Dec 05, 2021
प्रेम

एका प्रेमाची गोष्ट - Part 9

Read Later
एका प्रेमाची गोष्ट - Part 9

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

Part 9

मागच्या पार्टमध्ये....

प्रदीप सरांचा निरोप समारंभ होतो. 

श्रुती आणि निनादच्या साखरपुड्याची तारीख ठरते त्या प्रमाणे श्रुती लावण्याला निमंत्रण देते आणि निनाद अद्वैत आणि त्याच्या घराच्या लोकांना निमंत्रण देतो. अद्वैत जाणार म्हणून विधी पण साखरपुड्याला जाण्याचा विचार करते.

विधी आणि अद्वैत अद्वैतच्या केबिन मध्ये प्रोजेक्ट बद्दल डिसकस करत असतात.

आता पुढे....

 

विधी: निनादचा साखरपुडा आहे ना रे?

अद्वैत: हो. तू जाणार आहेस ना?

विधी: नक्की नाही रे. (मनातच, मी काय करू त्या निनादच्या साखरपुड्यात?). तू?

अद्वैत: हो आम्ही सगळेच जाऊ. आई, बाबा आणि मी.

विधी: ओके. (मनातच) (तू जाणार तर मला यावंच लागेल, आणि विधी अद्वैत कडे एकटक बघत राहते). तू कधी लग्न करणार अद्वैत?

अद्वैत: (हसतच) तू जेव्हा हो म्हणणार तेव्हा.

विधी: “काय? (विधी उडालीच) तू खरं बोलतोय? मी किती दिवसांपासून ह्या क्षणाची वाट बघत होती. तू believe नाही करू शकत कि मी आज किती खुश आहे...finally तुला माझ्या बद्दल फीलिंग आहेत हे ऐकून मला फार आनंद झाला. I love you so much Advait.

अद्वैत: मला तर तू फार आवडते विधी, बस कस बोलू हाच विचार करत होतो. I love you so much Vidhi. 

 

अद्वैत: विधी, विधी?? काय झालं? काय विचार करत आहे?

विधी: अअ (तेवढ्यात विधी स्वतःच्या इमॅजिनेशन मधून बाहेर येते, अरे देवा!! मी स्वप्न बघत होते, मला वाटलं अद्वैत मला लग्नासाठी खरंच विचारतो आहे आणि डोक्यावर हात मारते.)

अद्वैत: काय झालं विधी? R u ok?  Shall we discuss the project?

विधी: oh yes.

मग दोघंही कमला लागतात.

रविवार उजाडतो. श्रुती आणि निनादकडे उत्साहाला उधाण आलेलं असते. घराच्या सगळयांना सकाळी 9 ला हॉल वर पोचायचं असते, पाहुणे मंडळी १० ला येणार असतात. श्रुतीच्या मदतीसाठी लावण्यपण तिच्या सोबत लवकर येते.

जिकडे तिकडे सनई वाद्य वाजून मंगलमय वातावरणाची प्रचिती येत असते. जिकडे तिकडे झेंडूच्या फुलांची सजावट त्यात भर टाकत असतात. पाहुण्यांची रेलचेल, हसी मजाक, थट्टा सगळ्यांना कस उधाण आलेलं असते.

श्रुती आणि लावण्या वरच्या रूम मध्ये तयार होत असतात.

श्रुती एका सुंदर परी सारखी तयार झालेली असते. श्रुतीची तयारी झालेली असल्यामुळे लावण्या पण स्वतःच्या तयारीची सुरुवात करते. आज लावण्या सुंदरसा लेहंगा घालते. लेहंगा घालता घालता तिच्या लक्षात येते कि त्याच्या ब्लॉउजची बटण थोडी सैल झाली आहे....

"अरे देवा!! किती मूर्ख आहोत ना आपण, घरी एकदा बघून तर घायचं ना?" लावण्या

श्रुती: "लावण्या, लावण्या अग किती वेळ, चल बाहेर ये लवकर. १० वाजले, खालून बोलावणं आलं. मला खाली जावं लागेल, बाहेर ये लवकर"

लावण्या: "श्रुती, तुझ्याकडे सुई धागा आहे का ग? हे बघ ना ब्लॉउजच बटण थोडा सैल झालं आहे, मी बघितल सुद्धा नाही. आता कस घालू ह्याला?"

श्रुती: "नाही ग, सुई धागा तर नाही आहे. बघू..."

श्रुती तिला कस बस बटण लावून देते.

लावण्या: अग पण हे मधेच तुटलं तर? त्या पेक्षा मी घरी जाऊन येते.

श्रुती: मॅडम घरी जायला १ तास लागेल तुला आणि यायला १ तास तो पर्यंत सगळं कार्यक्रम संपून जाईल. बटण नाही तुटणार, मी सेफ्टी पिन लावून देते, थोडं लक्ष ठेव, साखरपुडा झाला कि लगेच change करून घे.

लावण्या नाईलाजाने हो म्हणते.

श्रुती, लावण्या आणि बाकी मैत्रिणी खाली हॉल मध्ये जातात. तसे हॉल मध्ये सगळे पाहुणे आलेले असतात. अद्वैत त्याच्या आई बाबांसोबत आलेलं असतो. विधी एकटीच येते.

 मुळातच विधी खूप सुंदर असल्यामुळे आणि आज छान तयार होऊन आल्यामुळे विधी जणू अप्सराच दिसत असते. सगळे विधीला बघत असतात त्यामुळे त्याच्या तिला अजूनच अहंकार येतो, पण ज्याच्या साठी आपण एवढ तयार झालो तो अद्वैत कुठे आहे? असा विचार करत विधी अद्वैत ला शोधात असते. जशी अद्वैत आणि त्याची फॅमिली दिसते तशी ती त्यांच्या जवळ जाते.

विधी: हाय अद्वैत, हाय काका काकू.

अद्वैत: हाय विधी, I must say you are looking so beautiful.

आई, बाबा तुम्ही हिला ओळखला का? हि सुनीता वहिनीची बहीण.

वसुंधराताई: अरे हो, एका लग्नात भेटलो होतो, आठवलं मला.

अद्वैत आणि विधीला एकत्र बघून वसुंधराताईंच्या मनात एक विचार येतो. तश्या त्या स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे दिग्विजयरावांना हळूच म्हणतात.

वसुंधराताई: "का हो? तुम्हाला कशी वाटते हि मुलगी? किती छान दिसत आहे ना अद्वैत सोबत? काढू का गोष्ट सुनीता जवळ?

दिग्विजयराव: काही गरज नाही, आपला ठरल आहे ना मी मुलाच्या मध्ये मध्ये करायच नाही. त्याला जर आवडली तर तो स्वतः म्हणेल आणि आपण त्याचा लग्न लाउन देऊ. तो पर्यंत आपण आपले विचार त्याच्यावर थोपवायचे नाहीत.

वसुंधराताई: तुमच हे अस आणि त्याच तस, कस लग्न होईल माझ्या पोराचं लग्न काय माहित.

दिग्विजयराव: होईल नक्की होईल, बस त्याला थोडा वेळ दे. त्याच्या मनानी घेऊ. तो आपल्याला नक्की सांगेल माहित आहे मला. तश्या वसुंधराताई विषय बंद करतात.

इकडे विधी अद्वैतशी बोलत असते पण त्याची नजर हॉल भर फिरत असते जस काही तो कोणाला तरी शोधात असतो. विधीच्या सगळं लक्षात येत.

विधी: मनातच (हा नक्की लावण्याला शोधात आहे, समोर एवढी अप्सरा आहे आणि ह्याला तिचं पडल आहे. ह्या हॉल मध्ये आता जरी मी कोणाला लग्नाला विचारल ना तरी कोणी नाही नाही म्हणणार, पण ह्याला त्या लावण्या मध्ये काय दिसते काय माहित. काहीही झाल तरी मी सहजासहजी हार मानणार नाही हे नक्की.)  

समोरून श्रुती स्टेज वर येते तिच्या सोबत लावण्यपण येते. निनाद तिथे आधीच उभा असतो.

भटजीबुवांची पूजा वगैरे सगळं सुरु होतं.

इकडे अद्वैत लावण्याला निहाळत असतो. विधी अद्वैतला बघत असते, तिच्या नजरेतून अद्वैतचा लावण्याला पाहणं सुटत नाही, तिला अजूनच लावण्याचा राग येतो. बघता बघता लावण्याची नजर पण अद्वैतकडे जाते पण लगेच त्याला पाहून न पहिल्या सारखं करते. ह्याच्या पासून शक्य तितका दूर राहायचं असा तिने आधीच ठरवलेलं असत. अद्वैतच मन थोडं खट्टू होते. पण हिला आपल्या मनातल्या भावना माहित नसल्यामुळे ती पण काय करणार, असा अद्वैत विचार करतो.

श्रुती आणि निनाद एकमेकांना रिंग घालून साखरपूडा सोहळा संपन्न करतात. ऑफिस मधले सगळेच त्यांना अभिनंदन करतात आणि सोबत फोटो काढतात. फोटो काढतांना जेन्टस निनादच्या एका साईडला आणि लेडीज श्रुतीच्या साईडला. लावण्या आणि विधी आजूबाजूला उभ्या असतात. लावण्याला थोड uncomfortable होत असते, तेव्हा विधी तिला सांगते.

विधी: लावण्या तुझ्या ब्लॉउजच बटण निघालं आहे मी फोटो झाला कि लाउन देते.

लावण्या: थँक you विधी मॅडम. मला वाटलंच ते निघेल.

लावण्या: वर रूम्स आहेत २ मिनिटे तिथे जाऊयात.

विधी: ओके चालेल. ५ मिनिट मध्ये जाऊयात.

मनातच (चला हीच संधी आहे लावण्याला अद्वैत पासून दूर न्यायाची आणि चांगला धडा शिकवायची. तसाही अद्वैत इथे दिसत नाही so हिला इथनं काढणं सोप राहील.)

इकडे अद्वैतला एक अर्जेंट कॉल येतो, खाली खूप गोंधळ सुरु असतो म्हणून तो वरच्या रूम्स मध्ये जातो आणि रूमच्या एका आडोश्याला फोनवर बोलत असतो.

ब्लॉउजच बटण लावावं लावण्या आणि विधी वरच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतात. पायऱ्यावर चढतांना मुद्दामहून   विधी बहाणा करते.

विधी: लावण्या माझी पर्स खाली राहून गेली तू वर जा मी पर्स घेऊन येते.

लावण्या: ओके

विधी तिथेच थांबते, लावण्यालावर एका रूम मध्ये जाताना बघते मग हळूच तिच्या मागे जाउन दाराचीकडी बाहेरून लाउन घेते.

रूममध्ये आतमध्ये गेल्यावर लावण्या विधीची वाट बघत असते, कॉर्नरला फोन वर असलेला अद्वैत तिला दिसतच नाही आणि ती रूमच्या आरस्यामध्ये स्वतःच्या ब्लॉउजच बटण लावायचा प्रयत्न करत असते. अद्वैतचा फोन झाल्यावर अद्वैत थोडा बाहेर येतो बघतो तर समोर लावण्या वाटलं आरस्यामध्ये बघत असते.     

    

क्रमशः

@विना देशमुख

टीप : कथा आवडल्यास नक्की like , comment , आणि share  करा नावासकट.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Vina Deshmukh

Housewife

Hi, I am fun loving housewife. Singing, dancing, writing and baking are my hobbies. I am a regular visitor on era. I love reading a lot.