एका प्रेमाची गोष्ट - Part 3

@@

आज लावण्याचा ऑफिस चा पहिला दिवस. आज छान पण सिम्पल तयार होऊन लावण्या ऑफिसमध्ये आली.

गेट च्या दोन्ही बाजूनी विविध सुंदर झाडे आणि फुलं होती, रस्ता एकदम एका राजवाड्या सारखा दिसत होता. मुख्य इमारतीच्या खाली मोठी पार्किंग होती. सगळं कसं स्वच्छ आणि छान दिसत होतं.

कंपनीच्या भव्य हॉल मध्ये गणपतीचा छान सुरेख फोटो होता. खूप सिम्पल पण सुंदर इंटिरियर डेकोरेशन होतं. लावण्याला तिथल्या स्वछ्तेची आणि शिस्तीची एक वेगळीच झलक बघायला भेटली. आपण ह्याचा एक पार्ट बनू हा विचार करून मनातून ती खूप खुश झाली. 

जवळ पास १५ न्यू जॉईन झालेले मुलं मुली होते, हे बघून लावण्याला जरा हायस वाटलं. सगळे वेळेच्या आत पोचले होते. ९ वाजता कंपनीचं induction प्रोग्रॅम सुरु होणार होता. सगळ्यांचा एकमेकांशी परिचय झाला. आजचा संपूर्ण दिवस असाच गेला.

२-३ दिवसात टीम पडून सगळ्यांना काम भेटणार असं सांगण्यात आलं.

लावण्याच्या टीम मध्ये अनिर्बाण पण जॉईन झाला होता. अनिर्बाणला लावण्या बघताच क्षणी आवडली. तो तिच्याशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला, अर्थातच लावण्याचं हे सगळं लक्षात आलं पण त्या वाटेला जायचंच नाही म्हणून ती त्याला दुर्लक्ष करत होती आणि कामाकडे लक्ष देत होती.

काही दिवसानी न्यू जोईनीला मार्गदर्शन आणि दिग्विजय पाटीलांची निवृत्ती म्हणून एक मीटिंग घेण्यात आली.

कंपनीच्या टाउनहॉल मध्ये मीटिंग होती. ठीक १० ला मीटिंग सुरु झाली. त्यात नवीन जुने सगळेच एम्प्लॉयी आले होते. दिग्विजय पाटील सोबत वसुंधराताई पण आल्या होत्या. लावण्या आणि श्रुती जवळच बसल्या होत्या.

दिग्विजय पाटील उठल्यानंतर एकच टाळ्यांचा गजर झाला. स्वतःच्या तत्वनिष्ठतेमुळे आणि स्वभावामुळे सगळ्याच्या मनात त्यांच्या विषयी फार आदर होता. तसे ते बोलायला लागले.

दिग्विजय – “मित्रानो, मी आज खूप काही बोलणार नाही फक्त एवढच सांगणार आहे कि आज तुमच्या मुळे आणि फक्त तूमच्या मुळेच ह्या कंपनीला स्वतःच असं एक स्थान मिळालं आहे. आजपर्यंत कंपनीला तुमच्या मुळे सतत फायदाच होत गेला. तुमच्या अपार कष्टामुळे हि कंपनी कुठून कुठे गेली. अजूनही अशीच प्रगतीच होत राहील अशी आशा करतो. आता मी थकलो आहे आणि माझी निवृत्तीची वेळ झाली आहे.

माझ्या नंतर ह्या कंपनीचे सर्व कारभार माझा मुलगा अद्वैत सांभाळेल. अद्वैत तुला खूप खूप शुभेच्छा.”

तसा एकच टाळ्यांचा गजर झाला.

जसा अद्वैतनी माईक घेतला तसा मुलींनी टाळ्यां वाजवणं सुरु केल्या. टाळ्या इतक्या वेळ सुरु होत्या कि शेवटी अद्वैतला विनंती करून त्या थांबवाव्या लागल्या आणि का नाही होणार अद्वैत एक मोस्ट एलिजिबल बॅचलर होता.  एक हॅंडसम, कोणालाही आवडणारा आणि त्यातल्या त्यात श्रीमंत मुलगा.

अद्वैतनी स्वतःला कस सिद्ध केल आणि त्यात त्याला काय काय अडचणी आल्या ह्या बद्दल सर्व सांगितलं. आपल्या आयुष्यात आपण वेळेला किती महत्व दिलं पाहिजे ह्या वर पण बोलला. त्याचा स्पीच इतका इन्स्पिरेशनल होतं कि सगळे मंत्रमुग्द होऊन ऐकत होते.

त्यात लावण्या पण होती. लावण्याला तर तो दिसताच क्षणी फारच आवडला.

'कसला हॅंडसम आहे हा, जिच्या हि नशिबात असेल ती किती नशीबवान असेल' तिच्या डोक्यात विचार येऊन गेला.

स्पीच संपलं तरी ती एकटच अद्वैत कडे बघतच होती.

तितक्यात श्रुतींनी तिला आवाज दिला.

श्रुती - 'लवी'

श्रुती - 'लवी' 

(लावण्याला तिच्या फार जवळचे लोक लवी म्हणायचे.)

लावण्या - ओह सॉरी माझ लक्ष नव्हत, काय झालं?

श्रुती – “मला वाटत आहे स्पीच संपलं (आणि हसायला लागली)”

लावण्या- “अरे हो, लक्षातच नाही आलं माझ्या.”

श्रुती – “ते दिसतच आहे मला, त्याला खाऊ कि गिळू असं बघत आहेस तू. आवडला वाटते अद्वैत?.”

लावण्या- “तुझं झालं परत सुरु? “

श्रुती – “त्यात काय, तुला आवडला असेल तर सांग मी सांगते तसं त्याला. मी ओळखते त्याला. “

लावण्या- “मॅडम जरा जमिनीवर या. जगातल्या श्रीमंत पोरी काय संपल्या आहेत का कि ह्याला मी आवडेल आणि तसही ज्या गावाला जायचंच नाही त्याचा रस्ता नाही विचारत मी.”

श्रुती – “कोणाला माहित, तू त्या गावाला जाणार नाही पण ते गाव तुझ्या जवळ येईल. u never know. (आणि परत हसायला लागली.)”

लावण्या- “तुला आवडला असेल तर तूच कर ना लग्न.”

श्रुती – “मीच केलं असत ग, पण तुला तर माहित आहे माझा हिरो आधीच रेडी आहे. “(परत दोघींचं हसणं सुरु झालं, तितक्यात घोळक्यातून एक आवाज आला. निनाद श्रुतीचा हिरो. निनाद श्रुतींच्याच ऑफिस मध्ये आणि अद्वैत चा खूप छान मित्र.)

निनाद – “हाय श्रुती, हाय लावण्या.”

लावण्या – “हाय जीजू, कसे आहात?”

निनाद – “अरे वाह आज एकदम जीजू. अजून झालो नाही आहे, कधी होईल देवाला माहित.“

लावण्या – “ओह डोन्ट वरी लवकरच होणार.” (मग थोड्या फार गप्पा मारून सगळे आपापल्या कामाला लागतात.)

८ दिवसानंतर टीम पाडण्यात आल्यात. लावण्या प्रदीपसरांच्या टीमच्या अंडर अली. टीम मध्ये आल्यावर तिला लवकरच कळले कि प्रदीपसर दुसऱ्या ब्रांचला ट्रान्सफर होऊन जाणार आहेत. त्यांच्या ठिकाणी कोणी दुसरी मुलगी येणार आहे. लावण्या मन लावून काम करू लागली. असेच दिवस जात होते.

एका दिवशी प्रदीप सरानी सगळ्यांना केबिन मध्ये बोलावलं, सगळे एंटर झाले तसे तिथे एक सुंदर मुलगी उभी होती, सगळ्यांना फार उत्सुकता होती कि ती कोण आहे ते? सगळे जमा झाल्यावर तिने स्वतःच इंट्रोड्युकशन करून दिल,

"Hi, I am Vidhi” ….. बोलताना विधी खूप कॉन्फिडन्ट वाटत होती आणि थोडी attitude पण देत होती. तिचा attitude तिला शोभत पण होता.  प्रदीप सर काही दिवस सुट्टी वर जाणार होते सो सगळं विधीच बघणार होती.   

सगळी न्यू टीम विधीला रिपोर्ट करणार होती आणि विधी अद्वैतला.  

आता लावण्याला कंपनी जॉईन करून जवळपास तीन ते चार महिने होत आले होते.

ह्या चार महिन्यात बरेचदा तिला अद्वैत दिसायचा पण दोघांची काही ओळख नसल्यामुळे आणि काही काम नसल्यामुळे कधीच बोलणं ह्यायचं नाही. हळू हळू लावण्या स्वतःच्या मेहनतीमुळे कामामध्ये एक्स्पर्ट होत गेली.

मधे मधे लावण्याला, विधी आणि अद्वैत खूपदा बोलताना दिसायचे, त्यामुळे त्या दोघं मधे काही तरी आहे असे तिला नेहमी वाटायचे. विधी आणि अद्वैतचे हेय एकमेकांच्या नात्यात येतात असं पण लावण्याला समजले. जे खरं पण होते.

अश्यातच एका शनिवारी....

आई- “लावण्या, उद्या फ्री आहेस ना बाळा तू?”

लावण्या – “हो आई, उद्या सुट्टीच आहे. बोल कुठे जायचा आहे?”

आई – “कुठे नाही ग, तुला तेच सांगणार होती, कि उद्या घरीच राहा, थोड काम आहे घरी. पाहुणे येणार आहेत.”

लावण्या- “कोण पाहुणे आई?”

आई – “कळेलच तुला उद्या?”

लावण्या- “नाही उद्या नाही, आताच सांग, कोण येणार आहे?“

(लावण्याला थोडा अंदाज आला च होता?)

आई- “उद्या तुला बघायला एक मुलगा येणार आहे.”

लावण्या – “आई, हे काय नवीनच, मी तुला सांगितलना मला सध्या लग्न करायच नाही आहे.”

आई- “आग बाळा, सध्या नको करू, आपण जुळवून तर ठेऊ आणि आताच कुठे काय होत आहे, आजून तर पाहणी व्हायची आहे.”

लावण्या – “पण आई मला तुला सोडून कुठेही जायच नाहीआहे ग.” (लावण्याला लगेच भरून आल.)

आई- “बाळा हि तर जगाची रीतच आहे, मुलीला माहेर सोडून सासरी जावंच लागेत, आज तू अस म्हणत आहे, उद्या तुला तुझा नवरा भेटेल, तुझी पिल्लं येतील, त्यात तू सगळं विसरशील. खूप छान आहे ग जग लग्नानंतर.”

लावण्या – “पण तुझ काय आई? तुला कोण सांभाळेल? कोण लक्ष देईल? आपले इतके नातेवाईक आहे पण त्यांनां आपल्या बद्दल काहीच नाही ग. तुला एकटीला सोडून मी नक्कीच नाही राहू शकणार.”

आई- “माझी नको ग काळजी करू, देव आहे आपल्या पाठीशी, होईल सगळं ठीक.”

लावण्या – दे”व आपल्या पाठीशी असता आई, तर आपण एवढे वाईट दिवस बघितलेच नसते. आपल्या सोबत इतक सगळं वाईट झालच नसत. तुझ्या वर इतके वाईट दिवस आलेच नसते.”

आई- “ बाळा, सगळ्यांच्याच आयुष्यात सुख दुःख येत असतात, पण आपण त्यांना कसा समोर जातो हे महत्वाच. एवढे वाईट दिवस काढल्यानंतर आज तू स्वतःच्या पायावर उभी आहे हे महत्वाच, ह्या पेक्षा आनंदाची गोष्ट कुठलीच नाही माझ्या साठी. आता बस तुला एक छानसा मुलगा भेटो, म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी.”

लावण्या – “आई प्लीज.....”

आई- “अग गम्मत केली. मग उद्या राहील ना माझ बाळ तयार. माझ्या साठी एवढ कर, माझ्या साठी एकदा हो म्हण. “

लावण्या - (थोडा विचार करून) “पण मला मुलगा आवडला तरच मी लग्नाला हो म्हणेल.”

आई – “मी तुझ्यावर कुठलीच जबरदस्ती नाही करणार. खर.”

रात्री लावण्याच्या डोक्यात विचार चक्र सुरु होतं, हो तर म्हटलं आपण पण मग पुढे काय?...विचार करता करता खूप उशिरा तिला झोप लागली.

रविवारी लावण्या लवकर उठून तयार झाली. ठीक १० ला सकाळी ती मंडळी आली.

मुलगा (रितेश), त्याचे आई बाबा आणि त्याच्या दोन मोठ्या बहिणी.

रितेश एका बँक मध्ये चांगल्या पोस्टवर मॅनेजर म्हणून होता.

लावण्या मनापासून तयार नव्हती म्हणून ति खूप खास तयार नव्हती झाली, पण तिच्या बोलक्या डोळ्यांमुळे आणि लाघवी चेहऱ्यामुळे तिला मेकअपची खास गरज नाही लागायची. पोह्याचा ट्रे घेऊन लावण्या आली, जशी आली तशी ती सगळ्यांच्याच मनात एकदम भरली. 

रितेशला तर ती फारच आवडली. थोडा बहुत लावण्याला विचारून आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारून ती मंडळी निघून गेली.

दिवस भर लावण्याची आई तर फारच खुश होती, त्या लोकांच्या चेहऱ्यावर तिला वाटले कि नक्की होकार येणार आणि लावण्या उदास, तिला बिलकुलच उत्साह नव्हता कसल्या कामाचा.

दिवस भर तिला वाटत होतं कि होकार नको यायला कारण रितेश नाही म्हणयासारखा नव्हता. वय, शिक्षण, नोकरी सगळ्यातच तो परफेक्ट बसत होता. जे लावण्याला नको होतं तेच झालं, त्यांच्या होकार आला.

आई – “बाळा, त्यांचा होकार आला.”

लावण्या- “पण आई मी आजून होकार नाही दिला आहे.”

आई- “अग पण....”

लावण्या – “मी तुला सांगितलं होतं ना कि मी हो म्हटलं तरच आपण पुढे जाऊ..”

आई- “बरं बाई तू वेळ घे आणि सांग मला.”

लावण्या- “आई, मला त्या मुलाशी एकदा भेटायचं आहे.”

आई - “बरं मी मुलाच्या आईला फोन करून विचारते. “

असं बोलून आईनी रितेशच्या आईला फोन केला. खरं तर रितेश च्या आई ला हि गोष्ट एकदम आवडली नाही पण त्यांनी उद्या ऑफिस नंतर दोघांची भेट ठरवली.

आज लावण्या ऑफिसमधून रितेशला भेटण्यासाठी थोडी लवकरच निघाली. दोघांनी एका रेस्टऑरेंट मध्ये भेटायचं ठरवलं.

रितेश – “ये लावण्या बस.”

लावण्या – “थँक यू !!”

रितेश - (लावण्याला थोडा वेळ रितेश एकटक बघत राहतो, मग थोडा भानावर येतो) “ओह सॉरी, मी विचारायलाच विसरलो, काय घेणार तुम्ही?”

लावण्या – “चहा चालेल. “

(रितेश वेटर ला ऑर्डर देऊन देतो.)

मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर रितेशनी स्वतःच विषयाला सुरुवात केली.

रितेश – “मला माझ्या आई कडून कळाल कि तुम्हाला माझ्या सोबत काही तरी बोलायचं आहे, बोला.”

लावण्या वाटच बघत होती ह्या विषयाची.

लावण्या – “मला तुमच्याशी थोड्या वेगळ्या विषयाला वर बोलायचं आहे.”

रितेश – “हो बोला ना, एकदम निश्चिन्त होऊन बोला, त्या साठीच तर आज आपण भेटलो आहोत.”

लावण्या – “तुम्हाला तर माहीतच आहे कि मला वडील नाही आणि मी एकुलती एकच आहे. माझ्या साठी माझ्या आई नी फार खस्ता खाल्य्या, मला सोडून तिचा बाकी कोणीच जवळचा नाही आहे. तर माझी विनंती आहे तुम्हाला कि लग्नानंतर माझी आई माझ्या सोबत राहील, तिचा सगळं खर्च मी उचलेल तुमच्या वर कुठलाच भार येऊ देणार नाही किंवा तिच्या मुळे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला काही प्रॉब्लेम होणार नाही ह्याची काळजी घेईल. “

रितेश साठी हि विनंती एकदम अनपेक्षित होती.

लावण्या – “आणि तुम्हाला जर हे मान्य असेल तरच मी तुमच्या सोबत लग्नं करेल.”

रितेश थोडा वेळ शॉक झाला, आणि म्हणाला.

रितेश – “लावण्या मला तर तुम्ही फारच आवडल्या आहात, खरंच. मला पण माझे आई बाबा जसे हवे आहेत तसे तुम्हाला पण हवे असतीलच, मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकतो. मला चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे.”

लावण्याला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता, तसं तिने परत विचारलं.

लावण्या – “ म्हणजे तुम्हाला माझी आई आपल्या लग्नानंतर आपल्या सोबत राहील हे चालणार आहे.”

रितेश – “हो, तुम्ही बरोबर ऐकलंत.”

लावण्या – “मला वाटत आहे तरीही तुम्ही एकदा तुमच्या घरातल्या लोंकासोबत बोलून बघावा, त्यांना चालेल ना?”

रितेश – “त्यांची काळजी नका करू, त्यांना काहीच प्रॉब्लेम नसणार आहे.”

हे सगळं ऐकून लावण्याला खूप आनंद झाला इतका कि आपण कुठे आहोत ह्याचा तिला भानच नव्हता.

आता तिची कळी खूपच खुलली. तिला मनापासून रितेश आवडून गेला...आणि ख़ुशी ख़ुशी ती घरी गेली......पण.....

क्रमशः...

@विना देशमुख

कथा कशी वाटली नक्की कळवा.

🎭 Series Post

View all