Dec 06, 2021
प्रेरणादायक

स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा मुखवटा

Read Later
स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा मुखवटा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

आजच्या स्त्रियांना खरंच स्वातंत्र्य मिळाले आहे का??हा एक मोठा प्रश्न आहे,खरतर स्त्रियांना फक्त नावापुरते स्वातंत्र्य मिळाले असून आजही स्त्रिया या मनमोकळे पणाने जगू शकत नाही...

लहानपणापासूनच आपण आपला भारत देश हा पुरुषप्रधान आहे हे ऐकतच मोठे झालोत,आणि आजही स्त्रिया या कितीही मोठ्या पदावर असल्या तरी जास्तीत जास्त ठिकाणी त्यांची सर्व सूत्रे पुरुषाच्या हाती असतात,म्हणजेच जसे ते म्हणतील तसे च वागावे लागते अन्यथा मानसिक त्रासाला बळी पडावं लागतं...

तर अशीच एक कहाणी ...
समीरा एक दिसायला सुंदर अशी देखणी स्त्री,शिक्षिका म्हणून कार्यरत होती,ती ज्या शाळेत होती तिथे पुरुषांचा जास्त समावेश होता,...आणि अर्थातच पुरुषांचे वर्चस्व देखील होते,तिच्या शाळेत जसे पुरुष वर्ग म्हणेल तसेच होणार,हे तिला बऱ्यापैकी माहीत होतेच,पण तरीही ती स्वतःच्या कल्पना,विचार सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायची...

पूर्ण स्टाफ मध्ये ती एकटीच महिला होती,त्यामुळे तिचा आवाज कुठेतरी दबून जायचा,आणि ती बोलली कीवा नाही बोलली तरी फार काही कोणाचं बदलायचे नाही,....डोक्याने अतिशय हुशार अशी समीरा, कॉलेज जीवनात सुवर्ण पदक मिळवलेली,पण या सामान्य शाळेत तिची काहीच किंमत नव्हती,...ती कोणालाच महत्वाची वाटत नसे.....

महत्वाचे होते तर ते फक्त तिचे सोंदर्य म्हणजेच ती इतकी सुंदर होती की एकदा का जर कोणाची नजर गेली तर तिच्यावरून नजर हटत नसे,आणि मग काय शाळेत असे ही काही लोक होते ज्यांना तिची सुंदरता दिसायची,....आणि त्या नजरा मग तिला असहणीय होत होत्या,पण करणार काय शेवटी नोकरी म्हटली की कितीतरी संकटांना सामोरे जावेच लागते असे म्हणत ती स्वतःची समजूत काढत असे..,..

प्रश्न होता तो स्त्रियांच्या मान सन्मान चा,स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा,...स्त्रियांना देखील पुरुषानं समवेत समान हक्क,अधिकार आहेत हे दाखुन देण्याचा,पण खालावलेली विचार काय समजू शकणार या गोष्टी....

समीरा नेहमीच स्वतःचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत असे पण तिच्या विचारांशी कोणालाच घेणेदेणे नव्हते,समीरा काहीपण बोलली की....लगेच समोरून उत्तर यायचे...राहू द्या मॅडम तुम्हाला नाही जमायचं,आहो बायांना नाही जमत ते,असे म्हणून तिला नेहमी गप्प बसविल्या जायचे....तिला सर्वांच्या अशा वागण्याचा खूप कंटाळा आला होता,,,आणि आता तिला कळून चुकलं होतं की स्त्रियांना स्वातत्र हे फक्त कागदोपत्री,अजून काही अमलात आले नाही....

मुलांना शिकविल्या जात होत की स्त्री पुरुष समानता आहे स्त्रिया या पुरुषांपेक्षा कमी नाही,मग आपल्या शाळेतील शिक्षकांचे असे विचार का??याचे उत्तर समीरा ला मिळत नव्हते,तिच्या शाळेतील लोक हे स्त्रियांना अजिबात भाव न देणारे होते,,पण आता करावे काय हे तिला काहीच सुचत नव्हते....

म्हणून तिने जास्त विचार न करता जे होईल त्यातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा असे ठरविले,...आणि अशातच एके दिवशी शाळेमध्ये शाळेची तपासणी करायला वरचे अधिकारी साहेब आले,अन् त्यांनी सामाजिक,बोधिक,व आजच्या युगातील...काही प्रश्न विचारले असता त्या प्रश्नांची उत्तरे कोणालाच येत नसल्याचे समोर येत असताना अचानक आवाज आला,थांबा सर ....मागून समिराने आवाज दिला....व अधिकारी जे ही प्रश्न करायचे त्याचे अचूक उत्तर ती देत होती,येवढेच काय तर तिच्या उत्तरांना खुश होऊन साहेबांनी शाळेला प्लस कॅटेगरी देऊन शाळेचे महत्त्व वाढवले....

आणि त्या दिवशी सर्वांना कळलं की स्त्री ही पुरुषापेक्षा हुशार तर असतेच,पण कोणत्याही वाईट परिस्थीचा मार्ग हा एका स्त्री कडेच असतो,आणि स्त्री त्यातून नक्की बाहेर पडते...स्त्री काही पुरुषांपेक्षा कमी नसते,...

सर्वांना समीरा चे महत्व कळले व आता सर्व पुरुष शिक्षक समीरा सोबत आदराने वागत असे,...व समीरा ही आपल्या नवनवीन कल्पना वापरून शाळेत सर्व सुख सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत असे.....


Ashwini Galwe Pund....

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ashwini Galwe Pund

Teacher

I am simple living women