एका प्रेमाची गोष्ट - Part 8

@@

मागच्या पार्टमध्ये.......

मागच्या पार्टमध्ये लावण्या अद्वैतला सॉरी म्हणायला जाते, ती त्याला सॉरी म्हणते. स्वतःची चुकी नसूनही अद्वैत तिला सॉरी म्हणतो ह्याचं लावण्याला फार आश्चर्य वाटते. अद्वैतला कुठे तर फीलिंग येते कि त्याला लावण्या आवडते. लावण्याला पण समजते कि ती अद्वैत कडे आकर्षित होत आहे म्हणून ती प्रदीप सरांना विनंती करते मी माझी जागा बदलवा. अद्वैत आणि लावण्याचं एकमेकांकडे बघणं विधीच्या लक्षात येत म्हणून ती थोडी लावण्यावर लक्ष ठेउन राहते......

आता पुढे...........

प्रदीप सरांचा निरोप समारंभ.....

आज प्रदीप सरांचा पुण्यातील ऑफिस मधला शेवटचा दिवस असतो. संध्याकाळी ४ वाजता सगळ्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये जमायचं आहे असा ई-मेल येतो. अद्वैत वेळेचा पक्का असल्यामुळे सगळे वेळेवर रूम मध्ये हजर होतात. कॉन्फरेन्स रूममध्ये जवळपास सगळेच जमलेले असतात. अद्वैत, लावण्या, विधी तर असतातच सोबतच बाकी सहकारी पण असतात. प्रदीप सरांच्या प्रेमळ बोलण्याने सगळ्यांना ते हवे हवे से वाटतात, त्यांनी दुसरीकडे जाऊच नये असं सगळ्यांना वाटत असते पण त्यांनी स्वतःहून बदलीची विनंती केल्यामुळे कोणी त्यांना थांबवू शकत नव्हतं.

तसही प्रदीप सरांच्या उलट विधी असते, तिच्या धूर्त स्वभावामुळे आणि फटकळ बोलण्यामुळे ती कोणालाच आवडत नसते त्यामुळे सगळ्यांना अजूनच वाईट वाटत असत.

अद्वैत कॉन्फेरसरूम मध्ये सगळे आले कि नाही हे बघण्यासाठी सगळयांवर एक नजर फिरवतो. खरंतर अद्वैतची नजर लावण्याला शोधात असते. लावण्याला बघतो तशी आपोआप एक हलकी smile त्याच्या चेहऱ्यावर झळकते.

सगळे आले असं समजून अद्वैत बोलायला सुरुवात करतो.

(अद्वैतकडे बघायचच नाही ह्या उद्देशाने लावण्या त्याच्याकडे बघतच नाही.)

अद्वैत: “आज आपण इथे सगळे कश्यासाठी जमलो आहोत हे सर्वाना माहीतच आहे. आज मला इथे म्हणताना फार वाईट वाटत आहे पण काय करणार?  प्रदीप सरांना कुठल्याच ओळखीची गरज नाही, प्रदीपसर खर तर तुम्हाला ह्या ऑफिस मधून जाऊ द्यावं अशी माझी बिलकुलच इच्छा नाही पण काय करणार (असं बोलता बोलता लावण्यावर नजर रोखतो आणि बोलतो कि) सगळं आपल्या हातात नसतं काही दुसऱ्याच्या पण हातात असतं.'

हे वाक्य बोलताना अचानक लावण्याची नजर अद्वैत कडे वळते.

(एक मिनिट लावण्याला वाटतं कि अद्वैत आपल्याला उद्देशून बोलत आहे. हा मला बोलत होता का? छे काही तरी काय, आपण इथे प्रदीप सरांसाठी जमलो आहोत ना, मग आपल्याला कसा म्हणेल? उगाच त्याचा विचार करू नको. आपला ठरलं आहे ना त्याच्या पासून दूर राहायचं मग उगाच कशाला विचार करत आहे.)

डोक्यातला विचार झटकून ती अद्वैतच्या बोलण्याकडे पुन्हा लक्ष देते.

अद्वैत बोलत असताना विधी अद्वैतच्या डोळ्यात डोळे टाकून ऐकत असते पण जेव्हा तो असं काही लावण्याकडे पाहून म्हणतो तेव्हा विधीला फार वाईट वाटत. (मला वाटत आहे अद्वैत कुठे तरी लावण्याकडे आकर्षित होत आहे, हे सगळं थांबवायला हवं, लावण्याला आमच्यातून निघावंच लागेल नाही तर ती वेळ माझ्यावर येईल...नाही नाही असं होता काम| नये. विधी मनोमन विचार करू लागली.)     

अद्वैत: प्रदीपसर, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्यानंतर प्रदीप सरांची सगळी जवाबदारी मिस लावण्यावर मी सोपवत आहे.

विधी, लावण्या सकट सगळे शॉक होतात, कुजबुजायला लागतात तसं अद्वैतच्या लक्षात येत.

अद्वैत: सॉरी फॉर द मिस्टेक. I meant मिस विधी, मिस विधी वर सोपवत आहे.

नाव घेतल्याबरोबर लावण्याला धडधडायला होतं आणि विधीला फार राग येतो, कसा बसा ती तो लपवते.

मीटिंग संपल्यावर सगळे प्रदीपसराना निरोप देतात आणि आपल्या जागी जातात.

लावण्या ह्या सगळ्यांचा विचार करत असते आणि परत सगळं आठवून मनोमन लाजते तितक्यात श्रुती येते.

श्रुती: हाय डिअर

लावण्या: हाय

श्रुती: काय झालं? एकदम गहण विचार आणि गालातल्या गालात हसणं, क्या बात है?

लावण्या: नाही ग काही नाही, सहज कामाचं.

(श्रुती अजून चिडवायला लागेल म्हणून लावण्या तिला काही सांगतच नाही.)

श्रुती: तुला एक छान गुड न्युज द्यायची आहे. 

लावण्या: गुड न्युज!! ती पण लग्न आधी??

आणि मग लावण्या झोरात हसायला लागते.

श्रुती: very funny. काय झालं तुला? वेगळ्याच ख़ुशी आहे. काही झालं आहे का? सांग ना?

लावण्या: काही नाही ग. माझं सोड. तू सांग. खूप खुशीत आहे. काय झालं?

श्रुती: पुढच्या आठवड्यात माझा साखरपुडा आहे.

लावण्या: व्वा ग्रेट न्युज यार.

श्रुती: हमममम.

Finally मी आणि निनाद एकत्र होऊ. किती दिवस मी ह्या दिवसाची वाट बघत होती आणि शेवटी लवकरच तो दिवस येणार आहे.

लावण्या: वाह यार मस्त. व्हेरी हैप्पी फॉर उ.

श्रुती, एक विचारू?

श्रुती: ऑफकोर्स यार परमिशन कसली मागते, बिन्दास्त विचार ना

लावण्या: तुझा प्रार्थना वर विश्वास आहे का ग? म्हणजे जे मागेल ते भेटेल.             

श्रुती: खरं सांगू का लवी, आयुष्यात काही गोष्टी कठीण असतात पण अशक्य नसतात. प्रार्थना त्यावर विश्वास आणि आपले प्रयत्न ह्यावर सगळं अवलंबून असत. निनाद आणि मी कधी एकत्र येऊ असं वाटलं नाही पण खूप प्रयत्न करून शेवटी सगळ्यांनी हो म्हटलंच.

का ? तू हे सगळं का विचारात आहे?

लावण्या: काही नाही ग सहज. (मनोमन विचार करते कदाचित, माझ्या पण आयुष्यात कोणी असा असता जो मला मनापासून आवडला असता आणि माझ्या आईसकट माझा स्वीकार केला असता. असेल का कोणी आपल्यासाठी ह्या जगात?)

श्रुती: मॅडम काय विचार करत आहात. चला घरी. ऑफिस सुटायची वेळ झाली.

लावण्या: हो चल         

इकडे अद्वैतच्या केबिन मध्ये निनाद येतो.

निनाद: राजे, कसे आहेत?

अद्वैत: हाय निनाद, ये. काय म्हणतो? खूप खुश आहे आज, काय झालं?

निनाद: I am here to share a great news with you. I am getting engaged with shruti next Sunday.

अद्वैत: व्वा यार खरंच ग्रेट न्युज. Finally you both are getting engage.

निनाद: yes , finally. तुला आणि काका काकूंना यायचच आहे, मी काहीच ऐकून घेणार नाही.

अद्वैत: अरे नक्की हे पण काही सांगायचं आहे, आम्ही नक्की येऊ.

By the way ऑफिस मधून कोणी येत आहे का?

निनाद: हो ना, येणार आहे ना, हे बघ मी लिस्ट पण बनविली विधी, समीर, नियती, हिमांशू आणि प्रदीप सर पण येणार आहेत.

अद्वैत: बस इतकेच

निनाद: (निनादच्या लक्षात येत पण त्याला अद्वैतच्या तोंडून ऐकायचा असत). हो रे बस इतकेच अजून कोणी नाही.

अद्वैत: नक्की? कोणाला विसरला तर नाही ना?

निनाद: नाही रे, अस तर काही नाही. तू सांग, मला तर काही आठवत नाही कोणाला विसरल्याचा?

अद्वैतचा केविलवाणा चेहरा निनादला पाहवत नाही पण तरीही तो त्याची मजा घायची ठरवतो.

अद्वैत: अरे ती आहे ना श्रुतीची मैत्रीण, काय नाव आहे तीच? ल वरून

निनाद: कोण रे ल वरून? थोडा विचार करून मुद्दामहून हो आठवल

तसा अद्वैत खुश होतो

निनाद: लतिका, बरं सांगतो तिला.

अद्वैत: आता हि कोण? मला लावण्या म्हणायचं होतं.

निनाद: अहो तो ये बात है.

अद्वैत: कूच बात नाही है मी लिस्ट साठी म्हणत होतो.

निनाद: बच्चू प्रेमामध्ये मी तुझ्या पेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे पावसाळे बघितले आहेत.

अद्वैत: अरे अस काहीच नाही.

निनाद: बरं तू सांगितलं आणि मी ऐकलं. तुला तर मी बघतोच एंगेजमेंट होऊ दे माझी एकदा.

अद्वैत: ओके

दोघंही खळखळून हसतात आणि घरी जायला निघतात तेवढ्यात विधी येते.

विधी: हॅलो गाईस, व्हाट्स अप.

अद्वैत: आता घरी निघतच होतो.

विधी: अद्वैत, मला थोडं एक प्रोजेक्ट बद्दल थोडं डिसकस करायचं होतं, can we?

अद्वैत: आता?

विधी: हो थोडं urgent आहे.

अद्वैत: ओके, निनाद तू हो पुढे मी येतो नंतर.

निनाद: ओके बाय विधी

विधी: बाय

विधी: निनादचा साखरपुडा आहे ना रे?

अद्वैत: हो. तू जाणार आहेस ना?

विधी: नक्की नाही रे. (मनातच, मी काय करू त्या निनादच्या साखरपुड्यात?). तू?

अद्वैत: हो आम्ही सगळेच जाऊ. आई, बाबा आणि मी.

विधी: ओके. (मनातच) (तू जाणार तर मला यावंच लागेल, आणि विधी अद्वैत कडे एकटक बघत राहते). तू कधी लग्न करणार अद्वैत?

अद्वैत: (हसतच) तू जेव्हा हो म्हणणार तेव्हा.

विधी: “काय? (विधी उडालीच) तू खरं बोलतोय? मी किती दिवसांपासून ह्या क्षणाची वाट बघत होती. तू believe नाही करू शकत कि मी आज किती खुश आहे...finally तुला माझ्या बद्दल फीलिंग आहेत हे ऐकून मला फार आनंद झाला. I love you so much Advait.

अद्वैत: मला तर तू फार आवडते विधी, बस कस बोलू हाच विचार करत होतो. I love you so much Vidhi.  

क्रमशः..

@विना देशमुख

टीप : कथा आवडल्यास नक्की like , comment , आणि share  करा नावासकट.

🎭 Series Post

View all