Dec 05, 2021
प्रेम

एका प्रेमाची गोष्ट - Part 4

Read Later
एका प्रेमाची गोष्ट - Part 4

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागच्या पार्ट मध्ये....

 

लावण्याला बघायला रितेश येतो, त्याला लावण्या फार आवडते.....दोघं पण बाहेर भेटतात...लावण्या त्याला लग्नानंतर माझी आई पण आपल्या सोबत राहील तरच मी लग्न करेल अशी अट घालते....रितेश हो म्हणतो....आता पुढे

 

लावण्या आनंदात घरी जाते, तिला खूप खुश बघून आईला पण आनंद होतो.

आई- “अरे बापरे, फार खुश दिसत आहे, आवडला ना तुला रितेश? खूप आनंदात दिसत आहे म्हणून विचारलं, मगा

 तर चेहरा पडला होता अगदी. “

लावण्या - हुम्म्म्मम्मम

आई लगेच जाऊन देवापुढे साखर ठेवते आणि मनोमन देवाचे आभार मानते.

रात्री तिला झोपच येत नव्हती. मनात असंख्य विचारांनी गर्दी केली होती....खरंच आवडला का आपल्याला रितेश? मन एकदम होकार नाही देत आहे, मग कसं?

काही वर्षांपूर्वी आपण काय विचार करायचो ना, वाटायचं कि आपल्याला पण कोणी राजकुमार येईल घायला, आपण पण कोणाला आवडू, कोणी आपल्यावर पण अपार प्रेम करेल, आपल्याला पण कधी  'love at first site’ होईल, आपण पण कोणाच्या प्रेमात पडू, एकदम फिल्मी. मी खरंच किती वेडी होती, असं काही नसत.  रिऍलिटी आणि खर आयुष्य खूप वेगळं असतं. रितेश मला आवडला नाही, पण फक्त आणि फक्त माझी अट त्यानी मान्य केली म्हणून मी लग्नाला तयार झाली. जाऊ दे कदाचित हेच आपल्या आयुष्यात लिहिलं असेल.

विचार करता करता तिला झोप लागली.

आज लावण्याने सहज म्हणून सुट्टी घेतली होती.

"आई मी थोडा वेळ मार्केट मध्ये जाऊन येते ग, थोडी शॉपिंग करायची होती, तू येणार आहेस का?"...लावण्या

"एवढ्या सकाळी? आज दिवस भर सुट्टी आहे ना...मग दुपारी जा आरामात."...आई

"नको ग, मला आज अजून थोडे काम आहेत म्हणून लवकर जाऊन येते. सांग ना चलतेस का सोबत?" लावण्या

"नको ग बाई, कालचे खूप काम बाकी आहेत, तूच जाऊन ये, मी थांबते घरी'...आई

"ठीक आहे आई, मी येते लवकर जाऊन"...तशी लावण्या जायला निघाली. बघते तर गाडी सुरूच नाही होत.

चांगलाच पाऊस पडून गेला होता, त्यात लावण्याची गाडी सुरु होत नाही म्हणून तिने बसनी जायचं ठरवलं.

लावण्या थोडा वेळ चालत जाते. जवळच एका सिग्नलवर बसची वाट बघत असते, पावसामुळे बसस्टॉप समोर पाणी साचलं असते. बाजूला २-३ शाळेतल्या लहान मुली पण बस ची वाट बघत उभ्या होत्या. योगायोगाने ठीक त्याच्या उलट्या साइडला अद्वैतची कार उभी होती. आज अद्वैत कार चालवत होता, नेमका फोन आल्यामुळे कार साइडला उभी केली होती. बोलता बोलता अद्वैतच लक्ष त्या शाळेच्या मुलींकडे आणि बाजूला उभ्या असणाऱ्या मुलीकडे (म्हणजेच लावण्याकडे) जाते. त्या काही तरी टाळ्यांचा गेम खेळत असतात. तितक्यात एकदम एक ट्रक जोरात पास झाला आणि अद्वैतला वाटलं सगळं पाणी मुलींच्या अंगावर उडालं असेल, जसा ट्रक पास झाला तसं बघतो तर काय बाजूच्या मोठ्या मुलीनी स्वतःच्या ओढणीने स्वतःला आणि त्या शाळेतल्या मुलींना असं व्यवस्थित कव्हर केलं असते जेणेकरून रस्त्यावरचं पाणी तिच्या ओढणी वर उडेल. आणि तसच होतं, सुदैवाने मुलींचा स्कूल युनिफॉर्म खराब नाही होत पण लावण्याची ओढणी पूर्ण खराब होते...तशी स्कूलबस येते आणि मुली लावण्याला गालावर किस करून आणि बाय करून निघून जातात. अद्वैत ला त्या मोठ्या मुलीचं म्हणजेच लावण्याच फार कौतुक वाटते. तसा तो तिला शोधतो तर लावण्या दिसत नाही त्याला पण तिचा चेहरा कसा लक्षात राहून जातो. सध्या अद्वैत ला काहीच कल्पना नसते कि हि मुलगी आपल्याच कंपनी मध्ये आहे. 

 

दुसऱ्या दिवशी

सकाळी ऑफिस मध्ये आल्या आल्या लावण्यानी रितेश बद्दल श्रुतीला सगळं सांगून टाकल, श्रुतीला पण आनंद झाला.

ऑफिस मध्ये पोचल्यानंतर लावण्यालाला रितेश चा मेसेज आला.

'हाय लावण्या'

'हाय रितेश'

लावण्याला धड धड होत होतं, काही तरी प्रॉब्लेम आहे असं मनातून वाटत होतं तिला, शेवटी तेच झालं.

 'लावण्या, तुमच्या सोबत बोलायचं होतं मला, पण तुम्हाला कॉल करायची हिम्मत नाही माझ्यात, म्हणून मेसेज करत आहे. तुमच्या सोबत लग्न नाही करू शकत मी, माझ्या घरातल्या लोकांन आवडलं नाही हे आणि मी पण माझा विचार बदलला. तुमची आई आपल्यासोबत आपल्यालग्ननंतर नाही राहू शकत, मला माफ करा, तुमचा विचार जर बदलला तर मला नक्की सांगा. मी लग्नाला तयार आहे.

आलेला मेसेज लावण्यानी २-३ दा वाचला,

“unbelievable” .....तिच्या तोंडून शब्द निघाला.

तिला रितेशचा प्रचंड राग आला, हा असा कसा? एकतर स्वतःच घराच्या लोकांना न विचारता हो म्हणतो आणि मग नाही म्हणतो...

माणसाला स्वतःच काहीतरी मत नक्कीच असायला हवं...anyways

तसाच रागात ती त्याला रिप्लाय करते

'Go To Hell '.

तेवढ्यात श्रुती डेस्क वर येते आणि कॉफी प्यायला चल म्हणून विचारते.

कॅफेटेरिया मध्ये दोघी जातात. लावण्याचा उदास चेहरा बघून श्रुती विचारते तेव्हा लावण्या सगळं सांगून टाकते.

श्रुती- “अग लावण्या, तू प्लीज रिलॅक्स हो, नको टेन्शन घेऊ, असे फार लोक मिळतात लाइफ मध्ये, सोडून दे आणि देवाचे आभार मन.”

लावण्या- “देवाचे आभार, इतक सगळं झाल्यावर?”

श्रुती- “अग हो, बर झालं त्यानी आताच सगळं सांगितलं, हेच त्यानी लग्नानंतर सांगितलं असतं म्हणजे?

किती त्रास झालं असता तुला. So just leave it. कदाचित तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी वाट बघत असेल. काही तरी छान लिहिल असेल. ह्याहून पेक्षा काही छान होणार असेल, ऐक माझ, तू नको काळजी करू. सगळं देवावर आणि नशिबावर सोड.”

लावण्या – “तू आणि तुझी फिल्मी दुनिया. “

(आता लावण्यालाच थोडं मन हलक झालं. तिला सुद्धा श्रुतीच म्हणणं पटलं, खरंच ह्यानी लग्नानंतर नकार दिला असता तर काय करणार होतो आपण?.)

“आता तर मी ठरवलंच कि लग्नचं नाही करायचं, काहीही होवो...” लावण्या

श्रुती - (किती वेडी आहे हि मुलगी, देवा हिच्या आयुष्यात लवकरच प्रेमाचे रंग भरू दे.)

लावण्या - चल मूवी बघायला जाऊ इव्हनिंगला.

श्रुती - हे तू म्हणत आहेस?

लावण्या - हो, आता प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा ठरवलं मी.

श्रुती - व्वा ग्रेट यार, चल. 

 

अद्वैतच्या घरी

निनाद - काकू येऊ का?

वसुंधराताई - अरे निनाद ये, बैस. कसा आहेस?

निनाद - मी मजेत आहे काकू, अद्वैत ला एक फाईल द्यायला आलो. कुठे आहेत साहेब?

वसुंधराताई - रूम मध्ये. बस येईलच तो. निनाद बरं झालं तू आला, मी तुला फोन करणारच होती.

निनाद - ओह काय झालं काकू, चिंतेत दिसत आहेत, सगळं ठीक ना.

वसुंधराताई - तस सगळं ठीक रे, एक विचारायचं होतं तुला, अद्वैतला तर तू चांगलाच ओळखतो, ऑफिस मध्ये पण सोबतच आहात, तर मला सांग, ह्याच नेमकं काय सुरु आहे? लग्नाला हो म्हणत नाही, इतक्या मुली दाखवल्या तर माहित नाही त्यांच्या सोबत असं काय बोलतॊ कि त्या नाही म्हणतात, ह्याच कोना सोबत प्रेम प्रकरण सुरु आहे का?

(निनादला हसू फुटाते कारण त्याला अद्वैत मुलीच्या कशी परीक्षा घेतो हे माहित असते.)

निनाद - नाही काकू तस खरंच काही नाही, त्याला वेळच नसतो. कामात व्यस्त असतो.

वसुंधराताई - हो पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ना, तू बोल बरं त्याच्या सोबत.

निनाद - बरं नक्की काकू, तुम्ही निश्चिन्त राहा.

तेवढ्यात अद्वैत खाली येतो.

अद्वैत - काय गोष्टी सुरु आहे?

वसुंधराताई - काही विशेष नाही रे, बस असच. तुम्ही बस मी चहा आणते.

अद्वैत - मला वाटलं आई तुला माझ्या लग्ना विषयी सांगत असेल.

निनाद - तुला कस कळलं? हो तेच सांगत होत्या त्या.

अद्वैत – (हसतच) त्यात काय कठीण? आज काल ज्याला त्याला ती तेच सांगत असते.

निनाद - अरे मग खरंच आहे त्यांचं, एक तर कोणी शोध नाही तर त्यांच्या मनानी कर.

अद्वैत - लग्नं तर करणार राव पण अश्या मुलीशी जी एकदम मनापासून आवडेल, एकदम डोक्यात घंटी वाजेल. जिला मी आवडेल ना कि माझा पैसा. एकदा अशी कोणी भेटू तर दे, मग बघ काहीही करून तिच्यासोबतच लग्नं करेल, काहीही झालं तरी.

निनाद - आणि हि घंटी केव्हा वाजेल?

अद्वैत - वाजेल नक्कीच वाजेल, पण केव्हा ते माहित नाही.

निनाद - तुझी घंटी लवकरच वाजो (आणि दोघंही मनापासून हसतात.)

निनाद : चल बाहेर जाऊ थोडा वेळ.

अद्वैत: "आज श्रुती नाही आहे वाटते"....अद्वैत निनाद ची गम्मत घेत.

निनाद: तसं काही नाही रे, जसा मी तुला भेटायला येतच नाही. चल ना जाऊयात बाहेर कुठे तरी.

अद्वैत: अरे नको, आता विधी येत आहे घरी. तिला थोडं प्रोजेक्ट बद्दल बोलायचं आहे.

निनाद: हि विधी तीच ना रे जी तुझ्या नात्यात येते? ऑफिस मध्ये पण तुझ्या मागे मागेच असते. क्या बात है?

कूच बात है क्या?

अद्वैत: काय तू पण? कुठली पण मुलगी दिसली कि लग्नाचाच विचार करतात का?

ती माझ्या नात्यात आहे हे खरं आहे, आणि तसही ती जॉब शोधातच होती आणि आपल्या ऑफिस मध्ये प्रदीप सर ची जागा खाली होणार होती, सो मी तिला apply करायला सांगितलं. तशी ती हुशार आहे सो सीलेक्ट झाली.

निनाद : हुम्म्म......लग्नासाठी पण कर कोणी तरी सिलेक्ट.

अद्वैत: नक्कीच....लग्न ....घंटी....आठवलं ना

निनाद: हो बाबा आठवलं.

(मग दोघंही खळखळून हसतात)

----८ दिवसानंतर ऑफिस मध्ये ----

विधीच्या बसण्याची जागापण अद्वैतच्या cubical जवळच होती.

विधी बद्दल थोडं. विधी एक सुंदर आणि हुशार मुलगी. विधी अद्वैतच्या दूरच्या वहिनीची बहीण. एका लग्न समारंभात त्यांची ओळख झाली, तेव्हापासूनच विधीला अद्वैत आवडायला लागला. कितीदा तिने त्याच्याशी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न केला पण अद्वैत कामाच सोडून दुसरं

काही बोलायचं नाही, किती वेळा विधीनि त्याला indirectly खूपदा सांगितले पण अद्वैतनी कधीच लक्ष नाही दिले.  

विधी: (विधी मनोमन विचार करू लागली) "चला बरं झालं आपण ह्याच्या समोरच बसायला आलो. अद्वैत, अद्वैत, किती try केला पण तू काही option नाही सोडला. शेवटी तुझ्या ऑफिस मध्ये यावं लागलं. खरं तर मी एवढी हुशार, शिकलेली, सुंदर, तू तर स्वतःहून विचारायला हवं होत पण ठीक आहे तुला मी आवडली कि नाही माहित नाही पण तू मला आवडला आहे हे नक्की. आणि मला जे आवडते ते मी मिळवूनच राहते. आता मी काहीही करून तुला आपलंसं बनवूनच राहील, त्यासाठी तर मी इथे आले. बघू किती दिवस तू माझा नाही होणार. एक दिवस तर तुला माझं ह्यावच लागेल. एक दिवस माझं हे रूप पाहून तू पिघळशीलच, असेच असतात मुलं....तू पण त्याला अपवाद नाहीच....हे मी सिद्ध करेलच.'

विधी मिश्किल हसते, तेवढ्यात purse मधला आरसा काढते, स्वतःला बघते आणि एक वेगळ्याच प्रकारचा अहंकार तिच्या चेहऱ्यावर झळकतो.

दुसरीकडे लावण्याचा लीडर प्रदीप.

प्रदीप - हाय लावण्या.

लावण्या - हॅलो सर.

प्रदीप - लावण्या, तुझा कामाचा हुरूप बघून एक मोठा काम देणार आहे तुला.

लावण्या - ओह मला आवडेल सर नक्कीच.

प्रदीप - मला वाटलंच, काम थोडं डिफिकल्ट आहे पण मला वाटते तू नक्की करून घेणार.

लावण्या - thank you so much sir. तुम्ही मला त्यासाठी योग्य समजलं.

प्रदीप - नाही ग, तुझी कामाप्रती निष्ठाच सांगते तू छान करून घेणार. फक्त तुला तुझा क्युबिकल बदलाव लागेल, तू आता दुसऱ्या ठिकाणी बसणार.

लावण्या - no problem सर.

(लावण्या दुसऱ्या ठिकाणी बसते, तिचं क्युबिकल अश्या ठिकाणी असते जिथून अद्वैत तिला डायरेक्ट दिसतो आणि अद्वैतला ती.)

लावण्याची नजर सहज अद्वैत कडे जाते, तो कसल्या तरी कामात खूप व्यस्त दिसतो.

'बापरे, किती काम असेल ह्याला' ती विचार करू लागते.

पुढे प्रदीप सर तिला ८ दिवसांनी तिला एक प्रेझेंटेशन द्यायला लावतात.

खूप मेहनत घेऊन लावण्याने प्रेझेंटेशन पूर्ण केलं. गेली कित्येक दिवस तिने ह्या साठी खूप मेहनत घेतलेली असते. उद्या प्रेझेंटेशन द्यायचं म्हणून तिला थोडं टेन्शन पण आलं असते.

प्रेसेंटेशनच्या दिवशी सकाळी लावण्या लवकर उठते आणि लवकर रेडी होते. सगळं ठीक व्हायला हवं म्हणून देवाला आणि आईला नमस्कार करते.  

लावण्या - आई नमस्कार करते आशीर्वाद दे. आज खूप महत्वाची मीटिंग आहे. सगळं छान झालं पाहिजे.

आई - नक्की होईल बाळा, थांब दही साखर देते. काळजी करू नको सगळं छान होईल.

लावण्या आईला नमस्कार करून निघाली.  बाहेर जाऊन बघते तर काय, गाडी पंचर?

लावण्या - 'अरे देवा, माझी गाडी पंचर आज बहुतेक बस किंवा ऑटो नीच जावं लागेल.'

आज तर श्रुती पण येणार नाही आहे. लावण्यानी डोक्यावर हातच मारला. आता ऑटो किंवा बस सोडून पर्याय नाही. बराच वेळ चालून गेल्यावर एक बस स्टॉप दिसला. ती तिथे उभी होऊन बस किंवा ऑटोची वाट बघायला लागली.

इकडे अद्वैत घरून मीटिंगला निघालेला असतो.

रस्त्यात त्याची गाडी खराब होते,

"काय झाले काका?“ अद्वैत

सर गाडीत थोडा प्रॉब्लेम आला आहे." ड्राइवर काका

"बरं किती वेळ लागेल?" अद्वैत घड्याळ कडे बघत म्हणाला.

"थोडा वेळ लागेल नक्कीच लागेल, तुम्ही म्हणत असाल तर मी घरून दुसरी गाडी मागवू का?" ड्राइवर काका 

"नाही नको, त्यात वेळ जाईल. मी ऑटो घेउन जातो, इम्पॉर्टन्ट मीटिंग आहे, तुमचं झाले कि कार घेउन या तुम्ही "...अद्वैत

"बरं सर", ड्राइवर काका

अद्वैत ऑटो घेऊन कंपनी मध्ये पोचतो सुद्धा.

इकडे लावण्या बसची वाट बघत असते, अर्धा तास तिला बस किंवा ऑटो मिळतच नाही. तिच्या बाजूला एक गोड लहान मुलगी तिच्या आईसोबत बॉल खेळत असते. थोडाच वेळात लावण्याची तिच्या सोबत छान मैत्री झाली.

तेवढ्यात एक आलिशान कार त्या लहान मुलीच्या खूप जवळून जाते, लावण्या त्या लहान मुलीला लगेच ओढते नाही तर तिला कारचा धक्का लागलाच असता.

पण त्यात त्या दोघी पण पडतात, त्यात मुलीला थोडा खरचटते, लहान मुलगी रडायला लागते आणि तिला शांत करण्यात लावण्याचा थोडा वेळ जातो.

लावण्याला कारच्या ड्राइवर चा खूपच राग येतो, ती त्याला रागात ओरडते पण ड्राइवर काहीच लक्ष न देता समोर निघून जातो, लावण्या गाडीचा नंबर बघते, नंबर खूप सोपा असतो म्हणून तिच्या सहजच लक्षात राहतो.      

'आयुष्यात परत भेट कुठे, मग दाखवते' रागात पुटपुटत परत बसची वाट बघते…. थोड्या वेळात बस भेटल्यावर ती पण ऑफिसला पोचते.

क्रमशः...

@विना देशमुख

कथा कशी वाटली नक्की कळवा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Vina Deshmukh

Housewife

Hi, I am fun loving housewife. Singing, dancing, writing and baking are my hobbies. I am a regular visitor on era. I love reading a lot.