स्त्रीत्व भाग ३३

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग ३३
क्रमश : भाग ३२
स्पृहा " चल आदी .. मला ४ वाजता कॉलेजला पोहचायचंय .. नाहीतर निहारिका आणि सागर जातील निघून "
आदी " हो ठीक आहे चल .. निघू "
आदीने तिला कारने कॉलेजला आणले .. दोघांनी नंबर्स एक्सचेंज केले .. अजूनही ती कार मधेच बसली होती ..
आदी " स्पृहा तुझ्या गालाला काय लागलंय ?"
स्पृहाने रुमालाने गाल पुसला .. " गेलं का ? "
आदी " नाही .. बघू दे रुमाल मी पुसतो "
स्पृहाने त्याच्या हातात रुमाल दिला ..
आदी " थोडी इकडे सरक ना .. गाल माझ्याकडे कर "
स्पृहाने एकदम पटकन गाल त्याच्या जवळ केला .. तर आदीने पटकन तिच्या गालावर किस केले ..
स्पृहाचे डोळे मोठे झाले .. आणि तोंड उघडे ते उघडेच राहिले दोन सेकंद.
आदी " गेला डाग "
स्पृहाने दोन्ही हात चेहऱ्यावर घेऊन चेहरा झाकला .. इतकी लाजत होती .. हात पाय थंड पडले तिचे
आदी " आर यु ऑल राईट ? "
स्पृहाने काहीच रिप्लाय दिला
आदी जरा टेन्शन मध्ये आला .. आता होऊन तर गेले होते त्याच्याकडून आणि त्याला तिला ह्या गोष्टीसाठी सॉरी नव्हते बोलायचे ..
स्पृहा " मी जाते .. " ती त्याच्याकडे न बघताच बोलली आणि कारचे दार उघडायचा प्रयत्न करू लागली . पण डोअर लॉक असल्याने तिला उघडता येत नव्हते
आदी " हेय .. रिलॅक्स .. इट्स ओके .. काही झाले नाहीये ... इकडे बघ ना माझ्याकडे ?"
स्पृहा " नको ना मला जायचंय "
आदी " हो पण .. तू रागावलीय का माझ्यावर ?"
स्पृहा " आदी .. तू ना .. काहीपण करतो .. असे करतात का ? "
आदी " मग कसे करतात .. हे मी काहीच केले नाही .. तिकडे ऑस्ट्रेलिया मध्ये तर खूप काही करतात "
स्पृहा " जा बाबा .. तू काहीपण बोलतोस माझ्याशी .. बाय "
आदी " बरं .. ऐक ना बाबा .. प्लिज मला कॉल कर .. दोन महिने तुला न पाहता नाही राहू शकणार मी .. प्लिज कॉल करशील ना "
स्पृहा " तू छान काम कर ऑफिसमध्ये .. मन लावून .. डॅडला प्राऊड फील झाले पाहिजे तुझ्यावर असे काम कर "
आदी " हो .. नक्की ..मी माझे १०० परसेंट देईन "
स्पृहा " आणि चीड चीड करू नकोस .. ठीक आहे "
आदी " नाही चिडणार .. चीड आली कि तुझे फोटो पाहीन .. मग माझा राग कुठच्या कुठे पळून जाईल .. स्पृहा असे वाटत .. तू बोलत रहा आणि मी ऐकत राहीन .. तुझा आवाज ऐकत रहावं असे वाटतं .. प्लिज कॉल करशील ना मला "
स्पृहा " मी कॉल करेन तुला .. बाय .. "
तर त्याने पुन्हा तिला जवळ घेतले आणि हळूच तिच्या कपाळावर किस केले .. " बायको आहेस तू माझी हे विसरू नकोस .. "
स्पृहा " बाय .. टेक केअर "
दोघांनी बाय केले आणि दोन महिन्यांसाठी वेगळे झाले .. आदी ती गेल्यावर कार मधेच बराच वेळ बसून राहिला होता .. तिथून जावेसे त्याला वाटतच नव्हते .. मधेच त्याच्या लक्षात आले कि तिचा रुमाल त्याच्याकडेच राहिलाय .. आदीने रुमालाचा स्मेल घेतला त्याच्या ओठांना लावला " लव यु स्पृहा "म्हणतच घरी गेला.
------------------------------------
रागिणी " मीटिंगचे कारण माझं पर्सनल आहे .. मी सांगेन तुला नंतर .. आधी तू सॉरी बोल यांना .. नाहीतर मी खरंच निघून जाईल तुझ्या आयुष्यातून "
रोहन " नो इट्स ओके .. रागिणी .. आय मिन मिसेस रागिणी .. आय डोन्ट नीड सॉरी "
रागिणी " रोहन .. सॉरी .. माझ्यामुळे तुम्हांला त्रास झाला .. एक्सट्रीमली सॉरी .. ते काल जरा आमचं भांडण झालेलं ना म्हणून तो मुद्दामून असे वागतोय .. अदरवाईज हि इज गुड मॅन .. आय थिंक "
प्रसाद " मिस्टर रोहन !! तुमचे काय काम होते ते मला माहित नाही .. पण बायको सांगतेय म्हणून सॉरी बोलतोय .. पण राग आहेच मला तुमच्यावर .. असे मॅरीड लेडीला कॅफे मध्ये भेटायला बोलवत जाऊ नका .. लोकांचे गैरसमज होतात "
रोहन " यस .. ऑफकोर्स .. मी निघतो बाय रा... मिसेस रागिणी "
अभयने त्याचा फोन त्याला परत दिला
तेवढ्यात मागून एक मुलगी आली ..
ती " सो यु आर अभय .. हाय एम त्रिवेणी .. अँड अफकोर्स यु आर रिजेक्टेड .. मी जे काही पाहिलंय आत्ता ते खूप भयंकर होते "
तसा अभय एकदम उठला आणि तिच्या मागे धावत गेला " मिस त्रिवेणी .. हॅलो मिस त्रिवेणी .. आय कॅन एक्सपेन .. प्लिज वेट "
आता त्या टेबल वर प्रसाद आणि रागिणी दोघेच होते .. रागिणीने कॉफीचे बिल टेबल वर ठेवले आणि ती उठून घरी जायला निघाली .. तर त्याने तिचा हात पकडला ..
प्रसाद " का ? माझ्या बरोबर कॉफी चांगली लागत नाही का ?"
रागिणी " प्रसाद .. शट अप "
प्रसाद " तुला काय पाहिजे ? डिवोर्स पाहिजे माझ्या पासून ? जा नाही देत ? आता तर अजिबात देणार नाही .. मला लेचापेचा समजू नकोस .. मी तिरसट आहे एक नंबरचा .. माझे प्रेम मिळवायला मी कोणत्याही थराला जाऊ शकतो .. तुझी आता सुटका नाही माझ्याकडून .. लक्षात ठेव .. हे असले कितीही वकील आणलेस ना तरी पुरून उरेल मी .. "तो अजूनही रागातच होता
रागिणी " यु आर इम्पॉसिबल "
प्रसाद " रागिणी खाली बस .. आत जास्त बकवास नाही करणार आहे मी .. " आणि तिला हाताला धरून त्याने पुन्हा सीट वर बसवले .. ती सीट त्याच्याकडे वळवली .. आणि तिच्या जवळ त्याची चेअर सरकवली आणि थोडा पुढे झुकून .. " माझे प्रेम आहे तुझ्यावर .. तुला मी सोडणार नाहीये .. तर असे बाहेर कोणाला भेटून मला भडकवू नकोस .. माझ्या हातून खून होईल हा सांगतो .. तू फक्त माझी आहेस .. सो गेट धिस इन युअर हेड .. ओके .. "
आणि तिचे हात जे त्याने हातात घेतले होते ते हात वर उचलून स्वतःच्या ओठांना अलगद लावले .. " मला भूक लागलीय .. मी काही खाल्ले नाही.. तर प्लिज ऑर्डर समथिंग "
रागिणीने वेटरला बोलवून व्हेज चीज सॅन्डविच आणि स्पेशल चहा ऑर्डर केला आणि ती उठू लागली तर त्याने पुन्हा हात पकडून ठेवला.
प्रसाद " बस ना इथे ? कुणीकडे जातेय ?" तो असे बोलत होता कि अत्ता काही झालेलेच नाहीये .. किंवा जे काही झाले त्या बद्दल काही दुःख नाहीये "
रागिणी " मला वॉशरूमला जायचंय ?"
प्रसाद " घरी गेल्यावर जा "
रागिणी " प्रसाद .. काय वेडेपणा आहे हा ?"
प्रसाद " लवकर ये .. आणि पर्स इथे ठवून जा "
रागिणी " मला पर्स पाहिजे बरोबर "
प्रसाद " प्लिज मला एकट्याला सोडून जाऊ नकोस .. आपण सॉर्ट आऊट करू ना आपले प्रॉब्लेम्स .. कशाला वकील .. तुला जेव्हा माझ्या पासून सुटका पाहिजे असेल तेव्हा सांग .. तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल .. हे असे वकील बिकील गरज नाही आपल्याला "
रागिणी " तू काहीही बरळतोय आज असे वाटत नाही का तुला ?"
प्रसाद " तूला दुसऱ्या कोणा बरोबर नाही बघू शकत मी .. तुम अगर मुझको को ना चाहो कोई बात नहीं .. तुम किसी और को चाहोगी तू मुश्किल होगी "
रागिणीला त्याचा ओव्हर पझेसिव्हनेस बघून मनातल्या मनात खूप छान वाटत होते .. आज त्याच्याही नकळत तो कितीदा तिला बोलला होता कि माझे तुझ्यावर प्रेम आहे .. तू माझी आहेस .. तिला जी इन्सिक्युरिटी होती ती आज एकदम गायबच झाली होती .. तो इतका चिडलाय तरी तो तिला आवडत होता .. त्याच्यातला माज तिला आवडत होता .. त्याच्यातला रांगडेपणा तिला आवडत होता .. त्याच्या मनात तिच्या बद्दल असलेला भाव तिला आवडत होता ..
रागिणी " मी पाच मिनिटात येते वॉशरूमला जाऊन "
प्रसाद " ठीक आहे .. "
रागिणी वॉशरूम मध्ये गेली .. आणि स्वतःला आरशात बघून एकदम हसू येत तिला .. तोंडावर पाण्याचे हबके मारून तोंड धुतले .. पण आनंदात डोळ्यांतून अश्रू ओघळलें .. आज सगळे जग जिंकले असे वाटत होते तिला .. आरशात बघून म्हणाली " आय लव्ह यु प्रसाद "
तेवढयात तिचा मोबाइल ब्लिंक झाला .. प्रसादच मेसेज आला होता " आय लव्ह यु .. लवकर ये बाहेर .. मला एकट्याला बसवत नाहीये इथे .. दोन मिनिटात ये नाहीतर मी वॉशरूम मध्ये आत येईन "
रागिणीने हसतच कपाळावर हात मारून घेतला ..
पटकन चेहरा पुसला .. थोडासा टच अप केला .. केस कोंब केले .. थोडासा परफ्युम मारला .. आज तिने लॉन्ग स्कर्ट आणि त्यावर फ्लोरल टॉप घातला होता .. केस वन साईडेड घेतले होते त्यात तिची रेड स्लिंग बॅग .. आणि हातात मोबाईल .. उंची बऱ्यापैकी होती त्यामुळे हिल्सची हौस नव्हती .. पण थोड्या ब्लक हाय हिल्स नाजूक पायाला शोभून दिसत होत्या .. रागिणी वॉशरूम मधून बाहेर आली तर प्रसाद वॉशरूमच्या बाहेर उभा होता आणि ती जशी बाहेर आली तशी त्याने हात पुढे केला .. ति चालतच पुढे आली आपोआप त्याच्या हातात एक हात दिला .. त्याने तिला स्वतःकडे ओढले तर ती एकदम त्याच्या छातीवर आदळली ..
गूंजी सी है सारी फ़िज़ा जैसे बजती हो शहनाइयाँ
लहराती है है मेह्की हवा गुनगुनाती है तन्हाईयाँ
सब गाते है सब ही मदहोश है
हम तुम क्यों खामोश है
साज़-ऐ-दिल छेडो ना
चुप हो क्यों गाओ ना
आओ ना… आओ ना… आओ ना… आओ ना…

तन मन में क्यों ऐसे बेहती हुई
ठंडी सी एक आग है
हो सासों में है कैसी ये रागिनी
धड़कन में क्या राग है
ये हुआ क्या हमे हम को समझाओ ना (२)
सब गाते है सब ही मदहोश है
हम तुम क्यों खामोश है
दिल में जो बातें है
होठों पे लाओ ना
आओ ना… आओ ना… आओ ना… आओ ना…

अब कोई दूरी ना उलझन कोई
बस एक इकरार है
अब ना कहीं हम ना तुम हो कहीं
बस प्यार ही प्यार है
सुन सको धड़कने इतने पास आओ ना (२)
सब गाते है सब ही मदहोश है
हम तुम क्यों खामोश है
अब मेरे सपनो पे तुम ही तुम छाओ ना
आओ ना… आओ ना… आओ ना… आओ ना…

गूंजी सी है सारी फ़िज़ा जैसे बजती हो शहनाइयाँ
हे लहराती है है मेह्की हवा गुनगुनाती है तन्हाईयाँ
सब गाते है सब ही मदहोश है
हम तुम क्यों खामोश है
साज़-ऐ-दिल छेडो ना
चुप हो क्यों गाओ ना
आओ ना… आओ ना… आओ ना… आओ ना…

🎭 Series Post

View all