स्त्रीत्व भाग २२

Story Of women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग २२
क्रमश : २१
आदिराज " सॉरी ना जान .. चुकलो .. चुकलो .. एकदा माफ कर प्लिज .. " आणि खालीच बसला तिच्या समोर
स्पृहा " आदी .. प्लिज डोन्ट क्रिएट सीन हिअर "
आदिराज "तू पाहिजे तर मला पनिष कर "
स्पृहा " जशी तूला मला द्यायची होती तशी .. तू दिलेली गिफ्ट नाकारली म्हणून इतका राग .. आदी मी पुन्हा एकदा सांगते .. मी तुझ्या आधीच्या गर्लफ्रेंड सारखी नाहीये .. मला ना दागिन्यांची हौस आहे ना तुझ्या पैशांची .. ना तुझ्या भारीतल्या कार ची .. तेव्हा प्लिज माझ्या समोर जो काल आदी होता त्याच आदींवर मी प्रेम करते .. बापाच्या पैशांवर मज्जा मस्ती आणि माज दाखवणाऱ्या ह्या आदींच्या प्रेमात मी नाहीये .. जो आदी .. देवी मातेला मानतो . तो आदी आपल्या गेलेल्या आईशी लहान मुला सारख्या गप्पा मारतो . जो आदी घरातल्या मेडला बहिणी सारखे वागवतो , जो आदी स्पृहा नावाच्या अत्यंत साध्या साधारण मुलीच्या प्रेमात आहे .. जो आदी ज्याला भुंगा आणि फुलपाखरातला फरक कळतो .. जो आदी प्रेयसी आधी आपल्या डॅड ला सिलेक्ट करतो , जो आदी आपल्या होणाऱ्या बायकोला आपल्या कुशीत शांतपणे झोपवतो .. जो आदी वेळ आली तर संपत्ती सोडायची तयारी दाखवतो , जो आधी आमच्या साध्या घरात नाश्ता करतो .. जो आदी एक दिवसात माझ्या घरा पर्यन्त पोहचतो .. माझ्या वडिलांशी मैत्री करतो तो आदी माझा आहे .. हा तो आदी नाहीये .. हा तो आदी नाहीये .. मी जातेय .. मी ह्या आदिला ओळखत नाही .. मी जातेय .. "
रडतच स्पृहा मंदिरात गेली .. देवीपुढे हात जोडले .. तर आदी पण तिच्या बाजूला हात जोडून उभा राहिला .. तिने डोळे उघडून बघितले तर कान पकडून तिच्या समोर उभा होता
आदिराज " सॉरी ना .. प्लिज नाही असे होणार .. मी माझ्या रागावर कंट्रोल करेन प्लिज "
स्पृहा पुन्हा त्या बाकावर जाऊन बसली .
तेवढयात सागरने आदिराज ला फोन केला
सागर " आदिराज , स्पृहाच्या अंगावर एक जरी खरचटलं असेल ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही .. तुझे ना आता खूप झाले .. मी आता पोलिसांकडे जातोय .. अर्ध्या तासात जर ती इथे कॉलेजला आली नाही ना तर तू गेलास समज "
आदिराज " ए .. पोलिसांची धमकीला मी घाबरत नाही .. माझा वकील बघून घेईल .. जा नाही सोडत स्पृहाला .. बायको आहे माझी ती .. "
सागर " आदिराज .. स्पृहा कुठेय ? मला बोलायचंय तिच्याशी "
आदिराज " मग असे बोल ना .. माझ्याशी सरळ बोलायचं हा आदीच सांगतो .. कुठे गायब होशील तू तुला पण कळणार नाही ... तुला माहित नाही माझि पावर.. इथे बसून तू जेल तुला जेल मध्ये सडवीन .. घे .. बोल स्पृहा जवळ "
आदिराज " स्पृहा .. त्या सागर सांगून ठेव हा आधीच सांगतो .. माझ्या वाट्याला जाऊ नकोस म्हणून .. डोक्यात जातो राव तो माझ्या .. मी काय क्रिमिनल आहे का ? सारखा म्हणतो स्पृहाला काय झाले तर बघ ? वैतागवाडी "
सागर पलीकडून सगळे ऐकत होता
स्पृहा " हा सागर"
सागर " स्पृहा .. एक मिनिट निहारिकाशी बोल .. ती खूप काळजीत आहे .. तू कुठे आहे .. आम्ही येऊ का तिकडे ? "
स्पृहा " सागर .. काही नाही होणार मला .. तो प्रेम करतो माझ्यावर .. तू दे निहारिका ला मी बोलते तिच्याशी "
निहारिका " अरे त्या आदिराजच्या .. मी तिकडे येईन ठोकून काढेन त्याला ? हाऊ डेअर हि .. कसा वागतोय तो तुझ्याशी ? कसा ओढत नेले यार त्याने तुला ?"
आदिराज सगळे ऐकत होता
निहारिका " ए स्पृहा .. तो तुझा यूज करेल आणि फेकून देईल .. तू त्याच्या नादाला लागू नकोस .. तुला माहित नाही का ? दर तीन महिन्याला वेगळी गर्ल फ्रेंड असते त्याची "
स्पृहा " झालंय तुझं बोलून .. आता माझे ऐक .. माझे आदिराज वर प्रेम आहे .. आणि मी इथे स्वतःहून माझ्या इच्छेने थांबले आहे .. "
निहारिका " अग येडे .. तेच तर सांगतेय .. तो तुझ्या भांवनांशी खेळतोय .. त्याच्या पैशावर तू भूललीस का?.. तू तुझी अक्कल गहाण टाकलीस काय ? समोर आलीस ना तर एक वाजविन तुझ्या मी ? कळत नाहीये का ? का स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतेय "
स्पृहा " निहारिका .. जे काय होयच ते होऊ दे .. आता नाही मी मागे हटणार .. माझ्याकडे वेळ कमी आहे .. मी तुझ्याशी नंतर बोलते "
निहारिका " स्पृहा .. गाढव .. काय चाललंय तुझे ? तो यूज करतोय तुला ?
स्पृहा " बास यार निहारिका .. तू मला काही पण बोल .. पण त्याला काही पण नको बोलूस .. प्लिज .. तुला आणि सागरला वाटतो तसा नाहीये तो .. आणि मला माझे निर्णय घेण्याचा अधिकार आहे "
निहारिका " भेंडी .. तुझ्या .. आम्ही इथे आमच्या बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगतोय ते काय मूर्ख म्हणून का ? "
स्पृहा " सॉरी .. तू तुझ्या जागी बरोबर आहेस .. आणि खरंच थँक यु तुम्ही दोघे माझी काळजी करताय .. पण मी आदी बरोबर सेफ आहे हि खात्री मला पटलीय .. आपण कॉलेज मध्ये आल्यावर बोलू "
स्पृहाने फोन कट केला .. आदिराजने सगळं कॉल ऐकला होता .. आणि एकदम गळून गेला .. एक मिनिट त्यालाही असे वाटले कि मी स्पृहाच्या आयुष्याशी खेळत नाहीये ना "
दोघे सेपरेट वेग वगेळ्या बाकावर बसले .. थोडावेळ कोणच कोणाशी काहीच बोलले नाही .. त्याचा चेहरा हा कॉल ऐकून पडला होता.
---------------------------------------------------------------------------
सुनील जेव्हा सासूबाईंना सोडायला स्टेशन ला गेला होता तेव्हा तेजूच्या आईने काल तेजू काय बोलत होती ते सांगत होते .. सुनील आता स्वतः डिप्रेस झाला होता .. आता हे खूळ तेजूच्या डोक्यातून कसे काढायचे यावर तो विचार करू लागला ..
इकडे तेजू तिच्या प्रिय नवऱ्याला नक्की कसे सोडावे म्हणून डोकं लावू लागली .. सुनील ला कोणीतरी दुसरी मुलगी आवडली पाहिजे .. कोणीतरी स्पृहा सारखी मुलगी सुनीलच्या आयुष्यात आली पाहिजे .. उद्याच आता बाकीची सुट्टी कॅन्सल करते आणि स्पृहाला विचारू का ?
काहीही ना .. एका स्त्रीच्या मनात काय येईल .. म्हणतात ना

मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.

तसेच काहीसे तिचे चालू होते .. तेवढ्यात तिला तिच्या डॉक्टरांचा फोन आला
डॉक्टर " मिसेस सुनील .. कशा आहेत ? "
तेजू " हा ठीक आहे डॉक्टर ? आता चालते फिरते घरात "
डॉक्टर " मिसेस सुनील .. मला जरा बोलायचं होते तुमच्याशी .. तुम्ही मला भेटू शकता का ?"
तेजू " हो येईल कि .. संध्याकाळी सुनील आला कि आम्ही दोघे येऊ भेटायला ?"
डॉक्टर " नाही .. आय मिन .. मला तुमच्या एकटी कडे काम आहे ? तुम्ही आज माझ्याकडे एकट्या येऊन भेटू शकता का ? आणि एक सुनील सरांना सांगू नका ? मला भेटायला येताय ते ?"
तेजू " म्हणजे ? मला कळत नाहीये तुम्ही असे का बोलताय ते ?"
डॉक्टर " ते तुम्ही मला भेटल्यावरच कळेल तुम्हांला ?"
तेजू " ठीक आहे .. मी कधी येऊ मॅडम ?"
डॉक्टर " दुपारी ३ वाजता या क्लिनिक ला तेव्हा पेशंट नसतात "
तेजू " ओके .. मी पोहचेन तेव्हा ?"
\"डॉक्टर " ओके "
----------------------------------------------
सागर नुसता लाल लाल झाला होता .. मनातून असे वाटत होते त्याला कि त्या आदिराजला हॉकीस्टिक ने फोडून काढावी .. वाट लावली त्याने स्पृहाची .. "
निहारिका तर रडतच होती ..
निहारिका " सागर , स्पृहा च्या घरी सांगू का मी ? ती चान्गले नाही करत आहे ? तिला माणसे ओळखता येत नाहीत ? किती घाबरते ती त्या आदिराजला .. सागर आपण काहीतरी करूयात का ? अरे तो .. काहीपण करेल तिच्या बरोबर .. मला खूप भीती वाटतेय ? पैशाच्या जोरावर तिला कुठे गायब करेल आपल्याला कळणार पण नाही "
सागर " नाही ग .. असे काही होणार नाही ? पण त्याचे पंख तर नक्कीच कापावे लागणार आहेत ? इस बार उसने गलत लडकी को चुना है "
निहारिका " अरे यार हि स्पृहा पण काय वेड्या सारखी वागतेय .. मला म्हणते मी सेफ आहे त्याच्या बरोबर "
सागर " मला म्हणते तो मला काहीच करणार नाही .. तो प्रेम करतो माझ्यावर ? अरे कसली एवढी पट्टी पढवली त्याने .. मला काही कळत नाहीये "
निहारिका " सागर .. त्याचं घर , गाडी , पैसा बघून तर ती त्याच्याकडे ओढली गेली नसेल ना "
सागर " काहीही निहारिका ? काय पण बोलतेस .. स्पृहा तशी नाहीये तुलाही माहितेय "
निहारिका " हो पण आता बघ ना कशी वागतेय ?"
------------------------------------------------------------------------
स्पृहा उठली आणि आदिराज ज्या बाकावर बसली होती तिथे आली ..
स्पृहा " आदी घे तुझा फोन "
आदिराज " बहुतेक सागर आणि निहारिका म्हणतायत ते बरोबर आहे ..आय एम नॉट राईट पर्सन फॉर यु "
स्पृहा " हेच मी तुला काल सांगत होते .. तेव्हा तुला ते पटत नव्हते "
आदिराज " माझ्यामुळे तुझे जास्तीचे नुकसान होण्यापेक्षा " लेट्स ब्रेक अप "
स्पृहा " हो .. ठीक आहे .. लेट्स ब्रेक अप "
आदिराजला वाटले कि स्पृहाला पण आता त्याच्या पासून ब्रेक अप पाहिजे म्हणून ती लगेच ऍग्री झाली
आदिराज उठला " ठीक आहे .. चल तुला सोडतो कॉलेजला "
स्पृहा " नको कशाला ? मी जाईल रिक्षेने "
आदिराज " कशाला ? मी सोडतो म्हणतोय ना "
स्पृहा " सोडून तर दिलंस तू आल्रेडी .. आता अजून काय सोडायचं राहिलंय .. यावेळी तर तुझे रेकॉर्डच झाले नाही का ? वन नाईट गर्लफ्रेंड .. सही ना .. रात गयी बात गयी "
आदिराज भडकलाच " स्पृहा .. "
स्पृहा " चल मी निघते .. " असे म्हणत ती रागाने उठली तिथून आणि पायऱ्या उतरू लागली
तेव्हढ्यात देवाचे पुजारी आले " काल तुझा मोबाईल सापडला मला इथे थांब हा मुली मी घेऊन येतो "

🎭 Series Post

View all