स्त्रीत्व भाग ३०

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ३०
क्रमश: भाग २९
सुनील आज जरा रिलॅक्स होता .. नेट वर बघत होता अष्टविनायक चे स्टे कुणीकडे करायचे वगैरे प्लॅन करत बसला होता .. तेजू सर्व किचन आवरून .. मस्त शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट असा नाईट ड्रेस घालून आली .. हातात तिचे बुक आणि डोळ्यांवर चष्मा लावून वाचत आली आणि सुनीलच्या मांडीवर बसून बुक वाचू लागली .. सुनीलला आज ती जरा खरोखरच नॉर्मल वाटत होती .. बऱ्याच दिवसांनी ती आज पूर्वी सारखी घरात वावरत होती .. नाहीतर मनाने इतकी खचली होती कि प्रत्येक गोष्टीसाठी मागे लागावे लागत होते ..
सुनील तिच्या डोक्याच्या अडून वळून लॅपटॉपची बटणे प्रेस करत काम करत बसला .. पण मनातून खूप हसत होता .. आंतरिक समाधान मिळाले होते त्याला .. पूर्वी नेहमीच ती रात्री अशी त्याच्या मांडीवर बसायची ..त्याच्या अंगावर झोपायची .. त्याचे काम असले कि तो रात्री तिला मांडीवर घेऊन काम करायचा .. आणि हा असा योग जवळ जवळ १ वर्षांनी आला होता ..
सुनीलने लॅपटॉप बंद केला .. तिला घट्ट मिठीत घेतले.. एक साईडला कपाळावर किस केले .. " जानु .. किती दिवसांनी अशी बसलीस ?"
तेजू " थांब ना इंटरेस्टिंग पॉईंट वर आलीय स्टोरी "
सुनीलने तिचा चष्मा काढला " आधी बघ माझ्याकडे "
तेजू " नको ना सुनील .. दे ना चष्मा "
सुनील " तेजू ..आय लव्ह यु "
तसे तेजू चष्म्याचे विसरली ..
तेजू "आय लव्ह यु टू डार्लिंग .. "आणि तिने त्याच्या इकडच्या गालावर तिकडच्या गालावर किशी दिली
सुनील " गोळ्या घेतल्यास ?"
तेजू " नाही .. नको ना आज .. कंटाळा आलाय मला मेडिसिन्सचा ?"
सुनील " अजिबात नाही चालणार .. आधी गोळ्या घे .. मी दूध आणतो गरम करून .. "
तेजू " सुनील .. थोडीशी कॉफी टाक ना दुधात "
सुनील " आर यु मॅड .. यु शुड स्लिप नाऊ .. नो कॉफी .. मी मस्त हळद घालून आणतो ..चालेल ?"
तेजू " ठीक आहे "
सुनील " गोळ्या घे पटकन "
तेजुने गोळ्या घेतल्या .. दूध प्यायली ..आणि सुनीलच्या कुशीत मस्त झोपून गेली.
-----------------------------------
मोहिनीने त्या झोपलेल्या मुलीला खांद्यावर टाकून रुक्मिणीच्या घरी आणले .. रुक्मिणी नुकतीच घरी आली होती
मोहिनी " आजे .. हि बघ कोण आलीय ?"
रुक्मिणी " कोण ग पावनी ?"
मोहिनी " आजे .. तू सारखी म्हणते ना .. मला कोण नाही .. मला कोण नाही .. घे हि आज पासून तुझी नातं "
रुक्मिणी " आग पण हाय कोन हि "
मोहिनीने आजीला सगळं किस्सा सांगितला .. आजीचे पण डोळे पाणावले .. डोळ्याला पदर लावत बोलली
रुक्मिणी " मी आज हाय तर उद्या न्हाय .. पोर लहान हाय .. "
मोहिनी " आजे .. तू फक्त पोरीला खायला कर आणि तिच्या बरोबर थांब.. मी पैसे देईल. आजे .. या पोरीकडे बघ .. किती लहान आहे .. कोण ठेवील तिला सांग बरं .. पोरीला माहित पण न्हाय काय वाईट जीवन जगायचयं तिला मोठं झाल्यावर "
रुक्मिणी " चाललं .. तू नको काळजी करुस .. आपण दोघी सांभाळू लेकराला "
मोहिनी " आजे .. तशीही आता तुला कामं होत नाही .. तू आता ट्रेन मध्ये जायचं काम बंदच कर .. मी नसले कि पोरीकडे बघायला कोणतरी पाहिजेच ना .. तू हिच्याकडे बघ .. पोर थोडी मोठी झाली कि तिला बसविन दुकानात "
रुक्मिणी " चाललं ग चाललं "
तेवढ्यात झोपलेली पोरगी उठली .. आजूबाजूला आपल्या ओळखीचं कोणच नाही म्हटल्यावर पुन्हा रडायला लागली .. त्या पोरीच्या डोळयांत दुःख होते .. " आई .. आई " असे ती बोलत होती .. हे बघून मोहिनीला मात्र पाझर फुटला होता ..
मोहिनी " गप पोरी गप .. आता हि तुझी आजी .. अन मी तुझी आई " आणि मोहिनीने तिला पुन्हा तिला जवळ घेतले..
---------------------------------------------
रागिणी किचन मध्ये जे गेली ते फ़टाफ़ट कामं उरकत होती .. सर्वांचा नाश्ता बनवला , पोळी भाजी बनवली .. सासूबाईंना उठवून त्यांना अंघोळ घातली .. त्यांना चहा नाश्ता दिला .. सकाळच्या गोळ्या दिल्या .. थोडे कोवळ्या उन्हात चालायला नेले .. आणि पुन्हा आराम करायला लावले ..
बाबा तिची सगळी धावपळ बघत होते .. आणि आपलाच पोरगा अजून झोपलाय ह्याचा त्यांना राग येत होता ..
शेखर " रागिणी .. जरा तू पण आराम कर "
रागिणी " बाबा .. आज मला बाहेर थोडे काम आहे .. मी लगेच निघते आणि १२ पर्यंत येते .. मला जर उशीर झाला तर वरण भाताचा कुकर मी काढून ठेवलाय .. धुवून ठेवढा लावा "
शेखर " ठीक आहे .. प्रसाद बरोबर नाही येत आहे का ?"
रागिणी " नाही ते रात्री उशीर पर्यंत काम करत होते ना .. झोपू दे त्यांना .. मी निघते "
रागिणीची एक मैत्रीण वकील होती तिला फोन करायचा होता रागिणीला .. शिवाय बँकेत जाऊन रजा वाढवून घ्यायची होती .. शिवाय प्रसाद ज्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर करतो त्याचे बँक स्टेटमेंट बघायचे होते अशा दोन तीन कामाचा विचार करून रागिणी घरातून बाहेर पडली ..
प्रसाद झोपेतून उठला .. आंघोळ करून बाहेर आला. रागिणी त्याला दिसली नाही तर त्याला नुसती बेचैनी आली होती ..
प्रसाद " बाबा .. रागिणी कुणीकडे गेलीय ?"
शेखर " चहात दूध टाकून घ्यायला सांगितलंय तुला तिने .. आणि पोहे ओव्हन मध्ये गरम करून खा असा निरोप आहे तिचा .. चहा मला पण दे थोडासा "
प्रसाद " बाबा .. रागिणी कुणीकडे गेलीय ? सामान आणायला गेली का ?"
शेखर " काही बोलली नाही मला .. फक्त काही काम आहे म्हणून जाते असे बोलली "
ती तिथे नव्हती त्याच्या डोळ्यांसमोर तर नुसती चीड चीड होत होती त्याची ..
--------------------------------------
स्पृहा फोटोला बघून नमस्कार करताना मनात " मॉम .. आज आदी मला तुमचं किचन माझ्या हातात द्यायला बघतोय .. त्याची ईच्छा म्हणून मी आज किचन मध्ये जाणार आहे .. मला आशीर्वाद दया .. आदीने बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद दया .. "
आदी मनात " मॉम .. स्पृहा किती तुझ्या सारखी आहे .. किती सुंदर दिसतेय ..मॉम .. तुला आवडली ना तुझी सून .. मॉम आय लव्ह हर "
तेवढ्यात आदीला त्याच्या डॅडचा फोन आला
आदीने फोन रिसिव्ह केला
डॅड " आदी कुणीकडे आहेस ?"
आदी " डॅड ?.. प्लिज डोन्ट कीप आय ऑन मी .. आणि प्लिज ते बॉडीगार्ड नका लावू माझ्या मागे "
डॅड " घरी त्या मुलीला घेऊन पुन्हा आलायस ना ?"
आदी " हमम "
डॅड " ती चांगली मुलगी आहे .. घाई करू नकोस प्लिज .. आय एम सॉरी बट धिस इज इंडिया इव्हन डोन्ट थिंक अबाउट अ किस "
आदी " डॅड .. व्हॉट आर यु सेयिंग ? प्लिज डॅड .. लेट मी हॅन्डल माय थिंग्स इन माय वे " आणि त्याने रागाने फोन कट केला .
स्पृहा तोपर्यंत किचन मध्ये गेली .. फ्रिज मध्ये सिमला मिरची होती .. ती चिरायला घेतली .. पोळीचे कणिक मळून झालेच होते तिचे .. डाळ आणि तांदूळ सापडले होते पण कुकर नाही दिसला.. ती ट्रॉली मध्ये कुकर शोधत होती तर हा आला किचन मध्ये
आदी " मी एक सेल्फी घेऊ का तुझ्या बरोबर ?"
स्पृहा " थांब ना आदी .. तू आता जा बाहेर .. तू तुझे काम कर .. जेवण झाले कि मी बोलावेन तुला "
आदी " मी काही मदत करू ?"
स्पृहा " नको .. तू बाहेर थांब "
आदी " का मी इथे थांबलो तर नाही चालणार का तुला ? तू काम कर .. मी गप्पा मारतो तुझ्याशी .. तेवढच मला बघता येईल तुला " आणि गोड हसला. तिला लाज वाटत होती हे ऐकताना पण तिचं लक्ष नाहीये असे दाखवण्याचा खटाटोप करत होती
तेवढ्यात तिला कुकर सापडला .. आणि तिने लगेच डाळ भात पण लावून टाकला .. आणि भाजी चिरायला बसली
आदी " मला तुला सांगायचंय काही .. काम करताना ऐकशील का ?"
स्पृहा " हो ऐकेंन कि "
आदी " माझी मॉम मी १० वि ला असताना गेली .. डॅड बिझनेस मध्ये बिझी असायचे आणि त्यांना माझ्याकडे बघायला वेळ नसायचा शिवाय त्यांच्या आऊट ऑफ सिटी मिटींग्स असायच्या .. मॉम गेल्या नंतर डॅड नि स्वतःला कामात झोकून दिले .. पण माझ्याकडे त्यांचे खूप दुर्लक्ष होत होते .. मी घरात एकटाच असायचो .. मेड्स असायचे दिवसभर पण अचानक आईच्या जाण्याने घर खायला उठायचे .. खूप चिडचिडा हट्टी होत चाललो होतो.
शेवटी माझी आत्या जी ऑस्ट्रेलिया असते ती मला तिच्या बरोबर घेऊन गेली .. माझे पुढचं शिक्षण तिकडेच ऑस्ट्रलियाला झाले .. मी तिकडे इंजिनिअरिंग प्लस मॅनेजमेंट केलं .. इकडे आल्यावर डॅड मला डायरेक्ट MD म्हणून लाँच करणार होते पण झाले असे कि मला इंडियात लोक काय बोलतायत काहीच कळायचं नाही .. डॅड खूप नर्वस झाले .. म्हणाले कि तू आता इथल्या कंपनी सांभाळायच्या लेव्हलचा नाहीयेस .. म्हणून मग डॅड नि मला इकडच्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊन दिले .. जस्ट इकडची सगळी सिस्टीम , लोक कळायला .. आधी मला बोअर होत होते पण जेव्हा कॉलेजला आलो ना तेव्हा मज्जा यायला लागली .. अभ्यास तर माझा आधीच झाला होता .. इथे येऊन फक्त टाईमपासच करायचा होता .. आणि इथल्या एक्साम आरामात क्लिअर करू शकेन मला माहिती होते .. त्यामुळे पैसे , पॉवर वर खूप मस्ती केली .. मुलांची मेन्टॅलिटी , मुलींची मेन्टॅलिटी या सगळ्या गोष्टी मी खरतर शिकत होतो .. बोलायची स्टाईल , वागायची स्टाईल मुद्दामून जवळून बघत होतो ..
स्पृहा एक मिनिट बघतच बसली त्याच्याकडे .. म्हणजे तू स्टुडन्ट नाहीयेस ? "
आदी " परीक्षा देणार आहे मी .. पण मला त्याची गरज नाहीये "
स्पृहाचे तोंडच पडले हे ऐकून
आदी " तुला हे सगळे माहित असणे गरजेचे आहे म्हणून सांगितले . प्लिज कोणाला सांगू नकोस .. फक्त डॅड आणि मी आमचे दोघांचे सिक्रेट आहे ते .. शिवाय ते दोघे राजीव आणि सुजय माझे मित्र नाहीयेत .. ते माझे बॉडीगार्ड आहेत .. मला कोणी काही करू नये म्हणून "

🎭 Series Post

View all