
मैत्रिणींनाे अनुभवलात का आठवणींचा गारवा.....
तुम्ही जुन्या आठवणीतील आठवणींना उजाळा देत
एका नविन आठवणीची साठवण केली असेल.
पुढील उन्हाळ्यातील गारव्याकरिता. कधी कधी छान वाटत ना
स्वतःमध्ये रमायला. दुनियेच्या या मोहमायेच्या श्रृंखलेतून अलगद
बाहेर पडायला. तेच विषय,त्याच गप्पा अधिकच कंटाळवाणे
वाटते.त्यावेळी काय हरकत आहे कधीतरी नविन विषय छेडायला.
कुठूनतरी शब्द येतील कानी वेडी झालीस का? एकटीच हसतेस!
मनातल्या मनात एकटीच बडबडतेस! लावू दया त्यांना अंदाज ,करू
दया विचार ...मनाला लावा फुलपााखराचे पंख
आणि हुंदडू दया आठवणींच्या बागेत स्वच्छंदपणे. बघा मैत्रिणीनो
स्वत: अनुभवा हा आठवणींचा हवाहवासा वाटणारा कधीही न
संपावासा वाटणारा हा प्रवास .या प्रवासात कुठे जायचे व कुठे
थांबायचे हे तुमचे तुम्ही ठरवायचे . जिवनात दु:खातही आनंद कसा
निर्माण करायचा यातूनच शिकायचे. हे यातूनच शिकायचे.
.