Oct 16, 2021
प्रेम

एका प्रेमाची गोष्ट - Part 2

Read Later
एका प्रेमाची गोष्ट - Part 2
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

(आज अद्वैतच्या ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे. मीटिंग मध्ये अद्वैत आणि त्याचे वडील दिग्विजय पाटील दोघंही जाणार आहेत.)

अद्वैत -  "काका लवकर कार काढा, मी आलोच आहे. आज एक खूप महत्वाची मीटिंग आहे. आपल्याला वेळेच्या आधी पोचायला हव." अद्वैत ड्राइवर काकांना सांगू लागला.

रामकाका- बरं अद्वैतभाऊ काढतो, या तुम्ही लवकर.

अद्वैत - आई, लवकर ब्रेकफास्ट दे ग, मला उशीर होत आहे.

वसुंधराताई - हो रे बाबा किती घाई? घे, पण थोडं आरामात खा. किती धावपळ करतोस अद्वैत? जरा स्वतःकडे पण लक्ष दे.

अद्वैत- आई, तुला माहित आहे ना मला कुठेपण उशिरा जायला आवडत नाही आणि आजतर खूप महत्वाची मीटिंग आहे. मला वाटत आहे बाबा तर निघून पण गेले असतील.

आई - हो ते केव्हाच गेलेत आणि ऑफिस मध्ये पोचले पण असतील. घे नाश्ता आणि सावकाश खा. संध्याकाळी लवकर घरी ये, आपल्याला नलूमावशीकडे जायचं आहे, येणार ना?

अद्वैत - बरं आई, पहिले मला जाऊ तर दे मगच मी लवकर येईल ना.

आजची मीटिंग खूप छान झाली, कॉन्ट्रॅक्ट शेवटी अद्वैतच्या कंपनीलाच मिळाले. आज अद्वैतनी खूप छान प्रेसेंटेशन दिलं त्यामुळेच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आज दिग्विजय पाटलांना स्वतःच्या पोराचा फार आभिमान वाटला. आता मी पूर्णपणे अद्वैतवर कारभार सोपवू शकतो. त्यांनी मनोमन ठरवलं.

त्यांनी अद्वैतला स्वतःच्या केबिन मध्ये बोलावून घेतलं.

अद्वैत - सर, आत येऊ?

(अद्वैत वडिलांना ऑफिस मध्ये 'सर' बोलवायचा. त्यानी कधीच वडिलांच्या मोठे होण्याचा माज केला नव्हता. आपल्या वडिलांसारखाच आपणपण स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असा त्यानी ठरवून टाकलं होत.)   

दिग्विजय - अरे ये, आज परमिशन नको मागू. आज एक सर म्हणून नाही तर एक वडील म्हणून तुला शाबासकी द्यायची आहे.  

दिग्विजय - अद्वैत, अभिनंदन !!अभिनंदन !!अभिनंदन !! आज तुझ्या मुळे कंपनीला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं.

अद्वैत - धन्यवाद बाबा.

दिग्विजय - चला म्हणजे आता मी तुझ्या आईला वेळ द्यायला मोकळा.

अद्वैत - पण बाबा.....

दिग्विजय - अरे काळजी नको करू, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.

अद्वैत - बरं बाबा आज जरा मी लवकर घरी जाणार आहे, आज आईला घेऊन नलूमावशी कडे जायचं आहे.

दिग्विजय - अरे आता तू कंपनीचा मालक आहेस. तुझं तू ठरव.

(तसे दोघंही हसायला लागले.) 

संध्याकाळी अद्वैत घरी येऊन आईला नलूमावशी कडे घेऊन गेला.

नलूमावशी आणि वसुंधराताई दोघी सख्या बहिणी नसल्या तरी सख्य्या मैत्रिणी. त्यांची मैत्री एकदम बालपणापासून. नलूमावशी अद्वैतला स्वतःच्या मुलासारखी मानायची.

अद्वैत - हाय मावशी, कशी आहेस?

नलूमावशी - या युवराज, आम्ही तर एकदम मजेत, तुम्ही सांगा...

अद्वैत - आम्ही पण मजेत.

एकूण सगळ्या गप्पा रंगल्या.

अद्वैत - वाह मावशी, काय खमंग सुगंध पसरला आहे ग घरात. काय बनवलं आहे?

नलूमावशी - वेजिटेबल कटलेट. बस थांब येतच असतील.

इतक्यात एक सुंदर पण मॉडर्न मुलगी ट्रे घेउन येऊ लागली.

तसा नलूमावशीनी वसुंधराताईंना डोळा मारला.

नलूमावशी - हि मोनिका माझ्या मित्राची मुलगी आणि मोनिका हा अद्वैत आणि त्याची आई वसुंधरा.

अद्वैतला लक्षात नव्हतं येत नेमकं काय सुरु आहे पण आई आणि मावशीचे इशारे तो समजून गेला कि आपल्याला इथे मोनिकासोबत भेटावयाला आणला आहे पण त्यानी तसं काही दाखवलं नाही.

इतक्यात मावशी आणि आई उठून आत गेल्या. रूममध्ये फक्त अद्वैत आणि मोनिका.

जश्या मावशी आणि आई रूमच्या बाहेर गेल्या तशी मोनिका अद्वैतजवळ येऊन बसली जे अद्वैतला बिलकुल आवडलं नाही.

मोनिका - हाय अद्वैत, कसा आहेस तू?

अद्वैत - मी ठीक. तू?

मोनिका - एकदम मजेत.

अद्वैत - बाय द वे, आपण ह्या आधी कधी भेटलो आहोत का?

मोनिका - नाही, कधीच नाही. पण मी नलूमावशीकडून फार ऐकलं आहे तुझ्याबद्दल.

अद्वैत - ओह अच्छा.

मोनिका - कस सुरु आहे मग ऑफिस अँड ऑल?

अद्वैत - सगळं मजेत. तू काय करतेस?

मोनिका - मी एका मल्टिनॅशनल फर्म मध्ये आहे.

अद्वैत - हुम्म्म ओक.

मोनिका - वेजिटेबल कटलेट खाऊन बघ ना.

(खर तर अद्वैत ला मावशी आणि आईसोबत खायचे होते पण मोनिकाचे मन त्याला मोडता नाही आले. अद्वैत खाऊ लागला. वेजिटेबल कटलेट नेहमी प्रमाणेच खमंग झाले होते. मावशीच्या हाताची चव माहित होती त्याला, तेव्हाच मोनिका म्हणाली )

मोनिका - आवडले का? मी स्वतःच्या हातानी बनवले आहेत.

अद्वैत - (तसं अद्वैतला तिच्या खोटं बोलण्याचा नवल आलं. किती धड धड खोटं बोलत आहे हि, पण त्यानी तसं काही दाखवलं नाही.) हो छान झालेत.

मोनिका - थँक्स हा.

(मग बराच वेळ मोनिका स्वतःला बद्दल खूप बोलत बसली. आपल्याला काय आवडता काय नाही, कुठे फिरायला जायला आवडते वगैरे सगळं.

अद्वैतला आता तिच्या बोलण्याचा वीट येऊ लागला पण तिची बडबड  काही कमी होई ना. खूप वेळानंतर आई आणि मावशी आल्या तेव्हा ती थांबली.)

नलूमावशी - झाल्या का गप्पा?

मोनिका- हो, पण अद्वैत काही बोलताच नाहीत, मी बोलत आहे किती वेळपासून.

नलूमावशी - का रे अद्वैत खरं आहे का? तसा तर तू केवढा बोलतो? (अद्वैत नी हलकीशी सामील दिली.)

मोनिका- हो, का. बरं चला आता मी निघते. (आणि सगळ्यांना बाय करून निघून गेली)

अद्वैत- मावशी काय हे?

नलूमावशी - काय म्हणजे काय? आम्हाला वाटलं तू स्वतःच शोधशील एखादी मुलगी, पण काम सोडून तुला काही दिसतं? आता आम्हीच करतो काय ते. तू ह्या मुलीला परत भेट आणि अजून जाणून घे आणि मग पुढचं आम्ही बघू.

अद्वैत- आई, मावशी तुम्ही प्लीज ऐकून तर घ्या.

आई- तुला आजपर्यंत इतक्या मुलींसोबत भेटवल पण माहित नाही तू अस काय बोलतो कि मुली निघून जातात.  तुझ आता पर्यंत आम्ही ऐकलं ना आता तू ऐक. तिला अजून एकदा भेट. आम्ही तुला फोर्स नाही करत पण सिरिअसली एकदा भेट.

अद्वैत- बरं. (नाइलाज म्हणून अद्वैतला हो म्हणाव लागलं.)

(मग थोडया फार अजून गप्पा मारून अद्वैत आणि आईनी नलूमावशीचा निरोप घेतला.)

२-३ दिवसांनंतर अद्वैतला मोनिकाच्या कॉल आलं. भेटायचं का आज? समरची बिलकुल इच्छा नव्हती पण हे चॅप्टर लवकर संपवून टाकाव आस वाटलं त्याला.

अद्वैत आणि मोनिका जवळच्याच एका हॉटेल मध्ये भेटले.

थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गपा मारल्या नंतर मोनिकाने स्वतःच विषयाला हात लावला.

मोनिका - खरंतर मी उगाच काही आढेवेढे घेणार नाही. मला तुझ्या बद्दल सगळंच माहित आहे. तुझं शिक्षण, तुझ्या कंपनीबद्दल. बाकी मला तर तू फार आवडला आहेस. फक्त लग्न साठी माझी एक अट आहे.

(खरं तर अद्वैतला मोनिकाच्या ओव्हर कॉन्फिडन्स बद्दल फार नवल आलं. मी हिला लग्न साठी हो कधी म्हटलं जे हि असं काही बोलत आहे? अद्वैतला आता तिचा रागच येऊ लागला तरी तो फार patience ठेऊन होता, नलूमावशीला वाईट ना वाटावं म्हणून.)

अद्वैत - कुठली अट?

मोनिका - लग्नानंतर आपल्यासोबत "डस्टबिन" नकोय.

अद्वैत - डस्टबिन??

मोनिका - तुझे आई वडील. (हसतच)

(खरं तर अद्वैतला तिचा इतका  राग आला कि वाटलं आता ह्या क्षणी निघून जावं. पण आता सगळं संपउनच जाव असं वाटलं त्याला. अद्वैत नेहमी मुलगी बघायला जायचा तेव्हा एक परीक्षा घायचा, तशीच आज मोनिकाची परीक्षा घायची असं त्यांनी ठरवलं.

अद्वैत - खरं तर मोनिका, मला पण तू फार आवडली. पण लग्ना आधी तुला खरं खरं सांगून द्यावा असं वाटते आहे. माझ्या कडे स्वतःच असं काही नाही, फक्त माझं शिक्षण सोडून. माझ्या कडे काहीच प्रॉपर्टी नाही आहे, जे आहे ते सगळं माझ्या वडिलांचं, जे मी कधीच घेणार नाही आणि राहिलं आई वडील सोबत राहायचं, तर ते माझ्या सोबत नाही मीच त्यांच्या सोबत त्यांच्या घरात राहतो. लग्नानंतर नाही राहणार, बाकी तू मला नक्की आवडली.

(तशी मोनिका रागात आली.)

मोनिका - तु माझी थट्टा करत आहेत ना?

अद्वैत - नाही ग, थट्टा कशाला करणार?

मोनिका - पण तु अस का करणार? एवढी मोठी प्रॉपर्टी सोडणार?

अद्वैत - हो. कारण जे काय आहे ते माझ्या वडिलांचं, माझं काहीच नाही. माझी तर अजून सुरुवात आहे. पण तुला तर मी आवडलो आहे ना?

(तशी मोनिका रागातच ताड ताड उठली आणि निघून गेली).

थोड्यावेळानी नलूमावशीचा अद्वैतला फोन आला.  

त्यानी सगळं सांगितलं आणि नलूमावशीनी कपाळावर हात ठेवला. कस होईल तुझं?

अद्वैत - मावशी, काळजी नको करू, माझी लग्नसाठी ना नाही आहे पण अशी कोणी हवी जी माझ्या वर प्रेम करेल ना कि माझ्या पैस्यावर.

मावशी - बरं, भेटेल हो नक्की. आईला पण फोन करून सांगून दे, कधीची वाट बघत आहे ती. तुझ्या आयुष्यात अशी मुलगी लवकर येवो हि ईश्वर चरणी प्रार्थना. (मावशी हसतच म्हणाली.)

क्रमशः

@vina deshmukh

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Vina Deshmukh

Housewife

Hi, I am fun loving housewife. Singing, dancing, writing and baking are my hobbies. I am a regular visitor on era. I love reading a lot.