सौंदर्य

स्त्री

              सौंदर्य ! स्त्रीला मिळालेली एक अलौकिक देणगी. स्त्री म्हटल की लाजणं, नटन, मुरडणं या गोष्टी आल्याच परंतु हे झालं बाह्य सौंदर्य. परंतु सौंदर्य बाह्य सौंदर्याला जास्त महत्व देण्यापेक्षा अंतर्गत सौंदर्यायाला जास्त महत्व देणे गरजेचे आहे. बाहेरून माणूस कसाही दिसला तरी तो आतून कसा आहे याला जास्त महत्त्व आहे. असं म्हटलं जातं माणूस मळका असला तरी चालेल पण तो जळका नसावा. म्हणजेच बाहेरील सौंदर्यापेक्षा अंतर्मनातील जे सौंदर्य आहे ते खुप महत्त्वाचे आहे. अंतर्मनातील स्वच्छता म्हणजेच इतरांबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा, सर्वांविषयी प्रेम असणं, मनामध्ये कोणाचाही तिरस्कार मत्सर  मनामध्ये धरता सर्वांबरोबर मिळून-मिसळून वागते आणि सर्वांना आपल्याबरोबर पुढे जाऊन पुढे घेऊन जाते तर ते खरं सौंदर्य असं म्हणता येईल. परंतु आता आपण मनातील, अंतर्मनातील सौंदर्य न बघता फक्त बाहेरील म्हणजे बाह्य सौंदर्याला जास्त महत्त्व देतो हा विचार कुठेतरी बदलायला हवा. एखादी स्त्री जर का ती दिसायला छान नसली तरी तिचं मन कसं आहे हे ओळखणं गरजेचं आहे त्यावरून तिची परीक्षा होणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीची परीक्षा आपण तिला बघताच क्षणी करतो परंतु जसे एखादे पुस्तक वाचल्याशिवाय आपल्याला कळत नाही त्याचप्रमाणे एखादा मनुष्य, एखादी व्यक्ती त्या व्यक्तीला नीट समजून घेतल्याशिवाय आपल्याला समजत नाही. म्हणूनच एखाद्या व्यक्तीला नीट समजून घेतल्याशिवाय , तिच्या बाह्यसौंदर्याला जास्त महत्त्व न देता अंतर्मनातील सौंदर्याला जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे. तसेच तिचा पराक्रम , शौर्य या गोष्टींनाही तीतकच महत्त्व आहे.  दृष्टी नाही दृष्टिकोन चांगला असायला हवा. 
      कुमारी - स्नेहल गोविंद चव्हाण, देवरूख 

🎭 Series Post

View all