Dec 05, 2021
प्रेम

एका प्रेमाची गोष्ट - Part 6

Read Later
एका प्रेमाची गोष्ट - Part 6

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

Part 6

मागच्या पार्ट मध्ये.............

 

ऑफिसमध्ये उशिरा पोचून लावण्या अद्वैत समोर प्रेसेंटेशन देते. अद्वैतला लावण्याला कुठे तरी बघितल्याचं आठवते.

 प्रेसेंटेशन छान होते पण उशिरा आल्याबद्दल अद्वैत लावण्याला बोलतो त्यात लावण्याला थोडा वाईट वाटतं. कंपनीच्या पार्किंग लाउन मध्ये 'ती' कार लावण्याला दिसते म्हणून ती कारची हवा सोडून देते त्यात तिला माहित नसते कि ती अद्वैतची कार आहे म्हणून, आणि हवा सोडताना अद्वैत बघतो........

 

आता पुढे.......    

 

रात्र भर लावण्या चा चेहरा त्याच्या समोर येतो आणि सारखा प्रश्न येतो, का केलं असेल हिने असं?

आपला आणि हिचा तर जास्त कधी संपर्क पण नाही आला, आपण तर एक एकमेकांना ओळखत पण नाही फारसं, का केला असेल हिने असं? रात्री हाच विचार करताना त्याला कधी झोप लागली समजलच नाही.

सकाळी उठून ब्रेकफास्ट करून अद्वैत आज ऑफिस मध्ये पोचतो.

ऑफिस मध्ये पोचल्या पोचल्या तो लावण्याच्या cubical समोरून जातो.....तेव्हा लावण्या पण ऑफिस मध्ये आलेली असते.....तिची आणि त्याची नजरानजर होते........ती लगेच कॉम्पुटर मध्ये बघते.......... अद्वैत तिथून निघून जातो...

आज लावण्या छान तयार होऊन आलेली असते आणि आपण त्या गाडीवाल्याला धडा शिकवलं म्हणून मनोमन फार खुश असते.

लावण्याला बघितल्या वर पुन्हा त्याला कालचा प्रसंग आठवतो..... तशी त्याची खूप उत्सुकता वाढते.

अद्वैत प्युन कडे मिस लावण्याला बोलवा असा निरोप पाठवतो.

प्युन: (लावण्याला) मॅडम तुम्हाला अद्वैत सरानी केबिन मध्ये बोलावलं आहे, आता.

लावण्या: ok

(अरे देवा!! आता काय? का बोलावलं ह्यानी मला? अजून प्रेसेंटेशन आहे कि परत उशीर झाल्या बद्दल रागवणार आहे हा. परत मनात एवढी धड धड का वाढली. आपण एवढं कॉन्फिडेंट आहोत, पण याच्या समोर जाताना काय होतं? वेगळच धड धड होते. असा ह्या पहिले कधीच नाही झालं. हुम्म्म्मम्म....कश्याला घाबरायचं ह्याला? खाणार आहे का हा?...अश्या असंख्य विचार डोक्या घेऊन लावण्या केबिनच्या दारावर knock करते...)

मोठी हिम्मत करून ती अद्वैतच्या केबिनच दार वाजव ते.

लावण्या - May I Coming sir? 

अद्वैत - Yes Please

लावण्या जरा भीत भीतच येते, धड धड अजून जोरात होते, लावण्या आज फारच गोड दिसत होती. लाइट पिंक कलरचा ड्रेस, उडणारे केस आणि तिचं ओव्हरऑल रूप बघून अद्वैत तिच्या कडे बघतच राहिला. तो इतका गढून गेला कि तिला बसायला सांगायचं विसरून गेला. रूम मध्ये एकदम शांतता.

शेवटी लावण्यालाच सुचेना काय करावं शेवटी तिनेच शांततेचा भंग केला...   

लावण्या - तुम्ही मला बोलावलं, काही काम होतं का?

लावण्याच्या बोलण्यामुळे अद्वैत लगेच भानावर आला.

अद्वैत – अअअअअअ …..हो, पण काम ऑफिस विषयी नाही आहे. खरं तर मला दुसरच काही तरी विचारायचं आहे. तुम्ही कंपनी मधल्या कारच्या टायरची हवा का सोडली??

लावण्याला एकदम धस्स झालं, बापरे ह्याला कस माहित?

नक्कीच कोणी तरी कमप्लेइंट केली आपली, जे पण असो जे आहे ते खरं सांगायचं असं तिनी ठरवलं.  

लावण्या - मला त्या कार मालकाला धडा शिकवायचा होता.

अद्वैतला फार आश्चर्य वाटलं.

अद्वैत - का? म्हणजे त्यांनी काही केलं आहे का तुम्हाला?

लावण्या - काही लोकांकडे कार असते तर वाटते काय आहे आणि काय नाही. थोड सुद्धा त्याचं बाकी कडे लक्ष नसत. आपल्या कार मुळे कोणाला काही लागल असेल, थोड थांबावं, आणि सॉरी म्हणाव तस तर काहीच नाही, सरळ निघून जातात. मग लावण्यानि प्रेसेंटेशन च्या दिवशीचा पूर्ण किस्सा सांगितला.  

लावण्या – “मला त्या मालकाला धडा शिकवायचा होता. पण मी त्यांना सॉरी वगैरे काहीच म्हणणार नाही आहे, काहीही झालं तरी. तुम्ही त्या कारच्या मालकांना सांगा कि मी का अस केलं नाही तर मला त्यांचं नाव सांगा मी सांगते त्यांना.”

लावण्या सर्व एका दमात बोलून गेली.

(हि कार अद्वैत ची असू शकते असा विचार सुद्धा तिच्या डोक्या मध्ये येत नाही.)

पण आपण अद्वैत समोर बोलतो आहोत, कंपनीचा हेड हे तिच्या आता लक्षात आलं, तशी ती चूप झाली.

"रिलॅक्स मिस लावण्या, तुम्हाला कोणी सॉरी म्हणायला लावत नाही आहे. मी तर सहजच विचारलं" अद्वैत एक हलकी स्माईल देउन म्हणाला.

लावण्याला वाटलं अद्वैतला विचारावं कि कोणी complaint केली, पण तिनी नाही विचारलं आणि अद्वैतने

पण नाही सांगितलं कि गाडी त्याची होती म्हणून.

पण अद्वैतला त्या लहान मुली बद्दल वाईट वाटलं आणि ड्राइवर काकांना ह्या पुढे लक्ष देउन गाडी चालवायला सांगायला हवं, आपल्या मुळे कोणालाच त्रास होता काम नये, असं विचार त्याने केला.

अद्वैतला ऐकताना फार गम्मत आणि कौतुकही वाटली, सगळ एकदम सहज बोलून गेली ही. तिच्या बोलण्यातला खरेपण जाणवला त्याला, अशी मुलगी पहिल्यांदाच भेटली होती त्याला.

अद्वैत - Relax Miss Lavanya, हे घ्या पाणी प्या.

तो पाण्याचा ग्लास देतो. लावण्या ग्लास घेते आणि दोघांचा बोटांचा एकमेकाना स्पर्श होतो, दोघांची परत नजारानजर होते, लावल्यानं एकदम कस तरी होते तेव्हा ती तिची नजर खाली करून घेते. दोघांना पण अवघडल्या सारखं होते.

लावण्या गट गट पाणी पिते आणि आता काय करावं म्हणून म्हणते

लावण्या – Thank u. May I go?

अद्वैत - हो या तुम्ही, मी निरोप देतो तुमचा कारच्या मालकांना. (आणी हसतो)

अद्वैत इतका गोड हसला कि लावण्या १५-२० सेकंड बघतच राहिली मग लगेच भानावर येऊन केबिनच्या बाहेर

निघण्यासाठी दार उघडते. मागे वळून परत दार लावताना परत अद्वैत कडे बघते...तो तिलाच बघत असतो, ती लगेच दार लावून स्वतःच्या क्युबिकल मध्ये जाऊन बसते.

क्युबिकल मध्ये बसल्यावर मनातली धड धड एकदम बंद झालेली असते. काय होत आहे?  ह्याच्या समोर एवढ का धड धड होते आपल्याला?

काल तर वेगळाच दिसला होता, पण आज एक गोड रूप बघायला भेटलं, पण काहीही म्हण मनात कसं घर करून गेला हा, एकदम आपल्या स्वप्नातल्या राजकुमार सारखा.

तो, त्याचं बोलणं, हसणं, त्याचा शब्द न शब्द सगळं लावण्या परत परत आठवू लागली, आणि मनोमन लाजली, मग लगेच भानावर आली आपण क्युबिकल मध्ये आहोत लक्षात आल तिच्या आणि मॉनिटर सुरु करून काम करू लागली.

लावण्या परत हळूच त्याला चोरून बघू लागली, अद्वैत त्याच्या कामात busy दिसत होता. लगेच लावण्याने मॉनिटर मध्ये डोकं घातलं. मनोमन विचार करू लागली, 'हे बरोबर नाही, एकतर तो इतका श्रीमंत आपल्यामध्ये का इंटरेस्टेड असेल? आणि असला तरी आपण लग्नच करणार नाही न मग त्याच्या कडे नकोच बघायला, ठरलं तर मग शक्य तेवढा दूर राहायचं ह्याच्यापासून.'

अद्वैत स्वतःच्या कॉम्पुटर स्क्रीन मध्ये नुसता बघत होता, लावण्याचं सगळं बोलणं उगाच आठवू लागला, अद्वैतला पण वेगळीच फीलिंग येत होती. आणि एकदम विचारात गढून गेला, 'काय आहे हे? सारखं सारखं का लक्ष जात आहे तिच्याच कडे? आणि का नाही जाणार? किती सहज आणि कुठलेही आढे वेढे न घेता बोलून गेली ही. अशी पोरगी आज पर्यंत भेटली नाही आपल्याला, तिला लपवता पण आलं असतं किंवा खोटं पण बोलता आलं असतं (जे कि बऱ्याच मुलींनी केलं) पण हीने तसलं काही केलं नाही

तो हळूच कॉम्पुटर मधून डोकं काढून लावण्याकडे बघतो ती मॉनिटर मध्ये काही तरी बघत असते....स्वतःच गोङ हसून कामात मग्न होतो.

तितक्यात निनाद येतो...

निनाद - अद्वैत, हि फाईल एकदा बघून घे.

अद्वैत – (कुठल्या तरी विचारात गढलेला असतो आणि गालातल्या गालात हसत असतो, file मध्ये न बघता म्हणतो) “त्यात काय बघायचा? छानच आहे”

निनादला त्याच्या बोलण्याचा अर्थ नाही समजत, त्याला अद्वैत बाहेर लावण्याकडे बघताना दिसतो आणि त्याच्या थोड लक्षात येत.

निनाद - राजे कुठे लक्ष आहे?

तितक्यात अद्वैत भानावर येतो.

अद्वैत - अरे, सॉरी काही बोललास का तू?

निनाद - हो, पण तू कुठे हरवल्यास? कोणी भेटली का?

अद्वैत - काही पण काय? चल बोल काय झाल? फार काम पडली आहेत अजून.

अद्वैत परत कामात व्यस्त होतो. पण निनादला कुठे तरी प्रेमाचा धूर दिसू लागतो.  

दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुती आणि लावण्या कॅफेटेरिया मध्ये ब्रेकफास्ट करत असतात. तितक्यात तिथे अनिर्बान येतो, लावण्याला न विचारता लगेच चेअर घेतो आणि श्रुती आणि लावण्याला ब्रेकफास्ट मध्ये जॉईन होतो. लावण्याला हे बिलकुल आवडत नाही.

अनिर्बान - हाय लवी. तुला प्रेमाने हेच म्हणतात न?

लावण्या - हुम्म्म

अनिर्बान - इफ उ डोन्ट माईंड मी इथे बसलं तर चालेल का?

लावण्या - मि.अनिर्बान तुम्ही आधीच इथे बसलेले आहात, ते पण न विचारता.

(लावण्या खूप रागात येऊन म्हणते.)

अनिर्बान - ओह सॉरी, आता विचारतो आहे न. पण तुम्ही मला मि.अनिर्बान म्हणू नका न प्लीज, नुसता 'अनी' म्हणा.

लावण्या - मला अनोळखी माणसाला टोपण नावानी बोलवायला आवडत नाही, आणी तुम्ही पण मला माझ्या टोपण नावानी नका बोलावत जाऊ, फक्त काही जवळचे लोकच बोलावू शकतात.

लावण्याला फारच राग आला, तसा अनिर्बानला स्वतःची चूक समजली आणी तो तिला 'सॉरी' म्हणून निघून गेला.

त्याच दिवशी संध्याकाळी लावण्या आणी श्रुती घरी जाण्यासाठी पार्कींग मध्ये आलेत. 'त्या' मालकाची कार परत पार्किंग मध्ये होती.

लावण्याला कार कडे बघून परत कार मालकाचा राग आला.

श्रुती - काय झाल लावण्या? चल न.

लावण्या - बघ न श्रुती, लगेच कंप्लेंट केली कारच्या मालकाने माझी. कळलं कस पण मी हे केलं म्हणून?

श्रुती - जाऊ दे न सोड...तुझं काम झाला न...

लावण्या - हो. चल सोड, जाऊ दे.

तेवढ्यात निनाद आणी अद्वैत पण पार्किंग मध्ये आले.

लावण्याची अद्वैतला बघून परत धड धड सुरु झाली, तिने त्याला बघणं टाळलं आणी खालीच बघू लागली.

अद्वैतला लावण्या दिसली आणी तो परत तिलाच बघू लागला. निनादनी हळूच श्रुतीला डोळ्यानी इशारा करून दाखवलं, श्रुतीला पण आनंद झाला.

निनाद - चला मग आज जोड्यानी घरी जाऊयात.

लगेच लावण्या आणी अद्वैत एकमेकांकडे बघतात आणी एकदम 'काय?' म्हणतात.

निनाद - अरे म्हणजे, मी आणी श्रुती जोड्यानी श्रुती कडे जाणार आहोत. तुमच्या बद्दल नाही म्हटलं मी, तुम्ही आणी जोडी कुठे....? म्हणजे?

लावण्याला खूप लाजल्यासारखं होते....'निनाद पण न...कुठे काय बोलतो समजतच नाही.'

सगळे घरी जायला निघतात.

श्रुती निनाद सोबत त्याच्या बाइक वर बसून निघून जाते.

लावण्या गाडी सुरु करते आणि गाडी वर बसते, गाडीच्या mirror मध्ये बघते तर काय अद्वैत त्याच कार मध्ये बसतो ज्याची हवा लावण्या सोडते. लावण्याला खूप मोठा शॉक बसतो. अद्वैत गाडी काढून निघून जातो, आणि लावण्या डोक्यावर हात मारून घेते.... 

क्रमशः..

@विना देशमुख

टीप : कथा आवडल्यास नक्की like , comment , आणि share  करा नावासकट.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Vina Deshmukh

Housewife

Hi, I am fun loving housewife. Singing, dancing, writing and baking are my hobbies. I am a regular visitor on era. I love reading a lot.