स्त्रीत्व भाग २१

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग २१
क्रमश: भाग २०
प्रसाद " मी चुकलो .. मी मान्य करतो .. आज आत्ता एवढच सांगतो कि मी सध्या कलंकित आहे . त्यातून बाहेर पडल्याशिवाय तुला जवळ घेणे म्हणजे मी पाप करतोय कि काय असे वाटते मला ? सारखी भीती लागून राहते कि तुला जर सत्य कळलं तर तू मला सोडून जाशील का ? म्हणून मी .. लांब लांब राहत होतो .. तुझ्याशी भावनिक बंध निर्माण होयला लागले कि भीती वाटायची मला .. आणि अजूनही वाटतेय .. अजूनही प्रॉब्लेम तसाच आहे .. सोल्युशन नाहीये माझ्याकडे .. पण आईने मला शॉक दिला .. जर मी माझ्या वरचा एक लागलेला कलंक नाही घालवू शकलो तर मी स्वतः तुला दुसऱ्याच्या हातात सुपूर्त करेन माझे प्रॉमिस आहे .. पण एक संधी जर तू दिलीस तर मी कदाचित निष्कलंकीत निघालो तर तू फक्त माझि आहेस "
अजूनही रागिणी त्याच्या घट्ट बाजू मध्ये बंद होती ..
प्रसाद " तू फक्त माझे ऐकून घे मग तुझा निर्णय घे .. मी नाही अडवणार तुला .. मग तुला कळेल कि मी का असा वागत होतो ? आणि आता वागतोय ते चुकीचे आहे कि पहिला वागत होतो ते चुकीचे हे तूच ठरव.. नाहीतरी तू मला सोडायचा निर्णय घेतलाच आहेस .. जो तू घेऊ नयेस म्हणून काही गोष्टी तुला सांगितल्या नव्हत्या .. आता सांगून बघतो कदाचित तुझा जाण्याचा निर्णय तू बदलशील अशी वेडी आशा आहे मला "
रागिणी " सोड ना " एकदम हळू आवाजात पुटपुटली
प्रसाद " तेच तर करायचं नाहीये मला .. सोडायचं नाहीये मला तुला "
रागिणी तिला त्याच्या हातातून सोडवून घेण्याचा नादात असताना .. त्याने आधी तिच्या कपाळावर आणि मग गालावर किस केले .. रागिणी एकदम आश्यर्यचकित होऊन बघू लागली त्याच्याकडे
प्रसाद " सोडू .. "
रागिणीने डोळ्यानेंच हो म्हणून सांगितल्यावर दुसऱ्या क्षणाला त्याने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतले .. रागिणी एकदम बावरली.. तिला बेड वर झोपवून .. तिच्या अंगावर पांघरूण टाकून तो खाली चटई वर झोपला.
दोघेही मनातून अस्वथ होते आणि अश्रूंनी उशी ओली करत होते
इतनी मोहब्बत करो ना
मैं डूब ना जाऊं कहीं
वापस किनारे पे आना
मैं भूल ना जाऊं कहीं
देखा जबसे चेहरा तेरा
मैं तो हफ़्तों से सोया नहीं

बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं

मुझे नींद आती नहीं है अकेले
ख्वाबों में आया करो

नहीं चल सकूँगा तुम्हारे बिना मैं
मेरा तुम सहारा बनो
इक तुम्हें चाहने के अलावा
और कुछ हमसे होगा नहीं

बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं

हमारी कमी तुमको महसूस होगी
भींगा देंगी जब बारिशें
मैं भर कर के लाया हूँ
आँखों में अपनी
अधूरी सी कुछ ख्वाहिशें
रूह से चाहने वाले आशिक
बातें जिस्मों की करते नहीं

बोल दो ना ज़रा
दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं

https://www.youtube.com/watch?v=f9_C8J4gqzQ
गाणे नक्की ऐका.
--------------------------------------------
आदिराजला कॉलेज ला जायचं होते म्हणून तो आवरायला त्याच्या रूम मध्ये गेला .. वॉशरूम मध्ये गेला तर मिरर समोर टूथ ब्रश होल्डर होते .. त्याचा शेप हाताच्या पंजा सारखा होता .. त्याकडे त्याचे लक्ष गेले तर त्याने स्पृहाच्या गळ्यात घातलेलं ब्रेसलेट स्पृहाने तिथे लटकावून ठेवले होते ..हे बघून त्याच्या डोक्यात रागाची तिडीक गेली .. एवढ दोन तास वेळ घालवून मी हिच्यासाठी खरेदी केलं .. हि चक्क वॉशरूम मध्ये विसरून जाते .. नाराजीतच त्याने आवरले आणि कॉलेजला पोहचला ..
स्पृहा निहारिका आणि सागर क्लासरूमच्या बाहेर उभे गप्पा मारत होते तेवढ्यात आदिराज तिकडे टपकला
आदिराज " स्पृहा .. चल जरा माझ्या बरोबर .. मला बोलायचय "
स्पृहा शांतपणे " आदी.. माझे आता लेक्चर आहे .. आत्ता नाही येऊ शकत मी "
आदिराजने तिला दंडाला पकडले " चल म्हटलं ना कि चालायचं "
सागर ने आदिराज चा हात ओढला
सागर " मिस्टर आदिराज .. तिला जर यायचं नसेल तर तू जबरदस्ती करू नकोस "
आदिराजने स्पृहाचा हात सोडला आणि सागरची कॉलर पकडली
आदिराज " तुला कळत नाही का रे ? जस्ट स्टे अवे फ्रॉम असं .. स्पृहा माझी आहे .. हे लक्षांत ठेवायचं "
तशी स्पृहा एकदम घाबरली
निहारिका " आदिराज .. सोड त्याला .. तुझी हिम्मत कशी झाली त्याची कॉलर पकडायची ?"
स्पृहा चे डोळे मात्र वाहू लागले .. एकटक फक्त आदींकडे बघत होती .. काय हा असा का विचित्र वागतो .. काल किती साधा सरळ निरागस होता .. आत्ता असा का वागतोय ? असाच विचार करू लागली
स्पृहा " चल आदी कुणीकडे यायचंय मी ?"
तशी आदिराज ने त्याची कॉलर सोडली
सागर " स्पृहा तू चुकतेय .. तू नको जाऊस त्याच्या बरोबर .. तुझ्या लायकीचा नाहीये तो "
निहारिका " स्पृहा सागर एकदम बरोबर बोलतोय .. मी म्हटले ना तुला तो बॉसी आहे .. अनप्रेडीटेबल आहे ,, तू त्याच्या प्रेमाच्या नाटकात फसू नकोस .. "
आदिराज त्या दोघांकडे काहीच लक्ष देत नव्हता .. स्पृहाला हाताला धरून अल्मोस्ट ओढतच जात होता .. आणि स्पृहा भरल्या डोळ्यांनी त्याच्या रागीट चेहऱ्याकडे पाहत होती ..
त्याने तिला रागाने कार मध्ये बसवले .. सीट बेल्ट लावला आणि इतक्या फास्ट गाडी पळवू लागला कि सगळे स्टुडंट्स त्याच्या कार कडे वळून बघत होते .. काल आणि आज मधे फरक हाच होता कि स्पृहाला त्याची भीती नव्हती वाटतं .. फक्त वाईट वाटत होते कि हा असा का वागतोय ?
आदिराज ने पुन्हा त्याच देऊळात तिला आणले .. कालच्याच बाकावर बसले
थोडा वेळ कोणचं काही बोलले नाही
स्पृहा " झाला तमाशा करून ? आपण ठरवतोय काय ? आपण वागतोय काय ? काहीच कळत नाही मला ?कसला एवढा राग आलाय तुला ?"
आदिराज " मी दिलेलं ब्रेसलेट का घातलं नाहीयेस ?" त्याला वाटले तिच्या लक्षात नसेल ते तिने कुणीकडे ठेवलंय
स्पृहा " ते जिथे असायला पाहिजे तिकडे ठेवलंय मी "
आदिराज " पण मी तुला एक प्रकारे मंगळसूत्र म्हणून घातले होते ना ते .. मग का काढलेस तू ते ? आणि दाखव मला ते कुठे आहे ते ?"
स्पृहा " मी तुला कालच सांगितले आहे कि मी कोणतेही गिफ्ट घेणार नाही .. एवढं महाग गिफ्ट तर नाहीच नाही .. मी घरी आई वडिलांशी खोटे बोलणार नाही .. माझ्या गळ्यात कधीच काही नसते .. हे दिसल्यावर कोणीपण विचारेलच ना ? कुणी दिले ? काय उत्तर देऊ मी ? म्हणून नाही घातलं ते मी ?"
आदिराज " पण मी एवढं दोन तास घालवून तुझ्यासाठी घेतलं होत ना ते .. "
स्पृहा " आदी .. काय लहान मुलांसारखं करतोय ? मी एवढं सांगतेय तुला कळत नाहीये का ?"
आदिराज " कळतंय ? पण तू ते कुणीकडे ठेवलंयस ते तरी लक्षांत आहे का तुझ्या ? २ लाख कॉस्ट आहे त्याची "
स्पृहा चे डोळे पाण्याने डबडबले होते " मी मागितले होते का ? का आणलेस तू ? त्यावरून एवढी कीटकीट .. का करतोयस तू ? मला गिफ्ट नकोय "
तिने निक्षून सांगितले आणि त्याचा त्याला राग येत होता .. त्याने तिला जोरात दंडाला पकडले
स्पृहा " आउच !! आदी .. लागतंय मला .. सोड माझा हात "
आदिराजने ते त्याच्या वरच्या खिशातून काढले आणि तिच्या हातात जबरदस्ती घालू लागला .. गळ्यात नकोय तर हातात घाल.. आपल्या प्रेमाची भेट आहे ती "
स्पृहा " जर तुला प्रेमाची भेट द्यायचीच असेल तर तू कमावलेल्या पैशांनी घेऊन दे .. तुझ्या डॅड नि दिलेल्या पैशांचे नकोय मला "
आदिराज एकदम शांत झाला
स्पृहा " मी काय सांगतेय ते नीट ऐकतो का जरा ? हे बघ आदिराज .. २ लाख रुपये कमवायला सर्व सामान्य माणसाला कमीत कमी २०००० पगार असेल तर १० महिने लागतात .. तू तुझ्या पैशांनी घेऊन दे मग मी घालेन .. एवढ्या तेवढ्या गोष्टी वरून तू इतका चिडतोयस .. काय मिळतंय तुला यातून .. म्हणून आमच्या घरचे म्हणतात गरजे पेक्षा जास्त पैसे आले ना कि भांडणंच होऊ शकतात दुसरे काही नाही .. आज तू बोलून दाखवलेसच ना कि २ लाखाचे ब्रेसलेट होते म्हणून .. जर चुकून माझ्या कडून हरवले असते तर .. "
आदिराज " तुझा गैरसमज होतोय .. मॅटर इज नॉट अबाऊट द मनी इट्स अबाऊट माय फीलिंग्स आर अटॅचड विथ धिस ब्रेसलेट .. आणि त्या बद्दल तुला काहीच वाटत नाही तू ते सरळ सरळ काढून टाकलेस "
स्पृहा " ते तुला जिथे सापडले ना तिकडेच ठेव .. मी विचार करून तिथे ठेवलंय ते "
आदिराज " वॉशरूम मध्ये ?"
स्पृहा " हो .. कारण तू जेव्हा हे बघशील तेव्हा तुला माझि आठवण येईल .. तू कितीही टेन्शन मध्ये असलास तरी फ्रेश होयला वॉशरूम मध्ये जाशील .. मिरर समोर उभा राहशील तेव्हा तुला ते दिसेल आणि मग माझ्या आठवणीने तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल म्हणून मी ते तिकडे ठेवले होते .. आणि जर नीट बघशील तर त्यातले एक लिटिल हार्ट गायब आहे ते मी माझ्या जवळ ठेवलय .. " तिने तिच्या स्लीव्स वर करून त्याला दाखवलं .. एक लिटिल हार्ट काळ्या दोऱ्यात तिने दंडाला बांधले होते .. पण आदिराजच्या जोरात हात पकडल्यामुळे तेच हार्ट तिच्या दंडात रुतले होते आणि त्यातून थोडेसे रक्त येत होते ..
आदिराज " शीट यार .. लागलंय तुला ? यार रुतलंय ते आत ? " आणि तो काढायला जाऊ लागला
स्पृहा " नको काढूस ते ? काल आई बाबांशी खोटं बोलून मी तुझ्या घरी राहिले ना त्याची शिक्षा आहे ती मला मिळालेली .. "
आदिराज " यार .. असे नको ना बोलूस "
स्पृहा " हेच सत्य आहे .. आदिराज .. तुझ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असेल तर मला कॉलेज ला सोडशील ?"

🎭 Series Post

View all