स्त्रीत्व भाग १९

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग १९
भाग १८

सागर आणि निहारिका आज वेळेच्या आधीच ट्रेन स्टेशनला हजर होते .. चातका सारखी स्पृहाची वाट बघत .. आज स्पृहाला घरातून निघायला जरा वेळच झाला होता .. कशी बशी घाईतच तीने ट्रेन पकडली
निहारिका " काय ग ? काल नक्की काय झालं ? तू त्या येड्या आदिराजच्या बरोबर का गेलीस ? आणि तिकडे राहिलीस पण ? काय डोकं ठिकाणावर नव्हतं का तुझं ?"
निहारिका जरा चिडलीच होती तिच्यावर
स्पृहा " तू आधी मला सांग कि तू मला एकटी सोडून कुणीकडे गेलीस ? तू पण नव्हतीस .. सागर पण नव्हता .. तूम्ही दोघे कुणीकडे गेला होतात ?"
स्पृहा पण तिच्यावर रागावलीच होती
निहारिका " ते .. ते .. " हिला काय सांगू असच एक मिनिट तिला वाटले
स्पृहा " सांग ना ? नाहीतर बघ हा मी पण काहीच सांगणार नाही ?"
निहारिका " बरं बाबा .. सांगते "
मैत्रिणीला आपली अनेक गुपितं माहीत असतात .. तशाच ह्या दोघी एकदम घट्ट होत्या आणि आज दोघी खूप गप्पा मारणार होत्या.
निहारिका " सागर ने मला काल प्रपोज केले " निहारिकाने एकदम आनंदात सांगितले
स्पृहा " काय ? अरे वाह !! मग तू हो सांगितलेस कि नाही ?"
निहारिका " म्हणजे काय ? आम्ही लवकरच एंगेजमेंट करू ?"
स्पृहा " वाह !! मस्तच .. काँग्रॅच्युलेशनस यार .. "
निहारिका " तेच काल आम्ही टेकडीवरच्या बागेत गेलो होती ... दिवसभर खूप गप्पा मारल्या .. आणि अग अजिबात आधी ठरले नव्हते .. हे सगळे ना सागरमुळे झाले .. मला स्टेशनला न आणता तिकडे घेऊन गेला म्हणून तुला कळवायला पण वेळ नाही मिळाला. "
स्पृहा " मला काल खूप भीती वाटली .. एकटीने आपण कधी असे करत नाही ना .. नेहमी ठरवूनच करतो "
निहारिका " अग पण आता सवय करायला हवी तुला .. मी कदाचित दिल्लीला जाणार आहे तुला बोललेले ना मी "
स्पृहा " हो अग .. पण असे अचानक .. मी मनापासून तयार नव्हते त्या गोष्टीसाठी ..काल खूप गडबड झाली "
निहारिका " सॉरी ना यार .. सांग ना आता नक्की काल काय काय झाले ? “
स्पृहा " अग आज तेजस्विनी ताई पण नाही .. रागिणी ताई पण नाही.. आणि आपली आजी बाई पण दिसत नाहीये .. ?"
स्पृहा विषय बदलायला बघत होती .. अजूनही निहारिकाला नक्की काय सांगू आणि कसे सांगू हे तिला काळातच नव्हते .. तिच्यासाठीच अचानक मोठा बदल झाला होता .. आदींचे प्रेम तिने स्वीकारले होते .. हे निहारिकाला सांगू कि नये ? असे झाले होते "
निहारिका " हो ग ? काय माहित ? सुट्टीवर असतील दोघी ? तू विषय नको बदलूस .. नीट सांग काळ काय काय झाले ते ?"
शेवटी स्पृहाने तिला आदिराजने तिला मंदिरात नेले .. तिथे काय काय झाले ते सांगितले .. मग तिथेच तिला चक्कर आली आणि जाग आली तर ती त्याच्या घरी होती .. मग तो काय काय बोलला .. ती काय काय बोलली .. हे सगळे तिने तिला सांगितले
निहारिका " स्पृहा बघ बाई जरा विचार कर ? बडे बाप कि औलाद आहे तो .. शिवाय किती बिनधास्त असतो माहितेय ना ? प्रेडिक्ट नाही करू शकत त्याचे वागणे ? आणि त्यात तुझ्या घरातले किती ट्रॅडिशनल आहेत .. बघ म्हणजे एकदा विचार कर पुन्हा "
स्पृहा " आदी वाटतो तसा नाहीये ग .. एकदम साधा आहे .. निरागस आहे .. "
निहारिका " निरागस कसला ? चिडतो कसला राग आला कि ? मला तर बॉसी वाटतो .. त्याला पाहिजे ते करतोच .. मागच्या वर्षी तो अमर तुझ्याशी बोलायला आला तर त्याला भर चौकात त्याने कानफटात मारली होती ते विसरलीस का ?"
स्पृहा " ते . अमर माझ्या मागे उगाचच लागला होता म्हणून .. "
निहारिका " पण तो हि तर लागलाच आहे ना तुझ्या मागे ?"
स्पृहा ला मनातून बेचैनी येत होती .. खूप काही तथ्य होते तिच्या बोलण्यात .. पण आता तिलाही तो आवडतोय हे तिला तिच्या मैत्रिणीला ठामपणे सांगताही येत नव्हते आणि निहारिकाला ते कळत नव्हते ..
तिघे कॉलेजला आले आणि वर्गात बसले.
----------------------------------
आदिराज जवळ जवळ हवेत उडतच घरी आला .. एक वेगळीच ख़ुशी होती त्याच्या चेहऱ्यावर .. आनंदात गाडी पार्क केली आणि घरात आला .. तर समोरच डॅड बसले होते
आदिराजने धावतच जाऊन डॅडला मिठी मारली
आदिराज " डॅड .. आय मिस्ड यु सो मच "
डॅड " यु लायर .. एकदाही कॉल केला नाहीस तू काल मला "
आदिराज " सॉरी .. सॉरी .. काल मी खूपच बिझी होतो "
डॅड " हो ते कळले मला .. कोण होती ती मुलगी ?"
आदिराज " डॅड .. जस्ट अ फ्रेंड आहे .. आणि पहिल्यांदा आणलीय का कोणत्या मुलीला मी घरी ?"
डॅड " आय नो .. बट धिस टाईम ओव्हर नाईट .. धिस इज टू मच आदी .. यु शुड ह्याव सम रिस्पेक्ट .. धिस इज अवर होम नॉट हॉटेल .."
आदिराज " डॅड .. प्लिज .. तुम्ही विचार करताय तसे नाहीये काही .. आय स्लेप्ट इन युअर रूम "
डॅड " हमम .. बट स्टील "
आदिराज " डॅड .. आय लव्ह हर .. अँड धिस टाईम इट्स रिअल "
डॅड " आय विल सी आफ्टर थ्री मन्थस "
आदिराज " यु विल सी आफ्टर १० इयर्स आय विल बी लविंग धिस गर्ल ओन्ली "
डॅड " हमम .. "
आदिराज " डॅड .. मी लवकरच ऑफिस जॉईन करतोय .. खूप मन लावून काम करायचंय .. "
डॅड " अरे वाह !! कसे काय डोक्यात उजेड पडला " आणि हसले
आदिराज " डॅड .. इट्स बिकॉज ऑफ हर .. शी सेड .. शी वॉण्टस मी टू बी मोस्ट सक्स्सेसफुल .. शी वॉण्टस मी ऑन कव्हरपेज ऑफ बिझनेस मॅगझीन "
डॅडनि भुवया उंचावून त्याच्या कडे बघितले
आदिराज "डॅड .. शी इज सो सिम्पल .. आय जस्ट लव्ह हर .. "
डॅड " मला कधी भेटवतोस मग "
आदिराज " २ वर्षांनंतर "
डॅड "म्हणजे ?"
आदिराज " तिने मला सांगितलंय कि दोन वर्षां नंतर आपण लग्न करू .. तोपर्यंत तू सेटल हो .. ती पण MBA पूर्ण करेल .. एखाद वर्ष नोकरी करेल .. मग लग्न "
डॅड " साउंड्स इंटरेस्टिंग .. आणि तुला हे सगळे मान्य आहे ?"
आदिराज " डॅड .. ती म्हणते त्यात काही चुकीचं नाहीये मग न मान्य करण्यासारखे काहीच नाहीये "
डॅड " पण दोन वर्षांत तुला किंवा तिला कोणी अजून आवडलं तर ..?? "
आदिराज " डॅड ..मॉम गेल्यावर सुद्धा तुम्हांला अजूनही कोणी आवडलं का ? नाही ना ? मग ?"
डॅड " आदी .. तुला एक सांगू का ? तुझे हे घर पैसा रहाणीमान बघून कोणीपण तुझ्यावर प्रेम करायचं नाटक करू शकत "
आदिराज " डॅड .. ती काल मला म्हणाली कि जर वेळ आली तर तुझ्या डॅडचे वैभव संप्पती सोडशील का माझ्यासाठी ? तिला काहीच इंटरेस्ट नाहीये आपल्या पैशांत "
डॅड " काय ?.. मग खरंच.. मग नक्कीच चांगली मुलगी आहे . मला भेटवं ना प्लिज "
आदिराज " नाही ना डॅड .. मला सुद्धा ती भेटणार नाहीये .. आम्ही जरी रिलेशन मध्ये असलो तरी आम्ही गर्ल्फ्रेन्ड बॉयफ्रेंड नाहीये .. फक्त लांबून बघणार एकमेकांना असे ठरलंय आमचं "
डॅड एकदम शॉकच झाले होते .. जे काही ऐकत होते ते सगळे त्यांना फारच निराळे होते
डॅड " वाह !! आदी आय एम प्राऊड ऑफ यु माय सन "
आदिराज " थँक यु डॅड "
डॅड " नाव काय आहे माझ्या सुनेचं ?"
आदिराज " तुम्हांला माहितेय डॅड "
डॅड " यु मिन स्पृहा .. "
आदिराज एकदम गोड हसला आणि मान होकारार्थी हलवली ..
डॅड " ग्रेट !! ..नवीन फॅक्टरी तिच्याच नावाने सुरु करू .."
आदिराज " डॅड .. एक प्रॉब्लेम आहे ?"
डॅड " काय ?\"
आदिराज " तिच्या घरचे एकदम साधी लोक आहेत .. त्यांचे विचार पण साधे आहेत .. खूप गोड माणसे आहेत .. त्यांचे मन मोडायचं नाहीये दोघांना .. ते जर नाही ऐकले तर ?? अशी भीती वाटतेय मनातून "
डॅड " सध्या तू तुझ्या कामावर लक्ष दे .. वेळ आली कि बघू या गोष्टीकडे .. आय एम विथ यु .. आपण दोघे करू काहीतरी.. "
आदिराज "ओके डॅड .. ठीक आहे जातो आता .. कॉलेजला जातो .. आणि मग तिकडूनच ऑफिस ला येईन "
डॅड " एक मिनिट ... आज नाही आलास तरी चालेल ..उद्या पासून ये .. आज आपल्या सुनबाईला भेटून घे " आणि हसले
आदिराजने डॅडला पुन्हा एकदा मिठी मारली " थँक यु डॅड "
आदिराज रूम मध्ये आला .. आणि आनंदात उड्याच माराव्या असे वाटत होते त्याला .. स्पृहाने घेतलेलं ब्लॅंकेट हातात घेऊन नाचत होता .. तिचे त्या रूम मधले अस्तित्व त्याला सुगंधित करत होते
तेवढ्यात त्याचे लक्ष टेबलकडे गेले .. चिठ्ठी वाचून .. तिने चिठ्ठीत त्याला आय लव्ह यु म्हंटलेलं वाचून तर वेडा होयचा राहिला होता तो .. चिठ्ठीला ओठाला लावून " लव्ह यु टू " असे म्हणत होता
थर्मास घेऊन बाहेर आला
आदिराज " डॅड .. तुमच्या सुनेच्या हातचा चहा घ्या .. "
दोघांनी कपात ओतून चहा म्हणजे अमृत असल्या सारखा प्यायला ..
डॅड " मस्त चहा केलाय .. अरे वाह .. हाताला चव आहे चांगली .. "
आदिराज " म्हणजे ?"
डॅड " म्हणजे तिला जेवण पण छान तयार करता येते म्हणायचे "
आदिराज " शक्यतो येत असावे "
डॅड " आदिराज .. एक मिनिट .. मी काय सांगतो ते ऐक .. एवढा तिने तुझ्यावर विश्वास दाखवला आहे तर कधी तो विश्वास कमी होणार नाही याकडे बघ .. तुला हे जमेल ना .. प्लिज डोन्ट हर्ट हर .. असे म्हणतात
डोन्ट डेट द मोस्ट ब्युटीफुल गर्ल इन द वर्ल्ड
डेट द गर्ल हू मेक्स युअर वर्ल्ड द मोस्ट ब्युटीफुल .
आदिराज " येस आय विल मेक शुअर दयाट शी विल बी हैप्पी विथ मी फॉरेव्हर "
डॅड " ग्रेट !! "

🎭 Series Post

View all