स्त्रीत्व भाग २५

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग २५

क्रमश: भाग २४
तेजूने घड्याळात बघितले तर अडीच वाजले होते .. लगेचच निघायला लागणार होते म्हणून तिने पटकन जीन्स घातली फुल स्लीव्हजचा टॉप घातला .. केस विंचरले .. तेवढ्यात सासूबाई तिच्या रूम मध्ये आल्या
सासूबाई " अगो तेजू निघालीस का ? कुणीकडे ?"
तेजू " हो आई .. ते जरा काम आहे माझे एक तासांत परत येईन "
सासूबाई " अग ते नलू मावशीच्या नातवाचा वाढदिवस आहे तर आपल्या दोघींना बोलावलं आहे .. तू येशील का डायरेक्ट तिकडे ?"
तेजू " जर सुनील येणार असेल तरच मी येईन .. नाहीतर मी घरी येईन आणि आराम करेन "
सासूबाई " ठीक आहे .. तुला जसे वाटेल तसे ठरव .. मी थोड्या वेळाने रिक्षेने जाईन "
तेजू " ठीक चालेल .. तुम्ही सावकाश जा .. आणि पोहचला कि मला फोन करा .. "
सासूबाई \" तू पण जास्त दगदग करू नकोस ?"
तेजू " हो ठीक आहे "
तेजू पण ऑटो ने ठरल्या प्रमाणे डॉक्टरकडे गेली
--------------------------------------------------------------------
मोहिनीच्या लक्षांत आले कि स्टेशन वर लोक टाईमपास म्हणून पुस्तके खरेदी करतात .. मोहिनी ने रिस्क घेऊन तिच्याकडे साठलेले पैसे सगळे या बिझनेस मध्ये घालायचे ठरवले .. प्लॅटफार्म वरच एक गाळा भाड्याने घेतला .. मग वेगवेगळी मॅगझिन्स , न्युज पेपर , आणि छान पुस्तके दुकानात ठेवू लागली .. अशीच एक गरजू बाई होती तिला दुकानात काउंटर वर बसवायची .. आणि स्वतः हिशोब करायची .. शिवाय बाकीच्या बायका होत्याच ज्या आर्टिफिशीयल दागिने विकायच्या .. त्याचाही हिशोब तिला ठेवायचा असायचा .. या सगळ्या भानगडीत तिचे काम खूप वाढले होते .. त्यामुळे ती पण आजी बाई कडे तीन दिवसात फिरकली नव्हती ..
स्वतःच्या शरीराकडे बघितल्यावर लोकांना आपली किळस वाटते .. काही काहींना भीती वाटते , या सगळ्यांतून मोहिनी बाहेर आली होती .. गरजू बायकांना काम करायला प्रवृत्त करून स्वावलंबी बनवत होती .. शिवाय पोलिसांना सांगून प्रोटेक्शन पण मिळवून द्यायची .. तशी ती स्वतःला मुलगी म्हणत असली तरीही पुरुषा सारखी आडदांड होती त्यामुळे तिला बघूनच चार हात लांब पळायचे लोक ..
रात्री चा स्टॉल मात्र बंद ठेवायची .. तरी रात्री हिशोब होई पर्यंत १० वाजायचे .. मग असेच बाहेर पाहिजे ते खायचे आणि घरी जाऊन झोपून जायचे असा तिचा दिनक्रम होता ..

आज पुन्हा ती आजी बाई का तीन दिवस आली नाही हे बघायला तिच्या खोपड्यावर आली ..
मोहिनी " आजे !! काय ग .. मेलीस कि काय ? "
रुक्मिणी " आलीस व्हय !! .. "
मोहिनी " काय होतंय नक्की तुला ? का अशी कामातून मन काढून घेतलंस ? मेले काम नाही केलेस तर खाशील काय ? काय भीक मागायला लागलीस कि काय ?"
रुक्मिणी " न्ह्याय ग .. नको वाटतंया सगळं "
मोहिनी " अग पण आहे असे कसे चाललं .. आपल्या माग पुढं हाय का कोनी .. काम करू तवा जेवू .. हाय कि न्हाई "
रुक्मिणी " व्हय ग .. व्हय .. उद्या पासन लागते कामाला .. हि बघ औषध आणिली म्या सरकारी दवाखान्यातुन "
मोहिनी " आजे फलाटावर स्टॉल टाकला आता .. तिथं बसून पुस्तकं विकायची .. लई माल खपतंय .. "
रुक्मिणी " लै भारी च कि मग "
मोहिनी " आजे .. तुला जो प्रश्न पडला होता ना .. त्याचं उत्तर घेऊन आलेय मी "
रुक्मिणी " कसला ग "
मोहिनी " तेच ग ते .. मेल्यावर लोकांना कळणार कसं ?"
रुक्मिणी " काय ते सांग कि मग पटदिशी "
मोहिनी " ते NGO वाले असतात त्यांना फॉर्म भरून द्यायचा .. मेल्यावर .. आपले अवयव दान करेन .. मग तेच लोक येतात .. आणि बघून जातात म्हातारी मरायला आली का जिवंत हाय .. आणि मग .. तुझे अवयव पण दुसऱ्याला लावतील .. आणि तुझा अंतिम संस्कार पण करतील "
रुक्मिणी " न्हाय न्हाय .. हे असले काय बी नाय करणार मी .. कापून माझे अवयव काढून टाकले तर स्वर्गात काय म्या अपहीच का ?"
मोहिनी हसायलाच लागली
मोहिनी " आजे .. स्वर्गात नवीन शरीर मिळत .. एकदम सुंदर .. ते काय जुनं शरीर नसत काय ?"
रुक्मिणी " तरीपण .. ग "
मोहिनी "चल आहे वाढ कि जेवायला .. १० वाजले .. अजून जेवली न्हाईस ना ?"
रुक्मिणी " काय करावं च नाय वाटत मला "
मोहिनी " हमम .. तुला ना रोज पार्ट्या करायला पाहिजेत .. चल घे आणलंय पार्सल .. दोघींना घे वाढून "
मग दोघी पुन्हा एकत्र जेवल्या .
---------------------------------------------
रागिणी एक मिनिट स्तब्धच बसली .. जे काय तिने ऐकले होते ते थोडेसे धक्का दायक होते ..
प्रसाद " तुझा नसेल माझ्यावर विश्वास तर मग राहू दे .. तू तुझा निर्णय घे .. "
रागिणी " मला एक कळत नाही .. तू लगेच पोलिसांकडे का गेला नाहीस ?"
प्रसाद " अग .. बाई .. आधीच मी किती टेन्शन मध्ये होतो .. शिवाय ते लगेच पोलिसांकडे जाणे योग्य नाही .. नक्की माझ्या बरोबर काय झालंय ? कोणी केलंय हे तरी कळले पाहिजे होते .. शिवाय तेव्हा लग्नाची तारीख जवळ आली होती .."
रागिणी "हम्म्म .... ठीक आहे .. आपण आता जाऊ "
प्रसाद " मला असे वाटतं कि मी माझी बाजू तुला सांगण्यासाठी हे प्रकरण तुला सांगितल .. तू या मध्ये अजिबात लक्ष घालू नकोस .. तूला मी आधीच सांगतोय .. मी माझ्या लेव्हल वर सोडवेन ते "
रागिणी " ठीक आहे . जशी तुझी ईच्छा "
प्रसाद " तू थांबायला तयार आहेस ना ?"
रागिणी " आता या पेपर वर सही तर केलीच ना .. "
तसे त्याने तो पेपर तिच्यासमोर टर्टर फाडून टाकले ..
प्रसाद " तू फ्री आहेस .. मी मुद्दामून तुझी सही घेतली होती पण आता मला असे वाटतंय कि तूला उगाच अडकवू नाही शकत .. इट्स रिस्की .. मी तुझी लाईफ रिस्क मध्ये नाही टाकू शकत "
रागिणी " ठीक आहे मग आपला डिवोर्स करून घायचा का ?"
प्रसाद " मी डिवोर्सचं कुठे काय बोललो "
रागिणी " मग काय नक्की म्हणणं काय आहे तुझे प्रसाद .. तू मला कन्फ्युज करतोय ?"
प्रसाद " मी म्हणतोय .. तू तुझा निर्णय घ्यावास "
रागिणीने कॉफी चे पैसे टेबल वर ठेवले .. आणि उठली " ठीक आहे .. बाय .. मी निघते .. थँक्स फॉर द कॉफी "
प्रसाद " सॉरी .. आय मिन सॉरी इज स्मॉल वर्ड .. तू खूप केलंय माझ्या साठी .. घरासाठी .. आणि मी त्रासा व्यतिरिक्त काहीच दिले नाही तुला "
रागिणी " इट्स ऑल राईट ... टेक केअर "
रागिणीने त्याला अजिबात दाखवले नाही कि तिला किती वाईट वाटतंय .. किती मोठ्याने रडावेसे वाटतंय ? शांतपणे तिथून उठली आणि चालायला सुरुवात केली
प्रसादच्या हृदयाचा ठोका चुकला होता .. रागिणी जस जशी दूर जातेय तस तशी त्याच्या शरीरातून कोणीतरी प्राण काढून घेतंय असे काहीसे त्याला वाटतं होते
ती पाच पावलं चालली असेल .. आणि त्याने जो एरिया त्याच्यासाठी घेतला होता त्याच्या बाहेर ती आता पाय टाकणारच होती तर प्रसाद ने मागून येऊन तिचा हात पकडला
प्रसाद " प्लिज डोन्ट लिव्ह मी .. आय नीड यु .. प्लिज डोन्ट गो "
रागिणी रागातच रडतच त्याचा हात झिडकारत होती ..
प्रसाद " प्लिज ना .. प्लिज .. आय नीड यु .. यु आर द ओन्ली होप ऑफ माय लाईफ .. तू माझ्या बरोबर असलीस तर मी संकटांचा एव्हरेस्ट पार करेन.. प्लिज डोन्ट लिव्ह मी .. म्हणतच तिच्या पायापूढे हात जोडून तिच्या चेहऱ्याकडे पाहत बोलत होता ..
रागिणी ला नक्की काय आणि कसे वागावे काहीच कळत नव्हते मनातच म्हणत होती " का एवढा कन्फ्युज करतोय .. ?"
प्रसाद एकदम कोलॅप्स झाला होता ..
रागिणी " प्रसाद .. तू मला वेड लावशील अशाने .. ना तू मला स्वीकारत आहेस ना मला जाऊन देत आहेस .. तुला नको असताना मी तुझ्या लाईफ मध्ये नाही घुसू शकत ."
प्रसाद " तुला मी आहे तसा चालेल का ? मी जरा तिरसट आहे .. मी खरा असा नाहीये .. मी मेंटल प्रेशर मध्ये आहे .. मी सांगू नाही शकत तुला ? इतका घाणेरडा आरोप माझ्यावर आलाय .. माझी जगायची इच्छाच मरून गेलीय .. तू गेलीस ना तर मी जिवंतपणे मरून जाईल .. तुला माझ्यावर विश्वास आहे ना .. कि मी असले काही कधीच करू नाही शकणार .. आई बाबांचा एकुलता एक मुलगा आहे मी .. हा असला आरोप माझ्यावर लागलाय हे सहन नाही होणार दोघांना .. मीच किती डिस्टरब आहे माझे मला माहित .. तू थांबशील का प्लिज .. मला हवीय तू .. तू प्लिज नको ना जाऊस "
रागिणी " मला बायकोचा दर्जा देऊ शकशील का तू ?"
प्रसाद " मी आता तुला जवळ घेण्याच्या मनस्थितीत नाहीये .. मला नको वाटतंय हे सगळं "
रागिणी " फक्त तेवढंच असते का नवरा बायको मध्ये ? बायकोचा दर्जा म्हणजे तुझे बाबा तुझ्या आईला कसे वागवतात तसे तू मला वागवशील .. मी .. लहान पणा पासून एकटी आहे .. आई बाबा गेल्या नंतर आर्थिक प्रॉब्लेम कधीच नाही आला मला .. कारण बाबांनी तशी तजवीज केली होती .. काका त्यांच्या घरी घेऊन गेला पण काकू आई नाही बनू शकली .. तिच्या सावत्र पणाला कंटाळून मी स्वतः हॉस्टेल लाईफ स्विकारले .. तुझे आई बाबा मला बघायला आले तेव्हा असे वाटले देवाने मला माझे आई बाबा माझ्या साठी परत पाठवले .. तुझ्याशी लग्न होणार म्हणून मी इतकी खुश होते पण .. (रडतच ) तू .. तू मला कामवाली बाईचा दर्जा दिलास.. ( मोठा हुंदका )त्या पेक्षा एकटीने जगलेल बरं .. नको वाटतंय मला सगळे .. मी पण माणूस आहे .. मला पण भावना आहेस .. आय अल्सो नीड सपोर्ट , केअर .. वर्ड ऑफ ऍप्रिसिएशन .. म्हटलं आता हसत खेळत आयुष्य जाईल तर तुझ्या अशा विचित्र वागण्याने माझी जगायची इच्छा गेलीय आता "
(खूपच गडबडीचा विकएन्ड होता हा .. त्यामुळे कमेंट ला प्रॉपर रिप्लाय द्यायला नाही मिळत आहे .. थोडे सांभाळून घ्या .. काल तर लॅपटॉप ऑन करायलाही वेळ नाही मिळला)

🎭 Series Post

View all