
रेवा तेवीस वर्ष तरुणी ,तिचे आई बाबा तिच्यासाठी स्थळ पाहत होते ..रेवा दिसायला नाकी डोळी नीट, आणि स्वभावही तिचा मनमिळावू होता.तिच्या गोड स्वभावामुळे खूप मैत्रिणी होत्या... बोलकी होती जे मनात एक...तेच तोंडात..तिला मनमोकळेपणाने बोलायला आवडायचे.....
तिला छान स्थळ चालून आले.. आकाश नाव होते मुलाचे.. डॉक्टर होता... घरात तो आई आणि बाबा ....छोटसं कुटुंब ,सुखी कुटुंब.. आकाशला रेवा खूप आवडली..त्याने जराही वेळ न घालवता तिला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली.. रेवाला तर स्वप्न असल्यासारखं वाटत होतं कारण त्याने अगदी न घाबरता,तिच्या आईने बाबांना मला रेवा खूप पसंत आहे तिला मी नेहमी सुखात ठेवील बोलला......
रेवाला त्याचा धीटपणा खुप आवडला ,तिनेही आणि तिच्या आई बाबांनी जराही आढेवेढे न घेता लग्नाला संमती दिली......
दोघांनी जवळच्या मोजक्या लोकांसमोर लग्न केले. तसही कोरोनाच सावट होते.... म्हणून कोणालाही बोलावता आले नाही....
आकाश तिला खूप जीव लावायचा...तिला कुठे ठेऊ आणि मग कुठे नाही असे झाले होते.... सासुपन तिला लेकीप्रमाणे जीव लावायची ,तिची लेकीची हौस सुनेमध्ये भागवत होती.. सतत काही ना काही वस्तू रेवासाठी आणायची... आणि सासरा तर अगदी तीच कौतुक करताना थकत न्हवता. त्यांचा परिवार रेवाच्या येण्याने पूर्ण झाला होता.....
दोघांचा संसार सुरू झाला...आता रेवा छान सून म्हणून कर्तव्य पार पाडत होती.... आकाशचा पूर्ण दिवस हॉस्पिटलला जायचा.नव्याचे नऊ दिवस वेगळेच असतात.....पण आकाशच्या कर्तव्यापोटी त्यांने एकही दिवस सुट्टी घेतली नाही.....रोज हॉस्पिटलला जायचा...
दुधात माशी पडावे असे झाले एक दिवस ....
एक दिवस आकाशला आणि त्याच्या आईला खोकला ,सर्दी ताप आला...आकाशला शंका आली त्याने लगेच रिपोर्ट काढले पाहतो तर काय दोघांचे रिपोर्ट पोसिटीव्ह होते.... त्याने रेवाला सांगितले.. तू माहेरी जा थोड्या दिवस ...आमच्यामुळे तुला त्रास नको...
पण ती हार मानणाऱ्या मधली न्हवती... तिने त्याला स्पष्ट सांगितले, काहीही झाले तरी माझं घर मी नाही सोडून जाणार आता ..हेच माझं घर आणि सर्वस्व आहे..तुम्ही दोघं लवकर बरे व्हाल आणि नक्कीच लवकर याल...आकाशला खूप बरं वाटलं.. खरंच अश्या मुलीबरोबर लग्न झाले जी फक्त सुखात नाही तर दुखातसुद्धा साथ देत आहे......
रेवा रोज जाऊन त्यांना काढा द्यायची, immunity वाढावी म्हणून dry fruit ,फळे..सतत फोन करायची.. इथे तिचे सासरे खचले होते. बायको आणि मुलगा दोघ कोरोना पोसिटीव्ह असल्यामुळे ,पण रेवा मात्र त्यांना सतत धीर देत राहिली.. त्यांचीही काळजी घेत राहिली.. रेवा खऱ्या अर्थाने सासरी एकरूप झाली....तीच हे रूप पाहून सासरे सुद्धा देवासमोर सतत हात जोडत होते आणि आभार मानत होते.. की रेवासारखी गुणी मुलगी आपल्या घरी आली......
रेवापण आतून तुटली होती,पण तरीही न जाणे का,आकाशच प्रेम जणू तीला मजबूत बनवत गेलं....रात्री रडायची पण पुन्हा सकाळी उठली की पूर्ण प्राण पणाला लावून ती धडपड करत होती...सतत ती आकाशला फोन लावायची आणि लवकर बरे व्हाल बोलायची, सासुलाही "आई लवकर बरं व्हायचं आहे हा तुम्हाला ,घराचा कारभार आपल्या दोघींना पाहायचा आहे..आणि बाबा आणि मी तुमच्या हातच्या पुरणपोळ्या खाण्यासाठी वाट पाहत आहोत.....
सतत रेवा सकारात्मक बोलत राहायची...आकाशला आणि आईला घराची ओढ लागली...दोघांचे रिपोर्ट काढण्यात आले.....ह्यावेळी negative आले रिपोर्ट... रेवाला आकाशने लगेच फोन करून संगीतले....रेवाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येऊ लागले.... तिने सासऱ्याला लगेच बातमी दिली ,सासरा आणि सून दोघांनी जोरदार तयारी केली......
जेव्हा आकाश आणि आई आली तेव्हा तिने दारातच दोघांनाही ओवाळले....
आकाशल रेवाला पाहून खूप रडु लागला .....त्याने तिला घट्ट मिठी मारली.. सासुनेही तिचे मुके घेतले ....खूप ह्रदयस्पर्शी क्षण होता तो...
रेवाने अगदी घर वाढदिवस असल्यासारखं सजवलं होत... मस्त cake बनवला होता.... आकाशने आणि त्याच्या आईने cake कापला...आणि आधी रेवाला भरवला...कारण आज जो पुनर्जन्म भेटला होता तो रेवाच्या सकारात्मक वर्त्तीमुळे.......रेवाने स्वतःच्या ह्या स्वभावाने सर्वांची मन जिंकली ती नेहमीसाठी.. ती सून नसून मुलगी झाली होती.......
ही एका प्रकारे रेवासाठी अग्निपरीक्षा होती,तिने माहेरी न जाता तिने आपल्या सासरीच भक्कमपणे ,धीर धरून संसाराची लढाई लढली आणि विजयीही झाली.....
हाच असतो ना संसार ,ज्यात स्त्री प्रत्येकाला धरून ठेवते..ती सुद्धा हतबल होते,पण तरीही ती त्यातून नक्कीच मार्ग काढते, आशा नाही सोडत... कितीही संकट आली तरी ती आतून तुटत नाही फक्त लढत राहते जोपर्यंत तिचा विजय होत नाही
अश्या सर्व रेवांना मनापासून सलाम
अश्विनी पाखरे ओगले
लेख अवडल्यास लाईक ,कंमेंट आणि नावासहित शेअर करा.
मला नक्की फॉलो करा...