Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

मनस्विनी मी

Read Later
मनस्विनी मी


लेखन स्पर्धा
गोष्ट छोटी डोँगराएवढी

आकाशी झेप घे रे पाखरा

चांदणी चौकातल्या त्या अरुंद गल्लीतुन सुमन जेव्हा शाळेतुन घरी चाललेली तेव्हा रस्त्यावरची टारगट मुले तिला जरासा स्पर्श करता यावा म्हणून एकमेकांना ढकलत होती. सुमन त्या सगळ्यांना कटवुन आपल्या घरी पोचली आणि तडक वर माळ्यावर जावुन रडत बसली.

सुभद्रा शेजारुन आली तेव्हा तिला जाणवले सुमन खाली उतरलीच नाहीय जेवायला म्हणून ती वर गेली तर सुमनचे डोळे रडुन सुजलेले आणि आईला बघुन तिला अजुनच उमाळा आला. "आई....."

सुमनच्या या आर्त हाकेने काय झालं हे तिच्या लक्षात आलं. तिने सुमनला जवळ घेतलं आणि सुमन ओक्साबोक्षी रडु लागली. शाळेत जाणारी आपली पोर या वस्तीत कशी सुरक्षित राहील याचा सुभद्रेला सदाचा घोर लागलेला होता कारण पोटासाठी इथे सगळ्याच बायका आपला देहविक्रय करत होत्या आणि आपल्या मुलीला या खाचरातुन बाहेर काढायला सुमन धडपडत होती.

सुमनचा बाप कोण हे स्वतः सुभद्रेलाही सांगता आले नसते कारण जेव्हा तिला फसवुन विकलेले तेव्हा किती जणांनी तिच्यावर अत्याचार केलेले याची तिला शुद्धच नव्हती. ती जेव्हा पोटुशी राहिली तेव्हा तिने हे मुल पाडायला खुप प्रयत्न केले पण शेवटी सुमन या जगात आलीच आणि तिला घेवुन सुमन एक दिवस तिथुन पळाली पण शेवटी अशाच दुसऱ्या वस्तीत येवुन पोचली.

आपल्या मुलीला ती डोळ्यांत तेल घालुन जपत होती. आपल्यासारखे आयुष्य आपल्या मुलीच्या वाट्याला येवु नये म्हणून धडपडत होती. आज सुमनच्या शाळेतल्या बाईंनी तिला एक नंबर दिलेला आणि त्या नंबरवर बोलायला सांग आईला म्हणून तिला सांगितलेले.

सुभद्रेने त्या नंबरवर फोन केला

"हॕलो...मी सुभद्रा परबबाईंनी हा नंबर दिलेला मला सुमनविषयी बोलण्यासाठी..."

"हो बोला ना...मी राधिका साने...मी लहान मुलांसाठी काम करते....अशा वस्तीतल्या मुलांसाठी पाळणाघर चालवते....त्यांना शक्य असेल तर हाॕस्टेलवर ठेवण्यासाठी देणगी मिळवते....जिथे अशा मुली शांत आणि सुरक्षित वातावरणात वाढतात....शक्य असल्यास दत्तकही देतो मुले....तुम्ही ठरवुन सांगा मला...."

सुभद्रेच्या मनावरचे ओझेच उतरले एकदम..."ताई मी उद्या शाळेत येते तुम्ही तिथे याल का आपण ठरवुया नक्की काय ते...." सुभद्रा लगेचच म्हणाली.

दुसऱ्या दिवशीच सुभद्रा सुमनला शाळेतुन राधिकाशी आणि परबबाईंशी बोलुन सरळ राधिकाच्या पाळणाघरात सोडले आणि तिथुन तिची रवानगी चांगल्या हाॕस्टेलवर झाली.

सुमन हुषार होती अभ्यासात आणि आता तर शांत निवांत अशी ती भरपुर अभ्यास करुन भराभर परिक्षा पास होत गेली आणि छोटीशी नोकरी करुन तिने आपले शिक्षणही उत्तम गुणाने पुरे केले...राधिकाताईंच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने आज ती चांगल्या सरकारी नोकरीत लागली आणि आज तिने तिच्या आईला घेवुन एका चांगल्या वस्तीत सरकारी घरात फ्लॕटमधे गृहप्रवेश केला.

एक दिवस तिच्या आईने तिला "आकाशी झेप घे रे पाखरा" म्हणून घराबाहेर उडायला पंख दिले आणि त्या पंखात बळ राधिकाताईंनी भरले. आज उलट झाले आज सुमनने आपल्या आईला त्या वस्तीतुन बाहेर काढुन आईला विहरायला आभाळ कवेत आणुन दिले आणि आईचे पांग फेडले.

सायली ज चव्हाण
सानपाडा
नवी मुंबई
9820495434
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

SAYALI CHAVAN

//