Mar 01, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

स्त्री स्वातंत्र्य

Read Later
स्त्री स्वातंत्र्यआपल्या देशासाठी अनेक शहीद झालेल्या सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आपल्या देशात अनेक शूर वीर होऊन गेले. जसे की स्वातंत्र्यवीर सावरकर,भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद,वासुदेव बळवंत फडके,नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सरकार विरोधी बंड पुकारले.
आज आपला देश स्वतंत्र झाला आहे,पण खरंच आजची स्त्री स्वतंत्र आहे का? तिला तिच्या मनाप्रमाणे जगता येत का? जर का एक मुलगी शाळेत जात असेल तेव्हा तिला हवे वागता येतं? महाविद्यालयात असते तेव्हा किती मुलांच्या नजरा असतात तिच्यावर. किती मुलं वाईट नजरेने बघत असतात. तिला आपण \"सातच्या आत घरात\" अशा नियमांच्या चौकटीत बंदिस्त बनवतो. एका मुलीची आणि एका मुलाची मैत्री असेल तर ते प्रेमातच असतात अशी या समाजाची धारणा असते. म्हणजे एका मुलीला मुलांशी मैत्री करण्याचं स्वातंत्र्य आजही नाहीच.
एक मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा तिथे तिला स्वातंत्र्य मिळेलच असे नसते. लग्न होण्याच्या आधी आई वडील म्हणतात की \"तुला हवं तसं रहा पण तुझ्या नवऱ्याच्या घरी. तो तुझ्या पाठीशी असेलच कि. तो तुला देईल की सगळं स्वातंत्र्य.\" पण होते उलटेच, काही लोक असतात जी मुलींना स्वतंत्र राहू देत नाहीत. जगात अशीही लोक आहेत जी स्त्रीला खूप शिकून मोठ करतात. तिला मोठ्या प्रमाणात समर्थन करत असतात.
आता एक उदाहरण देते की \"एक मुलगी होती. तिला खूप शिकून मोठ व्हायचं होतं,पण तिच्या घरचे तिला म्हणाले की, "लग्न झाल्यावर शिक काय शिकायचे ते." आणि त्यांनी तिचं बारावी झाल्यावर लगेच लग्न करून दिलं. लग्नानंतर जेव्हा तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की,\"मला पुढचे शिक्षण घ्यायचे आहे.\" तेव्हा तिला त्याने स्पष्ट नकार दिला. मग तिने विचार केला की,\"आता नाही तर थोड्या दिवसांनी आपण आपले शिक्षण घेऊ.\" मग काही दिवसांनी म्हणजे दोन वर्षे गेल्यानंतर तिने स्वतःहून महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर तिला पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी जायला लागणार होते, तेव्हा तिच्या घरचे तयार झाले नाहीत, कारण त्यांना वाटते की आपली सून आता बाहेर जाणार, मग शेजारचे लोक बोलणार की सुनेला बाहेर शिकायला पाठवून दिले. आता काय ती पुढे शिकून नोकरी करणार मग मुलगा घरगडी बनणार त्यात ह्यांना मुलं कधी होणार? म्हणून तिला पुढच्या शिक्षणासाठी जाऊ दिलं नाही.
जर सगळ्यांनीच असा विचार केला तर कसं होईल?
असाच विचार भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या घरच्यांनी केला असता तर आज त्या राष्ट्रपती झाल्या असत्या का? कल्पना चावला अंतराळात गेल्या असत्या का? झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या घरी पण असा विरोध केला तर त्या राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या असत्या का? छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर जर महाराणी ताराबाई तलवार घेऊन बाहेर पडल्या नसत्या तर हे हिंदवी स्वराज्य टिकलं असतं का? काही ठिकाणी स्त्रीला स्वातंत्र्य नाही तर काही ठिकाणी पुर्णपणे त्या स्त्रीवर विश्वास ठेवून त्यांना हवे ते करून देतात. त्यांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. आता देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली तरी प्रत्येक ठिकाणी स्त्रीला स्वातंत्र्य नाही. सरकारने महिलांसाठी ५०% आरक्षण लागू केलं,पण ते सत्यात उतरताना जास्त दिसत नाही. काही ठिकाणी महिलांना घरी डांबून ठेवले जाते. हे स्वातंत्र्य नाही. अशा स्त्रिया आजही पारतंत्र्यात जगत आहेत.
काही घरातील मुलं ही सैन्यामध्ये असतात. ते तिकडे सीमेवर असतात. प्रत्येक ठिकाणी ते आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत,तेव्हा त्यांचे कुटुंबीय गावाकडे राहत असतात. मग काही लोक म्हणतात की फौजी सीमेवर असताना त्याच्या बायकोने घरी बसले पाहिजे. कुठे जायचं नाही, कोणा परपुरुषाशी बोलायचं नाही. जर का ती काही कामानिमित्त परपुरुषांशी बोलली तर लोक लगेच संशय घेत असतात. बुरसटलेले विचार असणाऱ्या समाजातील हे कोणतं स्वातंत्र?

घराण्याची परंपरा,रूढी, चालीरीती अशा पांघरूनाखाली स्त्री आजही गुलामगिरीत कुढत आपलं आयुष्य काढत आहे. जिला ना कोणता निर्णय घ्यायचा अधिकार आहे ना कोणतं मत आहे. दुनियादारीच्या रहाटगाडग्यात त्यांची आजही फक्त पिळवणूक होतं आहे.
आज देश महासत्ता म्हणून उदयास येत आहे, पण स्त्री आजही गुलाम आहे, कोण करील तिला या गुलामगिरीतून मुक्त? स्त्रीला कधी मिळणार खरे स्वातंत्र्य?


कोणाकडे उत्तर असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

ईरावरील एक नवखी लेखिका
सौ. पल्लवी ढवळे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

@swapallu

Blogger

✍️Intention is very important in every action in my life ✍️

//