एका प्रेमाची गोष्ट - Part 5

@@

पार्ट 5

मागच्या पार्टमध्ये.....

लावण्या ऑफिसला जायला निघते तेव्हा बसस्टॉपवर बसची वाट बघत असते, तिथे एक लहान मुलगी पण खेळत असते, तेवढ्यात तिथे एक आलिशान कार त्या लहान मुलीच्या खूप जवळहुन जाते. त्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात लावण्याला थोडं लागते आणि त्यात तिचा वेळ जातो......म्हणून ती ऑफिसला थोडी उशिरा पोचते...लावण्या गाडीचा नंबर लक्षात ठेवते......

आता पुढे.......     

खरं तर ती आलिशान कार दुसऱ्या कोणाची नसून अद्वैतची असते.

ड्राइवर काका गाडी रिपेअर करून ऑफिस मध्ये नेतांना लावण्या सोबत हा प्रसंग घडतो....

आज लावण्याचं पहिल्यांदा ऑफिसमध्ये प्रेसेंटेशन असल्यामुळे आणि त्यातही ती उशिरा पोचल्यामुळे तिला खूप टेन्शन आलेलं असते.

ऑफिस मध्ये पोचल्या पोचल्या रेस्टरूम मध्ये जाऊन लावण्या स्वतःचा थोडा अवतार ठीक करून घेते, आणि लगेच आपल्या डेस्क वर पोचते. तिथे प्रदीप सर तिची वाट बघत असतात.

प्रदीप सर- अग लावण्या किती वेळ? रोज कशी वेळेवर येते आणि आज नेमका उशीर? लवकर चल अद्वैत वाट बघत आहेत कॉन्फरंस रूम मध्ये.

लावण्या – अद्वैत सर??

प्रदीप सर- हो त्यांच्या समोरच तर द्यायचं आहे तुला प्रेझेंटेशन.

लावण्याला थोडं टेन्शन आलं, एकतर उशीर झाला आणि त्यात अद्वैत समोर ती पाहिल्यान्दा येत होती, तिला आता खरंच फार टेन्शन आलं होतं.

अद्वैत वेळेच्या बाबतीत किती सतर्क आहे हे ती ऐकून होती.

लवकरच ती तिचा लॅपटॉप घेऊन प्रदीप सरांबरोबर कॉन्फरेन्स रूम पोचते. आज पाहिल्यान्दाच ती ऑफिसच्या कॉन्फरन्स रूम बघत असते. प्रोजेक्टर, चेयर्स, भला मोठा आयताकृती टेबलं त्यावर ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या, थंड AC रूम वगैरे सगळं बघून तिला खूप भारी वाटते.   

ती समोर बघते तेव्हा रूमच्या टेबलच्या बरोबर मधल्या खुर्चीवर अद्वैत बसलेला दिसतो, त्याच्या डाव्याबाजूला विधी (विधीचे एक्स्प्रेशन थोडे वैतागलेले असतात.) आणि उजव्या बाजूला अजून २-३ टीममेटस बसलेले दिसतात. आज पहिल्यांदा ती अद्वैतच्या समोर आली असते.

अद्वैतला एकदम स्वतःच्या समोर बघून लावण्याच्या मनाची घालमेल उडते. ब्लॅक कलरचा फॉर्मल शर्ट त्यात लावलेले स्पेक्स, थोडे विखुरलेले केस बघून ती खूपच फ्लॅट होते. डोक्यावरचा थोडा ताण थोड्या वेळासाठी पण का होईना कमी झाल्या सारखा वाटतो. पण लगेच समोर लॅपटॉप बघून तिला आपण इथे कश्यासाठी आलो आहोत ह्याची जाणीव होते, परत टेन्शन यायला लागत आणि हृदयाची धडधड खूप वाढते.

एक मिनिट अद्वैत तीच निरीक्षण करतो.

 लावण्या अद्वैत सगट सर्वाना ग्रीट करते. अद्वैत पण करतो पण अद्वैतच्या कपाळावरच्या आठ्या बघून तिला आणखी टेन्शन आलेलं असते. आपल्याला उशीर झाल्यामुळे अद्वैतचे एक्स्प्रेशन असे असतील असेच तिला वाटू लागत, जे खर पण असतं. प्रदीपसर लावण्याला स्वतःच इंट्रोड्युकशन आणि त्या नंतर प्रेसेंटेशन द्यायला लावतात. त्या प्रमाणे ती स्वतःच इंट्रोड्युकशन सुरु करते.

आधीच उशीर, त्यात पहिल प्रेसेंटेशन, समोर अद्वैत आणि त्याचा त्रासिक चेहरा, विधीचे एक्स्प्रेशन त्यात ती पूर्ण ब्लॅक होऊन जाते. नेमक काय बोलायचं आहे हे ती विसरते. तिचा खूप गोंधळ उडतो.

अद्वैतला लक्षात येत तसा तो म्हणतो,

"Ms Lavanya please relax, as this is your first presentation don’t worry, just do it."..अद्वैत

अद्वैत च्या बोलण्यामुळे तिला थोडा धीर येतो, खरं तर अद्वैतला समोर बघून तिला एक वेगळ्याच प्रकारची धडधड होते पण ती हे ती कोणालाच सांगू नाही शकत.

ती लगेच प्रेझेंटेशन सुरु करते. (अद्वैत कडे न बघता, अद्वैतला बघून एक वेगळ्याच प्रकारची धड धड तिच्या मनात होत असते, हे टाळण्यासाठी ती त्याच्या कडे बघतच नाही). जवळ पास ३० मिनिटांनी प्रेझेंटेशन संपत.  

लावण्याला पहिल्यांदा बघितल्यावर अद्वैतला हिला कुठे तरी बघितल्या सारखं वाटतं पण आठवतच नाही कुठे ते.

तसा तो आठवण्याचा खूप प्रयत्न करू लागतो, मग त्याला आठ्वले,

"अरेच्या!! हि तर ती बसस्टॉप वरची मुलगी जिने त्या शाळेच्या मुलींना पावसाच्या खराब पाण्यापासून वाचवलं होतं."

तसा अद्वैतचा ती उशिरा आल्याचा राग थोडा कमी होतो. थोडा नॉर्मल होतो, त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी सामील येते.

प्रेसेंटेशन दरम्यान विधी अद्वैत कडे बघत असते, अद्वैत प्रेसेंटेशन मन लावून बघत असतो, त्याला ते आवडते.  त्या नुसार त्याचे चेहऱ्यावरचे भाव पण बदलतात, विधी नेमकं तेच टिपते. विधीला अद्वैत दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे बघून इंप्रेस झालेला बघवत नाही. म्हणून विधी लावण्याला मुद्दामून काही कठीण प्रश्न विचारते. बऱ्यापैकी अभ्यास करून आल्यामुळे लावण्या छान उत्तर देते पण विधीच्या एक्स्प्रेशन वरून तिला ते आवडले अस दिसत नाही. तशी लावण्या थोडी घाबरते पण नंतर स्वतःला सावरते.

विधी सोडून तीच प्रेसेंटेशन सगळ्यांना फार आवडतं, त्यावर अद्वैत ४-५ प्रश्न तिला विचारतो आणि लावण्या छान उत्तर पण देते. आयुष्यात पहिल्यांदा प्रेसेंटेशन देउन सुद्धा कॉन्फिडन्टली उत्तर दिल्या बद्दल त्याला तिचं फार कौतुक वाटते.

तो खूप इंप्रेस होतो.

प्रेसेंटेशन संपल्यानंतर सगळेच जायला निघतात. अद्वैत तिथेच थांबतो त्याला तिथे थांबलेले बघून विधी पण तिथेच थांबते.

विधीला लावण्याचा अद्वैतवर पडलेला प्रभाव कमी करायचा असतो, म्हणून ती मुद्दामूनच प्रेसेंटेशन मध्ये काही चुका काढते.

विधी लावण्याच्या प्रेसेंटेशन मध्ये काय काय चुका होत्या हे सांगते. त्या चुका फार लहान असतात पण सिनियरला काय म्हणाव म्हणून लावण्या ऐकून घेते. अद्वैत पण observe करतो पण नंतर पण दोघींमध्ये काय बोलायचं म्हणून दुर्लक्ष करतो. सगळं झाल्यावर लावण्या जाणारच तोच…

अद्वैत – “Miss lavanya, wait.

 Vidhi, can you please excuse us?”

विधी: sure

इच्छा नसताना विधीला उठाव लागत, अद्वैत तिला जायला सांगेल असं तिला वाटतच नाही. नाईलाजाने तिला जावं लागते.

सगळे निघून जातात, रूम मध्ये फक्त लावण्या आणि अद्वैत. लावण्याची धड धड पुन्हा सुरु होते. तिला त्याच्या कडे बघायला पण होत नाही पण अद्वैतला वेगळंच काही वाटू नये म्हणून ती त्याच्या कडे जबरदस्तीने बघते.

तितक्यात अद्वैतचा फोन वाजतो, 'wait for 1 min ' असा लावण्याला इशारा करतो आणि फोन वर बोलत असतानाच तो चेअरवरून उठून लावण्याकडे येतो. लावण्याच्या जवळ ये पर्यंत सगळं स्लो मोशन मध्ये सुरु आहे, पूर्ण रूम मध्ये गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत आहे असा तिला भास होतो. अद्वैत चालत येत असताना तिच्या मनात गाणं सुरु होत..

"देखा जो तुम को यह दिल को क्या हुआ है
मेरी धड़कनों पे यह छाया क्या नशा है हाँ

मोहब्बत हो न जाए दिवानी खो न जाए
सँभालु कैसे इसको मुझे तू बता……………

तिचं गाणं संपते तोपर्यंत तो तिच्या जवळ पोचलेला असतो.

अद्वैतला फोन वर बोलताना त्याला भान नसतं, तो लावण्याच्या खूप जवळ उभा असतो, त्याला इतका जवळ बघून लावण्याला पूर्ण अंगावर शहारे येतात म्हणून ती २ पावलं मागे सरकते.

तो फोन वर बोलत असतो तेव्हा लावण्या त्यालाच बघत असते. पोटात असंख्य गुदगुल्या होत आहेत, आता मला हार्ट अटॅक येतो कि काय अस तिला वाटून जात.

प्रथमच लावण्या त्याला इतक्या जवळून बघत असते, काळे टपोरे डोळे, हलकीशी दाढी, डाव्या गालावरचा तीळ, हलका लावलेला perfume सगळं कस वेड लावणार असत. लगेच लावण्या स्वतःच्या मनाला सावरते. मनात तिच्या द्वंद युद्ध सुरु असतं, ती मनाला समजावते.

"लवी प्लीज, काय करत आहेस तू? बॉस आहे तो तुझा. हे सगळं शक्य नाही, तो आपल्या मध्ये कधीच इंटरेस्टेड राहणार नाही, ह्याला काय कमी आहे आयुष्यात. त्याला लाखो मुली मिळतील. ना तर आपण पैश्यानी ह्याची बरोबरी करू शकतो ना दिसण्याने. आपल्या पेक्षा किती तरी सुंदर मुली भेटतील त्याला, नाहीच कोणी भेटलं तर विधी तर आहेच, दोघांचं बॉण्डिंग पण किती छान आहे. हा विचार मनात पण नको येऊ देऊ."

"मिस लावण्या"

"मिस लावण्या"

लगेच ती भानावर येते.

"u  ok  ?" अद्वैत

"अ हो सॉरी" लावण्या

अद्वैत - मिस लावण्या, तुमच प्रेझेंटेशन खूप छान होतं, keep it up, पण वेळेला खूप किंमत असते, तुमच्या साठी १० मीनीट काहीच नसतील पण कोणासाठी १० मिनिट खूप असतात. पुढच्या वेळेस लक्षात असू द्या, anyways good work, keep it up.

लावण्या – ok sir I will keep in mind and thank you.

अद्वैत एक घायाळ करणारी smile देतो आणि कॉन्फरेन्स रूमच दार पकडून लावण्याला पहिले तू जा म्हणून दार पकडून उभा राहतो. एवढा मोठा माणूस पण आपल्यासाठी दार पकडून उभा ह्याच तिला फार अप्रूप वाटत. 

ती भरकन निघते आणि क्युबिकल मध्ये जाऊन बसते. मनातली धड धड आता थोडी कमी होते. तिला नुसत्या गुदगुल्या होत असतात. पण उशीर झाला म्हणून अद्वैत बोलला त्याबद्दल तिला फार वाईट वाटतं. तिला अद्वैतचा रागच आला.

'असा कसा हा? निदान विचारायचं तरी कि का उशीर झाला?. सामान्य लोकांचे पण काही प्रॉब्लेम असतात, ह्याच्या सारखी कार नसते ना प्रत्येकाकडे, इतकी मेहनत घेतली प्रेझेंटेशन वर आणि शेवटी उशीर झाला म्हणून बोलणे पण ऐका, जाऊ दे सोड, निदान प्रेझेंटेशन तरी आवडलं हे छान झालं'

अद्वैत स्वतःच्या केबिन मध्ये जातो आणि सहजच त्याची नजर लावण्याकडे जाते.

'अरेच्या हि इथे बसते, आपल्याला कशी दिसली नाही इतक्या दिवस? असो आणि परत कामात व्यस्त होतो. 

श्रुती निनाद भेट

श्रुती आणि निनाद दोघंही आज सुट्टीवर असल्यामुळे बाहेर भेटतात.

श्रुती - निनाद, बाबांशी बोलले मी, ते तयार आहेत तुला भेटायला. तू लवकर भेटायला ये मग पुढचं काय ते ठरवता येईल.

निनाद - अरे वाह, फार छान न्युज दिली तू मला...लवकरच येतो भेटायला...छान.

खरंच श्रुती, आज खूप आनंद होत आहे मला, शेवटी लवकरच आपण एक होऊ. आयुष्यात एक छान जोडीदार भेटला कि आयुष्य किती सुंदर होते ग.

श्रुती - हो ना खरंच. (मग श्रुती विचारात गुंग होऊन जाते)

निनाद- काय झालं श्रुती, कसला विचार करत आहेस?

श्रुती - मी लावण्याचा विचार करत आहे, ह्या सगळ्या आनंदापासून पासून ती किती दूर आहे. लग्नच नाही करत म्हणते ती.

निनाद- अग असं कस होईल? एक छान जोडीदार तिला पण मिळेल, नक्कीच करेल ती लग्न.

श्रुती - नाही रे, तुला नाही माहित. (श्रुती निनादला सांगणारच कि लावण्या का लग्न नाही करणार तेच तिला आठवते कि लावण्यांनी श्रुतीला ह्या विषयी कोणाला पण ना सांगण्याची शप्पथ घातली आहे.)  

निनाद - आपल्या अद्वैतच पण तेच आहे, अजून लग्नाचं काही सिरिअसली घेतच नाही आहे.

श्रुती - (हसतच) लावण्या आणि अद्वैत दोघंही सिंगलच आहेत, ह्याचंच लग्न लावून देउयात....

निनाद - गुड आयडिया

श्रुती - काय? (एकदम ओरडलीच) अरे मी गम्मत करत आहे.

निनाद - पण मी नाही करत आहे.

श्रुती - ते दोघं एकमेकांना कधी भेटले पण नाही, लग्न काय करतील?

निनाद - अग आपण कश्यासाठी आहोत, आपण भेटवू. प्रयत्न करायला काय हरकत आहे?

श्रुती - तू खरंच वेडा आहेस, चल घरी जाऊयात उशीर होत आहे मला.

दुसऱ्या दिवशी श्रुती आणि लावण्या, सोबतच ऑफिस मध्ये आल्या. लावण्याने कालचा सगळा प्रसंग श्रुतीला गाडीवरच सांगितला. गाडी पार्क करून दोघी जात होत्या तेवढ्यात लावण्याचं लक्ष ऐका कार कडे गेलं. हि तीच कार होती ज्या च्यामुळे आदल्यादिवशी त्या लहान मुलीला खरचटलं होतं आणि लावण्याला ऑफिस मध्ये पोचायला उशीर झाला होता..

 लावण्या - 'अरे बापरे गाडी चा मालक इथे वर्क करतो वाटते.'

श्रुती - 'कोण ग?'

लावण्या - 'अग, हि कार बघ, काल हिच्या मुळे मला फार उशीर झाला आणि कार मालकाला काहीच वाटलं नाही, सरळ निघून गेला. ह्याच्या मुळेच मला उशीर झाल्या आणि ह्याच्या मुळेच मला अद्वैत सरानी ऐकवलं.'

श्रुतींनी नीट बघितलं ती अद्वैतचीच कार होती. श्रुती अद्वैतला ओळखत असल्यामुळे तिला त्याची कार माहित होती, तसे तिला कालचे निनादचे शब्द पण आठवले 'प्रयत्न करायला काय हरकत आहे?’, तिला वाटलं ह्या निमित्तानी निदान दोघं भेटतील तरी, म्हणून तिनी लावण्याला उकसवायचं ठरवलं. '

श्रुती - हो ना तुला खरचटलं आणि बोलणे पण ऐकावे लागले. मग आता काय? इथे बसून वाट बघणार त्याची?

लावण्या – वाट? त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही मला, पण त्याला धडा तर नक्की शिकवणार मी.

श्रुती: नेमकं काय करणार आहेस तू?

लावण्या: वेळ आली कि सांगतेच, सांगायचं काय दाखवेलच.

४-५ दिवस असेच गेलेत. एक दिवस अद्वैतला आणि लावण्याला घरी जायला उशीर होणार होता. लावण्या काम संपवुन पार्किंग मध्ये आली. पार्किंग मध्ये ३-४ कार होत्या, त्यात लावण्याला ती कार दिसली, इकडे अद्वैत पण घरी जायला निघाला, खाली आला तोच त्याला त्याच्या कार जवळ कोणी तरी घुटमळत आहे असं दिसलं, त्यांनी लपून बघितलं तर त्याला लावण्या दिसली.

"अरेच्या हि काय करत आहे माझ्या कार जवळ?"…….अद्वैत मनोमन विचार करू लागला.

लावण्याने कारच्या एका टायर मधली हवं सोडून दिली. आपल्याला कोणी बघितलं नाही ह्याची खात्री करून सकूटी घेउन घरी निघून गेली.

अद्वैत नि हे ​सगळं पिलर च्या मागे उभा राहून बघितलं. त्याला फार नवल वाटलं, हिने असं का बरं केलं असावं?

थोडा वेळ तिथेच विचार करून त्यानी ड्राइवर काकांना गाडी बरोबर करून आणायला सांगितलं आणि घरी गेला.

पूर्ण रस्ता हाच विचार कि असं का केलं असावं हिने?

रात्र भर लावण्याचा चेहरा त्याच्या समोर येतो आणि सारखा प्रश्न येतो, का केलं असेल हिने असं?

क्रमशः....

@विना देशमुख

विनंती: माझी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियेमुळे माझा उत्साह नक्कीच वाढेल आणि कथा वाढवायला अजून हुरूप येईल. तब्येत बरी नसल्यामुळे पुढचा भाग थोडा उशिरा येईल. लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न नक्की करेल.

🎭 Series Post

View all