Login

स्त्री सुरक्षितता

स्त्री सुरक्षितता
स्त्री सुरक्षितता

स्त्री सुरक्षित आहे कां?
रोजचा पेपर उत्तर देतो
अत्याचार विनयभंगाच्या बातम्या
स्त्री सुरक्षित नाही हेच सांगतो...

कुठे गेले संस्कार, मूल्ये?
विचार करण्याची वेळ आहे
स्वतःच मजबूत बन नारी तू
स्वतः स्वतःची काळजी घे...

रोज जातात निष्पाप बळी
खरंच सांगा दोष कुणाचा
खून,अत्याचार शरीराचे तुकडे
अक्षरशः थरकाप पडतो मनाचा...

दुसऱ्यासाठी जगणं ही दुर्बलता?
संवेदनशीलशील वृत्ती ही दुर्बलता?
स्त्री अत्याचाराचे वाढते प्रमाण
बदलली नाही समाजाची मानसिकता.

सौ. रेखा देशमुख