स्त्रीत्व भाग १०

Story Of Women S Who Faces Tough Situation
स्त्रीत्व भाग १०

क्रमश : भाग ९

(कथेत पात्र खूप आहेत .. मागचा भाग मला सुद्धा वाचावा लागतो लिहिताना .. तुम्ही पण एक दोन दिवस वाचा म्हणजे लिंक लागेल .. )
संगीता ( स्पृहाची आई ) घरात मुसमुसत रडत होती .. स्पृहा घरी आली नाही ? काय झाले असेल ? या विचाराने ती घाबरली होती .. पण स्पृहाचे बाबा तिला समजावून सांगत होते कि काळजी करू नकोस ? काहीतरी प्रॉब्लेम आला असेल .. "
संगीता " अहो पण तिचा फोन पण तर लागत नाहीये .. स्विच ऑफ येतोय .. फोन कसा काय बंद .. काही प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना पोर .. गेले कित्येक दिवस मी बघतेय कसल्या तरी विचारात असते ती .. बोलत नाही घडाघडा "
बाबा " मी जातो पोलीस स्टेशनला .. मोबाईल चे लोकेशन ट्रॅक करून ते बघतील "
तेवढ्यात आजी बाहेर आली
आजी " श्रीधर .. वेडा झालास का ? अजिबात जायचं नाही पोलीस स्टेशनला ? उगाच आपल्या घराचे वाभाडे आपण काढायचे ? ते पोलीस काय करणार ? उगाच गावभर डंका "
संगीता " अहो आई .. आता पूर्वीचा जमाना नाही राहिलाय ? पोलीस आपल्याला मदत करतील .. आपण तिच्या पर्यंत पोहचू शकतो ? घरात बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा "
आजी " थोडे थांबा .. माझे मन मला सांगतंय .. स्पृहा बरोबर काहीही अघटीत होणार नाही.. उगाच चार चौघात कळू देऊ नका कि आपली लेक अजून आली नाही .. "
संगीता रडत रडत देवापुढे गेली आणि देव पाण्यात घालून बसली.
----------------------------------
सागर त्याचे काम करून नेहमी प्रमाणे निहारिका कडे आला .. दोघे रोज मंदिरात आरतीला जायचे ना म्हणून .. तर आज निहारिका तयारच नव्हती .. कशातच तीच लक्ष लागत नव्हते .. कारण स्पृहाचा आणि तिचा कॉन्टक्ट होत नव्हता .. आणि त्यात संगीताचा मगाशी फोन येऊन गेला होता कि स्पृहा अजून का घरी आली नाही ? तुला काही माहितेय का हे विचारायला ?आणि तिच्याकडे त्याचे उत्तर नव्हते .. तिला स्पृहाची काळजी वाटत होती
सागर " निहारिका .. काय झालं ? अजून तयार नाही झालीस ? आरती मिस होईल आपली ?"
निहारिकाने पटकन आहे त्या ड्रेस वरची ओढणी घेतली आणि त्याच्या बरोबर आरती साठी बाहेर पडली
आरती झाल्यावर तिने देवाला प्रार्थना केली " देवा माझ्या स्पृहाला नीट ठेव .. फक्त आज मी सकाळी तिच्या बरोबर नव्हते तर हे काय झाले देवा ..आरती झाल्यावर दोघे चालत चालत बोलत होते तेव्हा तिने सागरला सांगितले कि असे असे स्पृहा अजून घरी आली नाहीये आणि हे ऐकल्यावर सागरला पण थोडीशी भीती वाटली .. त्याने पण त्याच्या ओळखीच्या दोघांना कॉल करून काही माहिती मिळतेय का बघितली .. तर त्याला कळले कि आज आदिराज कॉलेजला आलाच नव्हता .. त्यामुळे आदिराज ने काही केले असेल असे कोणाला वाटे ना "
सागर " तिचे बाबा पोलिसांकडे जायला पाहिजेत "
निहारिका " त्याची वेळच नाही आली पाहिजे .. देवा .. प्लिज स्पृहाला नीट ठेव म्हणत तिने भरल्या डोळ्यांनी डोळे मिटले
सागर " डोन्ट वरी !! काही होणार नाही तिला .. मी एक काम करतो .. त्या आदीं चा काही कॉन्टॅक्ट नंबर मिळतो का ते बघतो? "असे म्हणून सागर निहारिकाला घरी सोडून त्याच्या एका मित्राला भेटायला गेला..
---------
प्रसाद बेडरूम मध्ये आला तर रागिणी बेड वर आल्रेडी झोपली होती
प्रसाद " आज .. मला इथेच झोपावे लागेल ? म्हणजे ते आई बाबा असे पर्यंत जरा अड्जस्ट कर " असे म्हणतच त्याने बेडरूम चे दार लावले
रागिणी काहीच बोलली नाही
प्रसाद आला आणि पांघरूणाची मोठी वळकटी बनवली आणि बेडच्या मधोमध ठेवून पार्टीशन करू लागला
रागिणी " हि हद्द आहे का ?
प्रसाद " हो .. माझ्यासाठी आहे .. मला लोळायची सवय आहे ना म्हणून " बोलतच तो आडवा पडला बेडवर
रागिणी " प्रसाद .. एक विचारू तुला ?"
प्रसाद " नको ? लाईट ऑफ कर .. मला झोपायचंय "
रागिणी " तू कर बंद .. तू मागून आलास ?"
प्रसाद " पण तुझ्या जवळ आहे ना बटन "
रागिणी " माझ्या प्रश्नाचे उत्तर दे मग बंद करते "
प्रसाद " काय ग किट किट असते तुझी ?"
रागिणी " तुझे बाहेर अफेअर चालू आहे का ?"
प्रसाद एकदम चमकला आणि तिच्याकडे बघितले तर ती त्याच्या कडे धारदार डोळ्यांनी पहात होती
रागिणी "बोल ना " जरा आवाज वाढला होता तिचा पण कापरा हि झाला होता .. नाही नाही म्हणता एक अश्रू डोळ्यांतून खाली पडलाच
प्रसाद " शु ... हळू बोल ना " दात ओठ खाऊन
प्रसाद " आई बाबा आज घरात आहेत .. कळत नाही का तुला ?"
रागिणी " अरे आई बाबा आहेत म्हणून दोन वाक्य बोलू तरी शकतेय मी .. एरवी ती पण होत नाहीत आपल्यात .. घरात फर्निचर आणल्यासारखी टाकून दिलीय तू मला .. कळतंय का ?"
प्रसाद उठला आणि लाईट्स ऑफ करून टाकले त्याने
रागिणी मात्र उशी ओली करत पडून राहिली आणि रडता रडता झोपून गेली
---------------------------------------------------
स्पृहा "आदिराज .. तूला कळतंय का ? रात्रीचे दहा वाजलेत ? माझ्या घरी .. "
आदिराज " हे बघ मी आता काय सांगतो ते ऐक .. आज रात्री तू इथेच रहा .. तुझ्या आई बाबांना फोन करून सांग मी इथे फ्रेंड च्या घरी आहे .. "
स्पृहा पटकन पर्स मध्ये मोबाईल शोधू लागली तर तिला तोच सापडेना ..
आदिराज " बहुदा मंदिरात पडला असेल .. मोबाईल .. तू माझ्या मोबाईल वरून कॉल कर "
स्पृहा " मी नाही राहू शकणार इकडे ? मला घरी जायला हवे आणि ती पर्स खांद्याला लावून निघायला बघत होती
आदिराज " थांब मग मी येतो "
स्पृहा " नाही .. नको .. बाबांना नाही आवडणार "
आदिराज " युअर सेफ्टी इज मोअर इम्पॉर्टन्ट फॉर मी "
स्पृहा " तुझ्या मम्मा ला कॉल करायला सांगू ? माझ्या आईशी त्या बोलतील तर तिला बरं वाटेल "
आदिराज " मम्मा .. नाहीये घरात "
आदिराज " तू कॉल तर कर आधी ?"
स्पृहा " अरे नाही असे होऊ शकत ? मी एका मुलाच्या घरी ? कसे शक्य आहे ? मी नाही असे सांगू शकत "
आदिराज " आमच्या आऊट हाऊसला सुनीता आमची केअर टेकर राहते ती मैत्रीण आहे असे सांग .. आणि इथला ऍड्रेस दे .. वेळ आली तर तिला पण बोलायला सांगू "
हे जरा तिला पटले
आदिराजने सुनीताला बोलावून घेतले आणि तिला सर्व कल्पना दिली
सुनीताच्या मोबाईल वरूनच तिच्या बाबांना कॉल केला..
------------------------
रुक्मिणी आजी झोपून राहिली होती .. आज जेवण पण बनवायचा तिला कंटाळा आला होता .. तेवढयात मोहिनी आली
मोहिनी " आजे .. उठ ग ? काय संध्याकाळच्या टाईमला झोपलीस ?"
रुक्मिणी " काय नाय .. आज जरा थकल्यावानी झालंय "
मोहिनी " किती पैसे कमवलेस ?"
रुक्मिणी " ते बघ त्या टोपलीतच तळाशी हायत बघ "
मोहिनी ने बघितले तर २०० च रुपये होते
मोहिनी " फक्त २०० च " आणि तसेच ठेवून दिले .. राहू दे तुझ्याकडे .. जास्ती कमवलेस कि घेइन मी "
रुक्मिणी " मला काय तो हिशोब कळत न्हाय .. तू ठेव तुझ्याकडं .. मला कशाला लागतायत पैसे "
मोहिनी " आजे .. आज माझा खास सेल झालाय १००० रुपये कमावले .. ३ मराठी , २ हिंदी आणि ५ इंग्लिश बुक विकली .. आज आपण पार्टी करू "
रुक्मिणी " म्हणजे काय करायचं ?"
मोहिनी " चल .. हाटेलात येतेस का माझ्या बरोबर "
रुक्मिणी " न्हाय नको .. हाटेलात उभं तरी करतील का मला ?"
मोहिनी " की एक काम करू ? ईथेच मागवू " आणि मोहिनी ने ऑनलाईन चायनीज ऑर्डर केले "
थोड्याच वेळात चायनीज येत होते
मोहिनी " आजे उठ कि ग .. जेवण येईल आता .. तयारी कर "
रक्मिनी आजी ईच्छा नसताना उठली .. आणि हात पाय धुवून बसली
तेवढयात चायनीज वाला चौकात आलाच मोहिनी फूड घेऊन हौशीने आली .. मग आजीच्या झोपडीत दोघी पार्टीला बसल्या
मोडक्या तोडक्या ग्लास मध्ये कोल्ड ड्रिंक .. जर्मनच्या ताटात नूडल्स सजल्या .. आणि काटा चमचा नव्हता म्हणून हाताच्या बोटांचा चमचा करून दोघी गप्पा मारत खात होत्या .. नवीन काहीतरी करायच्या नादात आजी तिचे आजचं दुःख विसरून गेली ..
------------------------------------

सुनीलला एक क्षण काही कळलेच नाही ..
सुनील " तेजू ... तेजू .. काय होतंय ?"
तशीच सुनील ने तिला उचलली आणि कार मध्ये टाकली आणि लगेच हॉस्पिटल ला घेऊन आला .. गाडी चालवता चालवता फोन वर बोलून ठेवेल्यामुळे डॉक्टर तयारच होते .. लगेच तिला चेक अप ला नेले .. एखादे इंजेक्शन दिल्याव तिला १० /१५ मिनिटांनी शुद्ध आली .
सुनील एकदम नर्वस होऊन बाहेर फेऱ्या मारत होता
सुनील " डॉक्टर नक्की काय झालाय ?"
डॉक्टर " आय व्ही एफ अनसक्स्सेसफुल .. उलट त्यांचे ऑपरेशन करून लेफ्ट ओव्हरी काढावी लागेल .. असे नाही केले तर त्यांच्या जीवाला धोका आहे "
सुनील " मग थांबलात का ? लवकर करा .. तिचे प्राण वाचणे जास्त महत्वाचे आहे "
डॉक्टर " याचे परिमाण काय होतील हे तुम्ही जाणून घेणे गरजेचं आहे ?"
सुनील " म्हणजे ?"
डॉक्टर " म्हणजे .. त्यांचे आई होण्याचे ५० टक्के चान्सेस अजून कमी होतील "
सुनील एकदम सुन्नच झाला
डॉक्टर " आत आजार मिरॅकल झाला तरच तुम्ही पॅरेन्ट होऊ शकता "
सुनील " मी प्रोसिजर करतो .. तुम्ही ऑपरेशनची तयारी करा "
डॉक्टर " ठीक आहे "
सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता.. कसला पप्पा आणि कसली आई .. इथे पैसे तर पैसा जात होता आणि हाती काही लागत नव्हते .. उलटे तब्बेतीची वाट लागत होती .. सुनील आता थकला होता .. डॉक्टर ट्रीटमेंट बघून पण आणि करून पण .. वाईट तर खूपच वाटत होते पण आता मनातून ठरवून टाकले त्याने .. " नो मोअर रिस्क .. आता हि सगळी ट्रीटमेंट थांबवावी .. बस झाले .. नसले बाळ तरी चालेल .. नाही बाप झालो तरी चालेल पण माझ्या तेजुला काही नको होयला ..
ऑपेरेशनची तयारी करून तेजुला भेटायला आला .. जसा सुनील आला तशी तेजू जोर जोरात रडायला लागली ..
तेजू " सुनील , आपले बाळ .. आता नाही राहणार .. सुनील .. मला नाही जगायचं .. सुनील .. "
सुनील काहीच बोलत नव्हता .. सुन्न झाला होता .. तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत बसला होता
सुनील " हे बघ तेजू .. रडू नकोस .. सांभाळ स्वतःला .. आणि घाबरू नकोस .. मी आहे ना तुझ्या बरोबर .. नको घाबरू .. आपण काढू यातून मार्ग .. तू धीर सोडू नकोस "
तेजू " आपल्याच बाबतीत का असे होतंय ? तुला पप्पा नाही बनू दिले मी .. मीच अभागी .. कुठलं दळभद्री नशीब घेऊन आले काय माहित ? " तेजू स्वतः ला कोसू लागली
सुनील " तेजू .. प्लिज वेड्या सारखे नको वागू "
तेवढ्यात डॉक्टर आले कि तिला ऑपरेशन ला घेऊन गेले.

🎭 Series Post

View all