Login

रमणीय आठवणी भाग - ३

रम्य त्या आठवणी

मैत्रिणींनो सुरुवात करते बालपणीच्या  आठवणींपासून .....

रम्य ते बालपण उगाच म्हणत नाही हळुवार मंद वाहणारा वारा त्या वाऱ्याने पानांची होणारी सळसळ, सुंदर नाजूक फुले व त्याचा परिमल, उगवत्या सूर्याची कोवळी किरणे, चंद्राची हसरी प्रतिकृती चांदण्यांचे बुढीचे खाटले ,बाहुला-बाहुलीची लगीन घाई. लंगडी, गारगोटी, कंची, चंगा - अष्टा  खेळताना भरणाऱ्या मैफिली ,  पेल्याने दूध पिताना ओठांवर येणारी पांढरी मिशी व त्या मिशीला थाटात मिरवणारे बालपण... खरंच या सर्व गोष्टींचे  एकत्र येणे यालाच रम्य ते बालपण म्हटल असेल का? हो नक्कीच ....मला आठवतं ते बालपण  म्हणजे मैत्रिणींसोबत होणारे रुसवे-फुगवे  व त्यातून होणारी  कट्टी, दो केल्याशिवाय न मिटणारी भांडण  आणि हो तेही लाघवी  म्हणजे नक्कीच बालपण ...मोठ्यांनी घेतलेले गालगुच्चे, घरून निघताना पाहुण्यांनी हातावर ठेवलेला एक रुपयाचा खाऊ आणि त्या खाऊ तून दहा पैशाचे खाल्लेले चुरमुरे आठवतात ना! आजच्या कॅडबरी ला लाजवेल असा गोडवा होता त्या पेपरमिंटच्या गोळी मध्ये  उगाचच म्हणतात का.....

                   लहानपण देगा देवा

                    मुंगी साखरेचा रवा

हेआठवल्यावर मला त्या बालपणीच्या आठवणींचा ठेवा आठवतो आणि खरंच मला बालपणातील त्या अनमोल ठेव्याचा हेवा वाटतो.

चला तर मग त्या बालपणीच्या आठवणींना थोडा उजाळा देऊ या आणि आठवणींच्या प्रवासातील एक एक  पैलू उलगडू या आणि हो... या आठवणींच्या दिव्य स्वप्नात रमूया ,या आठवणींच्या दिव्य स्वप्नात रमूया......

🎭 Series Post

View all