एका प्रेमाची गोष्ट - Part 7

@@

मागच्या पार्ट मध्ये.......

अद्वैत लावण्याला कार मधली हवा का सोडली ह्या बद्दल विचारतो, लावण्या त्याला सगळं सांगते, तेव्हा तिला ती कार अद्वैतची आहे हे माहित नसतं. नंतर पार्किंग लॉट मध्ये अद्वैत त्याच कार मध्ये बसताना लावण्याला दिसतो तेव्हा तिला माहित पडत कि ती कार अद्वैत ची होती आणि आपण अद्वैतच्या कार मधली हवा सोडली....

आता पुढे..........

लावण्या घरी पोचल्यानंतर ....

लावण्या आपल्याच धुंदीत....सारखे तेच ते विचार...'बापरे आपण चक्क अद्वैतला बोललो आणी त्याचं त्यानी जराही वाईट मानून घेतल नाही, का केल असेल त्यानी असं? अरे देवा, काय केल मी? जॉब वरून काढून टाकतो कि काय आता? काही समजतच नाही...तेवढ्यात आई हाक मारते.

आता पुढे..... लावण्या, लावण्या कश्यात गुंग आहेस एवढी? लवकर चल जेवायला.

लावण्या - आई, मला भूकच नाही आहे ग.

आई - का भूक नाही बाळा, बरं नाही आहे का?

लावण्या - नाही ग, थोडी थकली आहे आणी भूक तर नक्कीच नाही, मी जाते आणी पडते....

बेड वर पडल्या पडल्या तेच ते विचार. राहून राहून तिला अद्वैतचा चेहराच डोळ्यासमोर येत होता.

आणि सकाळी घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागली आणि परत विचारांची डोक्यात गर्दी झाली....

(बापरे...आता काय करू, हा समोर आला तर कसा face करू ह्याला? हे काय करून बसली मी, पण मला तर माहित नव्हतं कि कार कुणाची आहे...आता ...आता काय, जे झाल ते झालं पण इतका मोठा माणूस गाडी पण कशी चालवत होता? गाडी हाच चालवत होता कि कुणी दुसरा? काही कळायला मार्ग नाही. डोक्याचा नुसता भुगा होत आहे.....जाऊ दे जे झालं ते झालं.....उद्या जाऊन त्याला सॉरी म्हणू मग नंतर जे होईल...जॉब सोडावा लागला तर ठीक नाही तर आहेच....जाऊ दे.....देवा प्लीज माझा जॉब वाचवं.   

खूप वेळानी विचार करून शेवटी त्याला उद्या एकदा सॉरी म्हणायचं असा विचार करून लावण्या झोपी जाते.

इकडे अद्वैतची पण तीच हालत होती, घरी जाउन अंघोळ करून बेड वर पडतो, आज ऑफिसचे काम करण्याची काहीच इच्छा नव्हती त्याची. राहून राहून लावण्या, तिचा हाताला झालेला स्पर्श, तीच बोलणं सगळं त्याच्या मनाला एकदम भिडून गेलं. इतकी स्पष्ट बोलणारी मुलगी त्याला पहिल्यांदा भेटली होती, म्हणूनच त्याच्या मनात भरली होती.

दुसऱ्या दिवशी लावण्या झोपेतून उठते, तेव्हा तोच विचार सुरु असतो डोक्यात.

'काय करू? कस face करू? नको जाऊयात का आज ऑफिस मध्ये? पण आज नाही गेले तर उद्या तर जावंच लागेल. नुकतीच सुट्टी घेतली आपण, नको आता सुट्टी नको, जे होईल ते होईल.’

शेवटी लावण्या ऑफिस मध्ये जाते. लावण्या सोबत श्रुती आणी अद्वैत, सारखेच पार्किंग मधे येतात. अद्वैत ची गाडी बघताच परत लावण्याची धड धड सुरु होते. कार मधून अद्वैत उतरतो आणि श्रुतीला म्हणतो.

अद्वैत - हाय श्रुती. 

आणी लावण्याकडे बघून नुसतंच हाय करतो. लावण्या पण हाय करते.

दोघांचं गालातल्या गालात हसणं सुरु होत, हे सर्व श्रुतीच्या नजरेतून सुटत नाही.

मग तिघंही लिफ्ट पर्यंत जातात...जशी लिफ्ट येते तशी लावण्या आणी अद्वैत आत मध्ये जातात,

आणी श्रुती नेमकी म्हणते,’ गाडी च्या डिक्की मध्ये माझं सामान राहून गेलं.....मी आलीच २ मिनिट…...तुम्ही व्हा पुढे’.

श्रुती हे मुद्दामून करत आहे, हे लावण्याच्या लक्षात येत. तिला पण लिफ्टच्या बाहेर या वाटते पण लिफ्ट सुरु होऊन जाते. आता लिफ्ट मध्ये फक्त अद्वैत आणी लावण्या. लावण्या अद्वैत पासून दूर उभी राहते, तिला परत धड धड ह्यायला होतं...हळूच ती अद्वैत कडे बघते... अद्वैत फोन मधे बघत असतो. थोडं फोन मधून लक्ष काढून अद्वैत पण लावण्याकडे कटाक्ष टाकतो. अद्वैत पण लावण्याला बघून विचार करू लागतो खरंच ही नावाप्रमाणेच लावण्यवती आहे.

'सॉरी म्हणावं का ह्याला आता' लावण्या विचार करू लागते. त्याला सॉरी म्हणणारच. तेवढ्यात अद्वैतला एक कॉल येतो, तो बोलण्यात busy होऊन जातो आणि तिचं सॉरी म्हणायचं राहून जातं.

लिफ्ट थांबते...दार उघडते आणी दोघंही आपापल्या ठिकाणी काही न बोलता निघून जातात.

लावण्या खूप वेळ सॉरी कस म्हणायचं ह्याचा विचार करते तेवढ्यात तिथे अनिर्बान येतो...

अनिर्बान - लावण्या मला जरा बोलायचं आहे तुझ्यासोबत.

लावण्या - आपण नंतर बोलायचं का? मला थोड काम आहे.

अनिर्बान - मला आताच बोलायचं आहे.

लावण्या - ठीक आहे बोल.      

अनिर्बान - लावण्या मला तू फार आवडतेस ग, नेहमी तुझाच विचार येतो डोक्यात, लग्न करशील माझ्या सोबत?

लावण्या - हे बघ अनिर्बान, मी माझ्या आयुष्यात लग्नच नाही करणार आहे, तू प्लीज माझा विचार सोडून डे...

तसा अनिर्बान तिचा हात पकडतो आणी लावण्याला फारच राग येतो.

लावण्या - मि.अनिर्बान how dare you to touch me? तुम्हाला समजत नाही आहे का माझं म्हणणं?  Please get out from here. ह्याच्या पुढे माझ्या समोर आला तर याद राख.

लावण्याचा लाल बुंद चेहरा बघून अनिर्बान मनातून फार खजील होतो आणी सॉरी बोलून निघून जातो.

“समजतात काय हे सगळे स्वतःला? “

लावण्याला फारच राग येतो मग थोडा वेळानी राग शांत झाल्यावर कामामध्ये फोकस करते.

थोडा वेळानी तिला परत अद्वैत आठवतो आणी आता जाऊन एकदा त्याला सॉरी म्हणूयात असं वाटते तिला.

ती क्यूबिकल कडे बघते तर अद्वैत आणि विधी काही तरी बोलत असतात आणि विधी फार हसत असते. लावण्याला तिच्या कडे पाहून फार jealous feel होते आणि विधी केबिनच्या बाहेर जाण्याची वाट बघत असते. वेळ वाया न जाऊ म्हणून अद्वैतच्या क्यूबिकलच्या बाहेर उभी राहते. ५-१० मिनिटानंतर विधी बाहेर येते, विधी लावण्याला समोर बघून शॉक होते.

लावण्या: Hi विधी, अद्वैत सर busy आहेत का? मला थोडं बोलायचं होतं त्यांच्या सोबत.

विधी: काय बोलायचं आहे, काही प्रोजेक्ट बद्दल आहे का? मला विचार मी सांगते...

लावण्या: नाही, थोडं पर्सनल आहे.

तसं विधीला राग येतो आणि थोडी शंका पण येते. तशी ती म्हणते

'नाही, तो busy आहे सध्या, इम्पॉर्टन्ट काम करत आहे, तू नंतर बोल.'

विधी : मनातच (हिच्यावर लक्ष ठेवावं लागेल. अद्वैतच्या जास्त जवळ जात कामा नये.)

साधी लावण्या विधीच्या बोलण्यात येते आणि स्वतःच्या क्युबिकल मधे जाऊन बसते.

तेवढ्यात क्युबिकलचा फोन वाजतो तो अद्वैतचा असतो.

अद्वैत: मिस लावण्या, P&B अससोसिएशनची फाईल तुमच्या कडे आहे का?

लावण्या: हो

अद्वैत: ok घेउन या, आज मी फ्री आहे तर ते काम करून घेतो.

लावण्या: सर, तुम्ही फ्री आहात? (आश्चर्याने)

अद्वैत: हो, का?

लावण्या: नाही सहजच, ok आणते फाईल.

(अद्वैत तर फ्री आहे मग विधी मॅडम अश्या का म्हणाल्या? लावण्याला काहीच समजल नाही. असो)

परत तीच धड धड सुरु होते आणी परत हिम्मत करून ती दार वर knock knock करते.

लावण्या – May I Come in?

अद्वैत – yes please.

लावण्याला बघून अद्वैत थोडा आश्चर्यचकित होतो.

अद्वैत - या प्लीज बसा.

लावण्या - Thanks You.

अद्वैत - बोला.

लावण्या - खरं तर मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं.

अद्वैत - सॉरी कश्या बद्दल?

लावण्या - मी तुमच्या गाडीच्या टायरची हवा सोडली. मला माहित नव्हतं ती तुमची गाडी आहे म्हणून.

अद्वैत हसतच उठला आणी शेल्फ मधून एक फाईल काढत म्हणाला.

अद्वैत - इट्स ओक, चूक केली त्याची शिक्षा मला भेटली. धन्यवाद मला चूक लक्षात आणून दिल्या बदल, पुढच्या वेळेस मी लक्षात ठेवेल.

खरं तर मी गाडीत नव्हतो त्या दिवशी, ड्राइवर काका गाडी चालवत होते. पण कोणी का असो ना चूक तर चूक. आपल्या मुळे कोणालाच विनाकारण काही त्रास होता कामा नये. मी ड्राइवर काकांशी बोलेल ह्या बद्दल नक्की. इनफॅक्ट मीच तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. सॉरी. आमच्या मुळे तुम्हाला लागलं आणि परत तुम्ही उशिरा आल्यामुळे मीच तुम्हाला बोललो.

लावण्याला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. इतका मोठा माणूस आणी ह्याची तर काही चुकी नसून सुद्धा सॉरी म्हणत आहे हा. 1 मिनिट विचार करून ती अद्वैतच्या डोळ्यात बघते. मनातून सॉरी बोलत आहे हा असं तिला वाटतं. लावण्याला एक वेगळीच चमक त्याच्या डोळ्यात दिसते. त्याच्या अश्या पहाण्यानी तिला फार लाजल्या सारखं होतं, ती लगेच नजर खाली करते आणि शेवटी लावण्या जायला निघते.

लावण्या - OK, I think I should leave now.

अद्वैत - OK.

आणी छानशी स्माइल देतो.

लाजतच लावण्या जायला निघते, जशी वळते तशी तिची ओढणी कोणी तरी पकडली असं तिला वाटते.

अनिर्बाननी हात पकडला हे आठवून तिला परत राग येतो, तिला वाटते अद्वैतनी ओढणी पकडली, 'समजतात काय हे सगळे मुलं?' तिच्या मनात विचार येऊ लागतात तशी ती मागे न वळता म्हणते.

'मी. अद्वैत, मी तुम्हाला सॉरी काय म्हणाला आली तुम्ही तर गैरसमज करून घेतला, एवढे फ्रॅंक झालेत कि चक्क तुम्ही माझी ओढणी पकडली..... मी तसली मुलगी नाही आहे."अस रागात बोलताना ती मागे वळते.

बघते तर काय अद्वैत दूर फाईल हातात घेऊन उभा असतो आणी लावण्याची ओढणी खुर्चीमध्ये अडकली असते.

अद्वैतच्या लक्षात येत आणी लावण्याला एकदम खजील झाल्या सारखं होतं.

तेवढ्यात अद्वैत जवळ येतो आणी लावण्याची ओढणी काढून देतो आणी म्हणतो...

अद्वैत - मिस लावण्या, मी पण तसला मुलगा नाही आहे.

ह्यावर काय बोलावं लावण्याला काही समजत नाही, अद्वैत आणि लावण्याची परत नजरानजर होते.

तितक्यात तिथे विधी दार knock न करता येते, तिला अद्वैत आणि लावण्या एकमेकांकडे वेगळेच बघत आहे असं लक्षात येत. ते दोघंही डिस्टर्ब होतात आणि लावण्या भरकन केबिनच्या बाहेर येते आणी स्वतःलाच दोष देते.

आणि अद्वैत चेअर वर जाऊन बसतो आणि फाईल मधे बघतो.

विधी: I hope I didn’t disturb you?

अद्वैत: no, not at all.

 'किती मूर्ख आहोत आपण, एकदा बघून तर घायच न. आता ह्याच्या समोर मी कधीच जाणार नाही. मन किती पण ठरवते किअद्वैतला बघायच नाही तरी सारखे सारखे त्याच्याच कडे नजर जाते, मला वाटते आहे मी त्याच्या सोबत गुंतत चालली आहे...हे नक्कीच व्हायला नको. मला कोणाच्या प्रेमात पडायचं नाही आणि बाकी काही नाही.

देवा प्लीज थांबवं हे सगळं.'

क्युबिकल मध्ये गेल्यावर, हळूच लपून लावण्या अद्वैतला बघते तो कामात व्यस्त असतो. 

इथनं सारखं सारखं लक्ष जात, आधी इथली जागा बदलायला हवी.

ती लगेच प्रदीप सरांना कॉल करते.

लावण्या - प्रदीप सर, मला दुसर क्युबिकल मिळेल का? इथे डायरेक्ट AC आहे मला त्रास होतो.

प्रदीप सर - सध्या तसं काही करता येणार नाही, मी बघतो दुसरी कडे असल तर.

लावण्या - ओक ठीक आहे.

(आता बस....अद्वैत कडे लक्ष नाही द्यायचा)    

इकडे अद्वैतला लावण्याचं फार हसू येत आणि मनात विचाराची गर्दी होते.

खरंच खूप वेगळी आहे हि मुलगी, काही तरी वेगळं आहे हिच्यात, स्वतःचे काही तत्व आहेत हिचे, उगाच कोणाला इंप्रेस करण्यासाठी नाही वागत हि.....तिचं बघणं, तिचं लाजणं मनात कस घर करून गेलं... काय आहे हे सगळं? प्रेम? प्रेमचं तर आहे...सारखं सारखं तिच्या कडे बघायला आवडते...तिच्या सोबत बोलावं वाटते... तसं तिच्या समोर फार काही बोलता येत नाही आपल्याला तिला बघताच नुसती घंटी काय....घंट्या वाजायला लागतात.....प्रत्येक वेळेस हीच एक नवीन रूप बघायला भेटते....खरंच.....हिच्या सोबत अख्ख आयुष्य घालवायला आवडेल मला, पण कस? हि तर माझ्या पासून फार लांब राहते असच वाटत राहते मला.....पण मलाच काही तरी कराव लागेल....

क्रमशः..

@विना देशमुख

टीप : कथा आवडल्यास नक्की like , comment , आणि share  करा नावासकट.

🎭 Series Post

View all