स्त्रीत्व भाग १५

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग १५
क्रमश : भाग १४
आदी खाली चाललाच होता तर .. स्पृहा त्याच्या मागे मागे धावत आली
स्पृहा " आदी .. तू चिडलास का ?"
आदी " नाहीतर काय ? मी कधी जबरदस्ती केली का तुझ्यावर ? मी तुला सांगत होतो कि माझ्या भावना समजून घे .. तर तू काय काय उदाहरण देतेय .. तुला मला समजून घ्यायचच नाहीये "
स्पृहा " आदी .. मग मी इथे कशाला थांबलेय ..? "
पुन्हा ते दोघे बोलत आदींच्या रूम मध्ये आले आणि बाहेर गॅलरीत बसले
आदिराज " नक्की तुझे काय म्हणणं आहे ? तुला माझे प्रेम मान्य आहे कि नाही ? आय मिन आपण रिलेशन मध्ये आहोत कि नाही ?"
स्पृहा " हे मला पण माहित नाही .. मला थोडा वेळ हवाय .. "
आदिराज " म्हणजे किती वेळ हवाय ?"
स्पृहा " २ वर्ष ?"
आदिराज " व्हॉट ? २ वर्ष ? "
स्पृहा " माझे MBA पूर्ण होयला अजून १० महिने आहेत .. नंतर मी एक वर्ष तरी बाबांच्या कंपनीत नोकरी करेन .. मग मला २५ वर्ष पूर्ण झाली कि बाबा माझ्यासाठी स्थळ बघायला लागतील .. तेव्हा तू आमच्या घरी यायचं .. आणि मला मागणी घालायची .. तोपर्यंत तू पण ऑफिस मधे सेटल होशील "
आदिराज " ओके ? म्हणजे पण तोपर्यंत आपण गर्ल्फ्रेन्ड बॉयफ्रेंड का ?"
स्पृहा " नाही ना .. तसले मला तरी नाही जमणार .. "
आदिराज " म्हणजे मग आता तू मला भेटणार पण नाहीस का ? "
स्पृहा " नाही "
आदिराज " यार ह्याला काय अर्थ आहे ? मला काही कळत नाहीये ? नक्की तुझे माझ्यावर प्रेम आहे कि नाही ? तुला मी पाहिजे कि नको ? "
स्पृहा " आज मलाच काहीच कळत नाहीये.. पण तुझे माझ्यावर खरं प्रेम आहे ह्यावर माझा विश्वास बसलाय .. आणि तुझ्या बरोबर मी सेफ आहे हे हि मला पटलंय "
तसा आदिराज गालातल्या गालात हसला ..
आदिराज " मी आज सकाळी तुझ्याशी लग्न केलंय .. आपल्या दोघांसाठी .. म्हणजे आता तू माझी बायको आहेस .. आणि योगायोग असा कि आज तु आपल्या घरी रहायला आलीय .. मला जाम मज्जा वाटतेय."
स्पृहा " उद्या तू सगळ्यांना सांगशील ना कि मला कोणी वहिनी चिडवू नका म्हणून .. मला आवडत नाही ते "
आदिराज " ओके .. सांगतो .. "
स्पृहा " जर तुझ्या बाबांनी मला रिजेक्ट केलं तर ?"
आदिराज " प्रश्नच नाही .. त्यांचे माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे "
स्पृहा " म्हणूनच तर ते तुला विरोध करू शकतात .. कदाचित त्यांनी अजून कोणता तरी ऑप्शन शोधून ठेवला असेल तर ? "
आदिराज " हा .. त्यांनी पण शोधलीय एक मुलगी "
स्पृहा " बघ .. मी म्हटले ना .. "
आदिराज " पण मी पटवेन त्यांना "
स्पृहा " पण जर एक वेळ अशी आलीच कि ते तुला म्हणाले कि एकतर ते( डॅड नाहीतर मी (स्पृहा ) तर ?"
आदिराज हसतच " तर... मी नक्कीच डॅड सिलेक्ट करेन .. त्यांना मी कधीच एकट्याला नाही सोडणार "
स्पृहा " म्हणूनच मला भीती वाटते .. श्रीमंत मुला बरोबर कमिटमेंट करायला .. "
आदिराज " हे बघ बायको .. आता तू बायको झालीच आहेस .. आणि हि वेळ येणार नाही .. माझ्या आनंदापेक्षा काहीच मोठे नाहीये डॅडला "
स्पृहा " तरीही .. अशी वेळ आली तर तू हे सगळे वैभव सोडू शकशील माझ्यासाठी ?"
आदिराज " म्हणजे ?"
स्पृहा " म्हणजे जर अशी वेळ आलीच तर तू डॅड ला सोडायचं नाही म्हणून आपण तुझ्या डॅडच्या कंपनीत पगारावर काम करायचं .. म्हणजे डॅड वर लोड पण नाही येणार आणि त्यांची संपत्ती पण नाही घेतली असे होईल "
आदिराज " ठीक आहे डन "
आदिराज “एक प्रश्न आहे मला .. जर तुझ्या बाबंनी तुझ्यासाठी दुसरा मुलगा बघितला तर ?"
स्पृहा " माझ्या माहिती नुसार असे होणार नाही .. पण आपल्याला त्यांना पटवून द्यावे लागेल कि कोणत्याही परिस्थितीत तू मला सोडणार नाहीस आणि माझी काळजी घेऊ शकतोस "
आदिराज " आणि त्यासाठी काय करावे लागेल ?"
स्पृहा " ते आता मी कसे सांगू ? तेव्हा जे बाबा सांगतील ते करावे लागेल तुला ?"
आदिराज " आणि मी प्रयत्न करून जर मी नापास झालो तर .. "
स्पृहा " तर मग आपण आपले मॅरेज सर्टिफिकेट दाखवू .. आणि मग ते मला पाठवतील तुझ्या बरोबर ?"
आदिराज " ओके .. म्हणजे आता मॅरेज सर्टफिकेट बनवायला लागेल "
स्पृहा " आता नाही .. माझे MBA पूर्ण झाले कि पण करून ठेवू सेफर साईड "
आदिराज " ओके .. "
स्पृहा " तोपर्यंत .. भेटायचं नाही .. फक्त लांबून बघायचं जेव्हा तू कॉलेजला येशील तेव्हा "
आदिराज " अम्म्म्म .. नाही असे नाही मला चालणार .. तू नाही भेटलीस तर मी कसा जगणार ? त्यामुळे यावर काहीतरी वेगळा मार्ग काढू ?"
स्पृहा " मग तू घरी ये .. मी बाहेर नाही भेटणार "
आदिराज " बघ हा .. मी येईन घरी .. नंतर घाबरशील "
स्पृहा " तू असाच कारण नसताना आलास तर तुला ओरडतील माझे बाबा .. कदाचित उगाचच आपल्याला पुढे प्रॉब्लेम होईल "
आदिराज जो तिच्या पासून खूप लांब बसला होता ते पटकन पुढे आला आणि त्याने तिचे गाल दोन्ही हाताने ओढले .
आदिराज " ‘आपल्याला’ बोललीस .. म्हणजे आता तू आणि मी एक आहे ना "
तशी स्पृहा पण लाजली ..
स्पृहा " मी जाऊ .. झोपायला "
आदिराज " ठीक आहे .. खूप उशीर झालाय .. रात्रीचे दोन वाजलेत .. पण ना माझे मनच भरत नाहीये .. आता पुन्हा हि वेळ लवकर येणार नाही .. प्लिज थोडा वेळ अजून गप्पा मार ना "
स्पृहा " पण .. "
आदिराज " मी आईस्क्रिम आणतो .. ते सम्पे पर्यंत बोलशील "
स्पृहा " हो ठीक आहे "
आदिराज जाऊन पटकन दोघांना आईसस्क्रिम घेऊन आला .. आणि त्याच्या बाउल मधला पहिला घास त्याने स्पृहाला भरवला .. " हा माझ्या बायको साठी "
स्पृहा ने पण लगेच तिच्या बाउल मधला एक घास भरवला " हा माझ्या भावी नवऱ्या साठी "
स्पृहाने आईसस्क्रिम खायला सुरुवात केली .. पण आदी काही खाई ना
स्पृहा " तू खात का नाहीयेस ?"
आदी " हे संपलं तर तू लगेच जाशील ना झोपायला .. म्हणून "
स्पृहा " अरे .. खा .. ना .. नाही जाणार झोपायला मी .. लगेच "
आदी " बघ हा "
स्पृहा " होय "
आदी " मला ना खूप आनंद होतोय .. सकाळ पासून आज काय काय घडलंय . आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरात कोरून ठेवण्यासारखा आहे .. माझी स्पृहा मला मिळाली "
स्पृहा " आदी मला खूप भीती वाटतेय .. हे सगळे आपण ठरवलेलं तसेच्या तसे होईल ना .. "
आदी " म्हणून तर माझा भविष्यावर विश्वास नाहीये .. तू माझि आहेस आणि मला आता पासून माझी म्हणून हवी आहेस .. तुला पाहिजे तर आपण उद्याच जाऊन तुझ्या घरी सांगू कि " आम्ही दोघे लग्न केलंय .. आणि आज पासूनच तू माझि बायको म्हणून इकडे रहायला सुरुवात कर "
स्पृहाला धडकीच भरली " नाही नको रे .. आई बाबा खूपच नाराज होतील "
आदिराज " अरे प्यार किया तो डरना क्या ? आणि कधी ना कधी आपल्याला धीर करून सांगावेच लागेल ना .. मग उद्या का नको ?"
स्पृहा " आदी नको रे .. निदान MBA पास झाल्यावर .. बाबांच्या ऑफिस मध्ये नोकरी लागल्यावर अर्धी स्वप्न तरी पूर्ण केल्याचं समाधान देता येईल .. मग कदाचित ते मला तुझ्याशी लग्न करायला आवडीने होकार देतील "
आदिराज " हमम .. ठीक आहे .. झोप आता .. नाहीतर आजारी पडशील .. खूप झोप आलीय तुला "
स्पृहा " हो .. मला इतके जागायची सवयच नाहीये ना सॉरी .. ते आमच्या घरी आम्ही सगळे १० वाजताच झोपतो "
आदिराज " चल .. आत जाऊ .. मी सुनंदाला पाठवतो तुझ्या बरोबर "
दोघे गॅलरी मधून आत आले
आदिराज "तू झोप बेडवर.. मी पांघरूण अंगावर टाकतो तुझ्या आणि जातो आणि तिला पाठवतो "
स्पृहा बेडवर आडवी पडली .. त्याने तिच्या अंगावर पांघरूण टाकले .. तिच्या केसांतून हात फिरवावा असे मनातून खूप वाटत होते त्याला पण .. कदाचित तिला आवडणार नाही म्हणून लांबूनच त्याने तिला " गुड नाईट“असे म्हटले .
आदिराज " स्पृहा .. मी तुझी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे .. फक्त वडिलांच्या धाका खाली मला सोडून द्यायचा विचार करू नकोस .. आणि असे जर काही तू करतेय असे मला जाणवले तर .. माझ्या इतका कोणी वाईट नाही .. हे हि लक्षात ठेव .. मी काही पण करू शकतो आणि मला कोणाचीही भीती पण वाटत नाही हे तर तुला माहीतच आहे "
का कुणास ठाऊक .. झोपताना त्याला हे वाक्य तिला सुनवावे असे वाटले .. एक मन त्याला असे वाटले कि दोन वर्षाचं गाजर तर मला दाखवत नाही ना हि .. सध्याची बला टळली असा विचार करत तर नसेल ना "असा मनातच विचार करू लागला
स्पृहा " आदी .. जरा इकडे ये ... माझ्या शेजारी जरा आडवा पडशील प्लिज ..
तसा आदी चा टोन बदलला " का ग काय झाले ? तू ठीक आहेस ? तू कंफेटेबल आहेस ना ?" बोलतच तो तिच्या जवळ पण जरा अंतर ठेवून आडवा झाला .. आणि वरती रूफ कडे बघू लागला

स्पृहा " मी सगळ्यांत सेफ माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या जवळ आहे .. " म्हणतच त्याच्या दंडावर तिने डोके ठेवले ..
स्पृहा " आदी .. आजच चान्स आहे .. या नंतर २ वर्षांनी ......मला तुझ्या जवळ झोपवशील .. "
आदी " मी हात लावलेला चालेल तुला ?"
स्पृहा " मी फक्त कुशीत घे असे म्हणतेय .. म्हणजे तुला पण खात्री वाटेल कि मी म्हणतेय ते मी खरं म्हणतेय "
आदी " नको .. नाहीतर तू उगाच मला भुंगा बिंगा काही पण समजशील.. मी काही भुंगा नाहीये "
तशी स्पृहा पटकन हसली
आदी " ए .. हसू नको मला " म्हणतच त्याने तिला पटकन त्याच्या कुशीत घेतले ..
दोघांच्या हृदयात धडधड वाढली होती .. एकटक एकमेकांच्या डोळ्यांत पाहत होते ..
आदी " आय लव्ह यु " एकदम हळू आवाजात तो बोलला .. त्याच्या श्वासाने तिला शहारलं
स्पृहा ने दोन्ही हात डोळ्यांवर घेतले आणि लाजत होती
आदी " हॅलो .. आय एम वेटिंग "
स्पृहा " मी नाही .. मला लाज वाटते "
आदी " बोल ना .. फक्त एकदाच .. फक्त एकदाच "
स्पृहा " मला झोप आलीय .." आणि डोळे मिटू लागली
आदीने तिच्या कपाळावर किस केले .. आणि मिठी घट्ट केली .. "थँक यु .. माझ्यावर विश्वास दाखवल्या बद्दल .. हि रात्र मी कधीच विसरणार नाही .. तू माझ्या जवळ आलीस हाच तुझा होकार आहे .. "
स्पृहा रिलॅक्स मध्ये चक्क झोपली होती त्याच्या कुशीत .. तिला खात्री पटली होती कि माझ्या बरोबर माझा आदी काही वेडं वाकडं करणार नाही ..
अशाच असतात या स्त्रिया .. जेव्हा एखाद्याला आपले मानतात तेव्हा त्याला आपले सर्वस्व देऊन टाकतात .. जीव तर ओवाळतातच पण आपले स्त्रीत्व पण बहाल करून टाकायची हि तयारी असते .

🎭 Series Post

View all