Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

लेखणीचे बळ

Read Later
लेखणीचे बळ


लेखणीचे बळ

\"प्रेमाने जग जिंकता येतं\" असे म्हणतात. दुसरीकडे त्याच विचाराने असंही म्हणता येतं की\" लेखणीने संपूर्ण जग जिंकता येतं.\"जगातील मानवाच्या विचारधारा बदलविता येतात.
जगातील अनेक विचारवंतांच्या लेखणीची ताकद आज पर्यंतच्या अनेक राज्यकर्त्यांनी अनुभवलेली आहे.
तलवारीने हिंसा घडवल्या गेली. हिंसेने रक्तपात होऊन अनेक राष्ट्रे उलथविल्या गेलीत. शस्त्राने हिंसा घडविल्या जाते.
परंतु लेखणीला आपण शस्त्र म्हणू शकत नाही.... ते एक अस्त्र आहे. आणि अस्त्र हे शस्त्रापेक्षाही जहाल असतं.

एका विशिष्ट विचाराच्या साप्ताहिका चं
घोषवाक्य आहे.

खिंचोना कमान को
न तलवार निकालो
जब तो प मुकाबिल हो
तो अखबार निकालो
वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये लेखणी द्वारे अग्रलेख, स्तंभ किंवा आपली मते मांडून समाजाच्या विचारधारा बदलविण्याचे काम होते. वेगवेगळी साप्ताहिके, मासिके हे सुद्धा समाज प्रबोधनाचं काम करतात.
याद्वारे लोकांमध्ये मतपरिवर्तन होऊन ते चिराकाल टिकते.
नरेंद्र दाभोळकर, पानसरे व अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजातील अनिष्ट, अमानुष, अघोरी प्रथांना समाजातून नष्ट करण्यासाठी आपल्या ज्वलंत लेखणीला बळ देऊन प्रसंगी स्वतःचा बळी दिला.

अनेक थोर पुरुषांनी जी ग्रंथसंपदा स्वतःच्या लेखणीने लिहून ठेवली आहे ती आजही चिरकाल टिकणारी आहे.
लेखणीने च वाल्मिकी यांचं रामायण आणि व्यासांचं महाभारत अजरामर झालं.
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि पसायदान अजरामर झालं
महात्मा गांधींच्या लेखणीने संपूर्ण जगाला वेड लावलं. त्यांचे विचार आजही आत्मसात केल्या जातात.

लेखणी हे असं अस्त्र आहे की ज्यामुळे अनेक सकारात्मक मूल्यांची निर्मिती होते. लेखी शब्द शस्त्रांपेक्षा अधिक सामर्थ्यवान असतात.
लेखणीची शक्ती आशा, प्रेरणा आणि प्रोत्साहन देते.

लेनिन ने आपल्या लेखणीने आपले विचार रशियाच्या मनावर बिंबवून रशियाला महाशक्ती बनवले.
महान व्यक्ती मृत्यू पावतात. परंतु त्यांच्या विचारांनी त्यांच्या लेखणी द्वारे ते अजरामर होतात.

म्हणून लेखणीची ताकद जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ती तळपतच राहणार.


छाया राऊत ( बर्वे)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Chhaya Raut

//