स्त्रीत्व भाग २४

In Today's Part Prasad Tells His Past
स्त्रीत्व भाग २४

क्रमश: भाग २३
प्रसाद " पास्ट पेक्षा प्रेसेंट मध्ये आहे त्यामुळेच तर आपला संसार टांगणीला लागलाय .. तू सफर करतेय .. मी सफर करतोय अन नेसेसरी "
रागिणी ने न बोलता पेपर वर सही केली " बोल आता "
प्रसाद " ४ महिन्यांपूर्वी कोल्हापूरला क्लाएंट मिटिंग होती .. कोल्हापूर आपल्या गावापासून फक्त १००कमी आहे .. म्हणून मी शुक्रवारी ऑफिस झाल्यावर गावी गेलो .. मस्त आनंदात होतो .. ऑफिसमध्ये नुकतेच प्रमोशन झाले होते .. बाबांनी रिटायरमेंटचा सगळं पैसा आपण राहतो त्या घरात लावला म्हणुन माझा पगार तसाच्या तसा राहायचा .. मग आवडीने मोठी गाडी घेतली .. १६लाखाची गाडी .. कसला खुश होतो मी .. घरी आल्यावर
आई " प्रसाद .. आता घर झाले .. गाडी झाली .. नोकरीतही तू छान सेट झालास तर आता लग्न करायला हरकत नाही .. तुझ्या ऑफिस मध्ये , कॉलेजमध्ये कोणी तुझी आवडीची मुलगी असेल तर सांग .. मी आणि बाबा रीतसर मागणी घालायला जाऊ .. एकदा का तुझे लग्न झाले कि आम्ही दोघे तुझ्या जवाबदारीतून मोकळे "

प्रसाद " आई .. अजून आत्ताच तर सेट होतोय .. नंन्तर बघू लग्नाचे "
बाबा " प्रसाद " अरे आता २७ पूर्ण होतील .. जमे जमे पर्यंत एखाद वर्ष जाईल कदाचित .. तर मुली बघायला सुरुवात करू "
म्हणतच बाबांनी प्रसाद च्या हातात पाच सहा मुलींचे फोटो आणि बायोडेटा ठेवले
बाबा " ह्यातली कोणी आवडतेय का बघ ? ह्या सगळ्यांची पत्रिका जुळलीय तुझ्या पत्रिकेशी "
आई " अहो .. थांबा ना .. त्यानेच आधी कोणी बघितली असली तर .. प्रसाद .. आम्हा दोघांना काहीही प्रॉब्लेम नाहीये .. संसार तुला करायचाय .. तू खुश असणे गरजेचे "
प्रसाद " आई .. नाहीये कोणी असे तुला पण माहितेय ना मग का उगाच छेडतेय ?"
प्रसाद " आई ने खोदून खोदून मला विचारले कि माझ्या आयुष्यात कोणी मुलगी आहे का ? पण ती कधी नव्हतीच त्यामुळे आम्ही मुली बघायला सुरुवात केली ..त्या रात्री मी झोपायच्या आधी त्या सगळ्या मुलींचे फोटो पाहिले आणि त्यात तुझा फोटो होता .. पाहता क्षणीच आवडलीस मला तू .. तुझा बायोडाटा , फोटो आणि पत्रिका बाजूला काढली आणि माझ्या ड्रॉवर मध्ये ठेवली आणि बाकीचे फोटो मी बाहेर टी पॉय वर ठेवले ..
झोपायच्या आधी कितीदा तुझा फोटो बघितला माझे मलाच माहित नाही .. तुझा बायो डाटा वाचला तेव्हा कळलं कि तू कोल्हापूरला *********** बँकेत आहेस ..
दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून कोल्हापूरला निघालो मिटिंग साठी .. आईने टी पॉय वरचे फोटो पाहिले
आई " प्रसाद .. एक फोटो कमी आहे .. रागिणी चा .. मला पण तीच आवडलीय .. मी कॉन्टक्ट करू तिच्या घरच्यांना "
तसा मी गाडीत बसताना आईला हसतच सांगितले " एवढी पण काही भारी नाहीये .. पण ठीक आहे .. एकदा बघून येऊ शकतो "
आई " ठीक आहे .. मग अजून फोटो आणते वधू वर मंडळातून .. तिच्यावरच काय पाणी पडलंय "
प्रसाद " नाही नको .. आधी हिला भेटू .. मग ठरवू "
तर अशा पद्धतीने मॅडम तुम्हीं फोटो मधूनच आमच्या हृदयात आल्या होत्यात .. मग मी कोल्हापूरला गेलो तेव्हा मुद्दामून बँकेत पण आलो होतो .. तुला जवळून बघून तर मी आईला तिकडूनच सांगितले कि " आई रागिणी च्या घरी कॉन्टक्ट कर .. लगेच पुढच्या महिन्यात आपला साखरपुडा झाला .. तेव्हा बघ मी किती खुश होतो ..
तिकडून इकडे आलो तर माझे नेमक रिपोर्टींग १५दिवसांपूर्वी नेमकेच बदलले होते .. आता माझी रिपोर्टींग " लिझा ला होते ..
लिझा ..एकदम अबोल आहे .. कामाशी काम .. मॅरीड आहे ती पण .. पण माझी ट्युनिग बॉस म्हणून तिच्याशी जमत नव्हती .. ती बोलताना मान खाली घालून बोलायची अग .. पण मी लग्नाच्या गडबडीत .. फ़ार विचलित झालो होतो तेव्हा .. कधी एकदा घड्याळात ६ वाजतायत म्हणजे मी फ्री होईल .. शॉपिंग करायची होती .. आपल्या हनिमून साठी मी मालदीव सिलेक्ट केले होते .. त्याचे बुकिंग करायची तयारी चालू होती माझी .. तुला आठवतंय मी पासपोर्ट पण मागितला होता तुझ्याकडे
रागिणी ने मान हलवून होकार दिला
एक दिवस असाच संध्याकाळी घरी आलो तर .. एक इन्व्हॉलॉप होते .. मी शॉपिंग च्या बॅग्स कपाटात टाकल्या आणि मग इन्व्हलोप ओपन केले तर पाया खालची जमीन सरकली .. त्याने रागिणीला तेच इन्व्हलोप पुढे केले ..
रागिणी " काय आहे त्यात ?"
प्रसाद " तूच बघ एकदा .. सांगणे कठीण आहे मला "
रागिणी ने ते इन्व्हलोप ओपन केले आतमध्ये काही फोटो होते .. तिने ते बाहेर काढले .. आणि डोळ्यांत पाणी भरून .. पटपट बघू लागली
रागिणी रडतच " शी .. लाज नाही वाटत तुला हे असले फोटो मला दाखवतोस " म्हणतच सगळे फोटो तिने त्याच्या अंगावर फेकले आणि उठायला निघाली
प्रसाद " ह्या पेक्षाही जास्त मी हादरलो होतो .. हे असले माझे आणि लिझा चे फोटो पाहून "
रागिणी " प्रसाद .. वाट लावलीस माझ्या आयुष्याची .. का खेळलास .. मी .. मी काय वाईट केलं होते तुझे .. " रडतच
प्रसाद " रागिणी .. हे जर खरं असते तर तर मी फोटो कशाला काढेन ? आणि काढले तर तुला कशाला दाखवेन ?"
रागिणी " मग .. काय आपोआप आले ? जवळ तर गेलाच असशील ना तू तिच्या .. तेही आपला साखरपुडा झाल्यावर .. शी .. काय माणूस आहेस प्रसाद तू ?"
प्रसाद " त्या इन्व्हलोप मध्ये अजून आहे काहीतरी .. ते पण बघ ना "
प्रसाद खूप शांतपणे तिला सांगत होता
तिने डोळे पुसतच आतमध्ये काय आहे ते बघितले तर एक लेटर होते
" हे असले फोटो ढिगाने आहेत माझ्याकडे ? आज घरी पाठवलेत ? उद्या ऑफिसला पाठवेन ? असे होयला नको असेल तर सांगतो त्या अकाउंटला दर महिन्याला १ लाख रुपये पाठवायचे .. ज्या महिन्यात पैसे जमा होणार नाहीत त्या महिन्यात फोटो ऑफिसला HR dept ला पोहचतील .. मग बदनामी तर होईलच पण नोकरी हि जाईल .. "
मी सर्वात आधी गावी आलो .. आई आणि बाबांना सांगू का असा विचार करू लागलो .. पण घरी आई आणि बाबा इतके खुश होते .. आपल्या लग्नाला घेऊन .. मग माझ्या मनात विचार आला हे लग्नच मोडून टाकावे .. हे प्रकरण काहीतरी वेगळे दिसतंय .. माझ्यामुळे तुझी वाट नको लागायला .. आणि मी जेवताना धीर करून घरी आई आणि बाबांना सांगितले " मला हे लग्न नाही करायचेय " माझे हे वाक्य ऐकल्यावर आई परवा जशी खाली पडली ना तशी कोसळली .. दवाखान्यात लगेच नेली .. तर कळले हार्ट अटॅक आला होता तिला .. डॉक्टरांनी वाचवली तिला
मग आईने मला खोदून खोदून विचारले " का नाही करायचे लग्न ? काय प्रॉब्लेम आहे ? पण आता माझा धीर गेला होता .. आईला सांगायची वेळ नव्हती ती .. मी गप पणे त्या अकाउंट ला १ लाख रुपये पाठवले .. जो गुन्हा मी केला नाही त्याची शिक्षा मी भोगत होतो .. आणि तिथून माझे लग्नातलेलक्ष तर गेलेच मला नकोच वाटत होत हे सगळे ..
लिझा ने एकदा मला घरी कामाचे डिस्कस करायला बोलावले होते .. मी घरी गेलो तेव्हा एकदम भारी तयार होऊन बसली होती ती .. कामाचे डिस्कशन झाल्यावर मी निघालो तर तिने मला मागून पकडलं .. सॉरी तुला राग येईल पण जसे तू मला पकडले होतेस ना तसेच तिने पण पकडले होते .. मला एक क्षण काही कळलेच नाही कि हि अशी का वागतेय .. मी तिच्यावर ओरडलो आणि तिला मागे झटकून दिले आणि घरातून बाहेर पडलो ..
पुढच्या दोन दिवस मी वर्क फ्रॉम होम घेतले आणि मग डिपार्टमेंट चेंज करून घेतले होते या गोष्टीला २० दिवस होऊन गेले होते .. आणि हे अचानक फोटो घरी आले ..
फोटो एडिटेड आहेत .. माझा चेहरा ऍडजेस्ट केलाय .. हे नीट बघितले कि कळते .. .ह्याच टेन्शन मध्ये कसे बसे लग्न झाले .. तुझ्या जवळ सोड मला बघायला नको वाटायचे .. असे वाटायचे का ह्या मुलीच्या आयुष्याची वाट लावतोय मी .. म्हणून हनिमून वगैरे सगळे कॅन्सल केले ... सुट्टया पण जास्त नाही घेतलया ..
लिझाला ह्याचा जाब विचारायला मी आपले लग्न झाल्यावर गेलो .तर मला कळले कि लिझा प्रेग्नंट आहे .. आणि ती म्हणतेय कि आय एम द फादर ऑफ द बेबी "
संक्रातीच्या आदल्या दिवशी मी तिला भेटून आलो होतो .. आणि नेमके दुसऱ्या दिवशी तू माझ्या जवळ येण्याचा प्रयन्त केलास .. अगदी तसाच जसा लिझाने केला होता .. तुझ्या त्या ऍक्शन ने मला तिडीक आली .. असे वाटले कि तुला एक कानाखाली वाजवावी .. आणि मी रागात तुला काय काय बोललो .. मलाच माहित नाही
आई बाबा दुसऱ्या दिवशी गेल्या नंतर तू घर सोडून जावीस हीच माझी पण इच्छा होती .. मलाच स्वतःला नकोसं झालेलं .. रोज उशिरा यायचो .. तू गेल्यावर उठायचो .. तिरसटा सारखे बोलायचं .. अपमान करायचा .. हे सगळं मी मुद्दामून करत होतो कारण मला नको होत तू माझ्या जवळ आलेलं ..
तुझे हि लग्न झालंय .. खूप स्वप्न असतात .. मीही बघितली होती पण आता सगळे हातातून निसटून गेलंय .. माझ्या प्लॅन नुसार तू जायला पण निघालीस पण नेमके आई आणि बाबा परत आले आणि त्यांनी सगळं ऐकले ..
आता आई मरे पर्यंत तुला जाउ देणार नाही मी सॉरी .. मला आईला दुःखी होऊन नाही पाठवायचे .. तर आता एक वर्ष आपल्याला बेडरुम बाहेर आपण चांगले नवरा बायको आहोत हे नाटक करावे लागेल .. निदान सध्यातरी
मी उद्या सकाळी तुला बेडरूम च्या बाहेर एक " सॉरी बोलेन . आपण थोडा वेळ भांडायचे नाटक करू मग आपले भांडण कायमचे मिटले असे दाखवून देऊ त्या दोघांना .. मला माहितेय यात तू उगाच भरडली जातेय ..
रागिणी " लिझा का ब्लॅकमेल करतेय ? तिला पाहिजे ते तू दिले नाहीस म्हणून का ?"
प्रसाद " मला माहित नाही ? पण यात तू पडू नयेस असे वाटते मला .. माझे प्रयत्न चालू आहेत .. जर मी यातून निष्कलंक सुटलो तर तुला पाहिजे असेल तर तुझा .. नाहीतर तू तुझा तुला वाटेल तो निर्णय घेऊ शकतेस .. पण आई मेल्यावर "
रागिणी "काय सारखं चालवलय ? आई मेल्यावर "
प्रसाद " जमलं असते तर माझे सगळे आयुष्य आईला देईन मी .. पण नाही ना देऊ शकत .. निदान खोटा खोटा का होईना आनंद तर देईल "

🎭 Series Post

View all