Login

गोष्ट एका आयुष्याची भाग 1 - जन्म

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
1. जन्म

"जान्हवीच्या पोटात दुखायला सुरुवात झालीये अविनाश, तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं.", शालिनीताई आपल्या मुलाला सुनेच्या काळजीने म्हणाल्या.

दोघेही जान्हवीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून तिला ऑपेरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं.
शालिनीताई जान्हवी आणि बाळ दोघेही सुखरूप असावेत म्हणून देवाचा धावा करत होत्या. ऑपेरेशन थिएटर ची लाईट बंद झाली आणि डॉक्टर बाहेर आले, त्यांनी जान्हवीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं. आम्ही बाळ किंवा आई दोघांपैकी एकालाच वाचवू शकतो, बाकी सगळं त्या परमेश्वराच्या हातात आहे.

डॉक्टरांचं बोलणं ऐकून अविनाशला काय बोलावं तेच कळत नव्हतं. जान्हवीला वाचवा असं तो आणि शालिनीताई दोघेही म्हणाले. डॉक्टर तडक आत निघून गेले आणि त्यांनी जान्हवीला वाचवायचे प्रयत्न सुरु केले. शालिनीताई देवाचा आणखी धावा करू लागल्या. आणि अखेर त्यांची हाक देवाने ऐकली.

नर्स बाळाला घेऊन बाहेर आली, "अभिनंदन!!! तुम्हाला मुलगी झाली आहे". "जान्हवी कशी आहे", अविनाशने विचारलं.

"सुखरूप आहेत त्या", नर्सने स्मितहास्य करून सांगितलं.


"शुद्धीवर आल्यावर तुम्ही त्यांना भेटू शकता." नर्सने सांगितलं.


"तुमचं नशीब आणि देवाची कृपा म्हणूनच आज आई आणि बाळ दोघं सुखरूप आहेत, असे चमत्कार खूप कमी होतात. " - डॉक्टर


शालिनीताईंनी आणि अविनाशने डॉक्टरांचे आभार मानले आणि बाळाला आपल्या हातात घेतलं.


बाळ शांत झोपलं होतं. जान्हवीला शुद्ध आली तशी ती बाळाची विचारणा करू लागली. अविनाशने बाळाला तिला दाखवलं तेव्हा पहिल्यांदा तिने आपल्या बाळाला पाहिलं. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते.

🎭 Series Post

View all