरी तू राग नको मानुस .. तू पण थोडा विचार कर ना ? आपले लाईफ अजून विस्कळीत आहे .. मी आज रोहनला त्या केस संदर्भात बोलायला गेले होते .. रोहनने मला सांगितले ते खूप भयानक आहे ..
प्रसाद " काय ? म्हणजे मला कळले नाही ?"
रागिणी " हे बघ .. तू ज्या बँक अकाऊंटला पैसे ट्रान्सफर करतोस ना त्याचे बँक स्टेटमेंट आणलेत मी "
प्रसाद " पण तो बँक अकाउंट नंबर तर दुसऱ्या बँकेचा आहे ?"
रागिणी " हो .. म्हणून तर मी बँकेत गेले ..
त्या बँकेत माझी मैत्रीण आहे .. मी बँकेत जाऊन तिला विनंती केली आणि मला खूप वर्ष झाले ती ओळखते म्हणून तिने मला त्याचे स्टेटमेंट्स पाठवले . (हे काल्पनिक आहे .. असे बहुदा ऑफिशिअली करू शकत नाही .. अन ऑफिशिअल होऊ शकते )
प्रसाद " अरे वा मग ?
रागिणी " तर तो अकाऊंट अब्दुल शेख नावाच्या व्यक्तीचा आहे .. आणि त्याच्या स्टेटमेन्टला दर महिन्याला जसे तू पैसे पाठवतोस तसे अजून ५ अकाउंट वरून पैसे ट्रान्सफर होतात "
प्रसाद " ब्लडी .. "
रागिणी " याचा अर्थ त्याने अजून अशा ५ लोकांना पण फसवले आहे "
प्रसाद " माय गॉड "
रागिणी " मी रोहनला विचारले तर रोहन म्हणाला इट्स अ केस ऑफ हनी ट्रॅप "
प्रसाद " हनी ट्रॅप म्हणजे ?"
रागिणी " म्हणजे स्त्रीचा उपयोग करून कोणती तरी कॉन्फिडेन्शिअल माहिती किंवा पैसे काढून घेण्यासाठी ब्लॅकमेल करायचे .. जसे तुला केले .. या केस मध्ये व्हाईट कॉलर वाले लोक आपली इज्जत वाचवण्यासाठी जास्त विचार न करता पैसे पाठवत राहतात .. "
प्रसाद " रास्कल !! मी पण एक्सकॅटली हाच विचार करून पैसे ट्रान्फर केले "
रागिणी " तुझी इन्फॉर्मेशन त्यांनी आधी काढली असणार.. तुझ्या अकाऊंटला पैसे पडून राहतात .. म्हणजे १ लाख तू आरामात देऊ शकतो हे त्यांना माहित असणार याचा अर्थ तुझ्यावर पाळत ठेवली असणार किंवा अजूनही पाळत असेल ..तुला एकदम केअरफूल वागले पाहिजे "
प्रसाद " आय डोन्ट नो .. मला पण असेच वाटतं कि मला कोणीतरी फॉलो करत असावे "
रागिणी " तू तुझी फिनान्शिअल स्टेटस कोणाला दाखवली किंवा सांगितली होतीस का ? "
प्रसाद " अभय सोडला तर मी कोणाशीच बोलत नाही .. पण लिझा माझी सिनिअर म्हणून असल्यामुळे एक दोनदा कॉफी घेण्यासाठी कॅफे मध्ये गेलो होतो .. "
रागिणी " पैसे कसे पे केले होतेस ?"
प्रसाद " क्रेडिट कार्ड ने "
रागिणी " इथेच गडबड आहे .. कार्ड बघून त्यांना तुझी क्रेडिट लिमिट कळते "
प्रसाद " असेलही .. म्हणजे तुला असे वाटते कि लिझा हि एक त्यांची एजंट आहे "
रागिणी " कादाचित .. असेलही.. किंवा नसेलही .. ती स्वतः तिचे असले फोटो तुला का पाठवेल ना ? मला जरा इथे गडबड वाटतेय ? म्हणजे बघ हा तिच्या केसमध्ये तू तिला ब्लॅकमेल करू शकतोस कि तुझे असले फोटो माझ्याकडे आहेत .. पण इथे केस वेगळी आहे ती तुला ब्लँकमेल करतेय .. शिवाय तिचे नाव लीझा आहे मग पैसे घेणारा अब्दुल कसा काय ? मग हे दोघे पार्टनर आहेत का ? किंवा अब्दुल तिला पण असाच ब्लॅकमेल करत असेल .. असे सगळे प्रश्न उभे राहतायत "
प्रसाद " खरं सांगू .. माझा गट फिलिंग मला सांगतेय कि लिझा अशी नाहीये .. तिला काय कमी आहे .. ती मला सिनिअर आहे .. माझ्या पेक्षा सॅलरी पॅकेज जास्त असेल तीच .. आणि डेटा म्हणशील तर माझ्या पेक्षा तिच्याकडे जास्त डेटा आहे .. त्यामुळे लिझाच्या बाबतीत दोन्ही केस मध्ये गडबड आहे "
हे दोघे आतमध्ये केस संदर्भात बोलू लागले ते जेवणाचे विसरून गेले .. आई बाहेरून
आई " रागिणी .. जेवून घ्या ग आधी मग गप्पा मारा .. "
तशी रागिणी पटकन बाहेर जायला निघाली " चल तू ये .. मी ताट वाढते "
प्रसाद " रागिणी .. माझ्या किस च काय ?"
रागिणी हसतच पटकन बाहेर निघून गेली
प्रसाद फ्रेश होऊन बाहेर आला .. दोघे डायनिंग टेबल वर जेवायला बसले .. आज त्यांच्या दोघांच्यात हळू आवाजात काही तरी बोलणे होत आहे .. थोडीशी रागिणी हसत आहे .. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आहे हे आई आणि बाबांच्या दोघांच्या नजरेत आले .. प्रसादही बऱ्याच दिवसांनी खुश दिसत होता ..
जेवण झाल्यावर
बाबा " रागिणी .. ते फ्रिज मध्ये आईसस्क्रिम आहे ते आणशील सगळ्यांना "
तसा प्रसाद पटकन उठला आणि आईसक्रिम फ्रिज मधून काढून मोकळा " ते बाउल्स दे "
रागिणीने पटकन चार बाउल्स काढून पुसून त्याला दिले .. त्याने भरले आणि तीने दोन बाउल्स घेतले त्याने दोन घेतले आणि दोघे बाहेर आले .. आई सोफ्यावर बसली होती त्याने आईच्या हातात बाउल दिला आणि बाबांच्या हातात दिला आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा पडला
बाबा " अरे आधी खाऊन घे नि मग झोप ना "
प्रसाद " रागिणी .. माझे फ्रिज मध्ये ठेव .. मी नंतर खाईन .. आता जरा झोपतो .. आई .. तुझं खाऊन झाले कि मसाज कर काय ?"
आई " मी भरवू का आईसक्रीम .. " तसे त्याने आईकडून भरवून पण घेतलेंन "
रागिणी मनात " किती लकी आहे ना प्रसाद .. आपल्या आईच्या मांडीवर असे डोकं ठेवून झोपायला किती छान वाटत असेल ना त्याला .. "
शेखर " झाले का काम तुझं ? सकाळी जरा टेन्शन मधे वाटलीस ?"
रागिणी " हा म्हणजे जे ठरवले ते झाले आज .. आता पुढच्या आठवड्यात मला जॉईन व्हावे लागले .. लग्नासाठी सुट्टी घेऊन २ महिने होतायत तर लगेच हि सुट्टी .. तशा माझ्या सुट्ट्या बऱ्याच पेंडिंग आहेत .. पण तरी कामाचा प्रॉब्लेम होतो "
उज्वला " हो ग बाई बरोबर आहे .. आणि आता मी बरी झालेय .. आता माझी काळजी करू नकोस बेटा "
ह्यांचे बोलणे होई पर्यंत प्रसाद लिटरली डाराडूर .. त्याच्या बारीक आवाजात घोरण्याचा आवाज ऐकल्यावर हे तिघे हसले ..
उज्वला " तसा घोरत नाही .. पण माझ्या मांडीवर झोपला ना कि लगेच घोरायला सुरुवात .. मग गाढ झोपतो "
रागिणी " आईच्या मांडीची उब कोणत्याच उशीला नाही येणार .. "
उज्वला " हमम .. उद्या तुझ्या केसांना मी तेल लावून देते काय .. खूपच ड्राय दिसतायत "
रागिणी " नाही नको आई .. तुम्ही आराम करा आता .. मी पार्लरला जाऊन येईल.. स्पा केला ना कि छान होतील "
उज्वला " एकदा माझ्या कडून मसाज तर बघ "
रागिणी " बरं .. ठीक आहे .. आई मी आत पडते जरावेळ .. मग चहाची वेळ झाली कि उठवा मला "
उज्वला " हो चालेल बेटा .. तू पण झोप फ्रेश वाटेल "
रागिणीने पण आतमध्ये येऊन बेड वर मस्त ताणून दिले..
जेव्हा जाग आली तेव्हा प्रसादच्या उबदार मिठीत होती .. हा कधी आत आला आणि तिला कुशीत घेऊन झोपला तिलाही नाही कळलं ..
रागिणी मनातच " झोपाळू .. .. लाडोबा .. मगाशी किती चिडला होता .. आणि आता झोपलाय तर किती निरागस दिसतोय .. नक्की कसा आहे हा? रागीट , तापट , का केअरिंग , का प्रेमळ ? काहीच अंदाज येत नाही .. पझेसिव्ह आहे हे मात्र नक्की "
त्याच्या चेहऱ्याकडे बघत रागिणी मनात विचार करत होती .. तो मनाने चांगला आहे ना म्हणूनच त्याला फसवलं .. एवढं झाले तरी लिझा बद्दल राग नाहीये त्याच्या मनात .. म्हणजे खरंच कदाचित ती पण प्रॉब्लेम मध्ये असू शकते असा विचार करतच तो उठली ..
देवा .. लवकरात लवकर या प्रकरणातून प्रसाद बाहेर पडू दे म्हणजे खऱ्या अर्थाने आमचा संसार सुरु होईल.-----------------------------------------------

🎭 Series Post

View all