संकेत भाग एक.

कथा मालिका


कथेचे नाव : संकेत.


भाग एक


आदी अरे किती उशीर कधीची हाक मारते मी तुला येतोस ना जेवायला ?? हो आई आलोच. आई दे बरं मला पटकन जेवायला मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. हो ते नेहमीचच आहे आदी डबा तयारच आहे तुझा. तू सवय करून घे ना आई या सगळ्याची आता आणि मी किती वेळा सांगितलं आहे तुला ऑफिसला जाण्याआधी जेवणाचा घाट घालत जाऊ नकोस पण तू ऐकत नाहीस. तू डबा रोज तसाच परत आणतोस कधीच जेवत नाहीस, म्हणून मी हट्ट करते आणि मला सांग तू जेवलास तर ते माझ्या पोटात जाते का ?? ते सगळं ठीक आहे आई पण ऑफिसमध्ये इतके कस्टमर असतात , लोक तासन् तास वाट पहात बसलेली असतात, मग त्यांना सोडून जेवत बसणे बरं दिसत नाही ना ?? म्हणूनच सांगते जरा खाऊन जात जा. 


पण काय रे आदी तुझ्या भविष्य आणि वास्तूशास्त्रच्या अभ्यासाला इतकी मागणी आहे का की लोकं जास्त पैसे देऊन तुझ्याकडून मत मागतात ?? हो म्हणजे काय आई आजकाल लोकांच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत ना की सगळे प्रयत्न करून शेवटी लोक इथेच येतात आणि बऱ्याच लोकांचा यावर अजूनही तितकाच विश्वास आहे. नेहमीप्रमाणे बोलत बोलत त्याने चार घास पोटात कोंबले आणि आदी पळाला.


🎭 Series Post

View all