Dec 05, 2021
प्रेम

एका प्रेमाची गोष्ट - Part 1

Read Later
एका प्रेमाची गोष्ट - Part 1

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

एका प्रेमाची गोष्ट

Part 1

हि कथा आहे अद्वैत आणि लावण्याची. दोघांची तशी सध्या काहीच ओळख नाही, पण नियतीच्या मनात ह्या दोघांबद्दल काहीतरी वेगळच आहे. चला तर मग बघुयात.

अद्वैत, एक उच्च शिक्षित, ३३ वर्षाचा, हसरा आणि मेहनती मुलगा. सध्या सिंगलच कारण कामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशालाच वेळ नाही.

घरी आई आणि बाबा, बस एवढच लहान कुटुंब. अद्वैतचे वडील दिग्विजय पाटील आणि वसुंधराताई म्हणजे अद्वैतची आई. दिग्विजय पाटील, एक रुबाबदार व्यक्तिमत्व. चेहऱ्यावरून कठोर पण आतून तितकेच मऊ हृदय. सगळं स्टाफ त्याचं मनापासून आदर करायचा. आणि वसुंधराताई, जणू ममतेचा झराच. सगळ्यांना आपलंसं करून घायच्या.

खूप कष्टातून दिग्विजय पाटीलांनी स्वतःचा एक उद्योग सुरु केला होता. डी पी अँड सन प्रायव्हेट लिमिटेड  म्हणून एक कंपनी सुरु केली. हळू हळू हा छोटा उद्योग बराच मोठा झाला. आता त्यांचा स्वतःचा ब्रँड सुरु केला होता. एक छोटी सुरुवात खूप मोठी झाली होती. देश विदेशात त्यांचा ब्रँड  नावारूपाला आला होता. हा बिसनेस पुढे वाढविण्यासाठी अद्वैतनी पण खूप मेहनत घेतली होती. अद्वैतचा कामाप्रती हुरूप आणि बुद्धिकौशल्य बघून दिग्विजय पाटीलांनी हळू हळू अद्वैत वर सगळा भार सोपवणं सुरु केला.

आता थोडं लावण्याबद्दल, लावण्या एक गोड, कॉन्फिडन्ट मुलगी पण तितकीच हळवी. घरी फक्त लावण्या आणि तिची आई. लावण्याचे वडील तिच्या लहानपणीच गेलेले. आईनंच तिला लहानाच मोठं केलं. लावण्याला आईबद्दल नितान्त प्रेम आणि आदर. लावण्याचे बाबा गेल्यानंतर आईनंच शिकवण्याघेऊन लावण्याला स्वतःच्या पायावर उभ केलं होतं. शेवटी त्यांच्या कष्टच फळ मिळालं.

लावण्याला नुकत्याच २ कंपनीच्या ऑफर आल्या होत्या. एक पुण्यातच आणि एक बंगलोरला. बंगलोरची ऑफर खूप छान होती पण बंगलोरची ऑफर स्वीकारणं म्हणजे आई पासून लांब जाने जे तिला कधीच मान्य नव्हतं. शेवटी पुण्याची ऑफर तिनी स्वीकारली. ८ दिवसानंतर जॉईन ह्यायचं होतं. बंगलोरच्या ऑफर बद्दल आई नि तिला फार समजावलं.   

आई – “अग लावण्या, काय हरकत आहे? जा ग बंगलोर ला. तिथे तुला तुझ्या पुढच्या करियरसाठी खूप वाव आहे. माझ्यासाठी उगाच स्वतःच नुकसान नको करून घेउ. मीच आली असती तुझ्या सोबत पण मला तिथलं वातावरण सूट नाही होत पण नुसता ह्यासाठी तू स्वतःच नुकसान नको करून घेऊ”.

लावण्या – “आई हे सगळं माहित आहे मला, म्हणूनच तर मी ठरवलं मी तुला सोडून कुठेच जाणार नाही.”

आई - (थोडा हसतच) “ हुम्म्म म्हणे कुठेही सोडून जाणार नाही. आता असं म्हणत आहेस, उद्या तुझा राजकुमार येईल तेव्हा कशी त्याच्यासोबत लगेच निघून जाशील?”

लावण्या – “तेव्हाच तेव्हा बघू.” (माझ्या आयुष्यात मी कुणीही राजकुमार येऊच देणार नाही. तुला कधी आणि कुठेही सोडून जाणार नाही आई…...काहीही होऊ दे.....)

लावण्यानी मनोमन ठाम विचार केला.

वडील गेल्यानंतर आपल्यासाठी आईनी किती खस्ता खाल्ल्या हे लावण्यानी बघितलं होतं, वडील गेल्यानंतर लावण्याची आणि तिचा आईची जवाबदारी आपल्यावर यायला नको म्हणून सारे नातेवाईक दूर झालेत. इतकेच काय तर मामा, मामी, काका, काकू सगळे सांत्वन करून दूर गेलेत पण कोणी मदतीचा हात पुढे केला नाही. शेवटी लावण्याच्या आईनी खंबीर होऊन मिळेल ते काम करून आणि नंतर शिकवण्या घेउन लावण्याला लहान्याचं मोठं केलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. सगळं भूतकाळ डोळ्यासमोरून गेला तसं लावण्याच्या डोळ्यात चटकन पाणी आले.

 म्हणून काहीही झालं तरी मी लग्न करणार नाही, असा लावण्यानी मनोमन ठरवून टाकलं. हि गोष्ट तिनी कोणालाच सांगितली नव्हती फक्त तिच्या मैत्रिणीला म्हणजे श्रुतीला माहित होतं. श्रुती आणि लावण्या दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी. अगदी लहानपण दोघींचा सोबत गेलेला. श्रुती लावण्याला फार चांगली ओळखायची. विशेष म्हणजे श्रुती पण त्याच कंपनी मध्ये जॉब करायची जिथे लावण्याला जॉब लागला. श्रुती स्वतःच प्रेमात असल्यामुळे आयुष्य किती सुंदर आहे हे ती सतत लावण्याला सांगायची, पण लावण्यावर ह्याचा काहीही फरक पडायचा नाही. आपण कधीच प्रेमात पडणार नाही किंवा लग्न करणार नाही हे तिने ठरवलं होतं.  

 पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे तिला कुठे नाहीत होतं? सध्या लावण्या आपल्या नवीन कंपनी डी पी अँड सन प्रायव्हेट लिमिटेड बद्दल खूप उत्साहित होती. नवीन कंपनी कशी असेल, तिथले लोक आणि आपल्याला काम जमेल ना हे सगळं विचार ती करत होती.

क्रमशः  

कथा आवडल्यास कंमेंट नक्की करा.

Gmail :- [email protected]

Fb:- vina deshmukh

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Vina Deshmukh

Housewife

Hi, I am fun loving housewife. Singing, dancing, writing and baking are my hobbies. I am a regular visitor on era. I love reading a lot.