राज्य स्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा
विषय_ स्त्रीला समजून घेणे खरंच खूप कठीण असते का हो?
कथेचे नाव _ स्त्रीचं मन
कथेचे नाव _ स्त्रीचं मन
तर, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. कारण, खरंच स्त्रीला समजून घेणे खरंच खूप कठीण असते.
आदि अनंत काळापासून स्त्रीची असलेली प्रतिमा बदलली असे वाटत असतानाही तिचा प्रवास अतिशय खडतरच आहे.
तूच ग दुर्गा, तू भवानी
संसाराची तूच जननी
घर, कुटुंब, सांभाळणारी
तूच एकटी विश्वजननी
हो, स्त्री म्हणजे साक्षात दुर्गा, वाणीवर वर्चस्व प्रस्थापित करणारी सरस्वती, संसाराचा गाडा ओढणारी एक अष्टभुजा असणारी डोंबारीण... हो डोंबारीणच म्हणू शकते.
जन्मापासून तिला अनेक विविध प्रकारच्या परीक्षांमधून जावे लागते. लेक जन्माला आली तर आपण घरी लक्ष्मी आली असे म्हणतो. पण, त्याच लेकीवर जेव्हा अत्याचार होतो. तेव्हा मात्र आपलं मन पिळवटून निघते. अगदी अश्म युगांपासून ते आजच्या आधुनिक काळातील महिलांमध्ये एका मात्र साम्य आढळतं आणि ते म्हणजे तिच्या मनात असलेली गुंतागुंत.
तिचं मन एका नाजूक फुलांप्रमाणे असते. पण, या वासनाने बरबटलेल्या जगात लेकीला सांभाळणे कठीण होऊन जाते.
बालपणाच्या वाटेवरती
फुले अंथरली प्रेमाची
संरक्षित राहू द्या मजला हो
साद घालते अंतरीची

जेव्हा लबाड लोक आमीष दाखवून ही नाजूक कळी कुस्करून टाकतात. तेव्हा तिचे मन किती आक्रंदन करते. हे त्या नराधमांना कळत नाही.
वाढत्या वयात येणारी समज, आई वडीलांनी पाजलेले बंधनाचे डोस, आजीचे बोधामृत यामुळे तिचे मन चलबिचल होते. स्पर्धेच्या युगात चाललेली ती कुठेतरी भरकटत जाते. घरी असलेली बंधने झुगारून ती मोहमयी जगात वावरतांना बिनधास्त वावरते. पण, तरीही तिच्या मनात चाललेली खळबळ थांबतच नाही. काय योग्य आणि काय अयोग्य या पेक्षाही रात्रीच्या अंधारात दिव्यांच्या प्रकाशाने सारे विश्व उजळून निघते तसे तिचे होऊन जाते.
ईक ज्योती ईक बाती
मझधार में पड़ी है
जाऊ कैसे उसपार
पैरों में शृंखला बंधी है|
असे म्हणतात , एक छोटीशी पणती सगळ्या घरादाराला उजळून टाकते. पण, तरीही उत्तम जाण असलेली, सुशिक्षित आणि गृहिणी मग कोणत्याही स्त्रीला संपूर्ण स्वातंत्र्य मिळतच नाही.
अथांग विचारशक्ती असलेली स्त्री पण तिला न समजून घेता तिच्या वर बंधने टाकून , जबाबदारी टाकून सगळे मोकळे होतात. अपेक्षांचं ओझं घेऊन ती सतत जगत असते. ती न बोलता सगळ्यांनाच समजून घेते. पण, तिला समजून घेणं खरंच इतकं कठीण असते का?
जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर ती आई वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करते, शिक्षण घेते. पण, एरवी सात नंतर घरी येणाऱ्या मुलीकडे आई डोळे लावून बसलेली असते. कारण, या जगात चाललेल्या अत्याचाराचा ती बळी होऊ नये. म्हणजे तिला समजून घेतांना फार कठीण जाते.
स्त्री म्हणजे दुसऱ्यावर विसंबून असूनही दुसऱ्याच्या मतांचा आदर करणारी. स्वतः ला काय आवडते यापेक्षाही आपल्या कुटुंबाची आवड जोपासणारी. स्त्री म्हणजे स्वतः चा आनंद बाजूला ठेवून दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपणारी.
स्त्री म्हणजे कष्ट करून संसाराचा रथ ओढण्यासाठी सज्ज असलेली एक माऊली. स्त्री म्हणजे दिवसभर काबाडकष्ट करून थकलेला जीव अंथरूणावर पडताच उद्याच्या दिवसांची रोजी रोटी कशी मिळेल याचा विचार करत रात्र काढणारी. स्त्री म्हणजे संकटांचे वार झेलून आघात पेलण्यासाठी तयार असलेली. पोटासाठी स्वतः चे शरीर विकून आयुष्य जगणारी स्त्री.
एकंदरीतच स्त्रीचे आयुष्य म्हणजे टाकलेल्या पायघड्यांवर कोणीही चालत यावं. अगदी लग्नाच्या आधी मोकळेपणाने आधुनिक युगातील कपडे घालून वावरणारी ती ... लग्नानंतर तिने साडीच घातली पाहिजे. असा अट्टाहास का केला जातो.
लग्नानंतर तिने असे वागायचे, असेच बोलायचे , अगदी असंच बसायचं. तिला प्रत्येक गोष्टीत पाबंदी. एवढं सगळं ती झेलत असूनही स्त्रीला समजून घेण्यासाठी मनुष्याला कसरत करावी लागते.
अरे, थांबवा हा अत्याचार. दिवसभर घरात गृहिणी म्हणून वावरणाऱ्या स्त्रीला \" तुला काय समजतं? दिवसभर तर तू घरीच असते.\"अक्कल शुन्य\" असे म्हणणारी पुरुष मंडळी असतातच ना. परत रात्र झाली की त्यांच्या अय्याशी साठी ती हवीच असते.
हो स्त्रीला कळतंच नाही. तिचा स्वार्थचं कशात आहे. प्रत्येकवेळी नि:स्वार्थीपणे आपलं कर्तव्य करीत असते. पण, तिचं मन प्रत्येकालच वाचता आले पाहिजे. नकळत का होईना तिला लहान सहान गोष्टीतून आनंद देता आला पाहिजे.
स्त्री म्हणजे गुलाम नव्हे. पण, जेव्हा पुरुष मंडळी तिचं एकही शब्द न ऐकता स्वतः चाच हेका पुढे करतात. मग ती तिच्या मनाविरुद्ध का असेना. तिला हो म्हणावेच लागते.
तेव्हा तिच्या मनात होणाऱ्या, उठणाऱ्या वेदनांवर जर फुंकर घातलीच गेली नाही. तर ती खचत जाते. अशा वेळी तिला समजून घेणे महत्वाचे असते.
जग एकविसाव्या शतकाकडून पुढे चालले असले. तरीही कोणाचीच मानसिकता बदलली नाही आणि बदलायला तयार पण नाही.
न बोलता सारे ती सोसते
शेवटच्या श्वासापर्यंत ती लढते
स्वार होऊनी ओढते संसाराचा गाडा
संकटांना तोंड देऊन समाधानी ती राहते

एकच सांगणे, स्त्रीचा अंत म्हणजे या पृथ्वीचा अंत. या जगाचा अंत.
©®आश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा